(भाग-१)
(भाग-२)
(भाग-३)
(भाग-४)
(भाग-५)
(भाग-६)
(भाग-७)
(भाग-८)
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात पाय रोवुन आपले स्थान निर्माण करणारी एकमेक महीला संगीतकार म्हणजे उषा खन्ना. वडीलांचा गीतकार इंदिवर यांच्याशी परीचय होता. एकदा इंदिवर व ओ.पि.नैयर यांनी उषा खन्ना यांचा परीचय त्याकाळचे नावाजलेले निर्माते शशधर मुकर्जी यांच्याशी करून दिला.
उषा खन्ना यांनी त्यांना काही गाणी म्हणून दाखविली. शशधर मुकर्जींना जेंव्हा कळले की त्या गाण्यांचे संगीत दिग्दर्शनसुध्दा उषा खन्ना यांनीच केले आहे, त्यांनी तिला "दिल देके देखो"चे संगीत दिग्दर्शन करायची संधी दिली. १९५९साली आलेल्या सिनेमातुन आशा पारेखनेसुध्दा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. पुढे त्यांनी जवळ जवळ ३५ वर्षे संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.
स्वतः उत्तम गायक असलेल्या या संगीत दिग्दर्शीकेने अनुपमा देशपांडे, हेमलता, पकंज उधास, मोहम्मद अझीज, शब्बीर कुमार आणि सोनु निगम या गायकांना चित्रपटसृष्टीत आणले.
त्यांनी संगीतबध्द केलेली अनेक गाणी आजसुध्दा आवडीने ऐकली जातात. त्यांनी म.रफी आणि आशा भोसले यांच्याकडुन जास्त गाणी गाउन घेतली.
चित्रपट- दिल देके देखो (१९५९)
बड़े हैं दिल के काले
हाँ यही नीली सी आँखों वाले
सूरत बुरी हो
बुरा नहीं दिल मेरा
ना हो यक़ीन आज़मा ले
(म.रफी आणि आशा भोसले )
बोलो बोलो कुछ तो बोलो, गुस्सा छोड़ो दिल न तोड़ो
प्यार हो तो कह दो यस, प्यार नहीं तो कह दो नो
फिर जो हो हो सो हो, फिर जो हो हो सो हो, हाय
प्यार हो तो कह दो या
(म.रफी)
यार चुलबुला है हंसीं दिलरुबा है
झूठ बोलता है मगर ज़रा ज़रा
तो बोलो जी
फिर क्या करे दीवाना
(म.रफी आणि आशा भोसले )
चित्रपट- हम हिंदुस्थानी (१९६०)उषा खन्ना यांचे अतीशय गाजलेले गाणे
छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी
नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी
हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी
(मुकेश)
चित्रपट० फ्लॅट नं.९ (१९६१)
गा दीवाने झूम के
रात की ज़ुल्फ़ें चूम के
दिल भी है दिलदार भी है
मौसम भी है प्यार भी है
(मुकेश)
चित्रपट- शबनम (१९६४)
मैं ने रक्खा है मुहब्बत अपने अफ़साने का नाम
तुम भी कुछ अच्छा सा रख दो अपने दीवाने का नाम
(म.रफी)
तेरी निगाहों पे मर-मर गए हम
बाँकी अदाओं पे मर-मर गए हम
क्या करें क्या करें क्या करें
तेरी निगाहों पे .
(मुकेश)
चित्रपट- नीशान (१९६५)
हाय तबस्सुम तेरा, हाय तबस्सुम तेरा
धूप खिल गई रात में
या बिजली गिरी बरसात में
हाय तबस्सुम तेरा ...
(म.रफी)
चित्रपट- एक सपेरा एक लुटेरा (१९६५)
हम तुमसे जुदा हो के मर जाएँगे रो-रो के
मर जाएँगे रो-रो के
(म.रफी)
चित्रपट- हवस (१९७४)
तेरी गलियों में ना रखेंगे कदम, आज के बाद
तेरे मिलने को न आएंगे सनम, आज के बाद
तेरी गलियों में ना ...
