५० फक्त

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
4 Mar 2011 - 11:53 am

गेल्या आठवड्यात मी माझं मिपावरचं नाव बदललं charshad चं ५० फक्त केलं. त्या संदर्भात मला विचारलेले प्रश्न

१. हे का केलं ? - ब-याच दिवसापासुन होतं मनात हा बदल करायचा पण १३ फेब्रु. च्या कट्ट्यात श्री. निलकांत यांच्याबरोबर चर्चा केल्यावर यावर अंमल झाला.

२. हेच का ? - आता हा दिर्घ उत्तरी प्रश्न आहे.

नाही वर्ल्ड कप चालु झाला म्हणुन नाही, पण याला थोडा क्रिकेटचा संदर्भ आहे. ४ वर्षापुर्वी पर्यंत क्रिकेटचे दोनच प्रकार होते १. कसोटी आणि २. एकदिवसीय.

कसोटि पाच दिवस चालणारा सामना, प्रत्येकाला दोन दोन संधी मिळणार, एकदा केलेली चुक सुधारता येईल, आधीच्या वेळी मिळवलेलं दुस-यांदा घालवता येईल असा हा प्रकार. आणि शेवटपर्यंत अनिश्चित, त्यात अनिर्णित हा एक अतिशय कंटाळवाणा निर्णय लागण्याची भयंकर शक्यता.

दुसरीकडे एकदिवसीय सामना, मर्यादित षटकांचा, संधी एकच, एका ठिकाणि केलेली चुक म्हणजे फलंदाजित केलेली चुक क्षेत्ररक्षणात सुधारुन घेण्याची संधी, गोलंदाजीतली चुक फलंदाजीत सावरण्याची संधी , पण ती सुद्धा एकच.

या गोष्टींचा प्रभाव पडत होताच. कुठलीही गोष्ट बोलताना क्रिकेटचा संदर्भ देउन बोललं की आपल्या क्रिकेट्वेड्या देशात लगेच कळतं , जसं मला कुणि सांगितलेलं काही कळत नसेल तर मी त्याला outside off stump म्हणुन सोडुन देतो. उगाच मध्ये बॅट घालुन ऑट कोण व्हा.

कधीतरी विचार करताना, डायरी लिहिताना वाटलं आपण टेस्ट खेळतोय का वन डे ? आजचं उद्या करु, पुन्हा केंव्हातरी बघु हे असले विचार का करु शकतो तर टेस्ट खेळतोय म्हणुन. वेळेचं भान नाही राहात मग, कुठली बंधनं नको वाटतात, कुठलं ध्येय दिसत नाही समोर नक्की. कितिही केलं तरी कमीच आहे असं वाटायला लागतं. आत्ता आपण काहितरी करायचं आणि समोरच्यानं जास्त केलं तर पुन्हा अजुन जास्त करायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं नाही तर जिंकल्याचा शुद्ध निखळ आनंद नाहीच की पुन्हा पेटुन उठवेल अशी पराभवाची भळभळती जखम नाही, उगीच वेड्यासारखं ' नेकी कर ऑर दर्या में डाल ' किंवा तुला न मला घाल कुत्र्याला ' असा प्रकार सगळा.

त्यापेक्षा वनडे जरातरी बरि, ९९% काहीतरी निकाल लागणारच, मी जिंकेन किंवा हरेन, काहीतरी होईलच. आणि जे व्हायचं आहे ते करण्यासाठी मी जे करु शकतो ते एका निश्चित वेळेत, निश्चित पद्धतिनं करायचं आहे. कुणि दिलेल्या ध्येयामागं पळायचं असेल तर गाठायला ते ध्येय आहे. कुणाला पळवायचं असेल तर किती पंळवायचं ते ठरवुन तेवढं करायला हवंय. भले ते कमी पडेल एखादे वेळेस पण जर समोरचा ते करु शकला नाही त्याच्या निश्वित वेळेत आणि निश्चित साधनांनी तर मी जिंकलो नाहीतर हरलो. पण अनिर्णिततेचा तो भयंकर पेंडुलम नाही डोक्यावर.

