सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
23 Feb 2011 - 2:09 pm

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ||

नका कुणी हो जातपात मानू
नव्या कल्पना अंमलात आणू
जुने विचार मसणात जावूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१||

ह्या जातींनी काय नाय केलं
माणसामाणसात भांडन लावून दिलं
सख्खेशेजारी वैरी होती
एकमेकांचे गळे कापती
मी उच्च तू निच ते म्हणती
असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा
या जातींना खड्यात जावूद्या ||२||

ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार
तेली तांबोळी कुणगर, महार
कोळी कोष्टी कोकणा भामटा
भिल्ल रामोशी मातंग बेमटा
किती जाती तुम्ही निर्माण केल्या
माणसामाणसात भिंती उभ्या झाल्या ||३||

किती किती ह्या हो जाती
देशाच्या प्रगतीला खीळ घालती
देशात माणूसकीची जात तुम्ही राहूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||४||

झानदेवानं जात कधी मानली काहो?
नाय हो
साईबाबानं जात कधी मानली काहो?
नाय हो
राजाशिवाजीनं जात कधी मानली काहो?
नाय हो
शाहूराजानं जात कधी मानली काहो?
गांधीबाबानं जात कधी मानली काहो?
साने गुरूजींनी जात कधी मानली काहो?
सावरकरांनी जात कधी मानली काहो?
आंबेडकरांनी जात कधी मानली काहो?
नाय हो, नाय हो, नाय हो

मग तुम्ही आम्ही जातीवरून का हो भांडता?
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||५||

उच्चनिच करून काय मिळते?
दुसरा अन्न खातो तेच सार्‍यांना मिळते
या जातीमुळे माणसे हैवान झाली
इतर जातीला पाण्यात पाहू लागली
पुर्वजांनी केले ते काळाच्या पडद्याआड जावूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०२/२०११

शांतरसकवितासमाज

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

23 Feb 2011 - 2:28 pm | कच्ची कैरी

सार्या जातींना खड्ड्यात जाऊ असे म्हणायचे होते का तुम्हाला ?
बाकी कविता मस्त ह !

प्रकाश१११'s picture

23 Feb 2011 - 2:29 pm | प्रकाश१११

पाषाण भेदा -
ह्या जातींनी काय नाय केलं
माणसामाणसात भांडन लावून दिलं
सख्खेशेजारी वैरी होती
एकमेकांचे गळे कापती
अगदी मस्त. वा ..छान ..!!
पु.ले.शु.

गणेशा's picture

23 Feb 2011 - 2:43 pm | गणेशा

जबराट ....

येवुद्या आनखिन

नरेशकुमार's picture

23 Feb 2011 - 4:12 pm | नरेशकुमार

पटले आहे. असे व्हायला हवे.

अविनाशकुलकर्णी's picture

24 Feb 2011 - 4:28 pm | अविनाशकुलकर्णी

जात कसली खड्ड्यात जातिय?
जात आधारित जनगणना थांबवु शकता का?
बुद्ध समाज हि जनगणनेत..धर्म बुद्ध ..जात महार असा लावु लागला आहे...

बाकि कविता तुमच्या छान असतात..
पण हि जरा समता समाजवादी पठडीतली आहे.