मराठी विकीवरही अनेक मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या सदस्य पानावर लावण्यासाठी आता मिपा चिन्ह मराठी विकीवर तयार करण्यात आले आहे.
{{सदस्य चौकट मिसळपाव सदस्य|टोपणनाव=अमुक}} हा साचा अमुक ऐवजी स्वत:चे मिसळपाव संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे मिपाचिन्ह चौकट तुमच्या सदस्य पानावर दिसू लागेल.
माझ्या सदस्य पानावर पाहा.
From 12 August 2011
चला तर मग, या तुमच्या विकिपानावर!
आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अ ब पाहायला विसरू नका!
अ ब = अलीकडील बदल
प्रतिक्रिया
12 Aug 2011 - 11:11 am | निनाद
मिपावर टाकण्यासाठी ही छानशी चौकट वापरायला सांगणार होतो, पण हा कोड का चालत नाहीये. छान चैकटीत दिसत नाहीये - का ते कुणी सांगू शकेल का? -
म विकिमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे
कोड हा कसा दिसतो ते येथे पाहा.
कुणी एचटीएमएल वाले मदत करणार का?
12 Aug 2011 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार
निनाद,
प्रतिसाद दिल्यानंतर त्यात जर एचटीएमएल कोड युज केला असेल तर कायम प्रतिसादाच्या चौकटीखाली Input format मध्ये क्लिक करुन Full HTML सिलेक्ट करत जा.
15 Aug 2011 - 6:58 am | निनाद
धन्यवाद परा! येथून पुढे लक्षात ठेवीन... :)
12 Aug 2011 - 11:44 am | वपाडाव
निनादजी थोडे विस्कटून सांगाल काय?
वर काय चाल्लंय हे झेपत नाहीये......
वाईट नका वाटून घेउ पण थोडे खुलासेवार सांगितले तर बरे झाले असते असे वाटते...
12 Aug 2011 - 12:03 pm | गवि
नॉट समझींग्ड..
12 Aug 2011 - 12:19 pm | माझीही शॅम्पेन
???
+ १
12 Aug 2011 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार
मिपा
मी परिकथेतील राजकुमार या नावाने मिसळपाव संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.
ते बहूदा ह्या कोड बद्दल बोलत असावेत. जो तुम्ही तुमच्या विकीच्या सदस्य पानावर किंवा मिपाच्या खरडवहीत अथवा तुमच्या सहीत थोडेफार जुजबी बदल करुन लावु शकता.
ह्याचा कोड कुणाला हवा असल्यास :-
< div style="float:right; border:2px solid #db300d; margin:1px;" >
< table cellspacing="0" style="width:238px; background:white;" >
< tr >
< td style="width:45px; height:45px; background:#db300d; text-align:center; font-size:22pt; color:white;" >< b >मिपा< /b > < /td >
< td style="font-size:8pt; padding:4pt; line-height:1.25em; color:#db300d;">मी < b >परिकथेतील राजकुमार< /b > या नावाने मिसळपाव< /a > संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.< /td >
< /tr >
< /table >
< /div >
< p> < br / > < /p >
< क्ष्य्झ > मधल्या स्पेस काढून टाका.
15 Aug 2011 - 7:31 am | निनाद
इस्कोट करतो!
मराठी विकीवर आपण सदस्य झालो की तेथे आपल्याला एक सदस्य पान मिळते. (खरे तर अनेक पाने मिळतात!) त्यावर आपली माहिती असते. विकीवरून नवीन सदस्यांना एकमेकांशी संपर्क साधणे सोपे व्हावे. तसेच सदस्यांचे जाळे घट्ट व्हायला हवे. एकमेकांशी संपर्क सोपा व्हावा. या सर्व कारणांनी आपण इतरत्रही कुठे आणि कोणत्या नावाने सभासद आहोत हे तेथेच सांगता यायला हवे. यासाठी एक छोटी चौकट बनवून त्या पानावर टाकली जाते. यामुळे विकीवरचे मिपा सदस्य एका ठिकाणी सापडू शकतात. खाली माझ्या सहीत निनाद नावावर क्लिक केले की ते माझ्या विकी सदस्यपानावर घेऊन जाईल ते पाहावे.
हा संबंध दोन्ही बाजूंनी असावा म्हणून सदस्याच्या विकीपानावर मिपाचे नाव असावे आणि मिपावर विकीचे नाव असावे म्हणून चौकटी बनवल्या आहेत. त्या सदस्यांनी आपापल्या पानावर लावाव्यात म्हणून येथे दवंडी द्यायला आलोतो! पण दवंडी देतांना इतर कार्य बाहुल्य होते त्यामुळे ती धड दिली नाही यासाठी दिलगीर आहे!
पराने तो कोड धडपणे दिसेलसा बनवून दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार!
पराने दिलेला कोड आपल्या सहीत लावल्यास अजूनच उत्तम
अशा एकत्र येण्यामुळे मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प चालवले जाऊ शकतात. त्याद्वारे मिपा सारख्या संकेतस्थळांवरची प्रताधिकार नसलेली किंवा मुक्त माहिती विकिपीडियावर संकलित करता येते. ती संदर्भ म्हणून वापरली जाऊ लागते. विकीवरच्या माहितीचे संदर्भ मिपावर लेखन करतांना देता येतात. यामुळे मिपाची उत्तम दर्जाचा मजकूर असणारे स्थळ म्हणून किंमत वाढते आणि काही प्रमाणात विकीची विश्वासार्हता वाढत जाते.
आजच्या घडीला मिसळपाव विषयक माहितीही मराठी विकीवर नाही. हे पाहा विकीवरचे मिपापान चला बनवू या पान.
खरे तर मिपा आता इतके समॄद्ध आहे की मिपाची सर्वांगीण माहिती देणारे मिपा नावाचे दालन तेथे असावे असे मला वाटते. कुणी मदत करणार असेल तर कार्य पुढे जाऊ शकेल.
आपला
निनाद
----
मविकी
मीनिनादयानावानेमराठीविकिपिडियाचासदस्यआहे.
(बहुदा कोड अजूनही चालत नाहीये :( Full HTML यावेळी सिलेक्ट केलेले आहे...)