पण इथं, ही स्पर्धा आहे माझी माझ्याशीच, तो दुसरा कुणि नाहीच आणि असला तर मला माहित नाही. पण माझ्यातला दुसरा तर आहेच. माझी पहिली बॅटिंग आहे, काहीतरी करायचं आहे, विक्रम करायचे आहेत, केलेले मोडायचे आहेत, बळी पडतीलच, ते पडण्यासाठिच असतात, पण तरी ही पुढं जायचंच आहे. किति हे ध्येय नाही पण किती वेळात हे ध्येय आहे. मला नाही आवडत ते दिवसेंदिवस उभं राहणं आणि हा सगळा खेळ आपल्यच हातांनी अनिर्णिततेच्या भयंकर अनिश्चिततेकडं घेउन जाणं.

आणि म्हणुन मी माझ्यावर घालुन घेतलं एक बंधन, ५० फक्त, ५० वर्षे, आपलं कर्तुत्व दाखवायला, आपली ताकत सिद्ध करायला, वाढवाय्ला आणि एक ध्येय गाठायला. कोणती आहेत ही ध्येय किंवा काय मिळवायहातांनी, आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारिरिक का अजुन काही ? ते मला पण अजुन कळालेहातांनी,, मग इथं मात्र मी टेस्ट्चा नियम वापरतो. take one session one time. एकदा एका ध्येयाचा विचार आणि ते मिळवलं मी मग दुस-याचा पाठलाग सुरु. कधी एकाचा पाठलाग करताना दुसरं आपसुकच मिळतं आणि कधी पहिलं मिळवताना दुस-या पासुन फार लांब जातो. मग पुन्हा वाट बदलुन नवा पाठलाग सुरु करावा लागतो.

यात मजा आहे. एक थ्रिल आहे जसं प्रत्येक ओव्हर संपली की जसं उरलेल्या ओव्हर आणि चार पाच शक्यता पकडुन एकुण होणा-या रनस दाखवल्या जातात तसं, एक दिवस संपला की झोपताना उरलेले दिवस आणि मिळवायची ध्येयं यांचा हिशोब करायला मी मोकळा होतो. मग शक्यता - अशक्यतांचे तक्ते मांडले जातात, वाटा बदलायचा निर्णय घेतला जातो. कसं आधी विकेट वाचावायच्या का रनरेट वाढवायचा ते ठरवलं जातं, आणि एकदा वनडे खेळायला सुरवात केली की हे प्रत्येक ओव्हरला करावं लागतं, त्यानं आयुष्यात काय होतं तर एक शिस्त लागते, पुढं जाण्याची विजिगिषु का काय म्हणतात ना तशी व्रुत्ती तयात होते. एक प्रकारचा लढवय्येपणा येतो, आल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करणं सोपं जातं.

यासाठि ५० फक्त, उगाच टिवल्या बावल्य करायला आणि प्रत्येक बॉल तटवुन खेळायला वेऴ नाही आपल्याकडे. एवढं काही करुन जायचं आहे की कोणि सहजासहजि ते पार करु नये आणि केलं तरी मला वाईट वाटु नये.

असो, जे मला वाट्लं आणि जे मी अंगिकारायचा प्रयत्न करतो आहे ते लिहिलं, कोणाला पटेल न पटेल, काय फरक पडतो. जो पर्यंत बॅट आपल्या हातात आहे तोपर्यंत कोणता शॉट खेळायचा ते आपण ठरवायचं पण एक लक्षात ठेवुन ५० फक्त.

५० फक्त.

जीवनमानप्रवासविचारमतवाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Mar 2011 - 11:57 am | प्रचेतस

कारणमीमांसा पटली.
लेखन आवडेश.

पियुशा's picture

4 Mar 2011 - 12:00 pm | पियुशा

मस्त !

स्पंदना's picture

4 Mar 2011 - 12:04 pm | स्पंदना

ओह ! एका नावा माग एव्हढा विचार?
मला वाटल होत उगा एका लायनीच मीच तो हर्षद असा काहिसा धागा असावा.
पण नाही . हा माणुस हाडाचा लेखक आहे लेकाचा!

