पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्याला हसू येई. सातार्यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे.
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 10:22 pm | पिंगू
मी सोलापूरला गेलो होतो तेव्हा एक देऊळ बघितले आणि देवाचे नाव काय होते "खेलोबा"...
ते नाव वाचून तेव्हा अक्षरशः मी हसून हसून लोळत होतो.
- पिंगू
14 Mar 2011 - 10:54 pm | सुनील
मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही.
हे खरे नाही. ज्या चर्चवरून हे नाव आले ते सेंट थॉमस कथिड्रल आजही उभे आहे.
पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात
एके काळी येथे खरोखरच तलाव होता. तो (ब्रिटिश काळातच) बुजवला गेला. पण नाव मात्र राहिलं!
अशा (आता) गमतीशीर वाटणार्या नावांमागचा इतिहास जाणून घेणे रंजक ठरेल!
ठाण्यात तीन पेट्रोल पंप नावाचे एक ठिकाण आहे. आज मोजायला जाल तर तुम्हाला दोनच पेट्रोल पंप दिसतील. कारण तिसर्या पंपाच्या जागी आता इमारत उठली आहे! पण नाव मात्र तीन पेट्रोल पंप!
15 Mar 2011 - 5:54 pm | प्रदीप
मुंबईतील काही प्रसिद्ध (उदा. खडा पार्शी, भाऊचा धक्का) तसेच अप्रसिद्ध (शीवचा किल्ला) स्थळांविषयी सुंदर माहिती देणारी लेखमाला काही वर्षांपूर्वी म. टा. च्य साप्ताहिक पुरवणीत वाचल्याचे आठवते. नंतर अरूण टिकेकरांनीही काही चांगले लेखन केले आहे.
15 Mar 2011 - 8:22 pm | रामदास
आता भायखळ्याचा उड्डाणपूल जेथे द्विभाजीत होतो त्या बेळक्यात आहे.अजून उभाच आहे बिचारा हातात एक पुस्तक घेऊन.
15 Mar 2011 - 10:04 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
काळा घोडा चौकातला काळा घोडा(पुतळा) आता राणीच्या बागेत ठेवलेला आहे.
16 Mar 2011 - 10:13 am | टारझन
"दाणे आळी " म्हणुन एक भाग आहे , त्या भागाला हे नाव का दिल्या आहे ह्यावर जाणकार प्रकाश टाकतील काय ?
- टारझन
16 Mar 2011 - 11:07 am | मालोजीराव
जशी जेधेंची जेधे आळी,तापकीरांची तापकीर गल्ली,तुळशीबाग वालेंची तुळशीबाग,फडतरे बोळ ,शालुकर बोळ.....तशीच दाणे आळी
17 Mar 2011 - 3:13 pm | llपुण्याचे पेशवेll
नाही. दाणे आळीत पूर्वी दाणा-गोट्याचा बाजार भरत असे म्हणून त्याला दाणे आळी म्हणतात. दाणा-गोटा म्हणजे वेगवेगळी शेती उत्पादने.
तशीच पुढे डाळ आळी देखील आहे. चोळखण आळी आहे तिथे अजूनही चोळ्या, परकर वगैरेची बाजारपेठ आहे.
15 Mar 2011 - 10:16 pm | नितिन थत्ते
>>ज्या चर्चवरून हे नाव आले ते सेंट थॉमस कथिड्रल आजही उभे आहे.
बरोबर. पूर्वी फोर्ट भाग हा किल्ल्याच्या तटबंदीच्या आत होता. त्याला अनेक गेट होती. फ्लोरा फाऊंटन जवळच्या चर्चकडचे गेट म्हणजे चर्च गेट आणि व्हीटी स्टेशनकडच्या बाजाराच्या बाजूचे गेट म्हणजे बझारगेट. (लायन गेट आणि यलो गेट बाबत माहिती नाही).
१८६२ मध्ये या किल्याची भिंत पाडण्यात आली.
16 Mar 2011 - 12:37 am | शहराजाद
फोर्टात ओल्ड कस्टम्स हाउसवरून पुढे गेल्यावर शहीद भगतसिंग रोडला पुढे डावीकडे नौदलाचा भाग लागतो त्याच्या भिंतीला लायन गेट इ. आहेत.
16 Mar 2011 - 1:02 pm | रामदास
ही गोदीची दारे आहेत. मजूरांना गेट नंबर लक्षात ठेवायला नको म्हणून कलर कोड दिला होता. किंवा काही वेळा काही वैशिष्ट्य दिले होते. लॉयन गेटला बाहेर सिंहाचे पुतळे होते. (आहेत) यावरून कामगारांना लोकेशन पट्कन समजावे ही कल्पना होती. घड्याळ गोदी म्हणजे घड्याळ्याचा टॉवर असलेले गेट.
16 Mar 2011 - 7:20 pm | मराठे
ठाण्यातील तीन-हात नाक्याचं नाव कशावरून पडलं असावं?
कदाचीत लाल बहाद्दूर शास्त्री रोड, गोखले रोड आणि जुना आग्रा रोड एकत्र येतो म्हणून का?
17 Mar 2011 - 10:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणे, तिथे पूर्वी तीन रस्त्यांची नावं दाखवण्यासाठी तीन हात दाखवले होते. (मी पाहिलेले नाहीत, गोष्ट ऐकीव आहे.) आता तिथे 'मॅरेथॉन चौक' अशी पाटी लटवकलेली आहे. पण 'तीन हात नाका' हेच नाव अजूनही वापरात आहे.
जुना आग्रा रोड म्हणजेच वीर सावरकर पथ ना?
(एक्स ठाणेकर) अदिती
17 Mar 2011 - 1:33 pm | नितिन थत्ते
लालबहादूर शास्त्री रोड
18 Mar 2011 - 11:29 am | विजुभाऊ
जुना आग्रा रोड म्हणजेच वीर सावरकर पथ ना?
(एक्स ठाणेकर) अदिती
अरेरे.... इतक्या पुणेमय झाल्या की स्वतःच्या गावातला महत्वाचा रस्ता सुद्धा विसरलात.
