निसर्गाच्या ओढीमुळे कोकण दर्शनाची खुप वर्षानंतरची इच्छा काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाली. त्याची छायाचित्र.
१) सर्वप्रथम ज्याने कोकणाची निर्मिती केली त्या परशुरामाच्या मंदीराला भेट दिली.
२) प्रवेश द्वारातच ही दिपमाळ आहे.
४) मंडपाच्या भिंतीवरील हत्तीचे मुख
७) नुकतीच दिवाळी झालेली असल्याने मंदीराच्या बाहेरील आवारातील दुकानांबाहेर हे किल्ले बांधले होते.
१२) तिथल्याच देवळात बाजुला शंकरभगवानही होते.
१३) देवळाच्या बाहेर असलेली विहीर
१४) वेळणेश्वरच्या समुद्र किनार्यावर जाताना रस्त्यात लागलेल्या सुपारीला फुलोरा आला होता.
१५)
प्रतिक्रिया
22 Nov 2011 - 12:44 am | पाषाणभेद
हे वर्णन वेळणेश्वराचे आहे काय?
कोकणाला निसर्गाने भरभरून दान दिलेले आहे. त्याची प्रचिती फोटोंमधून आलेली आहे.
22 Nov 2011 - 12:44 am | रेवती
फोटो आवडले.
१७ क्र. च्या फोटोत दोघी कोळणींचा फोटू आहे का?
22 Nov 2011 - 1:05 am | प्राजु
वेळणेश्वर!!!
अप्रतिम!
माझ्या माहेरचं कुलदैवत आहे वेळणेश्वर!!
माझ कोकणातलं अतिशय लाडकं ठि़काण.
:)
22 Nov 2011 - 1:42 am | गणपा
प्रसन्न वाटलं.
22 Nov 2011 - 12:09 pm | मदनबाण
मस्त, मी सुद्धा मागच्या आठवड्यात वेळणेश्वराला जाउन आलो... :)
सवड मिळताच माझ्या कोकण दर्शनाचे फोटु टाकीन म्हणतो ! ;)
22 Nov 2011 - 9:33 am | अमोल केळकर
मस्त फोटो
परशुराम घाटातून दिसणारे चिपळूण टिपले नाहीत का ? :)
अमोल
22 Nov 2011 - 10:39 am | रुमानी
फोटो मसतच आहेत! पण जरा माहिति हवि होति.
22 Nov 2011 - 10:19 pm | रेवती
श्रुतीतै, जरा ८ ते १० दिवसांपूर्वीचे मिपावरचे धागे उसवलेत तर कोकणच कोकण आहे.
23 Nov 2011 - 11:34 am | वपाडाव
http://www.misalpav.com/node/19703#comment-351564
तासभर वाचुन काढा..... शांत होइल मन.....
22 Nov 2011 - 11:35 am | जागु
पाषाणभेद १ ते ८ परशुरामाचे मंदीर त्यानंतर वेळणेश्वर.
रेवती माहीत नाही ग. त्याही कदाचीत फिरण्यासाठी आल्या असतील.
अरे वा प्राजू मस्तच.
गणपा धन्यवाद.
मदनबाण फोटो टाका लवकर.
अमोल आम्हाला पोहोचायला उशीर होणार होता त्यामूळे मला हवी तशी फोटोग्राफी नाही करता आली.
श्रूती अग मलाच जास्त माहीती नाही म्हणून मी त्या फंदात पडले नाही. कोकणातील व्यक्ती चांगली माहीती देऊ शकतील.
22 Nov 2011 - 11:56 am | दीप्स
मस्त आहेत फोटो विशेषत: शेवटचा फोटो अतीशय सुरेख आहे.
22 Nov 2011 - 12:02 pm | ऋषिकेश
लोटे-परशुरामाच्या 'वर्जिनल' मंदीराची (आणि तिथल्या निर्मळ शांततेची) लावलेली वाट बघुन हल्ली नेहमीच वाईट वाटते. आता तर तिथे 'भक्तनिवास' बांधत आहेत म्हणे.
असो. बांधोत बापडे.. देऊळ चित्रपट बघताना हेच गाव आठवत होतं :(
बाकी, कोकणचे फोटो नेहमीच छान येतात.. तुम्हीही छान काढले आहेत!
