हसन अली - २

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
9 Mar 2011 - 9:23 am
गाभा: 

हसन अली

मागे हसन अली बद्दल काथ्याकूट मध्ये बराच विचारांचा कूट झाला. त्यात जेव्हा अतिरेकी संघटनांना तर हा पैसा जात नाही हे मत कोणाला फारसे पटले नव्हते - त्या काथ्याकूटाचा परिच्छेद पुढे देत आहे

।।।।।।।।।।।।।।।।।।।।।टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे. कोण असेल तो पुढारी. ५००००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले. ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल. २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला. ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे. हा विचार डोक्यात येतो. आपल्याला काय वाटते.

आता सुप्रिम कोर्टानेच एन्टी टेरर अंतरगत सुनावणी का करु नये म्हणून प्रश्न विचारला आहे सरकारला.

मला असे म्हणायचे आहे सरकार कोणाचेही असो - एक भारतीय म्हणून त्यातल्या दिग्गज्जांना असे का नाही वाटत की जो मनुष्य अशा त-हेने १५०००० कोटी जमवू शकतो तो निश्चितच आपल्या देशाचा मित्र नव्हे, आणि मग त्या दृष्टीकोनातून पावले उचलीली पाहिजेत. त्यात राजकारण कशाला पाहिजे.

मिपाकर आपल्या विचारांची वाट बघत आहे.

प्रतिक्रिया

विकास's picture

9 Mar 2011 - 9:59 am | विकास

मिपाकर आपल्या विचारांची वाट बघत आहे.

आपण (तुम्ही-आम्ही) नुसतीच वाट बघत बसतो. इथे हे लोकं (हसन अली आणि पार्टी) वाट लावताहेत आणि जनतेला वाटेला देखील लावत आहेत!

जो मनुष्य अशा त-हेने १५०००० कोटी जमवू शकतो तो निश्चितच आपल्या देशाचा मित्र नव्हे

देशाचा नसेल पण देशातील व्यक्तींचा नक्कीच असेल आणि तिथेच तर पाणी मुरतं!

तो सर्व प्रकारच्या घोड्याचा व्यापार करतो म्हणे. तसेच आतंरराष्ट्रीय अरबी घोड्याचा व्यापारी अदनान खरगोशी व हसन अली भागीदारी घोडे विकतात म्हणे.

मालोजीराव's picture

9 Mar 2011 - 11:04 am | मालोजीराव

अतिरेकी संघटनांना तर हा पैसा जात नाही हे मत कोणाला फारसे पटले नव्हते

काय पण काय सांगता....मागील लेखात सुद्धा सांगितले होतं कि त्याचे 'लॉर्ड ऑफ आर्म्स' अदनान खागोशी बरोबर संबंध आहेत
हे घ्या

चिरोटा's picture

9 Mar 2011 - 12:16 pm | चिरोटा

ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल

समजा तो अतिरेकी संघटनांना पैसा पुरवत नसेल तर आपणास आक्षेप नसेल का?
ह्सन अलीच्या आधी बाँबस्फोट घडून झाल्यानंतर ईशारे देणार्‍या गुप्तचर संघटना,मिलिटरी इंटिलिजन्स ह्यांचे हात ह्या गटारगंगेत किती बुडले आहेत ते पाहिले पाहिजे.एकटा दाउद जसा अंडरवर्ल्ड चालवू शकत नाही तसेच एकटा हसन अली पण हे धंदे करु शकत नाही.

भारी समर्थ's picture

9 Mar 2011 - 11:28 pm | भारी समर्थ

आक्षेप नसावा बहूदा.
म्हणूनच अविनाशदादा भोसलेंच्या पाठी सर्वच्या सर्व 'अ'राजकीय पक्ष ठामपणे उभे राहिले.
त्या सज्जन जिंदालच्या बायकोला तसेच शीतलताई मफतलाल यांनाही असंच ग्रीन चॅनलमधून सटकताना पकडलं होतं. तेव्हा कोणीही सज्जन जिंदालचा 'आसोचेम'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला नाही किंवा शीतल व अतुल्य मफतलालला सोशल सर्किटवरून कोणीही बेदखल केलं नाही....

बाकी, बाळ ठाकरेंनी संजय दत्तला का सोडवलं हे ही एक गूढच आहे की....

असो...

भारी समर्थ

भारी समर्थ's picture

9 Mar 2011 - 11:19 pm | भारी समर्थ

च्यायला त्या अंबानी आणि टाटा-बिर्लांच्या फाऊंडरची पूर्ण आणि नंतरच्या पिढ्यांची अर्धी कारकिर्द संपल्यावर कुठे १,५०,००० कोटीची उलाढाल करता आली. त्यांनीही सर्वच्या सर्व कामे कायदेशीर पद्धतीनेच केली होती होय? पण मुद्दा काय तर, हसन अली सारख्या माणसाने ही एवढी माया (काही वृत्तमास्तरांच्या मते ७०,००० कोटीची करबुडवी तर इतर काहींच्या मते ७५,००० कोटी) २५-३० वर्षांत खरंच जमवली असेल काय? असेल, तर कशी?
अशा आपल्या सर्वांना पडलेल्या व न पडलेल्या असंख्य प्रश्नांची चौकशी इडी करतच आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत तरी शांतता ठेवावीच लागेल.

