ह्या खिडकीतून...[भाग -२]

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जनातलं, मनातलं
3 Nov 2011 - 8:29 am

http://misalpav.com/node/19495

ध्यान तर लागले.डोळेपण मिटून गेले.झोपेने आपले पाश आवळले.
मग मध्येच जाग आली. डोळे किलकिले करून सहज बघून घेतले.
उंच आभाळात आमचे विमान तरंगत होते.
बाहेर जांभूळ रंगाचा प्रकाश पसरलेला
विमानात हवाई सुंदरीची लगबग चालू होती. ट्राल्या घेऊन काहीकाही देणे सुरु होते...
चहा ,कॉफी ,थंड पेय
मग हलके हलके बाहेर आभाळाचे रंग बदलू लागले .जांभूळ रंग बदलू लागला .तांबूस छटा आभाळात मिसळू लागल्या
मग कधीतरी हलकेच खिडकीची झडप उघडली.
नि भळकन प्रकाश खिडकीतून घुसला .डोळे दिपून गेले. सगळे झोपेत होते.
हवाई सुंदरी लगबगीने जवळ आली. मंजुळ आवाजात किंचाळली -
"नका उघडू खिडकी. सगळे झोपलेत..!"
नि तिनेच सराईतपणे गोल खिडकीचे शटर बंद केले. खिडकीचा डोळा बंद झाला .
किती वाजलेत ..?
प्रश्न पडला.
कुणास ठाऊक..?
काय करावे. कळत नव्हते .मन कंटाळून गेले होते .
मग सहज गंमत म्हणून मी बायकोकडे बघून घेतले.
एक छान जाणवले अशा ह्या मस्त प्रवासात
आपलीच बायको आपल्याला नव्याने सापडून जाते.
खूप निराळी निराळी वाटू लागते.
आपण आभाळात उडणारे निळे निळे पाखरू होऊन जातो
नि ती मस्त झाड होते......!!

मी अगदी सहज घड्याळात डोकावले.
आता वेळेचे गणित बदलले होते.
भारतीय वेळ येथे चालणार नव्हती. भारतात सकाळचे 1o वाजून गेले होते नि येथे पहाट झाली होती.
मी मधूनच खिडकीच्या फटीतून नजर टाकीत होतो.

मनात आले ...
अरे प्रथम प्रवास करतोय विमानाने नि खाली कसली अदभुत दुनिया पसरलीय ते नको बघायला ...?

माझ्या नजरेला दिसणारे ते शुभ्र ढग .
नुसता कल्लोळ ढगांचा.
प्रकाशाचा सुंदर चमक्तार त्या ढगांवर कोसळत होता
ते सगळे बघणे म्हणजे किती स्वर्गीय आनंद ठेवां होता .हे बघितल्या शिवाय कसा जाणवणार..?
मग हलके हलके सगळे डोळे उघडू लागले
प्रातर्विधि आटोपून घेतले
चहाचा गंध मनात झिरपू लागला .
ट्राली आली.
भरलेला नाश्ता घेऊन आली. .स्यांडविच,ब्रेड आम्लेट काय नि काय
थोडासा नाश्ता उरकून घेतला.
चहा घेतला.
विमानातील चहा म्हणजे दिव्यं अमृतानुभव आहे.
मी परत खिडकी हलकीशी किलकिली केली .
मंद प्रकाश बाहेर झिरपत होता.
निळा,जांभळा केशरी ,
कोणी सराईत चित्रकाराने सहज फराटे मारावे तसे आभाळ दिसत होते

खूप खोलवर काळ्याभोर शेताचे तुकडे दिसत होते. आखीव रेखीव अशी छोटी-छोटी घरे दिसत होती.
मलातर आम्ही लहानपणी गणपतीची सजावट करायचो तसे ते गाव वाटत होते. ते डोंगर नद्या तो घाट रस्ता .बोटाने कुरवाळीत नांगरलेले शेत सगळे मस्त वाटत होते
कोठले गाव ,कोठले शहर होते कुणास ठाऊक ?
मलातर खेडेच वाटत होते. टुमदार नि आखीव रेखीव.
मला गाव आवडून गेले.

