नको येवुस कविते( ३)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
20 Apr 2011 - 3:32 pm

काय सांगतील पोरी
या आसवांच्या ओळी
दु:खाच्या खाणीत
तव स्वप्नांची होळी

नको येवुस माहेराला
अवकळा सारी
क्षीण आहे भाव अन
जीव झाला भारी

सुख गेली दावणीला
शब्दही फितुर झाली
झोपडीच्या झरोक्यातुन
रात्र टिपुस ओली

उजाडलं रान सारं
तिथ आठवांची धुळ
माखलेल मन आज
जनु पारंब्याचा पिळ

नाही काही इथं
सार सार संपल
तुझ्या पिर्तीची ओढ
बस्स हीच जीवन वेल

---- शब्दमेघ (२० एप्रिल २०११)

२. नको बोलु बाबा काही :- http://www.misalpav.com/node/17097
१. हरवली पोर माझी कविता नावाची :- http://www.misalpav.com/node/17082

करुणकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Apr 2011 - 3:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुख गेली दावणीला
शब्दही फितुर झाली
झोपडीच्या झरोक्यातुन
रात्र टिपुस ओली

__/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2011 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुख गेली दावणीला
शब्दही फितुर झाली
झोपडीच्या झरोक्यातुन
रात्र टिपुस ओली

आवडल्या ओळी.

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

20 Apr 2011 - 4:15 pm | पियुशा

मस्त लिहिलय गनेशा जि :)

प्रकाश१११'s picture

20 Apr 2011 - 6:32 pm | प्रकाश१११

गणेशा -
उजाडलं रान सारं
तिथ आठवांची धुळ
माखलेल मन आज
जनु पारंब्याचा पिळ
छान लय.एकदम +१

नगरीनिरंजन's picture

20 Apr 2011 - 7:57 pm | नगरीनिरंजन

छान आहे गणेशा!
थोरामोठ्याच्या घरी मुलगी दिलेल्या गरीब बापाची कहाणी वाटते.

मस्तच गणेशा. पण हा विषय कसा काय सुचला? कारण विषय वेगळाच आहे. हाताळणी तर उत्तमच , हे वेगळे सांगायलाच नको. :)

प्रथमता सर्वांचे मनपुर्वक आभार :

@ निनाव
"हरवली पोर माझी कविता नावाची " ही कविता कवी आपल्या पोरीस म्हणजे कवितेस बोलतोय अश्या अर्थाने लिहायला घेतली सहज .. खुप दिवस शब्दच सुचत नसल्याने ..आणि आपोआपच ती एका बापाची कहानी झाली ..
मग मुलगी-वडील यांचेच संभाषण पुढील कवितेपासुन आहे या सिरिज मध्ये .. (नगरी निरंजन, राघव यांनीही एकेके कविता लिहिल्यात अश्या)
आता पुढील कवितेत मुलगी बोलेण याला उत्तर ...
बस्स बाकी विशेष प्रसंग असा नाही..
पण नगरीनिरंजन म्हणतात तसे .. कवितेतील बाप हा गावाकडील गरीब शेतकरी आहे ... त्याची भाषा .. शब्द.. आणि ठिकान तेच आहे.. मात्र मुलगी मोठ्या घरी आहे असेच काही नाही..
यातील मुलीचे नाव 'कविता' आहे ...

अवांतर : मुलगी आणि वडील यांचे नाते खुप आवडते मला त्यामुळे हे संभाषण लिहिताना गावाकडील चित्र हळुच डोळ्यासमोर येते .. बघु कशी होयील सिरिज ... माहित नाही

"नको बोलु बाबा काही" ही कविता सर्वात आवडली या तीन मधिल पण मला ...
पुढील कवितेच्या ओळीत पुन्हा हीच ओळ घेण्याचा विचार आहे ..
बघु ...

जबराच. लिहा-लिहा , मला खात्री आहे सिरीज नक्किच यशस्वी होईल. :) - मना पासून शुभेच्छा.
मला देखील 'ही' कविता खूप आवडली (इतरांना अनुमोदन :))

पैसा's picture

20 Apr 2011 - 8:22 pm | पैसा

३ कवितांची कवितामालिका पुरी झाली म्हणायची!

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 8:49 pm | स्पंदना

हृद्य!!

मला ही रचना अतिशय आवडली गणेशा!

आत्मशून्य's picture

21 Apr 2011 - 1:30 am | आत्मशून्य

कधी कधी आपण काळजाचा ठाव घेता राव.

प्यारे१'s picture

21 Apr 2011 - 9:45 am | प्यारे१

मस्त कविता रे भावा.....!!!

रामदास's picture

21 Apr 2011 - 9:59 am | रामदास

वाढवणार्‍या कविता. माझा लिहीण्याचा मोठा अधीकार नाही पण थोडे फिनीशींग टचेस हवेसे वाटतात.
(शिंपी सदरा शिवल्यावर बारीक सारीक धागे उडवतो तसे काहीसे.)

गणेशा's picture

21 Apr 2011 - 12:47 pm | गणेशा

@ रामदास जी ..
धन्यवाद ... फिनिशिंग टच हवेत हे अगदी बरोबर आहे.. पण शक्यतो मी ते ट्राय करत नाहि मुळ भावनांच्या खरे पणात त्यामुळे एक कृतीमता येत राहते माझ्याकडुन .. आपसुकच व्रुत्त्..लय..एकदंध कविता मला ही आवडते पण इतकी छान लिहिता येत नाही ..

पण कधी कधी धडक कविता लिहिण्यातील आनंद खुप असतो त्यामुळॅ ही सहज पटकन आलेली कविता ...

सर्व वाचकांचे मनापासुन आभार

ajay wankhede's picture

25 Apr 2011 - 11:46 pm | ajay wankhede

........कवी ना बन जाऊ
तेरे प्यार मे ये कविता .
काव्य रस मनाला भिडला राव ...
फिनिशिग नको च ..