(म.रफी)
चित्रपट- दादा (१९८०)
दिल के टुकड़े टुकड़े करके
मुस्कुराते चल दिये
जाते जाते ये तो बता जा
हम जियेंगे किसके लिये
(यशुदास)
आप तो ऐसे ना थे (१९८०)
तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है
(म.रफी, मनहर, हेमलता)
चित्रपट- साजन बिना सुहागन (१९७८)
मधुबन ख़ुशबू देता है, सागर सावन देता है
जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है
(यशुदास)
चित्रपट- बादल (१९६६)
अपने लिये जिये तो क्या जिये - २
तू जी, ऐ दिल, ज़माने के लिये
(मन्ना डे)
चित्रपट- लाल बंगला (१९६६)
चाँद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर
वो बेचारा दूर से देखे, वो बेचारा दूर से देखे
करे न कोई शोर
चाँद को क्या मालूम ...
(मुकेश)
हसीन वादियों
फ़िज़ाओं से कह दो हवाओं से कह दो
मेरा यार मेरा प्यार ले के आया है
हसीन वादियों ...
(म.रफी)
(उषा खन्ना यांनी गायलेली प्रसीध्द गाणी)
फिर आने लगा याद वोही प्यार का आलम
इनकार का आलम कभी इक़रार का आलम
फिर आने लगा याद वोही प्यार का आलम
प्यार का आलम (सोबत म. रफी, चित्रपट ये दिल किसको दू)
जलती है दुनिया जलती रहे सौ-सौ रंग बदलती रहे
प्यार की गाड़ी चलती रहे अपनी प्यार की गाड़ी चलती रहे
प्यार की गाड़ी ...(सोबत- मुकेश, चित्रपट जोहर मेहमुद इन हाँगकाँग)
उषा खन्ना यांची काही गाणी येथे ऐका.
उषा खन्ना यांची काही गाणी येथे डाउनलोड करा.
उषा खन्ना यांची सर्व गाणी येथे डाउनलोड करा.
प्रतिक्रिया
20 Mar 2011 - 9:33 am | नितिन थत्ते
मस्त.
सावनकुमार टाक यांच्या बर्याचशा सिनेमांना उषा खन्ना यांनी संगीत दिले होते.
शायद मेरी शादीका खयाल दिल में आया है हे असेच एक सुपरडूपर हिट
दादा चित्रपटात "अल्लाह करम करना मौला तु रहम करना" असे एक भयंकर बोअर गाणे आहे. दूरदर्शनच्या जमान्यात प्रत्येक ईदच्या आसपास हे गाणे हमखास छायागीतात लागे.
20 Mar 2011 - 10:47 am | सहज
>शायद मेरी शादीका खयाल दिल में आया है हे असेच एक सुपरडूपर हिट
हेच लिहणार होतो.
उषा खन्ना यांनी बरीच हीट गाणी दिली होती.
21 Mar 2011 - 1:21 pm | खडूस
सावनकुमार हे आधी उषा खन्ना यांचे prefered lyricist होते. नंतर ते दिग्दर्शक बनले. काही काळ हे पती-पत्नी देखील होते.
चूभूदेघे
20 Mar 2011 - 11:00 am | श्रावण मोडक
पुन्हा एकदा लौकीकार्थाने जिला दुसरी फळी म्हणतात तिला तसे दुय्यम मानण्यात फारसा अर्थ नाही हे वाटून गेलेच. अर्थात, चिंतामणी यांनी दुसरी फळी म्हटले अशा अर्थाने नव्हे. लौकीकार्थानेच. :)
20 Mar 2011 - 11:16 am | पैसा
उषा खन्ना यानी यातली फक्त २ गाणी केली असती, तरी त्यांचं नाव कायम रहिलं असतं.
१. तेरी गलियों में
२. हम तुमसे जुदा होके
बाकी सुपर हिट्ट गाणी तर आहेतच!
20 Mar 2011 - 2:30 pm | चिंतामणी
श्रामो- आपणास माझ्या त्यामागच्या समजल्या आहेतच. पण इतरांसाठी मी सांगु इच्छीतो की एक दोन सिनेमात शम्मी कपुर (दिल देके देखो), राजेश खन्ना (सौतन) अश्यांसारखे हिरो होते. बाकी चित्रपटात शेख मुख्तार, अजीत पासून दिपक पराशर, पंकज धिर, राजकिरण पर्यन्त हिरो होते. त्यामुळे अश्या (उषा खन्ना, चित्रगुप्त) संगीतकारांना "दुसरी फळी" म्हणले आहे. त्यांना आणि त्यांच्या प्रतिभेला कमी लेखलेले नाही.