हलके हलके प्रकाश दाट होत गेला. अजूनही खिडक्या बंद होत्या. काही माणसे झोपेत होती. काही पेंगत होती .
विमानात एक निराळेच निळे निळे वातावरण होते.
हवाई सुंदरीच्या चेहर्यावर छान प्रसन्न स्मित होते.
मग हलके हलके आमचे विमान जरा जरा खाली आलेसे वाटू लागले.
खोलवर नदी असाविसे वाटू लागले. आतातर रस्ते दिसू लागले. ट्रक, गाड्या आगकाडीच्या पेटी एवढ्या दिसू . भासू लागल्या
फ्र्यांकफर्ट आले असावे असे वाटून गेले. आणि मग हलके हलके रस्ते घरे मोठी मोठी दिसू लागली.
विमानाने धावपट्टीवर पळण्यास सुरवात केली . मोठमोठ्या अगडबंब ट्रक विमानासमोर चिमुकल्या वाटू लागल्या.
स्पीकरवर अनौंउन्समेंट होत होती.

पहिला पडाव पार झाला होतो
उतरण्याची कोणीही घाई करीत नव्हता. कोणीही उतरणार नाही असेच वाटत होते.
विमानाच्या दरवाजाजवळ विमानातील २-३ कर्मचारी व पायलट आम्हाला बाय बाय करण्यासाठी उभे होते..मग आम्हीपण त्याना बाय म्हणून खाली उतरलो .
दुसरे विमान कसे पकडायचे ..?
सगळे नवीन. नवखे.
काय करावे समजत नव्हते.
छोट्या पत्र्याच्या बोगद्यातून आम्ही सरकत होतो. वेळ तसा भरपूर होता .छोट्या लॉबीत आलो .तेथून एक जिना वर जातोय नि एक खाली जातोय. कोणीतरी कर्मचारी उभा होता. त्याला विचारले. त्याने बोटानीच खून करून जिना दाखविला. वर मोठा बोर्ड होता. त्यावर विमान नंबर नि गेट नंबर दिलेला होता.
हुष :. सापडला विमान नंबर नि गेट नंबर.
जसा बाण तसे जात राहिलो चालण्यास वेग पकडला .
सुरक्षा गेटमधून आम्ही पुढे सरकलो.

पुढचा प्रवास आठ तासाचा . विमान मिळाले.
आता आम्ही थोडे थोडे हुशार झालो होतो.
आम्ही आमच्या सिटा पकडल्या टोर्याटोला उतरलो. नि तेथून आमच्या मुक्कामी डोम्यास्टिक विमानाने थेट एडमिंटन
आम्ही आमची लढाई जिंकली होती. कारण आमच्या प्रवासाची एकट्याने लढलेली लढाई होती .
तशी सोपी सोपी नि मनात खूपशी अवघड वाटत होती
सल्ले देणारे खूप होते. सांगणारे खूप होते.
आम्ही मोठ्या हॉलमध्ये प्रवेश करताना आमचा पुतण्या आमच्या स्वागताला उभा होता.
सोबत त्याचा मित्र ,मित्राचे आई -बाबा सर्वजण आतुरतेने वाट बघत उभे होते.

[ परत कधीतरी ]

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

जाई.'s picture

3 Nov 2011 - 9:12 am | जाई.

वर्णन छान केलय

कच्ची कैरी's picture

3 Nov 2011 - 12:52 pm | कच्ची कैरी

अरे वा प्रकाश तुम्ही गद्य आणि पद्य दोघीकडेही !!!आज बर्याच दिवसांनी तुमच लिहलेल वाचल .

पैसा's picture

3 Nov 2011 - 1:35 pm | पैसा

पण पुढचा भाग परत कधीतरी का म्हणे?

प्रकाश१११'s picture

4 Nov 2011 - 10:01 am | प्रकाश१११

जाई ,कच्ची कैरी , नि पैसा
मनापासून आभार.

