विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
21 Feb 2011 - 12:02 am

केवळ लक्ष वेधण्यासाठी नवीन धागा आहे. हेच मी श्रामोंच्या धाग्यावरील प्रतिसादात दिलेले आहे.

http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o

इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल.हा त्याच कट ऑफ भागातील व्हिडीओ आहे.

मध्यमवयीन आदिवासी स्त्री तीस वर्षांच्या विनीलचा उल्लेख "मोर बापा" - माझा बाप असा करतेय. बघा.

जो जनतेचे रक्षण करतो
पोषण करतो धारण करतो
तोच पिता साक्षात मानावा
जन्म देतो निमित्त केवळ

हे त्या बाईने कुठे वाचलेले नाही. तरीही तिला हे वाटले. विनीलविषयी.

लक्षवेधी असल्याने हा धागा थोड्या वाचनांनंतर उडवला किंवा वाचनमात्र केला तरी चालेल. चर्चा श्रामोंच्याच धाग्यावर चालली तर उत्तम आहे.

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

चाणक्याचं राजकर्तव्यासंदर्भात एक चांगलं वचन आहे. सरकारी अधिकार्‍यांबद्दलही तेच लागू पडू शकतं (कारण तेच सगळ्यात खालच्या पातळीवर सरकारचं प्रतिनिधित्व करतात.)

प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजायां च हिते हितम् |
प्रजेच्या सुखात व हितातच राजाने स्वतःचं सुख व हित बघितलं पाहिजे.

असं जेव्हा अधिकार्‍यांकडून वागलं जाईल, तेव्हा आपोआप ते आदराला पात्र होतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Feb 2011 - 2:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल. <<

ही स्वयंस्फूर्ती कुठून येत असावी?
असेच काही वेडे लोकं फिरत असतात आजूबाजूला, एक आहेत मनोज स्वेन.
जालावर फिरताना विनील कृष्णा यांची, नक्षलवाद्यांनी पळवून नेण्याच्या काही दिवस आधीचीच आणखी एक गोष्ट सापडली.
आणि नक्षलवाद्यांसाठी ही एक कविता.

सुधीर काळे's picture

21 Feb 2011 - 3:28 pm | सुधीर काळे

राजेसाहेब,
माझ्या संगणकावर व्हीडियो हलतच नाहींय्.
घरी जाऊन पहातो.....

प्रसन्न केसकर's picture

21 Feb 2011 - 4:05 pm | प्रसन्न केसकर

विनिल प्रकरणाच्या निमित्ताने नक्षलवाद, त्याच्याशी मुकाबला अशी समग्र चर्चा सुरु आहे. बरेच जाणकार मते मांडत आहेत. त्यानिमित्ताने गेली कित्येक वर्षे हे सर्व विषय पुन्हा पुन्हा हाताळताना मला पडलेले काही प्रश्न मांडु इछितो. त्यांचीवस्तुनिष्ठ उत्तरे मिळाली तर आनंदच आहे न मिळाली तर केवळ असे काही प्रश्न असु शकतात याची जाणीव आली तरी ठीक आणि ते प्रश्न अनाठाई वाटल्यास उडवलेच तरी माझी हरकत नाही. ते प्रश्न असे:
१) नक्षलवाद (माओईस्ट, मार्क्सिस्ट्-लेनिनिस्ट इ. इ.) म्हणजे नक्की काय असते? त्याला काही सामाजिक-राजकीय तत्वज्ञान असते काय? असल्यास ते नक्की काय आणि आज तसे तत्वज्ञान अस्तित्वात आहे काय? नक्षलवादामधे वेगवेगळे गट आहेत काय, असले तर एकुण किती? असे गट होण्याची प्रक्रिया नक्की कशी होते? असे गट अस्तित्वात असण्याची नक्की कारणे काय?
२) नक्षलवाद हा असमानता, विषमता, पिळवणुक, शोषण, प्रशासनाचा अभाव अश्या अनेक कारणांनी वाढतो असे सांगीतले जाते. ही कारणे नक्षलवादाच्या वाढीस नक्की कश्याप्रकारे जबाबदार ठरतात?
३) बंदुकीच्या गोळीतुन क्रांती घडवणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगणारे नक्षलवादी आणि अन्य फुटिरतावादी, दहशतवादी, गँगस्टर यांच्यात काही फरक आहे काय? असल्यास तो कोणता? त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य, सामंजस्य असते काय? असले तर कश्या प्रकारचे?
४) नक्षलवादी वापरतात अगदी त्याच प्रकारची शस्त्रे, स्फोटके इ. अन्य दहशतवादी वापरतात. ही शस्त्रे व स्फोटके बरीच महागडी असतात आणि ती वापरणे अगदी सरकारी यंत्रणांनाही परवडत नाही. हे अविकसित भागातील गरीब, शोषित लोकांनी चालविलेल्या नक्षलवादी संघटनांना कसे परवडते? नक्षलवादाचे फंडिंग नक्की कसे होते? (हाच प्रश्न अनेक मानवतावादी संघटनांबाबतही उपस्थित होऊ शकतो.)
५) सरकारची शोषक, अन्यायकारक धोरणे नक्षलवादाला जबाबदार असल्याचे देखील अनेकदा सांगीतले जाते. ही धोरणे केवळ नक्षलवादग्रस्त भागापुरतीच असतात की संपुर्ण राज्यासाठी? जर ती संपुर्ण राज्यासाठी असतील तर ती सर्वांचेच शोषण करणारी अन्यायकारक ठरतील अश्या परिस्थितीत नक्षलवाद केवळ ठराविक भागापुरताच मर्यादित का रहातो?
जाणकारांकडुन अभ्यासपुर्ण उत्तरांच्या प्रतिक्षेत.

अवलिया's picture

21 Feb 2011 - 4:10 pm | अवलिया

अडचणीत आणणारे प्रश्न विचारत आहात तुम्ही.

आता अडचणीत कोण येणार हे ज्याच्या त्याच्या बुद्धीचे आकलन.

सुधीर काळे's picture

21 Feb 2011 - 4:29 pm | सुधीर काळे

सुरेख प्रश्न! उत्तरांची वाट पहात आहे.

एक से बढकर एक प्रश्ण !! मला जे जे हवं होतं ते ते या प्रतिसादात आहे . :) धन्यवाद प्रसन्न !
उत्तरे वाचण्यास उत्सुक !

-लक्षवादी

चिंतामणी's picture

21 Feb 2011 - 4:46 pm | चिंतामणी

प्रसन्न केसकर "पुन्हा एकदा" असे प्रश्ण विचारून कोणाकडुन उत्तर अपेक्षीत करत आहात?????? हे (सो कॉल्ड) विचारवंत/जाणकार सोइस्कर मौन पाळतील. (तोंड उघडण्यासाठी त्यांना वेगळे विषय आहेत)

नक्षलवादाचे फंडिंग नक्की कसे होते? (हाच प्रश्न अनेक मानवतावादी संघटनांबाबतही उपस्थित होऊ शकतो.)

ह्या प्रश्णाचे उत्तर कोणिही देणार नाही हा माझा अनुभव आहे. (डॉ.बिनायक सेन हा धागा पुन्हा एकदा वाचा).

प्रयत्न करीत आहे. मलासुद्धा या प्रश्णांची उत्तरे मिळाली तर हवी आहेत.

नितिन थत्ते's picture

21 Feb 2011 - 10:35 pm | नितिन थत्ते

१. नक्षलवाद म्हणजे नक्की काय याचा ऐतिहासिक उहापोह इंद्रराज पवार यांनी केलाच आहे. त्याहून अधिक माहिती नाही.

२. दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर उघड आहे असे मला वाटत होते परंतु ते तसे नसल्याचे दिसते म्हणून मला वाटते ते उत्तर देत आहे.

असमानता, विषमता पिळवणूक जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा त्यातून सोडवणूक करण्याचे आमीष दाखवणारे गट, पक्ष निर्माण होतात. त्यातले काही निवडणुकीच्या माध्यमातून व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन देत असतात तर काही लोकशाहीवर आमचा विश्वास नाही अशी घोषणा घेऊन येतात. या लोकशाहीवर विश्वास नाही म्हणणार्‍यांपैकी काही गट व्यवस्थेचेच गुलाम असतात आणि व्यवस्थेतला बदल म्हणजे लुटणार्‍या व्यक्ती बदलणे इतक्याच मर्यादित उद्दिष्टांचे असतात आणि ते लोकशाही मार्गाने सत्तांतर व्हायची शक्यता दिसताच व्यवस्थेशी जुळवून घेतात. आणि विषमता, पिळवणुक वगैरे स्वतःही सुखाने करू लागतात.

काही गट खरोखरच व्यवस्था बदलण्याचा विचार (बरोबर अथवा चुकीचा) मनात ठेवून असतात. ते खरेच व्यवस्था उलथून टाकण्याचा प्रयत्न करतात. ज्यांची खरोखरची पिळवणुक होत असते त्यांचा या गटांना पाठिंबा मिळतो. आणि पिळवणुकीतून सुटका तर नाहीच पण प्रशासनयंत्रणा आणि न्याययंत्रणा पिळवणुक करणार्‍यांनाच धार्जिणी आहे असे त्यांना "वाटल्यास" ही चळवळ फोफावते.

