राधा गौळण

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
23 Sep 2011 - 6:08 am

राधा गौळण

आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ||

दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी
पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१||

गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी
वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२||

मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या
आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११

शृंगारअद्भुतरसप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

23 Sep 2011 - 6:16 am | शिल्पा ब

छान. आवडलं.

आधीच्या चावनट धाग्यानंतर असं देवाचं लिहिल्याने तुम्हाला पुण्य लागेल.
शंभो!!

पाषाणभेद's picture

23 Sep 2011 - 6:23 am | पाषाणभेद

हॅं हॅं हॅं
आमचीं पापं पुण्यांची दोन्हीं तागडं एकां सरंळ रेषेंत राहण्याचीं आम्हीं काळजीं करतं असतों. त्यामूळें कधीं हें तर कधीं तें.

असों. कवितां आवडलीं तें महत्वाचें. कसें

शिवशंभो..................!!!!

नगरीनिरंजन's picture

23 Sep 2011 - 7:13 am | नगरीनिरंजन

आधीच्या चावनट धाग्यानंतर असं देवाचं लिहिल्याने तुम्हाला पुण्य लागेल

:-) डायरेक देवाचं लिहीलं तर?

शिल्पा ब's picture

23 Sep 2011 - 7:22 am | शिल्पा ब

लिहुन बघा अन आम्हाला सांगा काय वाटतंय ते...समजुन घ्यायला हवं तर विद्वानांची मदत घ्या.(मिपावरच बरेच विद्वान सापडतील.)