तो रस्ता एल बी एस म्हणजे लाल बहादूर शास्त्री या नावाने ओळखतात.
( बाय द वे .... लाल बहादूर शास्त्री यांचे नाव लाल आणि त्यांच्या वडीलांचे नाव बहादूर असे नव्हते तरिही एल बी एस असे का म्हणतात.
14 Mar 2011 - 11:01 pm | पक्या
राजगुरूनगर ला 'बकुळीचे झाड' असा एक पत्ता आहे.
बसस्थानकावर उतरल्यावर नातेवाईकांकडे जाताना रिक्षावाल्याला कुट जायचय ह्याचे उत्तर देताना फक्त बकुळीचे झाड एवढच सांगावे लागे.
अहमदनगर मधेही रामचंद्र खुंट असा एक भाग आहे. आता हे खुंट काय प्रकार आहे माहित नाही. एखादा खांब वगैरे असावा. पण कधी तसा तो तिथे दिसला नाही.
15 Mar 2011 - 7:26 pm | Nile
नगरमध्ये दोन तीन खुंट आहेत. रामचंद्र खुंटाप्रमाचे पारशा खुंट सुद्धा आहे. खुंट म्हणजे काय हे मलाही माहित नाही, पण बहुदा तालिम संबंधीत काहीतरी असावं असं वाटतं.
15 Mar 2011 - 7:34 pm | नरेशकुमार
तेली खुंट, रामचंद्र खुंट,
16 Mar 2011 - 5:37 pm | जयंत कुलकर्णी
आपण कधी बकूळीच्या झाडाला गेला होता का ? म्हणजे मला असं विचारायच आहे की हे तुम्हाला कोणी सांगितले आहे की आपण गेला होतात ? आणि कोण नातेवाईक ? दिक्षित का ?
14 Mar 2011 - 10:59 pm | मराठमोळा
पुण्यात हडपसरला साडे सतरा नळी म्हणुन एक एरिआ आहे. तसेच चारनळ म्हणुन एक जागा ओळखली जायची.
तसेच काही अजुन..
कँपात चारबावडी : बावडींचा पत्ता नाही.
कोल्हापुरात कोल्हे आहेत की नाही माहित नाही, तसेच नागपुर.
जळगावात पाण्याची बोंबाबोंब आहे.
कल्याणचे कल्याण कधी होईल माहित नाही.
नवरा नवरी नावाचे एक गाव आहे.
मामा भाचे म्हणुन एक मंदीर आहे. (कुठे आठवत नाही)
थोडं अवांतरः आमचे काही मित्रः/मैत्रिणी
सुर्यवीर सिंग चौहान - वजन ४० किलोपेक्षा कमी (आम्ही हँगर म्हणायचो)
अबोली: जन्मल्यापासुन १ सेकंद तोंड बंद नाही.
सुवर्णा : काळी कुट्ट . . ईटीसी.. ईटीसी..
अजुन आठवेल तसं..
16 Mar 2011 - 10:28 am | वपाडाव
नाग नदी (जशी मुळा-मुठा आहे ना एकदम नाला टाईप तशीच) तिच्या काठावर वसलेलं शहर म्हंजे नागपुर.
औ.बादेत गुलमंडी चौकात 'सुपारी हनुमान' आहे. त्याचं नाव ते का माहित नाही.
नांदेडात 'पिवळी गिरणी' आहे, महावीर सोसायटीजवळ, शिवाजीनगर.
परभणीत कृषी विद्यापीठाच्या वसमत रोडवरील कमानीला 'काळी कमान' असे म्हंतात.
17 Mar 2011 - 10:43 am | शिल्पा ब
हडपसर म्हणजे जिथं हाडं पसरली होती ते ठिकाण का?
एक आपली उत्सुकता म्हणून विचारतेय!!
17 Mar 2011 - 12:19 pm | वपाडाव
मला हा प्रश्न 'धनकवडी' बद्दल उद्भवला आहे.
त्याचे झाले असे की, फार पुर्वी एक 'घन' आडनावाचा व्यापारी ईकडे रहात असे. त्याचं खानदान सावकारी करत असे.
त्या व्यापार्याचं वय खुप जास्त होतं. त्याच्या तोंडात दात नसल्याने कवळी लावली होती.
लोक (जे त्याकडुन व्याजावर पैसे घेउन जात) ते त्याला 'घनकवळी' असं म्हणत.
पण कालौघात घनाचे धन आणी कवळीचे कवडी असे झाले.
ईति- धनकवडी इतिहास
30 Jun 2015 - 11:30 pm | भक्त प्रल्हाद
काय्चा काय.
अस्मादीक पुरातन काळापासुन इथे राहात असुन या गावात असे काहि प्रकरण उद्भवलेले नहि.
16 Jul 2015 - 12:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
कोल्हासुर असुराचा वध जिथे आदिमाया महालक्ष्मी ने केला ते कोल्हापुर झाले अशी पौराणिक आख्यायिका ऐकून आहोत
नागपुर मधले नाग हे वर सांगितल्याप्रमाणे नाग नदीशी निगडीत आहेच शिवाय बहुतेक संस्कृत की पाली की मागधी भाषेत मधे नाग म्हणजे हत्ती होय उदाहरणार्थ मौर्यकाळी गजदळाच्या आयुक्ताला (वॉर एलीफैंट कमिश्नर) ला नागवनाध्यक्ष असे म्हणत असत
15 Mar 2011 - 5:59 pm | प्रदीप
येथे 'अंडरग्राऊंड ब्रिज' असा एक प्रकार पूर्वी होता; आताही असेल पण त्याचे नवीन्य कमी झाले असावे. साबरमतीच्या दिशेने जाणार्या रेल्वेमार्गाच्या खालून एक रस्ता जाई (पार्ल्याच्या 'मिलन सब वे 'सारखा). तिथे जरा दिव्यांची रोषणाई केली होती. टूरिस्टांना ती जागा बसेसमधून अवश्य नेऊन दाखवीत असत!
