दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी
(भाग-१)
(भाग-२)
(भाग-३)
(भाग-४)
ह्या भागातसुध्दा ज्यांची कारकिर्द स्वतंत्र संगीतकार म्हणून मोजक्या चित्रपटांच्या पलीकडे गेली नाही अश्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांचा आढावा घेउ.
संगीत दिग्दर्शक- सी. अर्जून
१९७५ सालच्या "जय संतोषी मां" मुळे प्रसीध्दी मिळालेले सी. अर्जून १९६० सालापासुन चित्रपट सृष्टीत कार्यरत होते. प्रसीध्द बॅनर, प्रसीध्द कलाकार यांच्या वाट्याला आलेच नाहीत.
सर्वात गाजलेले गाणे म्हणजे म.रफी यांनी गायलेले पास बैठो तबीयत बहेल जायेगी" हे गाणे. (या गाण्याला पडद्यावर जगदिप होते).
हिंदी चित्रपटांबरोबर त्यांनी काही गुजराथी व एका सिंधी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते.
त्यांची काही गाजलेली गाणी (जय संतोषी मां व्यतिरीक्त) पुढील प्रमाणे.
चित्रपट- सुशीला (१९६६)
ग़म की अंधेरी रात में
दिल को ना बेक़रार कर
सुबह ज़रूर आयेगी
सुबह का इन्तज़ार कर
(म.रफी आणि तलत मेहमुद)
बेमुरव्वत बेवफ़ा बेगाना-ए-दिल आप हैं
आप माने या न माने मेरे क़ातिल आप हैं
(मुबारक बेगम)
चित्रपट- नबाब साहब (१९७८)
अब से पहले तो ये दिल की हालत न थी
आज क्या हो गया, आज क्या हो गया
(उषा मंगेशकर)
चित्रपटा- पुनर्मिलन (१९६४)
पास बैठो तबीयत बहल जायेगी
मौत भी आ गई हो तो टल जायेगी
(म.रफी)
चित्रपट- खून और मुजरीम
अबसे पहले ये दिल की हालत ना थी
आज क्या हो गया आज क्या हो गया.
(उषा मंगेशकर व सुरेश वाडकर)
संगीत दिग्दर्शक- सी. अर्जून यांची गाणी येथे आणि येथे ऐकता/डाउनलोड करता येतील.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संगीत दिग्दर्शक- नाशाद
संगीत दिग्दर्शक नाशाद उर्फ शौकत हैदरी यांनी दिलदार, जवाब, नगमा, कातील तसेच जिने दो या भारतातील चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. (भारतीय शब्द वापरण्याचे कारण पुढे १९६४ साली ते पाकीस्तान निवासी झाले). १९४७ साली दिलदार या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
पण गाणी गाजली ती बारादरी या चित्रपटातील.
चित्रपट- बारादरी (१९६४)
तसवीर बनाता हूँ, तसवीर नहीं बनती, तसवीर नहीं बनती
एक ख्वाब सा देखा है, ताबीर नहीं बनती, तसवीर नहीं बनती
(तलत मेहमुद यांचे अत्यंत प्रसीध्द गाणे)
भुला नहीं देना जी भुला नहीं देना
ज़माना खराब है दग़ा नहीं देना
(लता दिदी आणि म. रफी यांनी गायलेले एक प्रसीध्द रोमँटीक गीत)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संगीत दिग्दर्शक- सरदार मलीक
उदय शंकर यांचे कडे नृत्याचे शिक्षण घेतलेल्या आणि त्यांच्या ट्रुपमधे काम करणा-या सरदार मलीक यांना संगीताची खूप आवड होती. नृत्याबरोबरच ते गात आणि नृत्य दिग्दर्शानाचे कामसुद्धा करीत.
नृत्य दिग्दर्शानाचे काम करीत असताना आलेल्या कटु अनुभवामुळे त्यांनी ते काम बंद केले. पुढे त्यांना संगीत दिग्दर्शानाची संधी मिळाली. म. रफी यांचे गाणे ऐकल्यावर त्यांनी स्वत: गायचे नाही असे ठरवले.
अनेक "बी" ग्रेडच्या सिनेमांना संगीत दिल्यावर कंटाळुन हे कामसुद्धा बंद केले आणि गाणे शिकवायचे काम करू लागले. पण शेवटी शेवटी अनेकांना त्यांची ओळख "अन्नु मलीकचे वडील" अशीच राहीली.
त्यांची प्रसीध्द गाणी पुढील प्रमाणे.
चित्रपट- सारंगा (१९६०) या सिनेमातील मुकेश यांची दोन गाणी खूप गाजली.
सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन
मधुर तुम्हारे मिलन बिना
दिन कटते नहीं रैन, हो~
(मुकेश)
हे गाणे येथे ऐका/डाउनलोड करा.
