दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
11 May 2011 - 5:16 pm

( चाल : शूर आम्ही सरदार आम्हाला )

दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !
लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ|

मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत
दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत
लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१|

धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं
सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं
आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२|

( सूज्ञांस संदर्भ वे. सां. न. ! )

अद्भुतरससंस्कृतीविडंबनजीवनमानराहणीमौजमजा

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

12 May 2011 - 6:36 am | नरेशकुमार

तुमची कविता आवडली, एक मलाबि सुचलीय बघा.

दूर आहे कॉम्पुटर, यांना नाही कुणाची भीती !
लाज-बीज अन् शरमहि नाही , यांनी किबोर्ड घेतले हाती |धृ|

धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच यांना ठावं
अनंत फोरम्सवर कसं जगावं , हेच यांना ठावं
मागची-पुढची सारी अब्रु यांनी टांगली वेशीवरती |२|

दूर आहे यांचा कॉम्पुटर, यांना नाही कुणाची भीती !
लाज-बीज अन् शरमहि नाही , यांनी किबोर्ड घेतले हाती |धृ|