15 Mar 2011 - 6:23 pm | योगप्रभू
चांगली माहिती देताहात मित्रांनो.
महाराष्ट्रात काही गावांचीही नावे मजेशीर आहेत.
उदा : येडेमच्छिंद्र, झगलवाडी, शेटफळ, बोचेघोळ, शेमडी
15 Mar 2011 - 7:09 pm | नगरीनिरंजन
१.नगरमध्ये दिल्लीगेट नावाची एक लहानखुरी वेस आहे. तिथून पुर्वी लोक दिल्लीला जायचे अशी वदंता आहे.
२.नगरमधल्या स्मशानाला अमरधाम असे नाव आहे. या अमरधामवरून एसटी स्टँड कडून दिल्लीगेटकडे जाणारा बाह्यवळण रस्ता जातो. त्या रस्त्याचे नाव आहे अमरधाम रोड आणि त्याची अवस्था त्याचे नाव सार्थ करेल अशी काळजी महापालिकेकडून घेतली जाते.
15 Mar 2011 - 7:23 pm | Nile
दिल्ली गेटची अजुन एक कथा म्हणजे ते गेट दिल्लीच्या दिशेने (म्हणजे उत्तर?) आहे. खरं खोटं दिल्ली जाणो.
नगरमध्येच लोखंडी पुल म्हणुन एक लोखंडाचाच इंग्रजांनी बांधलेला पुल होता. त्याला १०० वर्षांची वारंटी होती. १०० वर्षाची वारंटी संपल्यावर त्या कंपनीकडून सविस्तर वारंटी संपल्याचे पत्र आले. लवकरच कुणा हलकटाने रात्रीत एका ट्रक वाल्याला पुलावरुन जायला सांगितले अन तो पुल ट्रकसकट खाली कोसळला.
बाकी पुण्याजवळील, अमर अली दरवेशचा दर्गा गमतीदार आहे, तिथे म्हणे बोट लावुन २०-२५ किलोचा दगड उचलता येतो. ;-)
2 Jul 2015 - 4:27 pm | शंतनु _०३१
जिभेला एका "विशिष्ट " चवीची सवय झाली कि मग रुचीपालट मानवत नाही, हा सिनेमा "मास " नसून काहीसा "क्लास" category मध्ये मोडतो. पुलाची ( स्टेशन कडे जाणारा ) खरी आहे, या प्रसंगावरून महापालिकेची कायम चेष्टा होत असते
15 Mar 2011 - 8:47 pm | कानडाऊ योगेशु
ह्या नावांबरोबरच त्यांचा इतिहास माहीत करुन घेणे देखील रंजक ठरेल.
उदा. (मिपावरच इतरत्र वाचले आहे) पुण्यातील खुन्या मारुति जवळ चाफेकर बंधुनी रँडवर गोळी झाडली म्हणुन त्याचे नाव खुन्या मारुती पडले.
दादर टी.टी येथे आधी ट्राम टर्मिनस होते.
15 Mar 2011 - 10:02 pm | नितिन थत्ते
गोळ्या गणेशखिंडीत किंवा त्याबाजूस कोठेतरी मारल्या असे वाचल्याचे आठवते.
15 Mar 2011 - 10:19 pm | पक्या
खुन्या मारुती नव्हे हो खुन्या मुरलीधर. हे कॄष्णाचे मंदिर आहे. सदाशिव पेठेत आहे.
या परिसरात खून झालेला होता म्हणून तसे नाव पडले आहे. खून बहुतेक इंग्रजांना फितूर द्रविड बंधूंचा करण्यात आला होता. चापेकर बंधूंपैकीच कोणीतरी केला ...आत्ता नीट लक्षात नाहिये.
पुण्यातील अजून काही अशी ठिकाणे - नळ स्टॉप - इथे नळाचा काय संबंध माहित नाही.
खडकमाळ - ? नाव कसे आले माहित नाही
गाय आळी - निंबाळ्कर तालमीकडून शनिपारा कडे जाताना ही आळी लागते. बहुधा पूर्वी इथे गायींचे गोठे असावेत असा एक अंदाज.
पेरू गेट - इथे पुर्वी पेरूची बाग होती. आता घरांनी गजबजलेला भाग आहे. पेरूचे एकही झाड दिसणार नाही
खजिना विहीर - इथे पुर्वी खजिना लपवून ठेवलेला असावा. आता विहीर पण दिसत नाही बहुतेक . पण ह्या भागाला अजूनही खजिना विहीरच म्हणतात.
15 Mar 2011 - 11:53 pm | चिंतामणी
या परिसरात खून झालेला होता म्हणून तसे नाव पडले आहे. खून बहुतेक इंग्रजांना फितूर द्रविड बंधूंचा करण्यात आला होता. चापेकर बंधूंपैकीच कोणीतरी केला ...
बहुतेक नव्हे. या मंदिरासमोर द्रवीडबंधु रहायचे. धनलोभांने त्यांनी रँडचा वध करणा-यांची अर्थातच चाफेकरबंधुची नावे इंग्रजांना सांगीतली होती. त्याबद्दल त्यांचाही वध करण्यात आला. तो या मंदिरासमोरच केला गेला.
पण खुन्या मुरलीधर हे नाव त्यामुळे पडले नाही. ते पेशव्यांच्या काळीच नाव पडले होते. त्याबद्दलची माहिती सविस्तर येथे वाचा.
17 Mar 2011 - 3:40 pm | llपुण्याचे पेशवेll
पेरुगेट म्हणजे खरेतर पेराँ गेट . महादजी शिंद्यांनी कवायती फौजा तयार केल्यावर त्या धर्तीवर पेशव्यांच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी नेमलेला फ्रेंच अधिकारी जनरल पेराँ हा होय. या पेराँचा बंगला त्या भागात होता. त्या बंगल्याकडे जाण्याच्या रस्त्यावर बंदोबस्ताच्या चौक्या बसवल्या होत्या. त्या रस्त्याला गेटवर जी चौकी होती त्या चौकाला पेरुगेट चौकी म्हणत. नंतर त्या चौकाचे नाव पेरूगेट असे पडून गेले.