21 Mar 2011 - 8:28 am | सहज
शम्मीकपूरचा 'दिल देके देखो' हा तसा पहीलाच सुपरहीट सिनेमा. त्या आधीचे सिनेमे (तुमसा नही देखा) माफक यश किंवा अपयशीच होते. त्या जमान्यात दिलीप, देव , राज व अन्य पहील्या फळीत होते त्यामुळे तसा शम्मीकपूर दुसर्या फळीतलाच होता ;-) जसे आमीर-सलमान-शाहरुख च्या खानदेशात सैफ अली दुसर्या फळीतला :-)
१९८३ मधे आलेला राजेश खन्नाचा सौतन व अवतार गाजले मग राजेश खन्नाची दुसरी का तिसरी इनिंग्ज सुरु झाली, नाहीतर तसा तो मल्टी स्टारर सिनेमात बहुतांशी असायचा, एक हिरोच्या भूमीकेत त्याचा सुपरहीट सिनेमा तेव्हा तरी बराच काळ आला नव्हता.
20 Mar 2011 - 3:09 pm | प्रदीप
ह्यातील अनेक नावांना उषा खन्नाने प्रथम चित्रपटसृष्टीत आणले ह्या दाव्याने खरे तर आश्चर्याचा तीव्र धका बसला. म्हणून त्यातील काही नावांविषयी आय. एम. डी. बी. वर पाहिले तेव्हा त्यांच्या पाश्वगायनाच्या प्रथम एंट्रीज ह्या दिसल्या:
* अनुपमा देशपांडे ---'सोहनी महिवाल' (१९८५) -- अनु मलिक
* हेमलता--- इथे तर गंमत आहे. 'आशिर्वाद' (१९६८) (वसंत देसाई) हा तिचा हेमलता ह्याच नावाने पाश्वगायन केलेला पहिला चित्रपट आहे असे दिसते. पण बहुधा ती त्यात कोरसमधे गायली असावी. त्यानंतर तिच्या नावावर कालानुक्रमे पुढील चित्रपट आहेत --विश्वास (१९६९), जीने की राह (१९६९), जवाब (१९७०), घर घर मी कहानी (१९७०), माँ और ममता (१९७०), मस्ताना (१९७०), मेहबूब की मेंहंदी (१९७१), आप आये बहार आयी (१९७१), छोटी बहू (१९७१), हरी दर्शन (१९७२), तपस्या (१९७६), मै पापी तुम भक्षणहार (१९७६), चितचोर (१९७६)........ ह्यांपैकी एकाही चित्रपटाचे संगीत उषा खन्नाचे नव्हते. 'चितचोरपा'शी मी थांबलो, कारण इथे ह्या गायिकेचा खरा उदय झाला हे सर्वशृत आहे (रविंद्र जैन-- ह्याअगोदरेच्या 'तपस्या' चे संगीतकारही तेच).
*पंकज उधास--- 'नाम' (१९८६)-- लक्ष्मीकांत- प्यारेलाल -- गाणे 'चिठ्ठी आयी है'
* सोनु निगम --'मुकाबला' (१९९३)-- दिलीप सेन, समीर सेन (ह्याही अगोदर सोनूने 'सा रे ग म' च्या संचालनात प्रत्यक्ष नेहमीच गाऊन नाव कमावले होते, पण पाश्वगायनाची सुरूवात ह्या चित्रपटापासून आहे).
तेव्हा इथे काहीतरी चुकते आहे काय?
शब्बीर कुमारच्याविषयी मी माहिती काढण्याच्या फंदात पडलो नाही. पण कुठल्याही सुरील्या संगीतकारास ह्या गायकाची करीयर सुरू करून दिल्याबद्दल अभिमान असेल असे वाटत नाही.
20 Mar 2011 - 4:24 pm | क्रान्ति
या लेखमालेच्या निमित्तानं खूप जुन्या गाण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. अजूनही विविधभारतीच्या भूले-बिसरे गीत या कार्यक्रमात आणि बरेचदा रविवारी रात्री १० वाजता लागणा-या छायागीत या कार्यक्रमात यातली बरीच गाणी ऐकायला मिळतात.
लिंक्सबद्दल खास धन्यवाद!
21 Mar 2011 - 7:13 am | ५० फक्त
मी गाणि शक्यतो त्यांचे गीतकार / संगीतकार / गायक असला विचार न करता ऐकतो, पण तुमचे लेखमाला वाचुन यापुढे गाणे ऐकताना या सगळ्यांचे आभार मानेन.
या सगळ्या मंडळींशिवाय आयुष्यात काय झालं असतं ही कल्पनाच करवत नाही.
27 Mar 2011 - 11:19 am | संजय अभ्यंकर
उषाखन्ना चे दिल देके देखॉ मधिल एक अप्रतिम गीत.
हम और तुम और ये समा