हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया
मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ||
घरचा नळ नाय कामाचा
सार्वजनीक हाय नळ गर्दीचा
वाही रातंदिस पानकाळ्याचा
त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया
मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१||
खालीवर दांडा करावा बरं
थोडं कष्टांचं काम हाय सारं
पानी येतंयं हापसून न्यारं
बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्हाती ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२||
सार्या बायांनी याची चव घेतली
एकजात सार्यांनी पसंती दिली
हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली
त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||३||
- पाषाणभेद
०७/११/२०११
प्रतिक्रिया
7 Nov 2011 - 7:59 pm | चंबा मुतनाळ
हातपंपाचे महत्व पटवून देणारी कविता. दुष्काळग्रस्त भागांमधे गृहिणींना ह्याचाच आधार असतो. सगळे नळ कोरडे झाल्यावर काय बरे करावे ह्या मातांनी! फक्त सहकाराचे महत्व देखील विशद करावयास हवे होते असे वाटते. पहिलीने पंप मारावा व दुसरीने आपली घागर भरावी, मग दुसरीने पहिलीला मदत करावी.
खूपच आवडली बॉ
-चंबा
7 Nov 2011 - 8:46 pm | दादा कोंडके
कल्पनाविस्तार आवडला! :)
7 Nov 2011 - 8:54 pm | धमाल मुलगा
शाहीऽऽर........
औंदा नारायनगावातल्या मौसमातली पयली सुपारी तुमास्नीच भेटनार बगा. :D
8 Nov 2011 - 3:23 pm | मेघवेडा
हेच! धम्माल गीत! लै मजा आली हो इष्टोनबिरेकर! ;)
7 Nov 2011 - 9:27 pm | गणेशा
काय ओ शाहिर ...
तुम्ही तर कुठल्याही गोष्टीवर एकदम झ्याक लिवता
7 Nov 2011 - 9:54 pm | विदेश
हातपंपानं पानी छान हापसलय !
7 Nov 2011 - 11:29 pm | आनंदी गोपाळ
मी एकटीच निजले..
रात्रीच्या अंधारात..
नको तिथंच पडला
अवचित माझा हात..
हाताखाली
नांगा काढून,
वैरिण ती बसली...
ग बाई मला
इश्काची इंगळी डसली!
अग बाई मला.. इश्काची इंगळी डसली... वा! काय सुंदर रचना होती ती!!
बाई ग.. बाई ग!!!
--(हातपंपाने आनंदी झालेला) गोपाळ
8 Nov 2011 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा
सार्या बायांनी याची चव घेतली..... कहर. ;-)
एकजात सार्यांनी पसंती दिली
हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली
त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||३||.... --^-- धन्य धन्य हो पाभे तुमच्या परतिभेची....आंम्ही मागे दिलेली उपाधी अगदी सार्थ करताय हो....भेदकपाषाण ;-)
8 Nov 2011 - 12:31 pm | वपाडाव
आपल्या विनंती खातर.....
मी हापसते लाव तुझी घागर,
गंगे, सखे या गं जरा लौकर,
नंतर तु पण मदत मला कर,
आमा सार्याची तहान भागती ग बया,
मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||४||
8 Nov 2011 - 12:47 pm | सुहास झेले
स्पीचलेस :) :)
8 Nov 2011 - 1:18 pm | चिरोटा
छान कविता.
8 Nov 2011 - 1:46 pm | मदनबाण
दफोरावांनी बरचं पाणी हापसुन ठेवलेले दिसते ! ;)
8 Nov 2011 - 2:29 pm | उदय के'सागर
धम्माल! भारीच रंग चढलाय! :D
8 Nov 2011 - 3:30 pm | मोहनराव
लै भारी!!
8 Nov 2011 - 6:56 pm | धन्या
च्यामारी, संस्कृती रक्षक कुठे र्हायले म्हनायचे? ;)
8 Nov 2011 - 9:21 pm | प्रभो
पाभे, लई भारी!!
9 Nov 2011 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घरचा नळ नाय कामाचा
सार्वजनीक हाय नळ गर्दीचा
वाही रातंदिस पानकाळ्याचा
त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया
मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१||
शाहीर पहिल्या दोन ओळींचा अर्थ सरळ घेतलेलाच बरा नाय का ! :)
-दिलीप बिरुटे
9 Nov 2011 - 9:24 pm | धमाल मुलगा
काय राव गुर्जी,
फडाची लावनी है ही. ;)
10 Nov 2011 - 5:51 am | प्रकाश१११
एकदम भन्नाट ..
घरचा नळ नाय कामाचा
सार्वजनीक हाय नळ गर्दीचा
वाही रातंदिस पानकाळ्याचा
त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया
मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१||
मी संगीतकार असतो तर ....???