तसेच नळ स्टॉपबद्दल इथे वाचा.
18 Mar 2011 - 7:49 am | पंगा
पेराँ नामक गृहस्थ सदाशिवपेठी होता हे वाचून अंमळ मौज वाटली.
15 Mar 2011 - 9:16 pm | अन्या दातार
कोल्हापुर शहरात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला ताराराणीचा(अश्वारुढ) पुतळा दिसतो. हा चौक म्हणजेच कावळा नाका. ब्रिटीश काळात तिथे कॉवेल नावाचा डॉक्टर अधिकारी राहात असे. त्याने तिथे दवाखाना काढला होता. म्हणून त्याला कॉवेल नाका असे संबोधत. काळाप्रमाणे त्यात बदल होत होत कॉवेल चा कावळा झाला!
30 Jun 2015 - 6:57 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
काहीही अपभ्रंश होत असतात आपल्याकडं.
16 Mar 2011 - 8:19 am | ईन्टरफेल
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.>>
महारास्ट्रातल्या गवां विशयि
आपल्याला कहि महित नहि?
ओ अन्ना ! आपल्या भारतात
३३ कोटि देव आहेत
कोना कोनाचे नाव घेनार ?
15 Mar 2011 - 9:55 pm | विजुभाऊ
पुण्यात पुणे ३० नावाचा एक विभाग आहे. हा विभाग सदाशिवराव भाऊ यांच्या नावाने ओळखला जातो. पुण्यासुंदर तील सर्वात पाट्या इथे पहायला दिसतात. प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द लोक याच विभागतले.
इथले लोक काटकसरी ( कोण म्हणाला रे *जूस म्हणुन) असतात
इथे बहुतेक शाकाहारी जमातीची वस्ती असूनही पुण्यातील सर्वात जास्त फेमस मांसाहारी हाटेले आढळतात.
15 Mar 2011 - 10:42 pm | शेखर
पुणेद्वेष्टे विजुभाऊ ;) श्रीखंडाचे विरजण केले ह्या प्रतिसादात.
15 Mar 2011 - 11:56 pm | चिंतामणी
ही तुमच्या (मिपावरील) खास मित्राची कर्मभुमी आणि अनेकांची निवास भूमी असल्याने ती तुम्हाला "चांगलीच" माहित असणार. ;)
17 Mar 2011 - 3:44 pm | llपुण्याचे पेशवेll
प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द लोक याच विभागतले
नेहेमीप्रमाणे विजुभाऊ अभ्यासात कमी पडले. ते प्र.वा. जोग नाही तर प्र.बा.जोग. जोग क्लासेस वाल्या जोगसरांचे वडील.
त्यांच्या वाड्याच्या दारावर पाटी होती. "माझे विचार ज्याना पटतील त्यांनीच इथे थांबावे. ज्यांना पटत नाहीत त्यांनी कटावे" "कटण्याचा मार्ग" आणि पुढे टिळकरोडचा मार्ग दाखवणारा बाण. :)
मी ११वीत असताना मुद्दामहून जाऊन ही पाटी पाहीली आहे. जोगांचा वाडा असेल अजून तर अजूनही पाटी असेल तशीच.
21 Mar 2011 - 6:10 pm | पंगा
दोन्ही दिशांकडे (म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे) निर्देश करणारे बाण होते, असे आठवते.
तसेच, पाटीचे शब्द काहीसे "माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे असेल, तरच या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह)." असे होते, आणि त्यापुढील ओळ वर दिल्याप्रमाणे "<------ कटण्याचा रस्ता ------>" अशी होती, असेही आठवते.
ऐकीव माहितीप्रमाणे, मोरारजीभाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना मुंबई प्रांतात दारूबंदी लागू होती तेव्हा अनेक मद्यपींच्या कोर्टकेसेस या महाशयांनी (ते वकील होते, असे कळते) यशस्वीपणे लढवून, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून बंगला बांधून त्या बंगल्यास "मोरारजीकृपा" असे नाव दिले होते.
18 Mar 2011 - 11:34 am | विजुभाऊ
प्र बा जोगांच्या दारावर अजून बर्याच पाट्या होत्या.
त्यात एक सूचनांची पाटी होती त्यातल्या सूचना अर्थातच नमुनेदार होत्या.
उदा: बेल एकदाच वाजवावी बराच वेळ वाट पाहूनही कोणी न आल्यास भेतण्याची इच्छा नाही असे समजून निघून जावे
पुणेरी पाट्यांचे प्र बा जोग हे जनक आहेत
15 Mar 2011 - 10:19 pm | ५० फक्त
मुंबईला नवी मुंबई आहे तसं सोलापुरला जुळे सोलापुर आहे. म्हणजे नवं उपनगर आहे.
तसेच सोलापुरात आड्वा नळ नावाने ओळखला जाणारा भाग आहे. या भागातल्या मुळच्या रस्त्याला नवीन पाणि पुरवठा लाईन आडवा छेद देउन गेली आहे म्हणुन आडवा नळ.
रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागाला फॉरेस्ट म्हणले जाते. का ते माहित नाही.
इथल्या किल्यात एक बाळंतिणिची विहिर आहे. आम्ही लहान असताना, त्या विहिरीत वाकुन पाहिले असता आत ओढुन घेतले जाते असे सांगत. याच किल्यात आता बाग आहे, तिला किल्यातली बाग म्हणतात. विजापुर रोडला कंबर तलाव आहे, कंबर का ते माहित नाही.
सोलापुर - पुणे रोडवर असलेले बाळे नावाचे उपनगर आहे, ह्या इथे जुनी स्मशानभुमी आहे, त्यावरुन कोणि फार उथळपणे बोलायला लागले की सोलापुरात त्याला ' उचलली जिभ लावली टाळ्याला, घेतली घंटी निघाले बा़ळ्याला' असे म्हणायची पद्धत आहे. आता हेच मी इथे प्रतिसादात पण वापरणार आहे.