हां दीवाना हूँ मैं -हां दीवाना हूँ मैं
ग़म का मारा हुआ इक बेगाना हूँ मैं
हां दीवाना हूँ मैं
(मुकेश)
चित्रपट- ठोकर (१९५३)
ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ
ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ
क्या करूँ, क्या करूँ
ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ
(हे गाणे तलत मेहमुद आणि आशा भोसले या दोघांनीही गायले आहे. दोन्हीतील कडवी वेगवेगळी आहेत)
चित्रपट- बचपन (१९६३)
मुझे तुमसे मुहब्बत है मगर मैं कह नहीं सकता
मगर मैं क्या करूँ बोले बिना भी रह नहीं सकता
(म.रफी)
चित्रपट- अ-बे हयात (१९५५)
मैं गरीबों का दिल, मैं मचलती सबाँ
बेकसों के लिये, प्यार का आशियाँ
(हेमंत कुमार)
सदार मलीक यांची चित्रपटातील गाणि येथे ऐकता/ डाउनलोड करता येतील.
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 9:43 am | ५० फक्त
या सेटमधली हि गाणि माहित आहेत, बाकीची ऐकतो.
सवीर बनाता हूँ, तसवीर नहीं बनती, तसवीर नहीं बनती
एक ख्वाब सा देखा है, ताबीर नहीं बनती, तसवीर नहीं बनती
भुला नहीं देना जी भुला नहीं देना
ज़माना खराब है दग़ा नहीं देना
पास बैठो तबीयत बहल जायेगी
मौत भी आ गई हो तो टल जायेगी
सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन
मधुर तुम्हारे मिलन बिना
दिन कटते नहीं रैन, हो~
हां दीवाना हूँ मैं -हां दीवाना हूँ मैं
ग़म का मारा हुआ इक बेगाना हूँ मैं
हां दीवाना हूँ मैं
मैं गरीबों का दिल, मैं मचलती सबाँ
बेकसों के लिये, प्यार का आशियाँ
9 Mar 2011 - 9:58 am | चित्रा
आठवण झाली गाण्याची, धन्यवाद.
तुमचा गाण्यांचा अभ्यास फारच चांगला आहे.
9 Mar 2011 - 10:53 am | इन्द्र्राज पवार
"...ऐ गमे दिल क्या करूं, ऐ वहशते-दिल क्या करू....!"
तलत मेहमूद वर जीव टाकणारे अगणित असल्याने त्यांच्या जवळजवळ सर्वच गाण्यांचा साठा आमच्या ग्रुपकडे आहे. त्यातील 'ऐ गमे दिल क्या करूं, ऐ वहशते-दिल क्या करू....' हे त्यातील उत्कट उदास भाव, अर्थ न कळताही मनावर मोहिनी पसरवणारे ते विलोभनीय ऊर्दु आणि या सर्वांवर कडी करणारे तलतचे सूर.... यामुळे या गीताची जादू आज या क्षणालाही यत्किंचितही कमी झालेली नाही. सरदार मलिक यानी 'ठोकर' साठी हे गाणे दिल्याचे कागदोपत्री समजले होतेच....चित्रपट पाहण्याचा (वा मिळण्याचा) प्रश्नच नव्हता, तरीही पडद्यावर 'आद्य उच्छलकूद सम्राट' शम्मी कपूर याने गायिले आहे, हे समजल्यावर थोडा विरसच झाला. पण कान्ट हेल्प !
पुढे श्री.माधव मोहोळकर लिखित 'गीतयात्री' मध्ये या गीताचा कर्ता 'मजाज' यांच्यावर एक लेख आहे आणि तोही 'ऐ गमे-दिल क्या करूं..." यास शीर्षकाने असे मित्राकडून समजल्यावर लागलीच त्या पुस्तकाची खरेदी झाली....आणि गीतामागील कविची ती वेदनाही त्या लेखातून समजली.
श्री.चिंतामणी यांच्या लेखमालेतील या पुष्पाच्या निमित्ताने अनुक्रमे तलत, सरदार मलिक, मजाज याना सलाम करीत आहे. [या क्षणी...प्रतिसाद देता देता... तलतचे हेच गाणे ऐकत आहे.......]
इन्द्रा
9 Mar 2011 - 12:39 pm | विजुभाऊ
एक थी लडकी चित्रपटातील " लारी लप्पा लारी लप्पा लाइ रखदा" हे गाणे संगीतकार विनोद यानी केलेले होते.
त्यांची इतर गाणी कोणाला माहीत आहेत का/
"नीना की नानी की नाव चली" आणि "रेल गाडी रेल गाडी झुक झुक झुक झुक" चित्रपट आशिर्वाद या गाण्यांचे संगीतकार कोण होते.
नानी तेरी मोरनी को मोर ले गये बाकी जो बचा था काले चोर ले गये " कोणाचे गाणे आहे
9 Mar 2011 - 3:30 pm | इन्द्र्राज पवार
"...संगीतकार विनोद ...."