त्या वृत्तमास्तरांचं काय सांगता राव... त्यांच्यावर 'पूर्ण' विश्वास ठेवणं हेच मुळात चूक आहे. म्हणतात ना,

नागड्यासोबत उघडा गेला
वाण नाय पण गुण आला... किंवा असंच काहीतरी - भावनाओंको समझो.

भारी समर्थ

मालोजीराव's picture

10 Mar 2011 - 10:40 am | मालोजीराव

'जेम्स बॉन्ड कॅसिनो रोयाल' मधला 'ला शिफ्रे' कोणाला आठवत असेल तर बघा, अगदी तंतोंतांत काम हसन अली करतो असं इंटरपोल चं म्हणणं आहे...
आर्म्स ट्राफिकिंग,हवाला,मास फंड ट्रान्स्फर (पाहिजे त्या देशात,पाहिजे तिथे,पाहिजे तेवढे पैसे उपलब्ध करून देणे ) इ.

चिरोटा's picture

10 Mar 2011 - 10:51 am | चिरोटा

मग कशाला ही चौकश्यांची नाटके? महाराष्ट्रातली आणि केंद्रातली किती 'आशास्थाने/प्ररणादायी नेतृत्वे' ह्यात गुंतली आहेत तेही बाहेर आले पाहिजे. हसन अलीचा तेलगी होवू नये ही अपेक्षा आहे.

मालोजीराव's picture

10 Mar 2011 - 11:15 am | मालोजीराव

(ED) प्रवर्तन निदेशालय द्वारा फक्त नावापुरते ४-५ खटले चालू आहेत, दर वेळी प्रवर्तन निदेशालय अपुरे पुरावे सदर करते....मग न्यायालय सरकारला फटकारते आणि अली ला सोडून देते,यावेळी सुद्धा असंच होणार.

हसन अलीचा तेलगी होवू नये ही अपेक्षा आहे.

तेलगी तरी किमान कायमचा तुरुंगात गेला, पण इथे असं होण्याची सुतराम हि शक्यता नाही....'इतक्या मोठ्या' माणसाला आत टाकण्याची क्षमता(कि इच्छा) सरकारमध्ये नक्कीच नाही. (क्वात्रोची चं संदर्भ घेऊन सांगतोय)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Mar 2011 - 11:12 am | निनाद मुक्काम प...

फोटो दिला म्हणून बरे झाले
आता साहेब कधी आमच्या पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करावयास आले तर काही कृपादृष्टी होते का ह्या दृष्टीने जास्त सरबराई करू .
अजित केरकर ह्यांना लंडन मध्ये जे आर डी टाटा ह्यांनी असेच स्वताची सरबराई केली म्हणून मोठ्या पदावर बसवले .
आम्ही असा अनुग्रह प्राप्त होण्याच्या प्रतीक्षेत .......
बाकी आमचा कुणाही व्यक्तीस आणी त्यांच्या मानसिकता व त्यांचे सामाजिक व खाजगी वर्तनाचे विरोधक नाही आहोत .
''दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती''

खुसपट's picture

11 Mar 2011 - 8:57 pm | खुसपट

आजच हसन अलीला केवळ रु. ७५०००/- च्या जामीनावर सोडले आहे.खरेतर तो एक मामुली गुन्हेगार किंवा वाट चुकलेला भारतीय असे समजून त्याला रु.७५/- च्या जामीनावर सोडणे योग्य ठरले असते.घोडे पाळून जर एवढे हजारो कोटी रुपये मिळत असतील तर सर्वच खासदार-आमदार यांनी घोडे पाळले असते.प्रत्यक्षात त्यांनाच उद्योजक घोड्यांप्रमाणे पाळत असतात. हसन अली याने दरवर्षी आयकर विवरणपत्रे भरली असणारच. पण त्याचा करसल्लागार कोण? , त्याच्या घोडेपालन व्यवसायाच्या वार्षिक हिशेबपत्रांचा ऑडीटर-चार्टर्ड अकाउंटंट कोण ? ह्याचा शोध घेवून त्यांची नावे उघड करण्याची आवश्यक्यता एकाही प्रसिद्धीमाध्यमास वाटली नाही, ती का? घोड्यांप्रमाणे ही माणसेही पाळलेली असतात. हसन अलीने जास्तकाही बोलू नये, ही सरकारपक्षाचीच ईच्छा आहे.आता निवडणूका आहेतच, तेव्हा पैसा लागणारच! मग हसन अली मोकळाच असायला हवा.

खुसपट
हसन अली कोण म्हणून काय पुसता,तो तर असे लाडका........!

विकास's picture

11 Mar 2011 - 10:07 pm | विकास

अखेर सट्ट्याचा जय होतो!

खात्यात तेवढेच पैसे होते म्हणुन त्याला ७५००० रुपडे दंड केला. ज्यादा केला असता तर सरकारला पैसे आणायला स्विस ब्याकेत जावे लागले असते

रणजित चितळे's picture

12 Mar 2011 - 9:14 am | रणजित चितळे

भारतात ख-या अर्थाने अराजक आले आहे.
जिसकी लाठी उसकी भैस । हे खरे आहे.