संगमेश्वर कॉलेजच्या समोरच्या भागाला पंखाबावडी म्हणतात, ते इथे असलेल्या एका विहिरीवर पुर्वी पवनचक्कीवर चालणारा रहाट होता म्हणुन.
बाकी, देव़ळांबद्दल म्हणाल तर, सोन्या मारुती आहे, पण ह्या मंडळाचा गणपती संपुर्ण चांदिचा आहे. मधला मारुती आहे, हा आधी भर चॉकात होता, १०-१५ वर्षांपुर्वी कोप-यात आणला आहे. आजोबा गणपती, ताता गणपती - हा पद्मशाली समाजाचा आहे, पद्मशाली समाजात आजोबांना ताता म्हणतात.
पत्रा तालीम, पाणिवेस तालीम, विजापुर वेस आहे, टोळाचा बोळ, चॉपाड अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत, वेश्यावस्ती असलेल्या भागाला तरटी नाका म्हणले जाते. जुन्या धान्याच्या खराब झालेल्या पोत्यापासुन केलेल्या पायपुसण्याला तरट म्हणले जाते, बहुधा तो संदर्भ असावा.
पुण्या-मुंबईत जेंव्हा मल्टिप्लेक्स म्हणजे काय ते माहित नव्हते तेंव्हापासुन सोलापुरात भागवत चित्रमंदिर आहे. एका संकुलात आशा, कला, मीना आणि दोन अशी पाच थिएटर आहेत. तसे ही सोलापुरात त्या रस्त्यावर एक किमोमीटर मध्ये ९ थिएटर आहेत. हे आमच्या गावाचं वैशिष्ट्य. आज पण फिल्मी मासिकात मुंबईनंतर सोलापुरच्या तिकिटविक्री वरुन सिनेमाच्या हिट / फ्लोप चा हिशोब मांडला जातो.
16 Mar 2011 - 10:18 am | विजुभाऊ
विजापुर रोडला कंबर तलाव आहे, कंबर का ते माहित नाही.
तो तलाव मलीक अंबर ने बांधला. त्या तलावाचे नाव पूर्वी मलीकअंबर तलाव असे होते.... कालौघात मलीकअंबर तलाव चे नाव कंबरतलाव राहीले
17 Mar 2011 - 4:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>पुण्या-मुंबईत जेंव्हा मल्टिप्लेक्स म्हणजे काय ते माहित नव्हते तेंव्हापासुन सोलापुरात भागवत चित्रमंदिर आहे. एका संकुलात आशा, कला, मीना आणि दोन अशी पाच थिएटर आहेत
भागवत चित्रमंदिराबद्दल पूर्ण आदर आहे, पण अशी संकुले मुंबईत पण होती :-) माटुंग्याचे बादल-बिजली-बरखा, वरळीचे सत्यम-सचिनम-सुंदरम ही मला माहित असलेली उदाहरणे. अशी संकुले आजच्या मल्टिप्लेक्सपेक्षा वेगळी होती. प्रत्येक ठिकाणी वेगळा सिनेमा लागायचा, तिकीट खिडक्या पण वेगळ्या असत असे आठवते. गेले ते दिवस च्यामारी.....
17 Mar 2011 - 5:57 pm | गणपा
वांदर्याचे Gaiety, Galaxy, Gem and Gossip
17 Mar 2011 - 6:43 pm | वपाडाव
हैदराबदेत लड आहे हो यांची...
नाव लिहायला पानं कमी पडावीत.
Sudershan 35/70MM, Devi 70 MM, Odeon, Mini Odeon, Sandhya 35/70MM, Sri Mayuri Theatre, Sapthagiri Cinema......etc
ही एकाच चौकात (R.T.C. Cross Roads, Hyderabad) असलेली १२ सिनेमाघरे...
एकंदरीत १५० च्या वरुन सिनेमाघरं /टाक्या आहेत हैदराबदेत.
आणी मल्टीप्लेक्स ही कंसेप्ट आता आलीए तिकडे.
फक्त ३ मल्टीप्लेक्स आहेत, ती सुद्धा २००८ साली झालेली.
2 Jul 2015 - 4:37 pm | वेल्लाभट
डोंबोलितही असा प्रकार आहे... बरोबर ना?
पूजा गोपी टिळक...?
2 Jul 2015 - 6:34 pm | dadadarekar
पूजा मधुबन व टिळक ... डोंबोली इस्टात मल्टिप्लेक्स आहे.
गोपी एकटेच आहे.. डोंबोली वेस्टमध्ये
15 Mar 2011 - 10:44 pm | सुनील
मुंबईत ब्रिटिश मंडळी कोटात (फोर्टात) रहात. बाजारहाटासाठी क्रॉफर्ड मार्केटात जात. ह्या बाजाराच्या मागच्या भागाला (आताचा महंमद अली रोड) behind the bazar असे संबोधीत. त्या behind the bazar चे पुढे झाले भेंडी बाजार!
16 Mar 2011 - 8:13 pm | प्रदीप
हे माहिती नव्हते.
बी. बी. माटुंगा व सेंट्रल माटुंगा ह्यांना जोडणारा लांबलचक ब्रिज आहे, जो रेल्वे कारखान्याच्या मधून जातो, त्याला 'झेड ब्रिज' असे नाव आहे. कारण त्याचा आकार इंग्रजी 'झेड' अक्षरासारखा आहे.
जुने मुंबईकर दादर व माटुंगा ह्यांच्या संदर्भात पश्चिम व पूर्व भागांना अनुक्रमे 'बी. बी.' व 'जी. आय. पी.' असे म्हणतात-- म्हणजे बी. बी. दादर, अथवा बी. बी. माटुंगा इ. ह्याचे कारण आता ज्यांना वेस्टर्न व सेंट्रल रेल्वे अशी नावे आहेत त्यांना पूर्वी अनुक्रमे 'बी. बी. सी. आय.' (Bombay Baroda Central India) व जी. आय. पी. (Greater Indian Peninsula) रेल्वे अशी नावे होती.