प्रकाश१११'s picture

4 Nov 2011 - 10:01 am | प्रकाश१११

जाई ,कच्ची कैरी , नि पैसा
मनापासून आभार.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Nov 2011 - 2:53 pm | निनाद मुक्काम प...

मस्त लिहिले आहे.

बाहेरील हॉल मध्ये मग ते भारतात असो की परदेशात आपली जवळची माणसे पाहून जो आनंद होतो तो शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही .
किंबहुना विमान प्रवासात सगळ्यात हुरहूर लावणार क्षण म्हणजे कस्टम मधून सर्व सोपस्कार पार पडले की बाहेरील हॉल मध्ये जाणारी वाट जी आपल्याला उगाच मोठी वाटते .आपले समान त्यावेळी जरा जास्तच जड वाटते. मात्र हॉल मध्ये फलक घेऊन टाय लावलेल्या घोळक्यातून आपली माणसे शोधणे अजिबात अवघड नसते. ते बिचारे बर्याच लवकर तेथे मोक्याची जागा पटकावून उभे असतात.

हॉटेल मेनेजमेंट चे दिवस आठवले. काही महिने विमानतळाच्या लगत पंचतारांकीत हॉटेलात हमाली ( ट्रेनिंग असे गोंडस नाव ) करायचो तेव्हा काम सुटल्यावर रात्री २ ते ५ पर्यत विमानतळावर भटकंती करायचो. ह्या सुमारास अमेरिका व इतर दूरवरून अनेक विमानांचे आगमन होत असल्याने बाहेर जमलेले पंजाबी ,गुजराती मराठी माणसांचे समूह असायचे. काही लोक हर तुरे घेऊन असायचे.

आजी आजोबा पासून अनेक हवशे नवशे तेथे जमलेले असायचे. आपल्या नातवंडांना मिठीत घेणारी आजी .किंवा पेरी पेंदा , जय श्री कृष्णा म्हणत विमानतळावर नमस्कार करणाऱ्या बहु सगळे वातावरण एकदम मंत्रमुग्ध करणारे असे. लहान मुलांचे चित्र विचित्र केशभूषा व कपडे सार्यांचे आम्हाला अप्रूप वाटे. दीर्घकाळ चालणार्या गळाभेटी नी एका डोळ्यात हसू तर एका डोळ्यात आसू सारेच पाहण्यारखे असायचे.

आमच्या काही सिनियर हवाई सुंदर्या झाल्या होत्या. त्यांची वर्णी थेट पंचतारांकीत हॉटेलात असायची. त्यांना दिवसाला खर्च करण्यासाठी बक्कल पैसा मिळायचा पण तरीही हॉटेलात त्यांची आम्ही सरबराई करायचो.
त्याबदल्यात सिगरेटी , मद्ये ( ऑर्डर केल्याप्रमाणे ) त्या आणायच्या.
एक मेका सहाय्य करू ,अवधे धरू सुपंथ ह्या वर हा व्यवहार चालायचा.

आठवीत असतांना रमेश मंत्र्यांची प्रवास वर्णने वाचली होती. असाच प्रवास करावा जग पहावे भटकंती करावी ह्या त्याकाळातील मनातील सुप्त इच्छेला अंकुर ह्याच वातावरणात फुटले.

आजही मुंबई विमानतळ असो किंवा लंडनचे हिथ्रो ( ज्याला चिटकून आमचे हिल्टन आहे) तेथे आलो की मन जुन्या आठवणीत रमते.
ह्या लेखामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

प्रकाश१११'s picture

5 Nov 2011 - 10:51 am | प्रकाश१११

निनाद-माझ्या लेखामुळे आपल्या जुन्या आठवणी चाळविल्या.खूप बरे वाटले ,आभार ..!!

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2011 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार

शिर्षक वाचून उत्साहाने धागा उघडला, मात्र घोर निराशा झाली असे खेदाने सांगावेसे वाटते.

प्रकाश१११ हे आमचे चांगले मित्र असल्याने, आमची नाराजी दूर करण्यासाठी ते लवकरच ह्या शिर्षकाला साजेशी कविता आम्हाला व्यनी करतील अशी अपेक्षा ठेवतो.