उडाला भडका
वाजवा डंका
पेटवा लंका
पेटली मशाल क्रांतीची
सर्वत्र विखारी नाग
धुमसली आंतरिक आग
भडकला सार्वजनिक राग
पेटली मशाल क्रांतीची
स्फुरले तारुण्य
सळसळले रक्त
हादरले मदांध तख्त
पेटली मशाल क्रांतीची
काव्य केलेने शस्त्राने
रक्त सांडली लेखणीने
भूमीस लाल-अभिषेक
पेटली मशाल क्रांतीची
धरणी दुभंगली
आकाश विस्फारले
भास्कराने डोळे मिटले
पेटली मशाल क्रांतीची
सृष्टी-पुत्रांनीचं पुकारला
प्रती-सृष्टीचा उष:काल
भास्कराने पुनश्च: डोळे उघडले
आकाश सारे मुक्त झाले
हसले डोंगर
आनंदिली सरिता
पेटली मशाल क्रांतीची
आता,
तुचं तुझा चित्रकार
तुचं तुझा शिल्पकार
तुचं देणार या प्रतिसृष्टीस आकार...
प्रतिक्रिया
7 Mar 2011 - 12:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान आहे..
7 Mar 2011 - 12:48 pm | आत्मशून्य
जसे झेंडा चीत्रपटातले गाणे होते "सावधान..... वणवा पेट घेत आहे".
7 Mar 2011 - 2:04 pm | अविनाशकुलकर्णी
बटबटीत..झाले आहे
7 Mar 2011 - 4:53 pm | गणेशा
मस्त कविता .. आवडली
10 Mar 2011 - 12:05 pm | अभिषेक९
धन्यवाद..
10 Mar 2011 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
राग नका मानु पण हे बडबडगीत वाटत आहे :)