तु फक्त उभा रहा-- २

किचेन's picture
किचेन in जनातलं, मनातलं
10 Nov 2011 - 3:23 pm

मला चक्कर यायचीच बाकी होती.
'तू एवढ सगळ कधी ठरवलं?'
'मी एकता नाही..मी आणि काकू मिळून.तू अडकलास पक्या!तुझ्याही डोक्याला मुंडावळ्या लाताकातायात आता.'
जवळ जवळ दीड तास आमच बोलन चालाल होत.इतक्यात

-----------------------------------------------------------------------------------------------------------

इतक्यात ती तयार होऊन समोर आली.तिच्या गोऱ्या रंगाला अगदी शोभेल असा जांभळा आणि मरून कलरचा घागरा.त्यावर नाजूक टिकली वर्क.जुन्या हेरोईन करायच्या तशी 'चीडीयाका घोसला' टाईप केशरचना! पण तिला अगदी सूट करत होती! मेक अप मध्ये तिचे डोळे अनिखीनच बोलके आणि सुंदर दिसत होते.
पण दिप्या एवढ सगळ बोलून गेला होता.त्यामूळे आता तिच्याकडे अस बघण योग्य वाटत नव्हत .आणि तो बोलल्याप्रमाणे बाकी सगळ्याचं लक्ष माझ्याकडेच होत याची जाणीव मला आत्ता झाली.इतक्यावेळ रूम मध्ये आम्ही दोघाच आणि आतल्या खोलीत बाईसाहेब एवढेच होतो.पण आत्ता माणसांची गर्दी वाढायला लागली.दिप्या देखील त्याचा लग्नाचा शेरवानी घालून रेडी होता.पण इथे बाईसाहेब थोडा तरी मेक अप करच म्हणून त्याच्या पाठीमागे लागल्या होत्या.दिप्या रेडी होत नव्हता.
'सांगा न हो तुम्ही दादाला!एकटाच नाही हा!'
'अहो पण मुल मेक अप करत नाहीत!' मुलीला अहो म्हण्याची हि माझी पहिलीच वेळ होती.दिप्या गालातल्या गालात हसत होता.'आणि तसाही तुम्ही याला काय मेक अप करणार?'
'मला अहो म्हणू नका प्लीज! अगदी म्हतार झाल्यासारखं वाटत! हे बघा डार्क स्पोट भरपूर आहेत.आणि कपाळाचा आणि हनुवटीचा रंग चेहर्यापेक्षा थोडा डार्क आहे! फेशियल केल असत तर ठीक होत.पण ऐकायचंच नाही न माझ! दादा ऐक माझ नाहीतर फोटो खराब येतील!'
तिने दिप्याच्या तोंडाला काय काय फासल देव जाणे.पण दिप्या आता बराच गोरा आणि फ्रेश दिसत होता.
रूममध्ये गर्दी वाढली तसा मी बाहेर गेलो.माझ्या ओळखीच कोणीच नव्हत.मग अशीच इतरांची चालेली घाई ,गडबड बघून उगीचच टेन्शन यायला लागल.थोड्याच दिवसात माझ लग्न...हि अशी मदत करायला आमच्या इथे कोणीच नाही.बाबा गेल्यापासून बाकी नातेवाकिंच आमच्या इथे येन कमी झालाय.मुळात बाबा सोलापूरहून इथे आले,हेच बाकीच्यांना पटल नव्हत.मग हि सगळी तयारी करणार कोण?बघुयात पुढच पुढे...पण तिच्या चेहऱ्यावरून तिला मी आवडेल अस वाटत नव्हत.तिचे वडील मुलाखत घेणार आहेत अस बोलला दिप्या.पण काय काय विचारतील?हि अशी वेळ माझ्यावर आधी आलीच नव्हती.मी शेफ आहे अस सांगितल्यावर देव जाणे कसल्या कसल्या रेसिपी विचारतील.
त्यापेक्षाही शेफ हे भारतासाठी नवीन आहे.मी शेफ आहे अस बोलल्यावर मला पसंत करतील का?