30 Jun 2015 - 7:17 pm | बॅटमॅन
बीबीशीआयला जायपीचा डबा जोडणे या अंतूबर्वीय वाक्प्रचाराचा उगम कळाला, धन्यवाद!
3 Jul 2015 - 12:45 am | सविता००१
लिहायला आले होते.
15 Mar 2011 - 10:53 pm | jaydip.kulkarni
वाई येथे परटाचा पार आहे ..............तिथे वडाचे फार जुने झाड आहे , पुर्वी तेथे बर्यापैकी परीट वस्ती होती पण आता फारशी नाही ........... तसेच मधली आळी नावाचा परीसर आहे पण तो कोणत्याही प्रकारे मध्यभागी नाही ............. पण ढोल्या गणपती मात्र नावाप्रमाणे आहे ..............
सान्गली येथे गावभाग नावाचा परीसर आहे , गावाच्या बाहेर ............
सातार्याजवळ चिमणगाव नावाचे गाव आहे , पण फारशा चिमण्या ( पोरी पण ) दिसल्या नाहीत .......
वेडी बाभळ नावाचा भाग ओगलेवाडी च्या जवळ आहे ......... पण तिथे बाभळ नाही ..........
16 Mar 2011 - 10:53 am | प्यारे१
आय्ला खरंच की.....
>>>वाई येथे परटाचा पार आहे ..............तिथे वडाचे फार जुने झाड आहे , पुर्वी तेथे बर्यापैकी परीट वस्ती होती पण आता फारशी नाही ........... तसेच मधली आळी नावाचा परीसर आहे पण तो कोणत्याही प्रकारे मध्यभागी नाही ............. पण ढोल्या गणपती मात्र नावाप्रमाणे आहे ..............<<<<
मधली आळी येथे आम्ही राहतो. नाव का दिले गेले आहे हे ठाऊक नाही. ( उगाच प्रश्न विचारणार्यांना योग्य जागी सुद्धा मारण्यात येणार नाही. बाकीच्यांचे २४*७ स्वागत. धन्यवाद.)
जुन्या काळी ती खरेच गावाच्या मध्यभागी असेल. कुणास ठाऊक.
कर्हाड वरुन कुंडलला जाताना दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी अशी गावांची 'दुग्धजन्य' नावे आढळतात.
16 Mar 2011 - 1:58 pm | वपाडाव
इतकं विरजण यांना भेटत कुठे असेल हो?
असो. बाकी,
आमचेकडे सर्व प्रकारच्या विरजणांचे आनन्ददायक श्रीखंड करून मिळेल.
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) या दोनही स्वाक्षर्यांची आठवण झाली.
16 Mar 2011 - 7:15 pm | jaydip.kulkarni
नमस्कार वाईकर ...................
16 Mar 2011 - 12:39 am | मेघवेडा
ठाण्याजवळची कापूरबावडी, वाघबीळ, गायमुख इ. ठिकाणं. रायगड किल्ल्याजवळ असलेल्या वाघबीळात एखादं भुयार असून ते इथं निघत असण्याचे काय चान्सेस? ;)
भांडुप पश्चिमेला 'जंगलमंगल रोड' आहे! तिथं जंगल तर नाहीच नि या रस्त्यावर मंगलकार्य होत असल्याचे चान्सेस सुद्धा कमीच! ;)
बोरीवलीच्या कुलूपवाडीच्या नावामागचं रहस्य काय आहे कोण जाणे!
गोरेगावात पांडुरंगवाडीजवळ एक मैदान आहे त्याला 'बाप का बगीचा' असंच म्हटलं जात असल्याचं लहानपणापासून ऐकलंय! बगीचा तर नावाला दिसला नाही कधी, कधी काळी असावा नि तिथं कुणीही येऊन ती जागा आपल्या बापाची असल्याचं समजून काय वाट्टेल ते करत असल्याने त्याला हे नाव पडलं असावं असा आमचा अंदाज आहे!
आरे कॉलनीत 'छोटा काश्मीर' हे गार्डन होण्यापूर्वी त्या टेकडीवर ऑब्झर्वेशन पॉईंट (की पोस्ट) होता. म्हणून तिथं बाग झाल्यावर
त्याचं 'ओ.पी. गार्डन' झालं! आरे कॉलनीतच दुसर्या एका टेकडीवर असलेल्या न्यूझीलंड हॉस्टेलचा प्रत्यक्षात न्यूझीलंडशी काही संबंध आहे की नाही याची कल्पना नाही! :)
कोकण रेलवेवर रत्नागिरीजवळ उक्षी नि भोके स्टेशनांच्या दरम्यान एक बोगदा आहे! त्यावर 'भोके बोगदा' असं प्रशस्त अक्षरांत लिहिलंय! तो बोगदा आला, की "गाडी भोक्याच्या बोगद्यात गेली रे!!" हे आमचं ठरलेलं वाक्य! ;)
कशेडी घाटातलं कशेडी गाव सोडून पुढे घाट उतरू लागलो की वाटेत एका ठिकाणी दरीकडे बाण केलेला बोर्ड आहे आणि त्यावर लिहिलंय "केवड्याचा माळ". तिथं माळ नाहीच.. दिसते ती नुसती खोलखोल दरीच!
चिपळूण-गुहागर रस्त्यावर मार्गताम्हने सोडल्यावर पुढे 'शृंगारतळी' नावाचं गाव लागतं! आम्ही एकदा मुद्दाम त्या गावातल्या तळीत आंघोळ करायला थांबलो होतो! म्हटलं बघू तरी काही शॄंगाराचा चान्स आहे का! ;)
16 Mar 2011 - 10:29 am | नितिन थत्ते
>>न्यूझीलंड हॉस्टेलचा प्रत्यक्षात न्यूझीलंडशी ....
पूर्वी दुग्धोत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी न्यूझीलंडमधील तज्ञ येत असत त्यांना राहण्यासाठी बांधलेले होस्टेल ते न्यूझीलंड होस्टेल.