~ होय, फारच छान आणि तितकेच गाजलेले गाणे होते "लारा लप्पा...." पडद्यावर मीना शौरी आणि तिच्या मैत्रिणी म्हणतात....यू ट्युबवर सातत्याने दुर्मिळ संगीत विभागात हे गाणे पाहायला मिळते. मीनाकुमारी यांच्या फिल्मोग्राफीमध्ये 'अनमोल रतन' नावाचा एक चित्रपट आहे, त्याचे संगीतकार म्हणून विनोद यांचा उल्लेख सापडला, मात्र यातील गाण्याविषयी काही माहिती नाही.
"नीना की नानी की नाव चली..." हे "आशीर्वाद" चित्रपटातील अशोककुमार यानीच गायिलेले गीत ज्याचे संगीतकार होते आपले वसंत देसाई.
"नानी तेरी मोरनी...' हे बालगीत आहे शब्दावरून सूचीत होतेच...पण त्याचा इतिहास ज्ञात नाही. कदाचित श्री.प्रदीप किंवा श्री.चिंतामणी याना माहीत असेल....दोघेही मास्टर आहेत या क्षेत्रात.
इन्द्रा
9 Mar 2011 - 4:18 pm | चिंतामणी
यांनी एकंदर ३२ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले. परंतु कुठल्याव्ही चित्रपटाची गाणी वरील गाण्याइतकी गाजली नाहीत. (सर्व सिनेमे "ब" अथवा "क" दर्ज्याच्या निर्मात्यांचे होते.)
नानी तेरी मोरनी को मोर ले गए हे गाणे मासूम (१९६०) मधील असून संगीत दिग्दर्शक हेमंतकुमार आहेत. ते गाणे राणु मुकर्जीने गायले आहे.
9 Mar 2011 - 6:33 pm | पैसा
या गाण्यांच्या सीडी कुठे मिळत नाहीत. रेडिओ एकूणच ऐकला जात नाही. ऐकायचं ठरवलं तर सिलोन रेडिओ अजून अस्तित्त्वात आहे का माहित नाही. टीव्हीवर सबंध वेळ शीला नाहीतर मुन्नी बोंब मारत असतात. या परिस्थितीत तुम्ही या रत्नांवरची धूळ झटकून आमच्यासमोर आणताय, तुम्हाला मनापासून धन्यवाद!
9 Mar 2011 - 10:26 pm | इन्द्र्राज पवार
"...या गाण्यांच्या सीडी कुठे मिळत नाहीत...."
~ तुझे हे म्हणणे काहीसे खरे असले तरी अजिबातच सीडी मिळत नाही असे नाही. फक्त ज्या दुकानात आपण जातो तेथील काम करणार्याला (किंवा करणारीला) तितका उत्साह असावा लागतो. कित्येक कर्मचारी हे निव्वळ पाट्या टाकणारेच असतात....हां, तू म्हणतेस तसे त्यानाही शीला की जवानी मध्ये आणि मुन्नीच्या बदनामीमध्येच इंटरेस्ट असतो. यापेक्षा जे दुकान एकछत्री (म्हणजे मालक हाच सर्व्हिस देणारा असे...) असते तिथे मात्र ग्राहकाची मागणी आवर्जून पुरविण्याची प्रामाणिकपणे कोशिश केली जाते.
रेडिओ सिलोन आता "इतिहास" झाला त्यामुळे त्याचे स्टेशन शोधण्याची तसदी घेण्याचे कारण नाही. तरीही तू http://www.eprasaran.com/ या साईटचा उपयोग करा. इथे बारमाही २४ तास हिंदी आणि मराठी गाण्यांचा "ऑनलाईन" आनंद घेता येतो (शिवाय गाण्याबाबतच्या निवेदनाशिवाय अन्य काहीही नसते, एकही जाहिरात नाही). अमेरिकेत राहिलेल्या मराठी बांधवांनी या रेडिओ स्टेशनची सुविधा सुरू केली असून जुन्या गाण्यांची बर्यापैकी भूक इथे भागली जाते.... ट्राय इट...!
इन्द्रा
9 Mar 2011 - 7:25 pm | चिंतामणी
प्रतिक्रीयाबद्दल धन्यु.
इतर सर्वांचे आभार जे व्यनीने अभीप्राय देतात अथवा फोनवरून देतात.
30 Mar 2011 - 9:09 am | छ्छुंदरसिंग
हया चित्रपटातील गीत आहे,
शाम रंगीन हुई है,तेरे आचल की तरहा,
सुरमई रंग चढा है,तेरे काजल की तरहा
(उषा मंगेशकर व सुरेश वाडकर),सं.अर्जुन चंदीरामानी.(सी.अर्जुन)
छ्छु!