पैसा's picture

4 Mar 2011 - 8:42 pm | पैसा

अगदी हेच म्हणते!

फक्त ५० का नाही?

-प्रश्न फक्त.

ओक्के सर

लेख आवडेश
मस्त

प्यारे१'s picture

4 Mar 2011 - 12:25 pm | प्यारे१

स्लॉग ओवर्स सुरु झाल्या म्हणायच्या मग....???

चौकार षटकार सुरु करताय का मग???

विजुभाऊ's picture

4 Mar 2011 - 12:53 pm | विजुभाऊ

दम लागला एवढे वाचून

तुमच्या फक्त ५० मध्ये एक प्रेक्षक म्हणुन आम्हला राहुद्या हो ..
नाहि उंचीवर गेलेला बॉल पाहण्यात मानेला आमच्या काही त्रास होणार नाही.. आवडेल उलट

च्यायला , हर्षदराव तर उपक्रमी झाले ..फक्त नाव बदलावर एवढा मोठ्ठा वैचारिक लेख ?
आहो सरळ सही मधे "पुर्वजन्मीचा सीहर्षद " एवढं टाकलं असती तरी जमलं असतंय ;) पण ठिक !
उगाचंच लिहायचं म्हणुन लिहीलेलं नाही गुड :)
आता पहिला पहिला क्रश च्या प्रतिक्षेत आहे :)

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 1:08 pm | नगरीनिरंजन

ब्बाब्बौ!! काय स्कोर झाला ओ? किती ओव्हर बाकीयेत? आणि टारगेट काये?

स्वैर परी's picture

4 Mar 2011 - 1:21 pm | स्वैर परी

:) नावामागचे 'गुपित' कळले!

इन्द्र्राज पवार's picture

4 Mar 2011 - 2:33 pm | इन्द्र्राज पवार

हर्षदराव....

मी असे समजत होतो की, नाना पाटेकर यांच्या "अबतक ५६" स्टाईलप्रमाणे हे तुम्ही नाव ग्रहण केले आहे. त्यामुळे त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासही उत्सुक होतो...पण इथे पाहिले तर चक्क टेस्टवरून वने डे चा मामला निघाला....म्हणजेच तुम्ही आमच्याच पंगतीमधील.

वेल...तुमची इथली बॅटिंगदेखील मी पाहात (दॅट इज वाचत..) असतोच, त्यामुळे तुमचा क्लासही माहिती आहेच.

नवीन नावासाठी "केव्हिन ओब्रायन काईंड" शुभेच्छा...!

इन्द्रा

वपाडाव's picture

4 Mar 2011 - 2:46 pm | वपाडाव

आडौलं (आडवलं)... बाबौ... जबरा विश्लेषनै नावबदलाचं...

तुमच्या नावामागचा इतिहास कळ्ला

नरेशकुमार's picture

4 Mar 2011 - 3:45 pm | नरेशकुमार

आयुष्याचेही असेच आहे. ५० वर्षे फक्त !

सामना नक्कीच चूरशीने खेळला जाणार असे वाटतेय. आमच्या शूभेच्छा, विजयी व्हा.

नि३सोलपुरकर's picture

4 Mar 2011 - 4:07 pm | नि३सोलपुरकर

कोण म्हणतो ...नावात काय आहे....??????

नरेशकुमार's picture

4 Mar 2011 - 6:47 pm | नरेशकुमार

मि म्हनतो, सदस्य णावात काय आहे !

