निरुत्तर

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
22 Apr 2011 - 1:15 pm

हॉल खच्चुन भरला होता.
विद्यार्थी -पालक सभा.
नविन सिलॅबस.
दहावीच्या पालकांना हायपर व्हायला आणखी एक कारण.
दोन कार्यक्रमामधे अर्ध्या तासाचा ब्रेक.
त्यात तो भेटायला येणार होता.
शाळेतल्या गुणवंत मुलामधला.
मुख्याध्यापकांची आग्रहाची विनंती.
टाळणे शक्य नव्हते.
-----------------------------------------------------------------------------------------
सभा सुरु झाली.
चौथ्या वाक्यात मांडीवरील लहानगीने भोकाड पसरले.
मी थांबलो.
सुज्ञ शिक्षीकेने आईला वर पक्षाच्या खोलीकडे नेले.
कुणी तरी दबल्या आवजात कॉमेंट केली.
मुले फिदीफिदी हसली.
-----------------------------------------------------------------------------------------
तो आला.
चेहेरा रागाने लालबुंद.
१५ मिनिटे बोलत होता.
नंतर शांत झाला.
त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे तेंव्हातरी उत्तर नव्हते.
-----------------------------------------------------------------------------------------
"किती तरी वेळ सांगितले. ऐकतच नाही. शाळेतल्या ओपन डे ला सुद्धा आली. सरांनी गरज नाही हे सांगुन सुद्धा. किती सहन करु सर? किती चेष्टा सहन करु सर? ३जी, अ‍ॅक्सीसडेंट. सहन न होणारे असेच कितीतरी टोमणे. सोडतच नाहीत.
कधी कधी वाटते घर आणि शाळ दोन्ही सोडावीत. आम्हाला कळते. ह्यांना कळत नाही. आजीचा सल्ला ऐकला नाही. एवढ्या उशीरा नको आपल्याला. म्हणे मला कंपनी. आणखी वर बेबी सिटींग चा आग्रह. आय हेट हर. आजच्या फिडींग वरुन उद्या शाळेत काय काय बोलातील नेम नाही. Stupid cow. Why did she carry the pregnancy.? अबॉर्शन केले असते तर काय बिघडले असते. अभ्यासात लक्षच लागत नाही सर. सांगा मी काय करु?
त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे आजही उत्तर नाही.

-----------------------------------------------------------------------------------------

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

22 Apr 2011 - 1:26 pm | छोटा डॉन

इन जनरल प्रभुसरांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे अस्तित्वात नसतात किंवा त्यांचे अस्तित्व मान्य करणे आपल्यालाच त्रासदायक ठरावे अशी असतात.

बाकी अशी उदाहरणे पाहण्यात असल्याने अजुन काही लिहण्यासारखे नाही, बाकी ठिक.

- छोटा डॉन

हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे :) ज्याच्या त्याच्या कडे उत्तर हवं :)

-(स्वतःच्या प्रश्नांची स्वतःच उत्तरं शोधणारा ) टारझन

ज्या समस्या माहीती नाहीत त्या आमच्यासारख्यांना सांगून गोंधळात टाकणे हे काही बरोबर नाही.
उगाचच गार -गार लागतं असं सांगून मारुतीच्या बेंबीत बोट घालायला लावता.

स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid cow करणार्‍या दिवट्याचे त्याच्या आई बाबांनी वेळीच कान उपटले असते तर अशी वेळ आली नसती.
दोष आई-वडलांचा आहे.
हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकिच्यांनी त्याच्याशी सहमत असाव असा आग्रह नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2011 - 6:11 pm | परिकथेतील राजकुमार

स्वत:च्या आईचा उल्लेख Stupid cow करणार्‍या दिवट्याचे त्याच्या आई बाबांनी वेळीच कान उपटले असते तर अशी वेळ आली नसती.
दोष आई-वडलांचा आहे.

कदाचित आईवर हा निर्णय लादला गेला असेल.

हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकिच्यांनी त्याच्याशी सहमत असाव असा आग्रह नाही.