16 Jul 2015 - 12:52 pm | चलत मुसाफिर
मी ऐकलेली कथा अशी. गुहागर हे पेशव्यांचे मूळ गाव. पुण्याहून पेशवे घराण्याचे लवाजमे नेहमी गुहागरला जात. त्या वेळी घाटरस्ते सुरक्षित नव्हते. लवाजम्यात स्त्रिया असत. चोर लुटारूंचे भय असे. त्यामुळे स्त्रिया आपले दागदागिने काढून ठेवत. पण गावात प्रवेश करण्याअगोदर पुन्हा सारा साज लेवावा लागे. त्याकरिता एका तळ्याकाठी राहुटी उभारली जाई. त्या तळ्याचे नाव शृंगारतळी असे पडले.
16 Mar 2011 - 9:27 am | वेडा कुंभार
अरे मेघवेडा तू भांडूप पश्चिम चा गाढव नाका विसरलास.
16 Mar 2011 - 5:46 pm | मेघवेडा
हो हो, विसरलोच होतो. पुन्हा भट्टीपाडा, टेंभीपाडा, फिल्टर पाडा, आणि काय काय पाडा असलं काय काय सुद्धा आहे भांडुपला!
16 Mar 2011 - 6:40 pm | सूड
>>अरे मेघवेडा तू भांडूप पश्चिम चा गाढव नाका विसरलास.
भांडूपच्या लोकांनी उगाच त्याचं अशोक केदारे चौक वैगरे नामकरण केलंय !:D
सगळे अजूनही गाढव नाकाच म्हणतात.
16 Mar 2011 - 10:04 am | ज्ञानेश...
धुळ्यात एक 'खोल गल्ली' म्हणून आहे.
तसेच तीन कंदील, पाच कंदील म्हणूनही काही एरिया आहेत.
16 Mar 2011 - 12:08 pm | श्रावण मोडक
धुळ्यातच पाच कंदीलच्या थोडे पुढे मुंबईच्या दिशेला बारा पत्थर (किंवा फत्तर) आहे. फाशी गेटही आहे.
एका भागाला मोगलाई असेही नाव आहे.
16 Mar 2011 - 10:15 am | विजुभाऊ
पुण्यात हुजूर पागा आहे तेथे म्हणे घोडे बांधत असत
सातार्यात हत्ती खाना आहे . पूर्वी म्हणे तेथे हत्ती बांधत असत
हल्ली या दोन्ही ठीकाणी शाळा आहेत. हा एक गमतीदार योगायोग.
भोर ला उभी मंगळवार पेठ आणि आडवी मंगळवार पेठ अशा दोन पेठा आहेत
16 Mar 2011 - 11:00 am | प्रदीप
हाँगकाँग येथे एका गल्लीचे नाव रेडनॅक्सेला टेरेस (Rednaxela Terrace)असे आहे. हे खरे तर अलेक्झांडर टेरेस (Alexander Terrace) असे असावयास हवे होते. पण असे सांगितले जाते की रस्त्याच्या नावाची पाटी लिहीणार्या चिनी कर्मचार्याने अलेक्झांड्रा उजवीकडून डावीकडे लिहीले (हे साधारणपणे १९०० च्या सुमारास झाले असावे असे रेकॉर्डवरून दिसते). तेव्हापासून ह्या रस्त्याचे नाव तसेच राहिले आहे! आता हे नाव दप्तरीही तसेच आहे-- रेडनॅक्सेला टेरेस!
17 Mar 2011 - 10:32 am | पंगा
पुण्यात जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्ता यांना जोडणारी एक अतिशय अरुंद, चिंचोळी अशी गल्ली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते त्याच्याशेजारी एक टोक आणि जंगली महाराज रस्त्यावर बहुधा पूर्वी जेथे डेक्कन टॉकीज किंवा कलमाडींचे पूना कॉफी हाउस होते त्याच्याशेजारी दुसरे टोक. गल्लीच्या एकाच बाजूस असंख्य टपरीवजा दुकाने आहेत, आणि रात्र असो वा दिवस, गल्लीत प्रचंड गर्दी असते.
या गल्लीस 'हाँगकाँग गल्ली' असे नाव पडण्यामागील काही कारण कोणास ठाऊक आहे काय?
(तसेच, याच धाग्यावर इतरत्र कोणीतरी विचारल्याप्रमाणे, 'नळ स्टॉप' या नावाचा उगम. किंवा, 'भिकारदास मारुती'तला भिकारदास नेमका कोण.)
17 Mar 2011 - 11:47 am | Nile
तिथं चाईनीज वस्तु विकत मिळतात म्हणुन असावे, चु भु द्या घ्या.
बाकी नळस्टॉप बद्दल माहित आहे. पुर्वी पुणं डेक्कनच्या पुढं नव्हतं. मात्र नळ स्टॉप जिथे आहे तिथे कार्पोरेशनचा एक पाण्याचा नळ होता, आजुबाजुच्या वस्त्यांसाठीचा (आणि कार्पोरेशनचा बहुदा त्या दिशेकडील शेवटचा) असावा.
आता तिथेच का अशी शंका येउ शकते. तर बहुदा डेक्कन वरुन त्या बाजुने कर्वे नगर पर्यंत जाणारी पायवाटसुद्धा होती, त्याच रस्त्याने कर्वे येत जात असत म्हणुनच तो कर्वे रोड. म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते.
18 Mar 2011 - 11:40 am | विजुभाऊ
म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते.
कोणीतरी म्हणाले की पुणे महापालीकेचे पाणी त्यापुढे जायचेच नाही म्हणून नळाचे पाणी जेथे थांबते तो नळ स्टॉप
.......एकेकाळी पुण्यात राहीला विजुभाऊ
17 Mar 2011 - 4:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते...
ते कोपऱ्यावरचे लकी गेलं ?? अरेरे !!! तिथे अजून एकदा जायची इच्छा होती.
1 Jul 2015 - 3:55 pm | gogglya
पुणे आता राहीले नाही!
