गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला !
जाउ दे त्याला किती उंचावरीही -
दोर आम्ही नीट त्याचा कापलेला
तोंड भरुनी मानलेला जो सलोखा
पाठ फिरताना गळा का दाबलेला ?
काल माशी ना उठे नाकावरीची -
आज मिरवी शूर नेता गाजलेला !
शांतिचा नारा घुमे दाही दिशांना
नेम तो जनतेवरी का रोखलेला ?
प्रतिक्रिया
28 Jul 2011 - 7:30 pm | गणेशा
शांतिचा नारा घुमे दाही दिशांना
नेम तो जनतेवरी का रोखलेला ?
मस्त
29 Jul 2011 - 10:45 am | कवितानागेश
दुसरे कडवे कळले नाही.
जरा इस्कटुन सांगा.
29 Jul 2011 - 11:01 am | विदेश
दोराच्या सहाय्याने एखादा गिर्यारोहण करू इच्छितो, पण आमची मानवी वृत्ती त्याला थोडेच सुखासुखी
सहजासहजी ध्येय प्राप्त करू देणार ? अडथळा आणणारच !