आपल्या मताचा आदर आहे ;)

अवांतर :- बर्‍याच वर्षापूर्वी आमच्या वाड्यासमोर सोसायटीचे काम चालू होते तेंव्हा त्या बांधकामावरील लमाणी बाई, तीची सुन आणि नात तिघी एकाच वेळी प्रेग्नंट होत्या.

गणपा's picture

22 Apr 2011 - 6:58 pm | गणपा

कदाचित आईवर हा निर्णय लादला गेला असेल.

मुलगा फाड फाड इंग्रजीत बोलतोय म्हणजे चांगल्या शाळेतला म्हणजेच खात्या पित्या घतातला असावा. (हा अंदाज आहे.) शिवाय एक मुलगा असताना (टिपीकल मेंटॅलिटी जरी गृहीत धरली की मुलगा हवाच) आईवर हा निर्णय लादला गेला असेल असं वाटत नाही.

समजा मान्य केलंच की जबरदस्तीने हा निर्णय तिच्यावर लादला गेला तरी 'मोकळे' होण्याचे मार्ग का कमी आहेत आपल्या देशात ?

आनंदयात्री's picture

22 Apr 2011 - 7:23 pm | आनंदयात्री

सहमत. गणपा नेहमी माझ्या मनातले बोलतो.

शाहरुख's picture

22 Apr 2011 - 6:14 pm | शाहरुख

One of life's best coping mechanisms is to know the difference between an inconvenience and a problem. If you break your neck, if you have nothing to eat, if your house is on fire, then you've got a problem. Everything else is an inconvenience. Life is inconvenient. Life is lumpy. A lump in the oatmeal, a lump in the throat and a lump in the breast are not the same kind of lump. One needs to learn the difference.

- Robert Fulghum

सांगा हे त्या पोराला..इंग्लिश झाडतोय येव्हढे तर हे ही समजेल.

चतुरंग's picture

22 Apr 2011 - 6:54 pm | चतुरंग

एकदम खणखणीत कानफडात भडकावली आहे! :)

-(लंपी)रंगा

स्पंदना's picture

24 Apr 2011 - 1:09 pm | स्पंदना

__/\__
अपर्णा

चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे आई, वडील आणि मुलगा ह्यांची सभा घेणे. गरज पडली तर वैयक्तिक सिटिंग्ज घेऊन समजावणे. पौगंडावस्थेतल्या मुलांना संवेदनशीलतेनेच हाताळावे लागते. कारण काहीही असो आज त्याला एक छोटी बहीण आहे आणि हे सत्य टाळण्याचे किंवा त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याचे काही कारण नाही. प्रत्येकाची/प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते हे त्याला समजले पाहिजे आणि त्याच्या घरच्यांनाही. त्या छोट्या बहिणीबद्दल अतिशय तिरस्काराची भावना निर्माण झाली तर तो तिला भावनेच्या भरात इजाही करु शकतो हे लक्षात घेऊन तातडीने प्रश्नावर मार्ग काढणे जरुरीचे वाटते!

-रंगा

पौगंडावस्था - ते वय वेडं असतं. आई-मुलाला एकत्र समजवले पाहीजे. मुलगा गुणवंत विद्यार्थ्यांमधला आहे, ऐकेल, न ऐकून कुठे जाईल? लहान आहे, मोठा झाल्यावर समजेल.

पण त्याने इतके सांगून त्याची आई-लहान मुलीला घेउन का आली? तिचे चुकलेच. फक्त वडील किंवा ती एकटी आली असती तर काही बिघडले नसते.

एक दोन अश्या ओळखीच्या केसेस आहेत, अर्थात त्यावेळी ह्या मुलाची जी प्रतिक्रिया होती तीच बरीचशी त्या दोघांची होती. आता अर्थात सगळे ओके आहे. त्यामुळे हा काही मोठा प्रश्न वाटत नाही. आई-वडलांनी मुलाच्या कलाने जरा घ्यायला काही हरकत नाही. मुलगा भावनेच्या भरात जास्त बोलून गेला आहे. गुणवंत आहे समजावल्यावर ऐकेल. मास्तर समुपदेशन काय केले ते देखील सांगा.