पुन्हा रात्र (२)

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
4 Apr 2011 - 2:04 am

रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं

असतं आतुन अलगद ऊबदार
मात्र, वर वर कसं गार असतं

पहाटेचं अंधारही अंधारच असतं
पाकिटातलं दिवस कोरं पान असतं

न दिसतं कोण न भेटतंच कुणी
आपल्याशीच आप्लं कसं छान जुळतं

कधी कसं छान मांडलेलं अन कधी दुमडलेलं
रात्री चं पांघरुण सवयीचं एक भाग असतं

कुणी वाचतं पुस्तकं अन कुणी पहातं चांदणं
कुणाच्या आलिंगनात कुणी तर कुणी गात असतं

कुणालाही चोरता येतं कुणाच्याही जगातून
पुन्हा नकळत त्यांच्याच मग ठेवायचं असतं

रात्रीचं पांघरुण असंच मजेदार असतं
कधी असतं जाड तर कधी नाजुक फार असतं

रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं

असतं आतुन अलगद ऊबदार
मात्र, वर वर कसं गार असतं

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

4 Apr 2011 - 8:49 am | प्रकाश१११

कुणी वाचतं पुस्तकं अन कुणी पहातं चांदणं
कुणाच्या आलिंगनात कुणी तर कुणी गात असतं

छानच .आवडली कविता !!