नक्क्कीच नाही.मी थोडा निश्चिंत झालो.मुलगी पसंत असली तरी एवढ्यात माझ लग्न काही होत नाही.पुढच्या वर्षी आलो तेव्हा बघू.अरे हो हा एक मुद्दा होता.मी वर्षभर घराबाहेर! काकांशी नॉर्मल गप्पा मारू.
स्टेजवर ब्राम्हण, फोटोग्राफर तयारी करत होते.एवढ्यात मुलीच्या मामानी मुलीला घेऊन यावे अशी कर्ण कर्कश्य विनंती करण्यात आली.दिप्याचा वरातीला विरोध होता म्हणून बर!नाहीतर बनंड वाल्यांचा तो आणखीन एक गोंगाट वाढला असता.
वधू-वर स्टेज वर गेले.दिप्यानी स्टेजवर जाताना 'चल तू पण' अशी खूण केली.खर तर मला स्टेज वर जायचं नव्हत पण त्याचा आग्रह म्हणून गेलो.लग्नाचे विधी सुरु झाले.कोणीतरी चिरक्या आवाजात मंगलाष्टक गायला सुरुवात केली.कळत काहीच नव्हत.फक्त शुभ मंगल सावधान ला दिप्याच्या डोक्यावर तांदळाचा मार बसत होता.मंगलाष्टक संपली.नवरा-नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले.मी स्टेजवरून खाली आलो. पुढचे विधी सप्तपदी,कन्यादान वगैरे चालू झाले होते.
सकाळप्रमाणेच बाईसाहेब आत्ताही पुढे पुढे करत होत्या.गोड दिसत होती ती!ति फच्त सुंदरच नाहि तर बोलकि, मनमिळवु हि होति.आम्च्य विचार्धार नक्किच जुळतिल. मग मी का नाही नाही करतोय? माहित नाही.पण लग्नाच्या बंधनात इतक्यात अडकायचं नाही.बास!पण का?तसा मी आता २७ चा.लग्नच वय झालाय आता.स्वतःच्या पायावरही उभा आहे.मुलगी छान आहे.सगळ्या गोष्टी जुळून येतायत!मग का नाही?कधी न कधी करायचाच आहे!मग आत्ता का नाही?मी गोंधळात पडलो होतो.
आलेल्या पाहुण्यांना स्टेज वरच्या विधींच काही सोयरे सूतक नव्हत.सगळे गप्पांमध्ये व्यस्त होते.तर काही कधी हे विधी संपतायत आणि ह्याच्या हातात पाकीट कोंबून जेवायला बसतोय ह्याची वाट बघत होते.मला गर्दीत आई दिसली.मी लगेच तिच्याकडे गेलो.
'आई काय चालू आहे हे सगळ?तू मला सांगितलं का नाहीस?"
'तुला किती वेळा लग्नाचं विचारल मी?पण हा विषय काढला कि तू लगेच विषय बदलतोस नाहीतर बाहेर निघुन जातोस.'
'आई पण...'
'पण बीण काही नाही!अरे जरा बघ किती सुंदर दिसतीये ती.हजारात शोभून दिसेल.इंजिनियर आहे,दोनदा अमेरिकेलाही जाऊन आलीये!नकाराचा प्रश्न येतचं नाही.हे बघ राजा नाही म्हणू नकोस.माझ्या डोळ्यासमोर तुझ लग्न झालेलं बघायचं मला'
आईने हळूच डोळे पुसले
'आई हे काय.काहीही होणार नाहीये तुला'
तेवढ्यात काका आले.पिनुचे वडील.आईने ओळख करून दिली.
थोड्या फार गप्पा झाल्या.काकांच्या बोलान्यारून त्यांना शेफ आणि अमेरेकेला राहतो याबद्दल काहीच प्रोबलेम नसल्याचे जाणवले.कदाचित त्यांनादेखील आधीपासूनच सगळे माहित असावे.ती अमेरिकेला जाऊन आलीये.म्हण्जे पासपोर्ट तयार आहे.विझाच बघता येईल.
मी स्टेजकडे बघितलं .दीपक वहिनींना मंगळसूत्र घालत होता.माल त्याच्या जागी मी आणि वहिनींच्या जागी ती दिसू लागली.माझा होकार पक्का.