३. प्रश्नातल्या यादीत गँगस्टर का आहेत हे कळले नाही. बाकीच्या तिन्हींचा जाहीर उद्देश तरी असलेली व्यवस्था/शासन/शासक बदलून नवे आणण्याचा असतो. गँगस्टरांचा जाहीर उद्देश काही असतो असे मला वाटत नाही. दुसर्‍याचे धन स्वतःकडे हिसकावून घेण्याची यंत्रणा एवढेच गँगस्टरांचे उद्दिष्ट असते.

बाकीच्या तीनांपैकी एकाचा राज्यातून फुटून निघण्याचा उद्देश असतो. दहशतवाद्यांचे वेगवेगळे उद्देश असू शकतात. नक्षलवाद्यांचा अस्तित्वात असलेली व्यवस्था मोडून नवी वर्गविहीन व्यवस्था उभारणे हा उद्देश असतो. (उद्देश यशस्वी झाल्यावर खरेच वर्गविहीन व्यवस्था ते आणतील की नाही यावर येथे काही भाष्य करीत नाही).

४. >>नक्षलवादी वापरतात अगदी त्याच प्रकारची शस्त्रे, स्फोटके इ. अन्य दहशतवादी वापरतात. ही शस्त्रे व स्फोटके बरीच महागडी असतात आणि ती वापरणे अगदी सरकारी यंत्रणांनाही परवडत नाही.

ही माहिती बहुधा चुकीची आहे. गुगलून मिळालेल्या माहितीनुसार Most foreign arms seized from Naxals looted from security forces.

Three jawans of the Central Reserve Police Force (CRPF) were arrested on Friday for selling arms and ammunition to Maoists, अशी माहिती मिळाली.

नक्षलवाद्यांचे फंडिंग नक्की कसे होते हे ठाऊक नाही पण त्यात परकीय मदत (उदा. नेपाळमधील माओवादी, म्यानमार मधील सरकार वगैरे) तसेच स्थानिक मदत (त्या भागात बस्तान बसवू पाहणारे उद्योजक व त्यांचे प्रतिस्पर्धी, जंगलातून लाकूड तोडणारे, तेंदू पत्ता गोळा करणारे ठेकेदार वगैरे) असणारच.

५. सरकारची अन्यायकारक धोरणे सर्वत्र असतात पण दुर्गम भागा खेरीज इतर भागात जनतेचे हितसंबंध व्यवस्थेत निर्माण झालेले असतात. दुसरे म्हणजे जेथे मध्यमवर्गाची संख्या लक्षणीय आहे तेथे उठाव वगैरेला पाठबळ मिळण्याची शक्यता कमी होते. दुर्गम भागात ही संख्या नगण्य असते तेथे नक्षली लोकांना पाठिंबा अधिक मिळतो किंवा बस्थान बसवणे सोपे होते.

शहरी भागात जमिनी वगैरे लोकांच्या मालकीच्या असतात त्यामुळे तसाही सरकारी वरवंटा सहजासहजी फिरवता येत नाही. उलट जंगलामधली जमीन सहसा फॉरेस्ट खात्याची असते. त्या जमिनीचे निर्णय सरकार कोणाला न विचारता घेऊ शकते. [ऐकीव माहिती प्रमाणे- उदा. जंगलातली लाकडे तोडण्याचे कंत्राट सरकार कंत्राटदाराला देते पण सरपणासाठी लाकूड तोडल्यास त्या जंगलात राहणार्‍या आदिवासींवर कारवाई होते. चू भू दे घे. मध्यंतरी महाराष्ट्रातील जंगलात पिढ्यानपिढ्या(?) राहणार्‍या आदिवासींना -अतिक्रमण केल्याचे सांगून- तेथून हुसकावून लावण्याबाबत कोर्ट केस चालू होत्या असे ऐकले होते].

त्यामुळे धोरणे समान असली तरी त्यांची अन्याय्य अंमलबजावणी शहरी भागात कमी आणि दुर्गम भागात जास्त असते. म्हणून नक्षलवाद तिकडे अधिक मूळ धरू शकतो.

याखेरीज लपून करण्याच्या चळवळी दुर्गम भागात जोर धरणार हे तर उघड आहे.

प्रसन्न केसकर's picture

21 Feb 2011 - 11:04 pm | प्रसन्न केसकर

इंटरेस्टिंग अ‍ॅनॅलिसीस आहे.
सर्वप्रथम खुलासे:
१) मी विचारलेले प्रश्न पुर्ण विचारांती उपस्थित केलेले आहेत. विविध सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आणि व्यवसायानिमित्त मी स्वतः घेतलेल्या काही अनुभवांचा अनेक वर्षे विचार करुन मी या प्रश्नांपर्यंत पोहोचलेलो आहे. शस्त्र्-स्फोटकांबाबत तुम्ही दिलेल्या दुव्यातील माहिती सत्य आहे पण ते केवळ अर्धसत्य आहे.
२) तुम्ही मुंबई परिसरातील आहात असा माझा समज आहे. वस्तुस्थिती तशी असेलच तर गँगस्टर या प्रश्नात का येतात हे कळणे सोपे आहे. दुसरे म्हणजे नक्षलवादाचा इतिहास अभ्यासायचा असेल तर गँगवॉर्सचा संदर्भ त्यात अनिवार्य आहे. नक्षलवादाच्या इतिहासाला तसाही एक आयाम आहे. डाव्या चळवळी समजुन घेताना दाभाडीचा इतिहास माहिती नसेल तर तो अभ्यास अपुर्ण ठरतो तसेच ते आहे.
उर्वरित मुद्यांवर ते कंडीशनल असल्याने आत्ताच उहापोह करत नाही. फक्त एक गोष्ट स्पष्ट करतो. नक्षलवादी स्वतः शोषित, गरीब वगैरे नसतात. बहुतेक सर्व नक्षलवादी नेत्यांनी गडगंज माया जमवलेली असते. कदाचित तेव्हढी माया प्रस्थापित लोकांकडे देखील नसेल. अजुन कुणाकडुन काही उत्तरे येतात काय याची वाट पाहु थोडी.

चिंतामणी's picture

22 Feb 2011 - 12:08 am | चिंतामणी

Most foreign arms seized from Naxals looted from security forces.

Naxals looted म्हणल्याबद्दल. तुमच्या लेखी त्याचा अर्थ काय हे मी समजू शकतो. पण............
कला जो अर्थ कळला आहे त्याबद्दल धन्यु.

एक सांगा. ही शस्त्रे लुटायला जाताना ते मोकळ्या हातांनी गेले होते का???????
ते वापरत असलेली शस्त्रे, स्फोटके इत्यादी गोष्टी फक्त पोलीसांना लूटून मिळाली????????

नितिन थत्ते's picture

22 Feb 2011 - 7:53 am | नितिन थत्ते

तुम्हाला काय 'गूढ" अर्थ कळला ते समजले नाही. शिवाय माझ्या लेखी कोणता वेगळा अर्थ असावा असे तुम्हाला वाटते याचे स्पष्टीकरण करावे.

मूळ वाक्य Most foreign arms seized from Naxals, looted from security forces

>>एक सांगा. ही शस्त्रे लुटायला जाताना ते मोकळ्या हातांनी गेले होते का???????

अर्थातच नाही.

>>ते वापरत असलेली शस्त्रे, स्फोटके इत्यादी गोष्टी फक्त पोलीसांना लूटून मिळाली????????

नाही. ती पोलिसांनी त्यांना विकत सुद्धा दिली आहेत असे बातमीत म्हटले आहे.

नितिन,
मी कालच पोस्ट केलेल्या "भारतीय....प्र. २ भाग-७" मध्ये पहिल्याच परिच्छेदातील कांहीं वाक्ये थेट तू लिहिलेल्या पृथःकरणात आहेत (लोकशाही मार्गाने सत्तांतर व्हायची शक्यता दिसताच व्यवस्थेशी जुळवून घेतात. आणि विषमता, पिळवणुक वगैरे स्वतःही सुखाने करू लागतात) म्हणून मुदाम खाली देत आहे!
१९९०च्या दशकात अन्य मागासलेल्या जाती-जमातींत (OBCत) गणना होणार्‍या आणि (जास्त करून) शेतीप्रधान व्यवसायातील मतदारांनी त्यांच्या सतत वाढणार्‍या आर्थिक बळाचे राजकीय बळात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेत्यांनी आपल्या बांधवांवर पूर्वी झालेल्या आन्यायांमुळे आलेल्या हलाखीच्या परिस्थितीला लक्षात घेऊन सरकारी नोकर्‍यांत आरक्षणाची मागणी केली आणि तसे आरक्षण त्यांना मिळालेही. पण हे नेते त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या आणि यापूर्वी अशाच आरक्षणाचे फायदे मिळविलेल्या वर्गांशी वैरानेच वागत राहिले.

अरुंधती रॉय कांहीं बोलल्या असतील तर ते वाचनात आलेले नाहीं! बोलल्या असतील तर जरूर इथे पोस्ट करावे. वाचायला आवडेल!

