वरचा "सा"

विश्वेश's picture
विश्वेश in जनातलं, मनातलं
20 Jul 2011 - 10:27 am

आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस .....
आज आमच्या संसाराच्या सुरावटीने वरचा "सा" गाठला ...

पहाटे पहाटे उगाच मला पल्लवी जोशी चा भास झाला ... आणि ती कर्ण कर्कश्श आवाजात ओरडली "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात है !". मी आपले सगळे स्पर्धक करतात तसे खोटे खोटे "हि हि हि, धन्यवाद" वगैरे केले ... आणि उठलो. पहिले तर गेल्या आठ वर्षातले सगळे चढ उतार समोर परीक्षक म्हणून उभे होते ... अनेक वेळा डेनजर झोन मधून बायकोच्या साथीने मी शिताफीने बाहेर आलो ... कित्येक वेळा फ़क़्त तिच्याच मतांचा आधार होता. दिवसाची अशी अपेक्षित सुरुवात झाल्यावर कसे अगदी routine मध्ये असल्यासारखे वाटते ... हायसे वाटते ... बाजूला पहिले तर आमची द्वंद्व गीताची साथी (संसाराच्या गाण्याला किती चांगले रूपक आहे हे ... द्वंद्व गीत) आणि आमचा एकमेव हक्काचा प्रेक्षक दोघेही अजून झोपले होते .... मी पटकन विचार केला ... च्यायला एखादे फुल बिल आणून बायकोच्या उशीखाली ठेवावे ... पण तिने सवयीने उठल्यावर तिने जोर जोरात उशी झाडली ... तर उगाच चुराडा ... surprise चा पण आणि फुलांचा पण ... जाऊदे आपल्याला असे करावेसे वाटले ह्यातच सगळे आले ... आई शप्पत मी हे सगळे मनात बोललो होतो ... पण कसे काय माहिती नाही ... बायको झोपेतच हसली ... आणि पोराने नेहमीप्रमाणे तिचे "च" अनुकरण केले ....

मी आपले दुधाची पिशवी घेतली, चहाचे आधण ठेवले ... खरच नेहमी पेक्षा आज वेगळे वाटत होते ... म्हणजे शरीर नेहमीच्याच कृती करत होते पण आज ते करतानाचे frustration नव्हते ... घाई नव्हती ... खरच ८ वर्षापूर्वी जन्मास घातलेले "नाते" आज मोठे झाले.... mature झाले ... श्या पुन्हा उगाचच जमीन हादराल्याचा भास झाला .... आणि निर्मिती तैंचा आवाज ऐकू आला ... "विनोद" मोठा झाला ..... आता बास झाले ... हे कार्यक्रम पहाणे बंद केले पाहिजे ... असे पुन्हा एकदा मी स्वताला बजावले .... चहा ओतू गेला .... एरवी गाढ झोपेत असणारी बायको नेमकी चहा आपल्या हातून ओतू गेल्यावर बरोब्बर मागे कशी काय उभी असते काय माहिती ... पण आज ती नव्हती ... (अरे वा आज नशीब पण साथ देत आहे ...) असुदे ... सगळे आवरून नेहमी प्रमाणे बायकोला office ला सोडले, पोराला शाळेत सोडले ... आणि स्वता टपरीवर चहाचे झुरके घ्यायला सुरुवात केली ...

लग्नाचा आठवा वाढदिवस .....
नक्की काय वाढते ह्या दिवशी ... एकमेकावरील प्रेम ? जिव्हाळा ? नात्याची दृढता ? वगैरे वगैरे .... हे फार पुस्तकी झाले ... मला विचाराल तर वाढतो एकमेकाबरोबर जगण्याचा अनुभव ! आणि कुठल्याही गोष्टीचा अजून १ वर्ष अनुभव वाढला कि आपोआप तुमचा आत्मविश्वास वाढतो Domain Expertise वाढतात ! अर्थात बायको हे Domain इतक्या झपाट्याने बदलत असते कि upto date राहण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात. ह्याच्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो अगदी सारासारपणे अनेक दिवस विचारपूर्वक घडवून आणलेला बदल किवा वृद्धी (अपेक्षान्मधली) ते अगदी एखाद्या मैत्रिणीने नुकताच उपभोगलेला तिचा लग्नाचा वाढ-दिवस. असो आज हे बोलायचा दिवस नाही ... उद्यापासून आहेच ....

पण खरच "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात है !" ... भैया और १ कटिंग .... और आज क्रीम रोल भी दो ....

धोरणअनुभव

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

20 Jul 2011 - 10:39 am | बहुगुणी

..."बायको हे Domain इतक्या झपाट्याने बदलत असते कि up to date राहण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात..."....

नक्कीच वरचा 'सा'! ;-)

(फक्त हा 'अनुभव' 'धोरण' या सदरात का बुवा?)

विश्वेश's picture

20 Jul 2011 - 10:51 am | विश्वेश

उगाच !

मुलूखावेगळी's picture

20 Jul 2011 - 11:06 am | मुलूखावेगळी

..."बायको हे Domain इतक्या झपाट्याने बदलत असते कि up to date राहण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात..."....

नक्कीच वरचा 'सा'! Wink

+१
लाईकेश

प्रीत-मोहर's picture

20 Jul 2011 - 10:51 am | प्रीत-मोहर

हेहेहे .हो म्यारिज अ‍ॅनिवर्सरीच्या शुभेच्छा!!

मृत्युन्जय's picture

20 Jul 2011 - 10:56 am | मृत्युन्जय

लिहिले आहे ते छान लिहिले आहे. अजुन थोडे रंगवता आले असते. पण आवडले.

विश्वेश's picture

20 Jul 2011 - 10:58 am | विश्वेश

इतना पैसा मे इतनाइच मिलेन्गा ...

पाषाणभेद's picture

20 Jul 2011 - 11:11 am | पाषाणभेद

जम्या जम्या

नक्की काय वाढते ह्या दिवशी ... एकमेकावरील प्रेम ? जिव्हाळा ? नात्याची दृढता ? वगैरे वगैरे .... हे फार पुस्तकी झाले ... मला विचाराल तर वाढतो एकमेकाबरोबर जगण्याचा अनुभव

मस्त ..
आवडले एकदम ..
पुढिल अश्याच गोड अनुभवांसाठी अनेक शुभेच्छा.