16 Mar 2011 - 11:00 am | कवितानागेश
ऐकिव माहिती:
"इष्टुर फाकडा" असे एक ठिकाण पुण्याच्या अगदी जवळच आहे.
कुणीतरी स्टुअर्ट होता, त्याची तिथे समाधी(?) आहे म्हणे.
शिवाय जत्रा पण असते.
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा
16 Mar 2011 - 11:40 am | नगरीनिरंजन
मी 'जाणकार' नाही पण लिहील्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहीतोय.
वडगावच्या लढाईत कुत्र्याच्या आईवानी मार खाल्लेल्या लेफ्टनंट स्टुअर्टची समाधी आहे ती. या लढाईत इंग्रजांना जगात कुठेही सहन करावा लागला नाही असा पराभव महादजी शिंदेंच्या मराठा सैन्याकडून सहन करावा लागला. इंग्रज शरण आल्यावर मोठ्या मनाने त्यांना मुंबईला जाऊ देण्यात आले.
या लाजिरवाण्या पराभवानंतर इष्टुर फाकडा हा एक विनोद झाला असावा मराठा सैन्यात, पण नंतर शतकभराने इंग्रजांची सत्ता आल्यावर त्या इष्टुर फाकड्याचं उदात्तीकरण करून जणू काही त्याने तुटपुंज्या सैनिकांनिशी मराठ्यांच्या बलाढ्य सेनेला मरेस्तोवर तोंड दिले असा अपप्रचार केला गेला आणि मग ही समाधी 'इंडिअन आर्मी' ने उभारली.
17 Mar 2011 - 3:51 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. इष्टुड फाकड्याचा वर सांगितलेला इतिहास तंतोतंत बरोबर आहे.
16 Mar 2011 - 11:37 am | अरुण मनोहर
सिंगापूरला ब्रिटीश येण्याआधी खूप वर्षे, म्हणजे १३६० शतकातली गोष्ट आहे.
सुमात्रा बेटांवर संग निला उतामा (निलोत्तम?) नावाचा राजा होता. श्रीविजयन साम्राज्यातला हा एक राजा होता. एकदा तो शिकार करायला सिंगापूर बेटावर आला, तेव्हा इथल्या जंगलात त्याने एक नविनच प्राणी पाहिला. त्याच्या प्रधानाने त्याला हा सिंह आहे असे सांगीतले. (तो वाघ असण्याची शक्यता जास्त आहे). पहिल्यांदा ह्या भागात सिंह दिसला, म्हणून ह्या बेटाचे नाव नंतर त्याच्या कारकिर्दीत सिंगापूर पडले, अशी दंतकथा आहे.
ब्रिटीशांच्या काळात अनेक मजूर भारतातून आणण्यात आले. त्यात दुधवाले भैया, धोबी वगैरे देखील होते. गवळ्यांची मोठी वस्ती आजच्या सेरेंगून भागात होती. त्यांच्या म्हशींचे गोठे जिथे होते, तो भाग कांदांग कर्बाऊ (मलेय भषेत- म्हशींचा गोठा) म्हणून ओळखल्या जाऊ लागला. आज तिथे स्त्रियांचे इस्पीतळ आहे. मजेचा भाग म्हणजे ते आज देखील कांदांग कर्बाऊ हॉस्पीटल म्हणून प्रसिद्ध आहे.
त्या काळी, शहरात एक मोठा धोबीघाट होता. आपटून धोपटून कपडे धुणारे उत्तर भारतीय धोबी होते. त्या भागाचे आज देखील धोबीघाट हेच नाव आहे.
16 Mar 2011 - 11:42 am | नगरीनिरंजन
सासवडजवळ सिंगापूर नावाचे गाव आहे असे ऐकून आहे.
16 Mar 2011 - 12:13 pm | श्रावण मोडक
बेळगावात बोगारवेस आहे. या नावाची कुळकथा काय असावी?
16 Mar 2011 - 7:20 pm | jaydip.kulkarni
बोगारवेस हे नाव पु . ल . देशपान्डेच्या रावसाहेब मधे ऐकले होते .......... आम्बट शॉकिन ;-) लोकान्चे तिर्थक्शेत्र आहे असे वाटते ................
1 Jul 2015 - 4:14 pm | पाटील हो
१ ) बेळगाव जवळ उलागडी खानापूर नावाचे गाव आहे, उलागडी = कांदा {मराठीत} , मराठीत कांद्याच खानापूर म्हणता येईल का ?
२) निप्पाणी - अक्कोळ रस्त्यावर पंगीराला जायला आंबा stop आहे पण आतातरी तिथे आंब्याचे झाड नाही .
३) चिकोडी मध्ये अंकली कुट नावाची एक वेस आहे. तिथून पुर्वी लोक अंकालीला जायचे असे म्हणतात ( आतापण तीतूनच जातात )
1 Jul 2015 - 10:05 pm | यसवायजी
निपाणीवरून आठवले, कराडजवळ येडे-नीपाणी नावाचे एक गाव आहे.
(शाने-निपाणीकर) SYG
16 Mar 2011 - 1:06 pm | रामदास
विचारून येतो.
16 Mar 2011 - 3:57 pm | श्रावण मोडक
नक्को. तुम्ही इथेच हवा आहात... ;)
16 Mar 2011 - 1:23 pm | रम्या
शिवडीला एक मारूती मंदीर आहे... नाव चिमण्या मारूती.
16 Mar 2011 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार
चेन्नई मध्ये व्हिजा गणेश म्हणुन एक गणपती प्रसिद्ध आहे. त्याच्या आशिर्वादाने म्हणे व्हिजाचे काम लवकरात लवकर होते.
हा हा हा
16 Mar 2011 - 1:36 pm | टारझन
आगायायाया =)) =)) =)) कसला मॉडर्ण झालाय गणेश हल्ली =))
- पासपोर्ट गणेश
16 Mar 2011 - 2:05 pm | Nile
हैद्राबादात व्हिसा गॉड आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Chilkur_Balaji_Temple