हसन अली - ३

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
13 Apr 2011 - 1:23 pm
गाभा: 

हसन अली - २

हसन अली आता बोलायला लागले आहेत. त्यानी चार राजकारण्यांची नावे घेतली आहेत.

http://www.chauthiduniya.com/2011/03/truth-about-ali-hasan-black-money-p... ह्या येथे अजून ह्या विषयावर माहिती मिळेल.

मिपावर लाच का द्यावी, लाच का देऊ नये ह्या वर खुप चर्चा झाली. एक असते सिमा, व ती ओलांडल्यावर होते परिसीमा. आपल्या देशाने लाच घ्यायची व द्यायची ह्याची परिसीमा गाठली आहे. त्या वर वेळीच अंकूश घातला नाहीतर हळू हळू तशी वृत्ती बनत जाईल व आपला देश लाच खाऊ देश म्हणून काही अफ्रिकन देशांसारखा ओळखला जाऊ लागेल.

ज्याच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो व लाच देतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो असे जेव्हा आपण मानायला लागू तेव्हाच कोठे ह्याला आळा बसेल.

चायना देशात अशा देशद्रोह्याला देहांताची शिक्षा ठोठावतात. आपल्या कडे अफजल गुरूला देखील फाशीची शिक्षा आपण देऊ शकत नाही.

जन लोकपाल मध्ये लाच घेणा-याला देशद्रोही ठरवण्याचा व देशद्रोह्याला साजेशी शिक्षा देण्याची तरतूद असावी का. आपल्याला काय वाटते. मला वाटते असावी.

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 1:27 pm | नगरीनिरंजन

>>जन लोकपाल मध्ये लाच घेणा-याला देशद्रोही ठरवण्याचा व देशद्रोह्याला साजेशी शिक्षा देण्याची तरतूद असावी का?
अशा शिक्षेसाठी जनलोकपाल यायची वाट का पाहावी लागावी? सध्याची व्यवस्था सक्षम असूनही व्यवस्थित राबवली जात नाही हेच तर दुखणं आहे. जनलोकपाल आले तरी न्यायालये तीच राहणार आहेत आणि लोकही तेच.

रणजित चितळे's picture

13 Apr 2011 - 1:41 pm | रणजित चितळे

आपला प्रतिसाद याग्य वाटतो, जन लोकपाल बिल आल्यावर त्याच्या नावाखाली आपल्या देश बांधणीच्या विविध कामाचा वेग अजूनच हळू होऊ नये म्हणजे मिळवले.