अरुंधती रॉय कांहीं बोलल्या असतील तर ना. वरच्या पोस्टमधील एक वाक्य त्यानासुद्धा लागु होते.

तोंड उघडण्यासाठी त्यांना वेगळे विषय आहेत

http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?queryed=40&username=&useremai...

नक्कीच पाहीले असणार. ;)

(डाव्याबाजुला वरती कार्टुन आहे. त्यावर क्लिक केल्यावर मोठे दिसेल.)

इन्द्र्राज पवार's picture

21 Feb 2011 - 8:05 pm | इन्द्र्राज पवार

श्री.प्रसन्न केसकर.....यांच्या "नक्षलवाद" विषयीच्या प्रतिसादात अनेक प्रश्नांचा समावेश आहे आणि त्यानी "जाणकार" हे विशेषण ज्याना लागू होते त्यांच्याकडून उत्तरे अपेक्षिली आहेत. मला अर्थातच हे विशेषण लागू होत नाही, तरीही कोल्हापूर येथील सीपीआयचे एक प्रमुख नेते श्री.गोविंद पानसरे आणि त्यांचे साथी आणि कामगार नेते श्री.दिलीप पोवार यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतून, तसेच कोल्हापूरला शे.का.पक्षाची बर्‍यापैकी पार्श्वभूमी असल्याने त्या निमित्ताने प्रि.एन.डी.पाटील यांच्यासमवेतही "नक्षल चळवळी" वर इथे परिसंवाद होत गेले, अधिक संदर्भातील वेळोवेळी केलेले वाचन, त्यातून मिळालेली ही त्रोटक माहिती, ....यांच्या मदतीने श्री.केसकर यांच्या सर्वच प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे देणारी नसली, तरी लेट अस होप टु हॅव समथिंग फॉर द स्टार्टर :

पहिल्या प्रश्नाविषयी ~

१) नक्षलवाद (माओईस्ट, मार्क्सिस्ट्-लेनिनिस्ट इ. इ.) म्हणजे नक्की काय असते? त्याला काही सामाजिक-राजकीय तत्वज्ञान असते काय? असल्यास ते नक्की काय आणि आज तसे तत्वज्ञान अस्तित्वात आहे काय? नक्षलवादामधे वेगवेगळे गट आहेत काय, असले तर एकुण किती? असे गट होण्याची प्रक्रिया नक्की कशी होते? असे गट अस्तित्वात असण्याची नक्की कारणे काय?

~ "नक्षलवाद" ही संज्ञा अस्तित्वात कशी आली ते एक अभ्यासक म्हणून श्री.केसकर आणि इथल्या जवळपास सर्वच प्रतिसादकांना माहीत आहे हे गृहित जरी धरले तरीही नवख्यांसाठी थोडक्यात सांगतो की, प.बंगालच्या सिलिगुडी सबडिव्हिजनमध्ये येत असलेले 'नक्षलबारी' हे छोटेसे खेडेगाव (जिल्हा दार्जिलिंग) जिथे मार्च १९६७ मध्ये बिमल किशन या आदिवासी तरूणाला कोर्टाकडून मिळालेली जमीन त्याला मारहाण करून स्थानिक जमिनदाराने हिसकावून घेतेली आणि त्याला देशोधडीला लावले. या अन्यायाने पेटून उठलेल्या अन्य आदिवासी तरुणांनी एकत्र येवून त्या जमिनदाराच्या जुलमाविरुद्ध लढा दिला, त्याला कम्युनिस्ट पक्षाच्याच अनेक पदरांनी सक्रिय पाठिंबा दिला (विशेष म्हणजे त्या काळात सीपीआय्[एम] ने स्थापलेल्या आघाडीचेच बंगालमध्ये राज्य होते). पुढे हा वणवा केवळ बंगालमध्येच नव्हे तर शेजारील आसाम ओरिसा आन्ध्रातही पसरला आणि 'आपण एकत्र आलो तर या बड्या धेंडांविरूद्ध यशस्वी लढा देवू शकतो...' हा विश्वासही बळावला. यातून प्रचलित झाली "नक्षलवादी" ही संज्ञा [ही माहिती सविस्तरपणे विकिपेडियावरही उपलब्ध आहेच....गरजूनी ती जरूर अभ्यासावी.]

पुढे या 'एकत्र' मध्ये 'शस्त्रे' ही आली. पण बंगालमध्ये पसरलेली नक्षलवाद्यांची ही चळवळ सीपीआय (एम) नेच काही प्रमाणात काबूत ठेवली. त्यामुळे झाले असे की, आदिवासींचे कल्याण करतो असे म्हणणारे हेच कम्युनिस्ट सत्तेत आल्यावर भांडवलशाहीचे बगलबच्चे होतात असा प्रबळ समज असणारे जे कुणी चळवळीत युवक होते त्यानी या आदिवासी आणि तत्सम पिडीत गटाला घेऊन 'रीव्होल्युशनरी युनिट' ची १९६८ मध्ये स्थापना केली. या युनिटची दोन ध्येये होती, "प्रस्थापितांविरूद्ध लढा द्यायचा तो शस्त्राने" व "कोणत्याही प्रकारच्या निवडणूकीत असहकार". पुढे 'शस्त्राने द्यावयाचा लढा" कशाप्रकारे पुढे न्यावा यावरून नेहमी होतात तसे मतभेद झाले आणि टी.नागी रेड्डी आणि कन्हय्या चटर्जी या दोन नेत्यानी अनुक्रमे आंध्र आणि प.बंगालमध्ये सवत्या चुली मांडल्या. कन्हय्या ग्रुपचीही पुढे शकले झाली आणि त्यातून 'शस्त्राच्याच आधारे वर्गविरहीत समाज स्थापन करायचा' असे ठासून मांडणारा एक नेता या युवा नक्षलींना मिळाला....त्याचे नाव चारू मुझुमदार.

कन्हय्याने स्थापलेल्या कम्युनिस्ट फळीचे नाव झाले 'माओवादी कम्युनिस्ट सेंटर (MCC)" तर चारूच्या पार्टीचे नाव झाले सीपीआय (मार्क्सवादी-लेनिनवादी). मात्र धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मतभेद असले तरी मूळ उद्देश नक्षलवादी चळवळ जोमाने वाढवायची आणि त्यायोगे सशस्त्र क्रांतीनेच संबंधित राज्यांतील जमिनदारी नष्ट करायची. पुढे चारू मुझुमदारला (जो सर्वत्र 'नक्षल गुरु' या नावानेच ओळखला जाऊ लागला) या माध्यमाद्वारे तळागाळातील लोक आणि आदिवासी वाड्यात जी लोकप्रियता लाभली ती सार्‍या देशभरात पसरली. अर्थात त्याला भक्कम साथ मिळाली ती कनु सन्याल या अभ्यासू आणि विलक्षण वक्तृत्त्व गुण असलेल्या युवकाची. पण इतके असूनही माओने चीनमध्ये घडवून आणलेली क्रांती इथे भारतात आणण्याचे जे स्वप्न चारू मुझुमदारने पाहिले ते अर्थातच प्रत्यक्षात आले नाही आणि त्यामुळे निराशेने ग्रासलेल्या चारुचे १९७२ मध्ये निधन झाल्यावर सीपीआय (एम-एल) ला अवकळा आली असेच म्हणावे लागेल. पुढे नेहमीप्रमाणे याचीही शकले झाली आणि कनु सन्याल जरी हयात होता तरी त्यानेही १९७७ मध्ये 'शस्त्राने झगडा' ही कल्पना बाजूला सारली आणि मतपेटीच्या माध्यमानेच पिडितांचे कल्याण करता येईल अशी भूमिका घेतली.

तरीही अजूनही 'शस्त्र मार्गा' वर ठाम विश्वास असलेल्या नक्षल्यांनी नागभूषण पटनाईक याच्या नक्षलवाद्यांचा असा एक सीपीआय (एम-एल) लिबरेशन ग्रुप स्थापन केला आणि गुरिल्ला पध्दतीचे जीवन जगूनच प्रस्थापित राज्यशैलीवर प्रहार करायचे निश्चित केले. ही घटना म्हणजेच मतपेट्याद्वारे स्थापन झालेले शासन आम्हास मान्य नाही अशी भूमिका घेऊन त्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या कोणत्याही यंत्रणेला आम्ही विरोध करणार....हेच यांचे सूत्र. हे पटनाईक आणि विनोद मिश्रा रचीत माओवादी+लेनिनवादी+मार्क्सवादी चळवळीचे भारतीय रूप जे शहरी लोकांसाठी नसून आदिवासींकरताच नेमस्त होते. पुढील काही वर्षात (परत नेहमीप्रमाणे) यात फूट पडली आणि १९८० मध्ये "पीपल्स वॉर ग्रुप (PWG)" स्थापन झाला, ज्याचे पक्के धोरण हेच की, 'वर्गव्यवस्थेचा समूळ नाश'. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पीडब्ल्यूजी ला 'स्टार वलय' असलेला कुणीएक नेता नसूनही आज नक्षलवाद्यांच्या अनेक फळ्यांमध्ये हा ग्रुप लोकप्रिय आहे.....अ‍ॅक्टिव्हही आहेच, विशेषतः आंध्रात.

