तुला पाहिले मी बाकि काही पाहिले ना,
आयुष्य पुष्प फक्त!, अन्य काही वाहिले ना.
उध्वस्त झाले गाव, मला काय त्याचे,
मी विचारले कि, माझे घर राहिले ना?
तुच्छ वाटे मजला दुःख कोणतेही,
फसवे वचन तुझे ते सांग साहिले ना.
जे पाहिले होते मी तुझ्या संगतीने,
ते विश्व चांदण्यांचे अद्याप पाहिले ना.
प्रतिक्रिया
11 Aug 2011 - 5:16 pm | गणेशा
अप्रतिम गझल अभिजित ..
मनापासुन आवडली
विषेशकरुन
आणि विश्व चांदण्यांचे एकदम मस्तच..
------------
साहिले ह्या शब्दाचा अर्थ निटसा कळला नाहिये.
साहिल म्हणजे किणारा ना.
साहिले म्हणजे सहण केले असा अर्थ लिहिलेला आहे काय ?
अवांतर : फर्स्ट रीड फर्स्ट रिप्लाय
12 Aug 2011 - 2:16 am | अभिजीत राजवाडे
गणेश राव,
काय दिलखुलास प्रतिक्रिया दिली. वाहवा!!!
साहिले हा शब्द सहन या अर्थाने योजिला आहे. तुम्ही बरोबर ओळखले.
मी तुमच्या इतरांच्या लेख आणि कवितांवर दिलेल्या प्रतिक्रिया हि वाचल्या फारच परिपक्व रसग्रहण\विश्लेषण करता तुम्ही.
असाच स्नेह वाढावा, हि अपेक्षा.
आभार!!!
12 Aug 2011 - 3:17 pm | गणेशा
धन्यवाद मनापासुन.
आत्ताच तुमची दुसरी कविता वाचली आणि मग हा रिप्लाय पाहिला.