कच्ची कैरी's picture

4 Mar 2011 - 4:17 pm | कच्ची कैरी

ओह्ह्ह्ह्ह्!!!तर ते तुम्हीच आहात का हर्षद .आता ओळखले आणि नावातले रहस्यही उलगडले .
बारश्याला बोलविले नाही आम्हाला ;)

ओ हर्षद राव , ते बारष्याच्या उरलेलं जेवण प्याक करुन ठेवलंय ते द्या ह्यांना. .. कुठं काही चान्स दिसला की बोलवा .. काय गावजेवण आहे काय .. शरम वाटली एक मिपाकर असल्याची आज :(

- कछ्छी दाबेली
फुकट तिथे फॅमिली सकट

कच्ची कैरी's picture

4 Mar 2011 - 9:19 pm | कच्ची कैरी

खुपसलेचस का तु टुझे नकटे नाक ?नोज खुप्सेकर कुठला !तुला तर मिपाकर असल्याची शरम कधीच वाटायला हवी होती त्या बारशातल सगळ जेवण भुक्कडसारख संपवतांना लाज वाटली नाही ,अचकट्-विच़कट प्रतिसाद देतांना लाज वाटली नाही ,दुसर्यांचा बाजार उठवितांना लाज वाटली नाही आणि आता म्हणे लाज वाटतेय ह्या निर्लज्जपणाच्या पुतळ्याला .गनमन छु कुठला !अलाज शरमकर कुठला !

टारझन's picture

4 Mar 2011 - 9:46 pm | टारझन

होतो तळतळाट , मन मेटाकुटी |
घ्यावे हाती मग वॅसलिन ची डबी ||
टार्‍या म्हणे ऐसे ! नही तो फिर कैसे ||
भारत माता की जय ||

प्रशांत's picture

4 Mar 2011 - 5:57 pm | प्रशांत

मी पण नाव बदलायचा विचार करत होतो....

पण एव्हढा मोठा लेख लिहावा लागेल नंतर......

शक्य नाहि...

मुलूखावेगळी's picture

5 Mar 2011 - 9:59 am | मुलूखावेगळी

मी पण नाव बदलायचा विचार करत होतो....

बदला कि हाकानाका

पण एव्हढा मोठा लेख लिहावा लागेल नंतर......

कशाला १दम वादग्रस्त प्रतिक्रिया द्या किन्वा खरडी करा त्यानिमित्ताने

शक्य नाहि...

शक्यता नाकारता येत नाही. ;)

अवलिया's picture

4 Mar 2011 - 6:41 pm | अवलिया

ओके

सहज's picture

4 Mar 2011 - 6:53 pm | सहज

जपून हा आता!

नाहीतर कराचीहून 'फिक्स' व्हायचा वाचलासं तरी 'साहेबांच्या' तावडीत जाशील हो!

;-)

प्रीत-मोहर's picture

4 Mar 2011 - 7:29 pm | प्रीत-मोहर

मस्त लिवलत :)

धमाल मुलगा's picture

4 Mar 2011 - 7:34 pm | धमाल मुलगा

इतका विचार? इतका विचार?
अवघड हैसा द्येवा तुमी!

आम्ही बघा, आला दिवस आपला म्हणायचा, आयुष्याची धमाल करायची. :)

रमताराम's picture

4 Mar 2011 - 8:36 pm | रमताराम

कोण आहे हो तो, कुण्या गाढवानं यांना कारण विचारलं हो नाव बदलण्याचं?

डावखुरा's picture

4 Mar 2011 - 11:11 pm | डावखुरा

मान गये बॉस...झकास लिहिलंत..
[माझी पार्टी हुकली राव... :( ]
अन् काहीही फिरकी घेता राव...म्हणे गेस कर...

पुढच्या बाँडर्यांच्या प्रतिक्षेत...

हा धागा कृपया प्रतिसादांसह दृश्य करावा.

सस्नेह's picture

26 Dec 2012 - 9:38 pm | सस्नेह

हम्म..पटले अन आवडले. पण ५० राव, फक्त ५० मधे संपत नाही बरं, दुसरी इनिंग नंतर सुरु होते...

सुहास..'s picture

26 Dec 2012 - 9:39 pm | सुहास..

ब्बार ! आता पुढे ????

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Dec 2012 - 10:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मि.पा. च फेसबूक झालय का हो? :).

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

दू...दू...दू...! चिमणराव. :-\

मी ही नामांतरा मागची कथा वाचलीच नव्हती.
आज रंगानि ख.फ.वर लिंकवलि ,म्हनुनशान मिळालि. उपयुक्त कथा. वाचनीय. :)