या क्षणाला नक्षलवाद्यांत सीपीआय (एम.एल) आणि पीडब्ल्यूजी हे दोन पक्ष प्रामुख्याने कार्यरत असून दोघांच्याही तत्वज्ञानाला चांगलाच पाठिंबा लाभतोय असे दिसत्ये. कम्युनिस्ट पक्षांच्या परंपरेनुसार यांच्यातही आठवड्यातील सातही दिवस धुमसत असतेच पण सामान्य कार्यकर्त्याना आता त्याचे काही वावगे वाटत नाही. म्हणजे असे की, माओवाद्यांनी जिल्हाधिकारी श्री.विनिल कृष्णा आणि इंजिनिअर माज्झी याना ओलिस धरले म्हणून लेनिनवादी, मार्क्सवादी तसेच पीडब्ल्यूजी सरकारला काही मदत करतील याची सुतराम शक्यता नाही.

बिहार, छत्तीसगड, उ.प्रदेश, आपले महाराष्ट्र राज्य आणि ईशान्येकडील छोटी राज्ये यांच्यातही जी कमीजास्त प्रमाणात नक्षलवादी चळवळ चालू असते त्यांचे सुकाणू आलटूनपालटून माओवादी, लेनिनवादी आणि पीडब्ल्यूजीकडे यांचाकडे येतात. त्या त्या प्रांतात ही मंडळी विविध नावाने (कधी 'लिबरेशन ग्रुप"... कधी "न्यू मुव्हमेन्ट" तर कधी 'रीव्होल्यूशनरी ग्रुप', 'न्यू डेमोक्रसी ग्रुप' आदी.... सरकारदरबारी याना Fragmented Groups असे म्हटले गेले आहे) आपापल्या मगदुराप्रमाणे त्याना अभिप्रेत असलेली 'क्रांती' आणण्याचे कांड करीत असतातच.

~ श्री.केसकर यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची ही सुरूवात समजतो. त्यांच्या क्रमांक २ ते ५ ची उत्तरे मी माझ्या मगदुराप्रमाणे देऊ शकतो, पण तरीही श्री.आ.रा. आणि तत्सम अभ्यासू सदस्यांकडे या प्रश्नांचा सखोल अभ्यास असल्याने ते माझ्यापेक्षा प्रभावीपणे उत्तरे देतील.....त्या प्रतिक्षेत राहतो.

इन्द्रा

प्रसन्न केसकर's picture

21 Feb 2011 - 9:06 pm | प्रसन्न केसकर

अभ्यासपुर्ण प्रतिसाद वाचला.
इतिहासाचा आढावा महत्वाचा आहेच. या प्रतिसादामुळे ती उजळणी होते आहे.
प्रतिसादात मला अपेक्षित असलेले एक वाक्य आहेच.
या क्षणाला नक्षलवाद्यांत सीपीआय (एम.एल) आणि पीडब्ल्यूजी हे दोन पक्ष प्रामुख्याने कार्यरत असून दोघांच्याही तत्वज्ञानाला चांगलाच पाठिंबा लाभतोय असे दिसत्ये. हे ते वाक्य. माझा एक प्रश्न नक्षलवादाच्या तत्वज्ञानाबद्दलही
आहे. शिवाय सशस्त्र क्रांती ते मतपेटीच्या माध्यमातुन बदल या परिवर्तनाबाबत जवळपास काहीच उहापोह नाही. नक्षलवादाला तत्वज्ञान आहे असे म्हणताना या परिवर्तनाचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. अन्यथा ती दिशाभुल ठरते.
नक्षलवादाबाबत गेली वीस एक वर्षे अशीच दिशाभुल सातत्याने सुरु आहे. डाव्या चळवळींच्या इतिहासात नक्सलबारीचे महत्व अनन्यसाधारण आहेच पण संपुर्ण भारतातील (आणि अर्थातच अविभाज्य संबंध असलेल्या नेपाळमधीलही) डाव्या चळवळीच्या इतिहासात ते महत्व नक्की काय आणि किती हा प्रश्न रहातोच. अनेक फँटसीज मधे ते ओव्हर एक्झॅग्रेट होते आणि या फँटसीज सार्वत्रिक आहेत.
माझे अन्य प्रश्न अजुन आहेतच. त्यांना काय उत्तरे येतात ते पाहु आणि त्या अनुषंगाने चर्चा पुढे ठेऊ असे मला वाटते. मग या धाग्याचेही काश्मीर झाले तरी हरकत नाही.

इंद्रा-जी,
तुम्हाला माहिती नसलेला कुठला तरी विषय आहे काय? सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत आहात! धन्य आहात!!
माझे कांही अपरिपक्व प्रश्नः
भारताला त्रास व्हावा म्हणून यांना फंडिंग चीनमधून येते काय? शस्त्रास्त्रेसुद्धा चीन पुरवतो काय? जसे काश्मिरी दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि ISI तर्फे पैसे व शस्त्रास्त्रे पुरवली जातात तशीच चीनही पुरवतो काय? (असणारच!)
पुन्हा एकदा माझे कांहीं जुने प्रश्नः
१) कूळ कायद्याने 'कसेल त्याची जमीन' असताना अशा चळवळी उभ्या रहायचे कारणच मला दिसत नाहीं. तरीही असे होत असेल तर एक तर कायद्यात पळवाटा आहेत किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नाहीं.
२) माओवादी तत्वप्रणालीचा सपशेल पराभव रशिया आणि चीनमध्ये झालेला स्पष्ट दिसत असताना (तोही माओ त्से तुंगसारखा बलदंड नेता असताना) अशी तत्वप्रणाली आजही हे लोक कुठल्या बळावर आदिवासींना पटवून देतात? ही तत्वप्रणाली आता scrap झाली आहे/व्हायला हवी! (या दुसर्‍या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळतच नाहीं)
जर कायद्यात पळवाटा असतील किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्यांच्यावर कुरघोडी करायला शस्त्रास्त्रे कशाला? चांगले वकील, खासदार/आमदार हे काम कां करू शकत नाहींत? आणि मग ते कसे निवडून येतात?

इन्द्र्राज पवार's picture

21 Feb 2011 - 10:10 pm | इन्द्र्राज पवार

सुधीर जी... मी आता काय प्रतिक्रिया देऊ तुमच्या या आपुलकीच्या भावनेबद्दल ? मी वर म्हटल्याप्रमाणे विविध क्षेत्रातील अन्य अधिकारी लोकांकडून [जे प्रत्यक्ष फिल्ड वर्क करतात] माहिती गोळा करतो आणि नोंदवून ठेवतो, तसेच थोडीफार भटकंतीही झाली आहे या भागात समविचारी मित्रांसमवेत (मात्र बंगालमध्ये अजून गेलेलो नाही) त्यामुळे अनायासे माहितीत भरही पडत जाते. ..(वाचनही आहेच...इथली कम्युनिस्ट पक्षाचे माहेरघर असलेली लोकवाङ्मय गृहाची लायब्ररी बिनदिक्कत वापरू शकतो, इतका घरोबा आहे) शिवाय इथे तुमच्यासारखे अभ्यासू आणि देशाच्या सद्यःस्थितीविषयी मनःपूर्वक आस्था बाळगणार्‍या लोकांचे विचारही मिसळपावसारख्या आपुलकीच्या संस्थळावर वाचायला मिळतात...वाद घालता येतो, प्रतिसाद देता येतो, घेता येतो....अशा अनेक बाबीमुळे ज्ञानप्राप्तीच्या कक्षा रुंदावत जातात, इतकेच म्हणतो. असो.

तुम्ही वरील प्रतिसादात उभ्या केलेल्या प्रश्नांची यथामती उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

इन्द्रा

इंद्रा-जी,
माझ्या प्रतिसादातील दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा जरूर प्रयत्न करा!

अप्पा जोगळेकर's picture

23 Feb 2011 - 1:14 am | अप्पा जोगळेकर

सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत कसे?
मलाही आधी हा प्रश्न पडायचा. आता खात्री झाल्येय की त्यांच्याकडे सुरईतला राक्षस किंवा हातावर घासण्याचा अल्लाउद्दिनचा दिवा असणार.

गोगोल's picture

26 Feb 2011 - 12:26 am | गोगोल

याचे उत्तर माहीती आहे. इन्द्रा साहेब खरेखुरे हुशार बिशार काही नाहियेत. ते त्यांच्या एरीयातील एक नामचीन गुंड आहेत. सगळीकडे नुसती दह्शत पसरवून ठेवली आहे. पण झाल काय की त्यांना ते इंटेलेक्च्युली खूप हुशार आहेत असं सिद्ध करायचा किडा आला. म्हणून मग त्यांनी एक १०० एक विविध विषयावरच्या तज्ञ लोकांना पकडून आणल आणि तळघरात डांबून ठेवलय. आता त्या लोकांना आदेश असतो की मिसळपाववर कुठ्लाही लेख आला की माहीतीपुर्ण कमीत कमी पानभर प्रतिसाद द्यायचाच .. तरच त्यांना त्यादिवशी खायला मिळते. जर का प्रतिसाद मूळ लेखापेक्षा मोठा असेल तर बक्षिस म्हणून शिकरण पण मिळते.
म्हणून सर्वांना अशी विनंति आहे की त्यांनी विविध विषयावरचे धागे काढून त्या बिचार्या लोकांना खायला मिळेल याची सोय करून द्यावी.

