रानातल्या फुलांचा

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
16 Dec 2011 - 3:26 pm

जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो.

रानात जाउनी मी
होइन या फुलांचा
सहवास देवतांच्या
बागेतल्या मुलांचा...

किती रंगरुप त्यांचे
व्हावे मनात गोळा
भरगच्च रानराइ
वाटे ही सांब भोळा

मी एकटाच त्यांची
बांधेन देवळेही
परि मुळ तत्व त्यांचे
आहेच देवळे-ही

राना मधेच देव
मानायचाच झाला
रानामधुन फुलता
तो रान रान झाला

त्याचीच रूपकेही
त्याने प्रतीत केली
आंम्ही खुळ्या जनांनी
भक्तीत सोय केली

सारे अखेर त्याचे
त्याचेच फक्त आहे
मी कोणता स्वयंभू...?
त्याचे निमित्त आहे

वेडाहि मीच थोडा
देवाजिच्या मुलांचा
वेडास वेढणार्‍या
रानातल्या फुलांचा...
=====================================================================

करुणशांतरसकलासंस्कृतीकविता

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

16 Dec 2011 - 5:17 pm | मेघवेडा

वा वा! आवडली. आनंद, प्रेम, कृतज्ञता सारं जाणवतंय! छान. :)

सारे अखेर त्याचे
त्याचेच फक्त आहे
मी कोणता स्वयंभू...?
त्याचे निमित्त आहे

खूपच छान!'तत्त्वमसि'ची आठवण झाली! आता पुन्हा एकदा वाचणार. :)

स्पा's picture

17 Dec 2011 - 8:43 am | स्पा

गुर्जी.. फारच सुंदर हो...

जाम आवडली

प्रचेतस's picture

16 Dec 2011 - 5:50 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर.

राना मधेच देव
मानायचाच झाला
रानामधुन फुलता
तो रान रान झाला

अगदी खरे आहे.

आत्मशून्य's picture

16 Dec 2011 - 6:28 pm | आत्मशून्य

.

प्राजु's picture

16 Dec 2011 - 7:19 pm | प्राजु

सुंदर!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2011 - 8:55 pm | अत्रुप्त आत्मा

मे.वे.,वल्ली,आ.शू,प्राजु ताइ...धन्यवाद

लीलाधर's picture

17 Dec 2011 - 8:33 am | लीलाधर

व्वा व्वा सुंदर सुरेख काव्य निर्मिती ---^--- :)

सारे अखेर त्याचे
त्याचेच फक्त आहे
मी कोणता स्वयंभू...?
त्याचे निमित्त आहे

शेवटी कर्ता करवीता तोच आहे आपण फक्त निमित्त मात्र.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Dec 2011 - 5:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खुप आवडल्या गेली आहे. :)

दुर्लक्षित रानफुलांचा तुम्ही सन्मान केला आहे. त्यांना न्याय दिला आहे म्हणून रानफुलांच्या तर्फे धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2011 - 12:51 am | अत्रुप्त आत्मा

स्पा,च.चाणक्य,मि.का.,जागु ताइ.... धन्यवाद

काव्यवेडी's picture

18 Dec 2011 - 10:09 pm | काव्यवेडी

व्वा , खूप सुन्दर काव्य !!!