पकलो आता, फार झाला

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
31 May 2008 - 3:20 pm

तीन दिवस फक्त वादविवाद पाहुन पकलो (हा आमचा खास शब्द बर का!) कोठुन आला ते विचारु नका #:S
मिपावर एक सुंदर काव्य दिसलं आणि मोह आवरला नाही :O
सुधीर मोघे लिहितात...
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा
झुलतो बाई रास-झुला!

(हो जे front pageवर आहे ना तेच)

तर माझा एक प्रयत्न

पकलो आता, फार झाला

हा बी पिळे,तो बी पिळे, तुम्हीबी पिळा

टिकेची वेणू, शिव्यांच्या टिपर्‍या

वाढतात वाद, तापताच काया

कोणाच्या नावावरी, कोणालाही पिळा

अर्थहीन भासे, वादाचा रंग

तर्कहीन सारे, नुसताच तवंग

चोहीकडे धगं दिसे, तरीहि बावळा

गुंतलास कोठे, कसं कळेना तू

प्रेमाची प्रार्थना, केव्हा सुटशील तू

बुध्दी झरे, मति सरे, द्वेष उतु चालला

पकावु चेतन

अवांतर : ह.घ्या. नाहितर उगच म्हणाल हा कोण मोठा उपदेश करतोय नको ते

मुक्तकविडंबनसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

1 Jun 2008 - 1:51 pm | अरुण मनोहर

>>> तर्कहीन सारे, नुसताच तवंग
तर्रीविन सारे नुसताच तवंग
सारे लागले पिळू आपण गिळू
जरी मळमळू :SS
---खवय्या.

चेतन's picture

2 Jun 2008 - 1:50 pm | चेतन

तर्रीविन हा शब्द पण मस्त आहे

असो बहुतेक मी पिळ्ण्याचाबाबतित नविनच दिसतोयं (इथे बरेचजण पोहोचलेले दिसतायत)

अपचनी चेतन