अप्पा जोगळेकर's picture

26 Feb 2011 - 11:04 pm | अप्पा जोगळेकर

ते त्यांच्या एरीयातील एक नामचीन गुंड आहेत.
जर का प्रतिसाद मूळ लेखापेक्षा मोठा असेल तर बक्षिस म्हणून शिकरण पण मिळते.
आवरा. :)

- शिकरण पोळीचा फ्यान

इन्द्र्राज पवार's picture

26 Feb 2011 - 11:50 pm | इन्द्र्राज पवार

अहो अप्पा....!

शिकरणाची भीती वा काळजी मला अजिबात नाही. कारण श्री.गोगोल यानीच ती जबाबदारी स्वखुशीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. {तसे त्यानी मला सांगितले देखील असल्याने प्रतिसाद येतच राहतील}. आता 'नामचीन गुंड' वगैरे विशेषनाम दिले असल्याने या आधारे पुढील निवडणुकीचे तिकिट मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडे अर्ज करतोच.....(शिवाय अ‍ॅडिशनल बेनेफिट असा की आडनाव "पवार" आहे...त्यामुळे निम्मी लढाई जिंकली असेच आहे)

थॅन्क्स..

इन्द्रा

स्वाती२'s picture

21 Feb 2011 - 9:53 pm | स्वाती२

वाचत आहे

इन्द्र्राज पवार's picture

22 Feb 2011 - 1:08 am | इन्द्र्राज पवार

"...नक्षलवादाचे फंडिंग नक्की कसे होते? (हाच प्रश्न अनेक मानवतावादी संघटनांबाबतही उपस्थित होऊ शकतो.)..."

श्री.केसकर यांच्या प्रश्न क्रमांक ४ मधील वरील भाग. फंडिंगच्या संदर्भात श्री.नितिन थत्ते यानी (संभाव्य) परकीय मदतीचा उल्लेख केला आहेच. यातच थोडी भर घालतो. [मात्र माझी माहिती ही फक्त नक्षलवादी चळवळीना मिळत असलेल्या फंडिंग संदर्भातील आहे.....मानवतावादी संघटनांचा इथे उल्लेख टाळू या, कारण तो वेगळा विषय आहे]

सर्वसाधारणपण कम्युनिस्टातील अतिडाव्या विचारसरणीचे [सीपीआय-माओवादी] जे कार्यकर्ते आहेत (जे सरकार दरबारी Extremists म्हणून नोंद झालेले आहेत) त्याना ईप्सित असलेली 'क्रांती' ही सततच्या पैशाच्या पुरवठ्याशिवाय अधुरी राहील हे चांगलेच माहीत असल्याने त्यांच्या 'घटने'तच 'पैसा कसा उभा करायचा?' यावर तरतूद केलेली आढळते ~ आर्टिकल ६० : "लगान, देणग्या, दंड आणि शत्रूंकडून हिसकावून घेतलेली संपत्ती" ही उत्पन्नाची प्रमुख साधने मानली जातील. यात 'देणग्या' हा भाग फार छुपा आहे. प्रमुख देणगीदार आहेत ते नक्षलवाद्यांच्या प्रभाव असलेल्या छ्त्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि आसाममधील खाणमालक. आंध्र प्रदेश आणि बिहारमधील पेपर मालक, आसाम आणि ईशान्येकडील राज्यातील चहा मळेवाले. आता या बिगीजकडून देणगीस्वरूपात जे काही येत असेल ते मोजण्याचा वा 'चेक' करण्याचे कोणतेही स्त्रोत ना मिडियाकडे आहेत ना अन्य कुठल्याही स्वयंसेवी संघटनाकडे. पण पोलिस सूत्रांकडून सरकारला वेळोवेळी मिळत जाणार्‍या अधिकृत माहितीच्या आधारे केन्द्रीय गृहमंत्री चिदम्बरम आणि राज्याचे गृहमंत्री श्री.आर.आर.पाटील यानी 'खाण मालकांच्याकडून या नक्षलवाद्यांना मिळत असलेल्या देणग्यांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे' असे जाहीर म्हटले आहे. श्री.पाटील गडचिरोलीमधील परिस्थितीविषयी बोलत होते. तथापि ह्या देणग्या कशा 'वसूल' केल्या जातात याविषयीचीही माहिती त्यांच्याकडे असेलच, ती जर प्रकाशित झाली तर शहारे येतील असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

सरकारी आकडेवारीनुसार देशातील एकूण ६३६ जिल्ह्यापैकी २२३ जिल्ह्यात सीपीआय-माओवादी संघटना बळकट आहेत (हा आकडा खरोखरी लक्षणीय आहे, असे म्हणावे लागेल) आणि हाती असलेल्या आधुनिक शस्त्रांच्या बळावर हे कार्यकर्ते या अंदाजे ४० हजार किलोमीटरच्या परिघातील जिल्ह्याजिल्ह्यातून कार्यरत असलेल्या सुमारे २००० पोलिस स्टेशनांच्या उपस्थितीत छोट्यामोठ्या ठिकाणाहून 'टॅक्स' गोळा करीत असतात. ही 'लगान' ची रक्कमही डोळे दिपविणारी असते. हा ढोबळ अंदाज नसून खुद्द छत्तीसगडच्या डीआयजी विश्वजित रंजन यानीच प्रकाशित केलेल्या आणि केन्द्र सरकारकडे दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, माओवादी विविध मार्गाने दरवर्षी २० अब्ज रूपये गोळा करतात. [मार्च २००८ मध्ये झारखंड येथील पोलिसांच्या चकमकीत सीपीआय-माओवादी मध्यवर्ती समितीचा एक प्रमुख सदस्य मिहिर मिश्रा सापडला होता. त्याच्याकडील कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कमध्ये मिळालेली माहिती अशी ~ सन २००७ मध्ये समितीने वसुली रूपाने दहा अब्ज रूपये गोळा केले आणि २००८ साठी हे लक्ष्य ११.२५ अब्ज रुपयांचे राहिल. डिस्कमधील माहितीत हेही उघडकीला आले की, आंध्रप्रदेश वसुलीच्या कामात त्या वर्षी तिसर्‍या क्रमांकावर गेले असून बिहार आणि छ्त्तीसगड हे अनुक्रमे प्रथम व द्वितिय स्थानावर आहेत. झारखंडने २००७ मध्ये ७५ कोटीची वसुली केली तर त्याचवेळी आपल्या महाराष्ट्राचा आणि कर्नाटकाचा वाटा होता अनुक्रमे १०० कोटी आणि ७८ कोटी. अशीच कमीजास्त स्थिती होती अन्य राज्यांची....हे सर्व दप्तर सीपीआय-माओवादीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले. उलटतपासणीत मिश्राने हेही कबूल केले की, चळवळीचे सर्व प्रमुख नेते आपापली बँक खाती सांभाळतात. [यातील एक नेता आणि पक्षाचा सचिव साम्बशिवदू याच्या एकट्याच्या खात्यावर ८० कोट रुपये होते आणि हादेखील १५ फेब्रु.२००९ मध्ये पोलिसाना शरण आला आणि त्याने हे अकौन्ट डिटेल्स खुले केले.]...अर्थात या नेतेमंडळींच्या म्हणण्यानुसार हा सारा पैसा नक्षलवाद्यांच्या गुरिला युद्धनीती आणि सैन्याच्या देखभालीसाठी उपयोगात आणला जातो.

देणग्याव्यतिरिक्त माओवाद्यांचे प्रमुख साधन म्हणजे सक्तीची वसूली....जी त्याना मिळते देशभरात सर्वत्र चालू असलेल्या रोड कॉन्ट्रॅक्ट्स घेणार्‍या कंपन्याकडून, जंगलतोडणीचे कामे मिळालेल्या ठेकेदारांकडून, तेंदू पत्ता, रबर, पेपर आणि चहाचे मळे हे यातील प्रमुख घटक. शिवाय चोरटी दारू, प्राण्यांची कातडी मिळविण्याचे धंदे करणारे, आयुर्वेदिक औषधवनस्पती, सागवान, बांबू आणि चंदन तस्कर....यानी तर माओवाद्यांना उघडउघड पोसले आहे असेही म्हटले जाते.....

[फार विचित्र आहे हा विषय....! कादंबरीच लिहिता येईल या सर्व घडामोडीवर].