23 Nov 2011 - 5:53 pm | मेघवेडा
अगदी अगदी. २००४ साली पहिल्यांदा गेलो होतो असाच भटकत भटकत आणि तेंव्हा तिथल्या त्या काळजात चर्र करणार्या पण निर्मळ शांततेच्या, तिथल्या निसर्गाच्या, त्या गावच्याच प्रेमात पडलो. मग खूप वेळा, ऑलमोस्ट दरवर्षी जात राहिलो पण गेल्या दोनेक वर्षात, विशेषतः यंदाच्या खेपेला हा परिसर जरासा अनोळखी आहे का काय असा भास होऊ लागला. :)
तंतोतंत साडेनऊशेवेळा सहमत. :)
(गेल्या कांही दिवसांत मिपावर कोकणच कोकण दिसतंय! हे आकडे प्रातिनिधिक म्हटले तरी कोकणचा पर्यटनक्षेत्र म्हणून होत असलेला विकास यांतून दिसून येत आहे हे पाहून खूप छान वाटलं! पण सोबत एक अनामिक भीती सुद्धा दाटून आली.)
22 Nov 2011 - 12:34 pm | वपाडाव
नारळाच्या बनातुन दिसणारा भास्कर केवळ अव्वल..........
22 Nov 2011 - 12:47 pm | जागु
मदनबाण, दीप्स, ऋषीकेष, वडापाव धन्यवाद.
22 Nov 2011 - 1:21 pm | प्रचेतस
जागुतै,
कोकणचं सुरेख दर्शन घडवलत आम्हाला.
22 Nov 2011 - 1:22 pm | सविता००१
सुंदर, अतिशय सुंदर
22 Nov 2011 - 1:53 pm | वाहीदा
समुद्र किनारा सुंदर सुरेख ....फोटो अप्रतिम !!
22 Nov 2011 - 2:45 pm | विशाखा राऊत
क्या बात है जागुताई.. एक्दम मस्त
22 Nov 2011 - 4:17 pm | जागु
वल्ली, सविता, वाहिदा, विशाखा धन्यवाद.
22 Nov 2011 - 4:17 pm | जागु
वल्ली, सविता, वाहिदा, विशाखा धन्यवाद.
22 Nov 2011 - 10:42 pm | मन१
इतके दिवस इथे पुण्यात असूनही कधीच कोकण नीट फिरता आला नाही ह्याचं वाइट वाटत.
एखाद दोन वेळेस कर्डे वगैरे बीच वर, दापोलीपाशी गेलो ते केवळ टीम पार्टी पुरताच. बीच,रीसोर्ट वगैरे प्रकार करून झालअजूनहीतरीही सगळच राहून गेलं ह्याबद्दल वाइट वाटतय. पावसबद्दलही खूप ऐकलय्,तळकोकणाबद्दलही.
वेलणेश्वर्,व्याडेश्वर्,गुहागर्,पेण,हरिहरेश्वर अशी शेकडो ठिकाणं पाहण्यासारखी, राहण्यासारखी आहेत. ही सगळीच ठिकाणं पहायचं मनात आहे. कधी योग येइल देव जाणे.
दोस्त लोक यायला तयार होत नाहित्.झालिच तर फिरायला नाही म्हणतात. बीचवर पडले राहून निवांत घोट घोट घेत घेण्यात त्यांना आनंद आहे. मला फिरायचय. एकटं कसं फिरावं, कसं प्लॅन करावं हे समजत नाहीये.
कुणी मदत्/मार्गदर्शन्/सहकार्य केल्यास त्या विमुक्त सारखाच एकटाही फिरायची तयारी आहे.
कुणी आमंत्रण दिल्यास त्यांना जॉइन करायचीही इच्छा आहे.
खिन्न...
22 Nov 2011 - 11:09 pm | पैसा
http://misalpav.com/node/19703
22 Nov 2011 - 11:46 pm | मन१
आत्ताच त्या धाग्याला बुकमार्क करून आलो.
23 Nov 2011 - 1:32 pm | वाहीदा
आत्ताच त्या धाग्याला मी ही बुकमार्क केलं.
धन्यवाद !
23 Nov 2011 - 12:38 am | चित्रा
फोटो आवडले.
23 Nov 2011 - 3:19 pm | महेश काळे
अप्रतिम फोटु..