निळ्या निळ्या नभातून -
कोसळती शुभ्र धारा ;
काळ्या काळ्या मातीतून -
ओल्या गंधाचा फवारा ;
हिरव्या हिरव्या कोंबातून -
दिमाखात ये फुलोरा ;
पिवळ्या पिवळ्या फुलांतून -
झुले तो सोनपिसारा ;
अज्ञातशा कुंचल्यातून
खेळ रंगतो हा न्यारा !
सप्तरंगी अफलातून
इंद्रधनूचा नजारा -
फुलतो रोमांचातून
मनमोराचा पिसारा -
होई चिंब मिठीतून ...
सण पाऊस साजरा !