वरील बाबी छुप्यारितीने चालू असलेल्या धंद्यातील वसूली. पण ज्या राज्यात माओवादी बळकट आहेत तिथे ते अगदी लहानमोठ्या व्यापार्‍यापासून स्थानिक डॉक्टरांकडूनदेखील ठराविक देणगीची अपेक्षा करतात जी पुरी होतेच होते. किराणा, औषधविक्रेते, वाईनशॉप, बिडी-सिग्रेट दुकानदार, केबल ऑपरेटर्स.... किती नावे घ्यावीत ? कायदा खूप काही सांगतो की अशा वसुलीवाल्यांना पकडा आणि आमच्या ताब्यात द्या....पण हे होते का...? कारण व्हू वुड विश टु फेस द डेव्हिल्स राथ? हीदेखील भीती आहेच.

बिहारच्या किशनगंज आणि पूर्णिया जिल्ह्यात आणि झारखंडच्या घाग्रा आणि गुम्ला जिल्ह्यातील सुमारे १५०० हेक्टर जमिनीत लागवड केलेली अफूची आणि गांजाच्या उत्पादने ही एकट्या माओवादी नेत्यांची होती. २००९ मध्ये सीबीएनने (Central Bureau of Narcotics) धाड टाकून मिलिटरीच्या मदतीने ही लागवड भस्म करून टाकली खरी...पण इथून या अगोदर जे उत्पन्न माओवाद्यांना मिळत होते ते चक्कर आणणारेच होते. एकट्या बिहारमधुन आदल्या वर्षी त्यानी ११२ कोटी रुपयाचे उत्पन्न घेतले होते. तर मुर्शिदाबाद आणि बंगालच्या नादिया जिल्ह्यातून अफूच्या बोंडांपासून १२० कोटीचा महसूल त्याना मिळाला होता.

खूप लिहिता येईल अजूनही.....उत्पन्नाच्या स्त्रोतावर....आणि तेही सरकारी दप्तरातील माहितीवरून, त्यामुळे तीवर विश्वास ठेवावाच लागेल. पण, इतपत माहितीवरून तरी इथल्या सदस्यांनी हे जाणवेल की, माओवाद्यांच्या गंगेची गंगोत्री कुठे आहे !

इन्द्रा

आळश्यांचा राजा's picture

22 Feb 2011 - 6:53 am | आळश्यांचा राजा

ग्रेट!

चिंतामणी's picture

22 Feb 2011 - 8:32 am | चिंतामणी

या धाग्यावर लिहीणारे सगळे विचारवंत हा (फंडिंगच्या वाटा....!!) पोस्ट वाचतील अशी आशा करतो.

नितिन थत्ते's picture

22 Feb 2011 - 8:41 am | नितिन थत्ते

(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये अशी विनंती + मागणी.

जे तो वापरतील त्यांना पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षित नाही असे समजावे व त्यांच्या प्रतिसादांकडे व प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे.

चिंतामणी's picture

23 Feb 2011 - 1:32 am | चिंतामणी

(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये अशी विनंती + मागणी.

(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये

सर्व धाग्यांवर "पॉझिटिव्ह चर्चा " होत नाही असे आपले म्हणणे आहे का?? आपण सगळेजण सगळीकडेच
पॉझिटिव्ह चर्चा होईल " ह्या कडे का लक्ष देत नाही?

'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये

'विचारवंत' म्हणले यात काय चुकले???????????

'विचारवंत' हा अपशब्द आहे का??

नितिन थत्ते's picture

22 Feb 2011 - 8:44 am | नितिन थत्ते

(किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षिणार्‍यांनी 'विचारवंत' हा शब्द या धाग्यावर वापरू नये अशी विनंती + मागणी.

जे तो वापरतील त्यांना पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षित नाही असे समजावे व त्यांच्या प्रतिसादांकडे व प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे.

सुधीर काळे's picture

22 Feb 2011 - 10:54 am | सुधीर काळे

(In the lighter vein.....) आयुर्वेदाची औषधे आणि चहा महाग का होत आहे याची कांहीं कारणे इंद्रा-जींच्या वरील प्रतिसादामुळे कळली!

प्रसन्न केसकर's picture

22 Feb 2011 - 3:24 pm | प्रसन्न केसकर

अजुन बरेच काही कळत जाईल. नक्षलवाद इज नोव्हेअर अ डेडिकेटेड मुव्हमेंट. इट इज ओन्ली प्रोफेशनल टेरेरीझम. इट नीडस अ व्हेरी कॉम्प्रीहेन्सीव्ह अ‍ॅप्रोच टु डील विथ. अँड दॅट अ‍ॅप्रोज विल कम ओन्ली विथ रिअलायझेशन ऑफ रिअ‍ॅलिटी.
अभी तो बहुत शो बाकी है काळेसाहेब!
अजुन नक्षलवादाला तत्वज्ञान आहे, सध्या भारतात नक्षलवादाच्या नावाखाली जे चालते त्याला चारु-कनु (दोघेही खर्‍या नक्षलवादाचे मुळ प्रवर्तक आणि दोघेही नक्षलवादाबाबतच्या फस्ट्रेशनने चळवळ सुरु केल्यावर काही महिन्यातच ग्रासले होते.) यांच्या तत्वज्ञानाचा बेगडी मुलामा चढवणारे कोण कोण लोक आहेत, दहशतवाद/ गँगस्टरीझम कसा चालतो असे बरेच विषय चर्चेत यायचे आहेत.

प्रसन्न-जी,
मला जे अजीबात कळत नाहीं कीं हे 'सपशेल पडेल' तत्वज्ञान लोकांना इतके कसे पटते? ज्यांच्या देशात या तत्वज्ञानाचा उगम झाला त्याच देशांनी त्या तत्वज्ञानाला फेकून दिल्यावरच त्यांची प्रगती झाली. तरीही हे तत्वज्ञान कसे उभे रहात?
म्हणजे चांगल्या शिकल्या-सवरलेल्या शहरी माणसांनी साप चावल्यावर मांत्रिकाकडे जाण्याइतकेच मला हे तत्वज्ञान हास्यास्पद वाटते!

चिंतामणी's picture

22 Feb 2011 - 5:50 pm | चिंतामणी

मला जे अजीबात कळत नाहीं कीं हे 'सपशेल पडेल' तत्वज्ञान लोकांना इतके कसे पटते?

कोंणाला पटले आहे असे तुम्हाला सुचीत करायचे आहे??????

;)

अप्पा जोगळेकर's picture

26 Feb 2011 - 11:06 pm | अप्पा जोगळेकर

दोघेही खर्‍या नक्षलवादाचे मुळ प्रवर्तक
खरा नक्षलवाद म्हणजे काय ?

प्रसन्न केसकर's picture

22 Feb 2011 - 3:14 pm | प्रसन्न केसकर

सुंदर विवेचन.
पण पहिले म्हणजे हेच आर्थिक स्त्रोत सर्वच दहशतवादी, गँगस्टर यांचेही असतात ना? की त्यांचे इकॉनॉमिक मॉडेल काही वेगळे असते?
दुसरे म्हणजे हे सगळे झाले पब्लीकली नोन इकॉनॉमिक सोर्स. त्यापलीकडे पण सोर्सेस असु शकतात ना?
तिसरे म्हणजे हे रिसोर्सेस नक्षलबारी मॉडेल च्या व्हेग अ‍ॅनॅलिसिस मधे नक्की मिळतील. तसे वेगळ्या शब्दात ते कदाचित कोणत्याही देशाच्या राज्यघटनेत पण असतील. पण नक्षलबारी मॉडेल आणि हे सोर्सेस, त्यांचे ऑप्टीमायझेशन आणि त्यांचे युटिलायझेशन यान कितपत फरक आहे हे देखील विचारात घ्यावे लागेल. त्यासाठी नक्षलबारी मॉडेलमधे सुरुवातीच्या काळातल्या बिप्लब कोर्टांचे निकाल महत्वाचे ठरतील. त्या न्यायालयांचे निकाल पाहिले तर या मॉडेलच्या अगदी उलटे आहेत.छत्तीसगढ्,आंध्र, महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगढ याचा उल्लेख मी येथे जाणुन बुजुन करत नाही कारण माझ्या मते तेथील घटनांचा काहीच संबंध नक्षलवादाच्या तत्वज्ञानाशी नाही. तो स्युडो नक्षलवाद आहे. त्याला १९९० नंतर कोणतेच तत्वज्ञान नाही आणि त्याआधी देखील बव्हंशी तत्वज्ञान होते ते मुखवट्यापुरतेच हे त्या भागातल्या नक्षलवादाच्या वाढीचा इतिहास दर्शवतो.
तुझ्या प्रतिसादात तु मानवतावादी संघटना, त्यांचे रिसोर्सेस वेगळे काढलेत. ते असे वेगळे काढणे शक्य आहे? विशेषतः जेव्हा प्रश्न दहशतवाद, नक्षलवाद अश्या व्यापक संकल्पनांबाबत येतो तेव्हा तरी तसे करता येईल. हे सर्व एकाच प्रश्नाचे वेगवेगळे पैलु नाहीत? मग असे सेग्रीगेशन, असा होलिअर दॅन काऊ अ‍ॅटीट्युड कश्यासाठी?
आणि सर्वात महत्वाचा मुद्दा - शस्त्रे, स्फोटके यांचे काय? त्यांचे रिसोर्सेस काय? एकसारखी शस्त्रे-स्फोटके आणि तंत्रज्ञान कसे येते या सगळ्या दहशतवादी संघटना, नक्षलवादी गट आणि गँगस्टर्सना? शेवटी त्या सगळ्याचाही पन्नास साठ वर्षांचा हिस्ट्री ट्रेल आहेच की. तो का इग्नोर करायचा? त्याबाबतही काहीतरी येऊ दे विश्लेषण.