पिनुही तयार होती.मला धक्काच बसला.आम्हाला एकमेकांची ओळख व्हावी म्हणून आतल्या खोलीत पाठवण्यात आल.तिला देखील हा सगळा प्लान आधीपासून माहित होता.ती डव्ह घरूनच घेऊन आली होती.पण मला बाहेर काढण्यासाठी दिप्यानी हि युक्ती वापरली होती.आणि मधल्या वेळात तिला हि सगळी कल्पना दिली होती.तेव्हा ती नाहीच बोलली होती.पण दिप्यानी तिला तयार केली.

दिपकने ठरवल्याप्रमाणे जागरण गोंधळाच्या दुसर्या दिवशी बैठक झाली.लग्न साधंच हवं ह्या माझ्या मागणीला थोडा विरोध झाला.पण नंतर सगळे तयार झाले.दीपकच्या लग्नानंतर बरोबर आठवडाभराने माझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या.लग्नाची पूर्ण जबाबदारी दीपकने सांभाळली.लग्न निर्विघाणपणे पार पडल.चि.सौ का.प्रियांकाही खूप खुश होती.मला अगदी माझ्या मनासारखा नवरा मिळाला.हे तिने मला निदान शंभरदा तरी ऐकवलं होत!(कदाचित तिला स्वयंपाक करता येत नाही त्यामुळे असेल!) ;)

थोडेच दिवसात डिपेडंट विसाच कामही पूर्ण होईल.आणि मग दोघे जोडीने यु एस ला.!
कोणी कोणास ठावूक कथा ,पटकथा ,नायिका सगळे ठरवून ठेवले होत.फक्त नायकाची एन्ट्री बाकी ठेवली होती.मी आकाशाकडे बघितलं.त्याला मनापासुन थंक्स बोललो.

कथा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार

लिहीत रहा....

जमल्यास तेवढे ते शिर्षक मात्र बदला बॉ.

आता कस बदलु?अस बदलता येत का? थोड सहकर्य करा.

जमल्यास तेवढे ते शिर्षक मात्र बदला बॉ.
पर्‍या तू पण ना ! ;)

प्रचेतस's picture

10 Nov 2011 - 3:35 pm | प्रचेतस

मस्त लिहिलय.
कथा आवडली.

धन्या's picture

10 Nov 2011 - 3:51 pm | धन्या

सगळं कसं गोग्गोड लिहिलंय... विश्वास नाही बसत तुम्ही लग्न जमवता यावर. कथा वास्तवापासून बरीच दूर आहे. ;)

थोडेच दिवसात डिपेडंट विसाच कामही पूर्ण होईल.आणि मग दोघे जोडीने यु एस ला.!

हे असं नसतो हो. मी पाहिलेल्या सार्‍या केसेसमध्ये नायक पुढे निघून गेला होता. आणि मग व्हिजाचं काम झाल्यावर नायिका मागाहून जॉईन झाली नायकाला.

सुट्टी वाढ्वुन घेनार आहे. ;)

भलताच नशिबवान दिसतोय तुमचा कथानायक. :)

वपाडाव's picture

10 Nov 2011 - 4:24 pm | वपाडाव

निर्विघाणपणे - तै, हे निर्विघ्णपणे असं लिहा.....

माल त्याच्या जागी मी आणि वहिनींच्या जागी ती दिसू लागली.

माल - हा शब्द वाचुन एकाचवेळी अनेक घंट्या माझ्या मस्तकात वाजु लागल्या.....

(अश्याच पिनुच्या शोधात असलेला) - वप्या

मोहनराव's picture

10 Nov 2011 - 4:55 pm | मोहनराव

<<माल - हा शब्द वाचुन एकाचवेळी अनेक घंट्या माझ्या मस्तकात वाजु लागल्या.....>>

बॅचलरच्या लाइफमधे हेच असत, घंट्या मस्तकात भरपुर वाजुन जातात पण तो त्याचा बँड बाजा लवकर वाजत नाही ना राव!!