प्रदीप's picture

23 Feb 2011 - 7:56 pm | प्रदीप

तुम्ही ही जी नक्षलवाद्यांच्या मिळकतीची माहिती दिली आहे ती अक्षरशः भेलकांडून टाकणारी (staggering) आहे.

मात्र "प्रमुख देणगीदार आहेत ते नक्षलवाद्यांच्या प्रभाव असलेल्या छ्त्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि आसाममधील खाणमालक. आंध्र प्रदेश आणि बिहारमधील पेपर मालक, आसाम आणि ईशान्येकडील राज्यातील चहा मळेवाले. आता या बिगीजकडून देणगीस्वरूपात जे काही येत असेल ते मोजण्याचा वा 'चेक' करण्याचे कोणतेही स्त्रोत ना मिडियाकडे आहेत ना अन्य कुठल्याही स्वयंसेवी संघटनाकडे. " ह्याविषयी मला वाटते हे लोक राजीखुशीने ह्या देणग्या देत नसून, जबरदस्ती देत असण्याची शक्यता जास्त आहे. पूर्वी चहामळेवाल्यांच्या मॅनेजरांचे अपहरण झाल्याचा बातम्या पेपरात येत. नंतर त्या तशा येणे बंद झाल्या. ह्याची दोन कारणे संभवतात. एक- ह्या बातम्यांना किंमत उरली नाही, दुसरी ह्या प्रस्थापनांचे मालक नियमित 'प्रोटेक्शन मनी' पोहोचवू लागले, दोन्ही कारणे खरी असावीत, असा माझा अंदाज आहे.

इन्द्र्राज पवार's picture

23 Feb 2011 - 10:55 pm | इन्द्र्राज पवार

थॅन्क्स प्रदीप जी.....तुमच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांचे इथे प्रतिसाद अत्यंत आवश्यक आहेत. मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहात होतो असे म्हटले तर ती अतिशयोक्ती मानू नका, प्लीज. तुम्ही, श्री.जयंत कुलकर्णी, श्री.सुधीर काळे आदी सीनिअर सदस्य जर राष्ट्रापुढे असलेल्या अशा (गंभीर) समस्येबाबत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रतिसाद रूपात मत व्यक्त करणे फार फार गरजेचे आहे.

विनील प्रकरणामुळे निदान इथे एका ज्वलंत प्रश्नाबाबत इथे सर्वच बाजूनी विचारमंथन होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मी वाचलेली इथली सर्वच मते/विचार मला पटले आहेत असे नाही, तसेच मी मांडलेल्या इतिहासावर तसेच माझ्या काही मतावर सर्वांनी Positive प्रतिक्रिया द्याव्यात असेही काही नाही. पण या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणार्‍या लोकांच्या भूमिका तरी या निमित्ताने समजत आहेत हे देखील काही कमी नाही.....असो.

तुमच्या मुद्द्यातील "ह्याविषयी मला वाटते हे लोक राजीखुशीने ह्या देणग्या देत नसून, जबरदस्ती देत असण्याची शक्यता जास्त आहे..." या मताविषयी इतकेच म्हणू शकतो की, अशा देणग्या कुणीही राजीखुषीने देतील असे खुद्द देणगी वसूली करणारेही मानत नाही. आता इथे 'जबरदस्ती' च्या व्याख्येची व्याप्ती अशी काही विचित्र आहे की ती जर मान्य केली नाही तर आसामच्या टाटा 'टी' च्या मळ्यात एक ग्राम (आय रीपिट..... वन सिंगल ग्राम) चहाचे उत्पन्न होणार नाही.....तर थापर यांच्या बिहारमधील पेपर साम्राज्यात एकही दिवस एखादा साधा कामगारसुद्धा कामावर येऊ शकणार नाही.

राज्य असो वा केन्द्र सरकार असो.....गृहखात्याकडून कधीही अशा देणग्या 'राजीखुशी' ने दिल्या गेल्याची नोंद करू शकत नाही....कारण त्या नॉन-ट्रेसेबल असतात. पण मी वरील प्रतिसादात उल्लेख केलेल्या अनेकविध उद्योगधंद्यात होऊ घातलेली अब्जावधी रुपयांची वार्षिक उलाढाल पाहता हे कार्पोरेट जायन्टस अशा देणग्या देणे ही एक नित्याची बाब मानतात.....शेवटी त्याचा भुर्दन्ड सर्वसामान्य ग्राहकांवर टाकता येतो हेही त्याना माहीत असतेच.

दहाबारा वर्षापूर्वी अशीच एक घटना आपल्या देशात घडली होती. वीरप्पनने कन्नड सुपरस्टार डॉ.राज कुमार यांचे अपहरण केले होते....१०९ दिवसांनी त्यांची सुटका झाली....वदंता अशी की राजकुमार यांच्या कुटुंबियानी ५ कोट "रॅन्सम" वीरप्पनकडे पोच केली.....याला त्यावेळेच्या कर्नाटकाच्या डीआयजीनी (तो आकडा तीन कोटीवर आणून...) दुजोरा दिला होता.

असे 'स्टार' या जंगलराजांना हवेच असतात, पैशाशिवाय आपल्या अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी. आज देशाचे परराष्ट्रमंत्री असलेले एस.एम.कृष्णा हेच त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते आणि त्यानीही वीरप्पनच्या किती मागण्या मान्य केल्या होत्या (का? तर डॉ.राजकुमार कन्नडिगांच्या गळ्यातील ताईत....) त्यावर खरे तर वेगळा धागा होऊ शकतो.

इन्द्रा

आळश्यांचा राजा's picture

22 Feb 2011 - 7:48 am | आळश्यांचा राजा

एक आठवले. विनिल सपोर्ट ग्रुप आहे फेसबुकवर. तिथे विनिल सोबत काम करणारे अजून एक अधिकारी - मलकनगिरिचे पी डी (डीआर डी ए) बलवंत सिंग - यांनी विनिल काय म्हणत असे ते सांगितले आहे - आय अ‍ॅम नॉट फाइटिंग माओइझम; आय अ‍ॅम फाइटिंग अंडरडेव्हलपमेंट.

या एका वाक्याने लढाईचा पुरा फोकसच बदलून टाकला.

या निमित्ताने श्रामोंच्या मागील एका प्रतिसादातील वाक्यही आठवले - मी शासनाच्या हिंसेचाही निषेध करतो.

विनिलचा मार्ग या दृष्टीने सिग्निफिकण्ट आहे. हा मार्ग केवळ माओवाद्यांच्या हिंसेलाच उत्तर देतोय असं नाही, तर शासनाच्याही हिंसेला बगल देतोय. हिंसेचे दुष्टचक्र मुळातूनच नष्ट करण्याचा हा मार्ग आहे.

मार्गाची चर्चाच केवळ करत न बसता तो मार्ग प्रत्यक्षात आणण्याची हिंमत दाखवणे हा अजून एक निराळा भाग. ती बाळगणारा विनिल हा अजून एक अभिमानास्पद आस्पेक्ट आहे.

नक्षलवादाशी आपला संबंध केवळ जनरल नॉलेज मिळवण्याच्या पुढेही येऊ शकतो असे ज्यांना ज्यांना वाटते, त्यांनी आवर्जून या सपोर्ट ग्रुपला एक भेट द्यावी.

इंद्रा -

यू आर प्राइड ऑफ धिस प्लेस! एक मालिका सुरु कर मित्रा. तुझे दोन प्रतिसाद हे पहिले दोन भाग होऊ शकतात. हे एवढे मनावर घेच. थत्ते, केसकर साहेब, श्रामो, आणि इतर अभ्यासू प्रतिसादांनी तुझे लिखाण अजून सखोल बनवतीलच.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Feb 2011 - 11:43 am | बिपिन कार्यकर्ते

होय मी आहे त्या ग्रुपचा सदस्य. तिथे तसेच इतरत्रही विनिल बद्दल वाचायचा प्रयत्न असतो. वाचतोही. मला वाटते आत्तापर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातले हे पहिलेच उदाहरण असेल की एका सरकारी अधिकार्‍याचे अपहरण झाले आणि सामान्य जनता पेटून उठली, रस्त्यावर उतरली. बरं ही सामान्य जनता कोण? केवळ मध्यमवर्गिय का? तर नाही... रूढार्थाने ठार अडाणी असलेले गरिब आदिवासी! नुसतेच आंदोलन नाही तर चक्क नक्षल्यांवर हल्ला करून विनिलची सुटका करायचा बेत आखला. धिस इज सिम्पली अनहर्ड ऑफ इन रिसेंट टाईम्स. यावरूनच विनिलची योग्यता आणि अशा व्यक्तींची आजकाल असलेली गरज दोन्ही स्पष्ट होत आहे.