(बँड बाजाच्या प्रति़क्षेत असलेला) - मोहन

अन्या दातार's picture

10 Nov 2011 - 8:35 pm | अन्या दातार

च्यायला तुम्हीपण प्रतिक्षेतच का?
बघा हो किचेनतै, कित्ती कित्ती स्कोप आहे नै तुम्हाला (आता फक्त हा स्कोप कुठला ते इचारायचं नाय ;) )

मोहनराव's picture

10 Nov 2011 - 11:00 pm | मोहनराव

:)

पियुशा's picture

10 Nov 2011 - 4:32 pm | पियुशा

@ व प्या .
माल - हा शब्द वाचुन एकाचवेळी अनेक घंट्या माझ्या मस्तकात वाजु लागल्या.....

बरोब्ब्रर ,तुझ्याच डोक्यात वाजणार घंट्या ;)
घंट्या मोकळ्या जागेतच खणखण वाजतात ;)

वपाडाव's picture

10 Nov 2011 - 4:37 pm | वपाडाव

उगी उगी बाला....असं नै ललायचं....खाउ खाणाल का? चॉक्की देतो हां....

= आपण लौकरच आप्ल्या डोक्यातील बटाट्यांची एखादी पाकृ करुन दाखवाल अशी अपेक्षा.....

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 5:48 pm | स्मिता.

मस्त सुचलं हां पियु तुला!
म्हणून रोज शाळेत जावं ;)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणून रोज शाळेत जावं

पियुशा's picture

11 Nov 2011 - 10:19 am | पियुशा

पर्या ,,,घे हसुन घे एकदाच !
पार बाजार उठवनार आपण आमचा ;)

शिल्पा ब's picture

11 Nov 2011 - 8:40 am | शिल्पा ब

=)) :-D :lol:

तिमा's picture

10 Nov 2011 - 4:57 pm | तिमा

एकता, लाताकातायात, बोलन,चालाल, हेरोईन, अनिखिनच, दोघाच, मुल्,म्हण्याची, म्हतार, नातेवाकिंच, बनंड वाल्यांचा, फच्त, मनमिळवु, बोलकि, आम्च्या, विचार्धार, बोलान्यारुन, प्रोबलेम, विझाच, अक्षदा, निर्विघाणपणे.....

एवढेच शब्द टाईप करताना घाम फुटला. तुमच्या चिकाटीचे कौतुक आहे.

किचेन's picture

10 Nov 2011 - 5:09 pm | किचेन

धन्य आहात! किति वेळ वाचत होतात? शाळेत मराठिचे शिक्षक असणार तुम्हि! ;)

प्रभाकर पेठकर's picture

10 Nov 2011 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर

नशिबवान आहात.

लेखन सुधारलेत तर आम्ही वाचकही स्वतःला 'नशिबवान' समजू.

अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.

रेवती's picture

10 Nov 2011 - 9:14 pm | रेवती

हा हा हा...
सहमत. गोष्ट छान आहे. पण गोष्ट म्हणूनच छान आहे.

मागे एकदा विनंती केली होती, आता माझ्यकडुन तरी इशारा समजा, शुद्धलेखनाच्या चुका एखादेवेळेस मान्य पण शब्दलेखनाच्या चुका करु नका, प्लिज, नाहीतर वर श्री. वपाडाव यांचेप्रमाणे प्रत्येक चुकीचे अर्थ लावले जातील. आणि तिमांशी सहमत.

अधिक परांशी तर सहमतच, शिर्षक बदला. मा, संमं ला शरण जा हवं तर.

मायला किचेन का किचन. नक्की आयडी काय आहे का त्यात पण गफलत आहे.

- पिंगू

किचेन असच नाव आहे माझ. त्यात काहिहि चुकिच नाहि!

नगरीनिरंजन's picture

11 Nov 2011 - 8:32 am | नगरीनिरंजन

गोष्ट आवडली नाही आणि टंकनदोषामुळे आणखीनच रसभंग झाला.
केवळ दिसण्यावर लट्टू होणार्‍या आणि घरच्यांनी सगळं ठरवलेल्याला बुगुबुगु मान डोलावणार्‍या कथानायकाचं भवितव्य उघड आहे.
असो. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.

उदय के&#039;सागर's picture

11 Nov 2011 - 11:49 am | उदय के'सागर

खरंच! सहमत... गोष्ट अगदीच अवडली नाहि.

आणि अगदी कळ्कळीची विनंती , कृपया टंकलेखन सुधारा!!!!!!!