माओवाद्यांना व्यवस्था सुधारण्यात रस नाही, किंवा रिफ्रेज करतो, त्यांना सुधारित व्यवस्था आणायची नाहीये, फक्त स्वतःची व्यवस्था आणायची आहे. बास. त्यासाठी त्यांना आज आदिवासी आणि त्यांची चाललेली नाडणूक यांच्या कुबड्या उपयोगी ठरत आहे. जर का काही कारणाने ही उपयुक्तता संपली की मग कोण आदिवासी? असेही होईल.

आळश्यांचा राजा's picture

22 Feb 2011 - 9:11 pm | आळश्यांचा राजा

मला वाटते आत्तापर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातले हे पहिलेच उदाहरण असेल की एका सरकारी अधिकार्‍याचे अपहरण झाले आणि सामान्य जनता पेटून उठली,...

...अशा व्यक्तींची आजकाल असलेली गरज दोन्ही स्पष्ट होत आहे

माओवाद्यांना व्यवस्था सुधारण्यात रस नाही, ... फक्त स्वतःची व्यवस्था आणायची आहे. बास.

सहमत आहे.

चिंतामणी's picture

23 Feb 2011 - 12:23 am | चिंतामणी

मी सुध्दा सहमत आहे.

चित्रा's picture

22 Feb 2011 - 10:12 am | चित्रा

प्रतिसाद, आळशांचा राजा आणि इंद्रराज पवार यांचे.
विनिल यांचे "आय अ‍ॅम फायटिंग अगेन्स्ट अंडरडीवेलपमेंट" हेच बहुदा परिस्थिती चिघळत रहावी असे वाटणार्‍या लोकांना नको आहे असे दिसते.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Feb 2011 - 11:44 am | बिपिन कार्यकर्ते

कोरापुट कलेक्टर श्री. राजेश पाटील यांनी केलेले हे आवाहन मिपावरही यावे असे वाटते -

Thanks all,

for the support and solidarity extended by the patriotic and peace loving citizen of india for the release of R. Vineel Krishna.

now there is need to cross the cyber boundaries and make the voice reach to all corners of india that a patriotic human being who has taken it as his mission of life to change the rural landscape cann't suffer like this

let there be candle light march, meetings, debate and dicussions on this importatnt issues in all big cities, universities and colleges

if we remain indifferent to this then no one can save this country in future, one third of our landmass is already under the influence of red terror

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2011 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फेसबुकावरील Support For Vineel ग्रूप.

इन्द्र्राज पवार's picture

22 Feb 2011 - 6:12 pm | इन्द्र्राज पवार

वरील प्रतिसादात श्री.सुधीर काळे आणि श्री.प्रसन्न केसकर यानी या महत्वाच्या चर्चेदरम्यान (तसेच संबंधात) ओघाने काही नवीन प्रश्न पुढे आणले आहेत, पैकी श्री.सुधीर जी यांच्या प्रश्नांबाबतचा हा यथामती घेतलेला धांडोळा ~

१) कूळ कायद्याने 'कसेल त्याची जमीन' असताना अशा चळवळी उभ्या रहायचे कारणच मला दिसत नाहीं. तरीही असे होत असेल तर एक तर कायद्यात पळवाटा आहेत किंवा कायद्याची अंमलबजावणी होत नाहीं.

~ कायदा, त्याची अंमलबजावणी आणि चळवळी ह्या गोष्टी एकमेकाला पूरक असल्या तरी 'कायद्यामुळे'च चळवळ उभी राहते (वा मरते...) असे नसून अन्य कारणासाठीदेखील चळवळी उभ्या राहिल्याची उदाहरणे प्रत्ययी नजरेसमोर येतील. "विद्यापीठातील भ्रष्ट पेपरसेटर्स ना काढून टाका..." अशी मागणी स्टुडंट्स युनियन करते, व्हीसी+सीनेट ती धुडकावून लावते, मग त्या मागणीसाठी युनियन व्यापक चळवळ उभी करते... कॉलेजीसमधून बंद पाळला जातो, वर्तमानपत्रे युनिअनची बाजू घेऊन तो प्रश्न धसास लावतात....मग स्थानिक आमदार, खासदार पुढे येतात, कुलगुरू युनियन पुढार्‍यांनी बोलावून घेतात...यादीतील १० नावापैकी ८ नावावर काट मारली जाते...युनिअन 'झाला आपला विजय...' म्हणून चळवळ स्थगित करते. इ.इ. ~ या उदाहरणात कायदा येत नाही, प्रकरण चिघळू नये म्हणून आणलाही जात नाही. इथे 'दोन पावले पुढे, एक पाऊल मागे...' असे तत्व स्वीकारले म्हणजे दोन्ही घटक समाधान प्राप्त करून नित्याच्या व्यवहाराला लागतात.....हे सुशिक्षित जगात घडू शकते....घडते.

~ नक्षलवादी चळवळ सुरू झाली ती 'कसेल त्याची जमीन' या कायद्यामुळे नव्हे तर ज्या आदिवासी युवकाची जी जमीन होती ती एका जमीनदाराने सावकारी पद्धतीच्या व्यवहारातून गिळंकृत केली होती. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या युवकाने सर्वप्रथम कायद्याच्या बाजूनेच लढा देऊन सावकारी देणे पूर्णपणे भागवले असे सिद्ध केले होते आणि त्याच्या आधारेच कोर्टाने जमीन बिमल किशनचीच असल्याने ती त्याला परत द्यावी असा हुकूमनामा बजावला. पण भारतीय न्यायव्यवस्था अशी काही आंधळी आहे की, हुकूम दिला, पण तो अंमलात कसा येईल याचे कसलेही गणित नाही. समज असा की, जमिनदार रायसाहेब यानी संध्याकाळी गावी परतल्यानंतर किशनला बोलावून त्याच्या पदरी शेताची कागदपत्रे ठेवावीत आणि आपले रखवालदार तिथून एका हाळीने बोलावून घ्यावेत..... होत नाही असे कदापिही...

इथे स्थानिक पोलिस काय करतात असा प्रश्न तुमच्यापुढे पडत असेल, सुधीर जी. पण त्या जमीनदाराच्या जागी आपल्या वाड्याच्या प्रांगणात वारा खात, मलईचे घुटके घेत पडलेला एखादा उग्रनारायणसम 'अमरीश पुरी' नजरेसमोर आणा....आणि त्याच्या आजुबाजूला अस्ताव्यस्त पसरलेले गुरासम त्याचे पित्ते....बंगालमध्ये तर असे जमीनदारच गाव चालवत असत. आता अशा वळू पोसल्यागत पैलवानाच्या गराड्यात त्या किरकोळ गावातील तितकाच 'रघुवीर यादव' टाईप किरकोळ पोलिस (१९६५-६६ चे चित्र आहे...) थरथरत त्याची सायकल घेऊन कोर्ट हुकूम देण्यास आला तर त्याचे स्वागत कसे होत असेल? "फेकून दे तो हुकूम....आणि सांग जा त्या किसन्याला, असेल हिंमत तर चालवून दाखव नांगर शेतात....मग बघ काय होते ते...!" संतापाने फणफणलेला किशन हिंमत दाखवतो आणि खरोखरी ज्यावेळी शेत ताब्यात घ्यायला जातो, त्यावेळी जो अनुभव त्याला आणि त्याच्या जमातीच्या अन्य लोकांना येतो तो कायद्याच्या भाषेत वर्णन करताही येत नाही.....त्याला मारून टाकले म्हणजेच 'कसेल त्याची जमीन' हा कायदा आपल्या उपयोगाचा नाही हे त्या आदिवासी आणि अन्य सम वर्गाने जाणले आणि डोळ्यादेखत झालेल्या त्या अन्यायपूर्वक हत्येने तसेच 'या देशाचा कायदा आपल्याला न्याय तर देईल, पण त्याची अंमलबजावणी करायला पुरेसा नाही...' असा निष्कर्ष काढून मग 'ईट का जवाब पत्थर से...' हेच सूत्र अंमलात आणले तरच खर्‍या अर्थाने न्याय, असे त्या उद्ध्वस्त झालेल्या जमातीला शिकवण देणारा तिथलाच एखादा चारू मुझुमदार त्याना 'गॉडफादर' वाटतो....मग त्या चळवळीला हिंसेची जी दिशा मिळते, तिचे रूपांतर मग एका "ईझम" मध्ये होते....तोच 'नक्षलवाद' म्हणून जोमाने फोफावतो. सरकार आपले रक्षण करत नसेल तर मग ते सरकार तरी का मानायचे? या भूमिकेतून चोखाळलेल्या रस्त्याला त्यांच्या नजरेत जे "यश" मिळते त्यामुळे फुलून जावून मग अन्यत्र हीच केमिस्ट्री वापरून "युवा वर्ग" इकडे वळविता येतो. शिवाय आदिवासी (अगदी महाराष्ट्रातील घेतले तरी) मुलामुलींना पारंपारिक पद्धतीने चालू असलेल्या शिक्षणप्रसारात काहीच गती नाही, गम्य नाही. आजही महाराष्ट्रातील कित्येक सरकारी खात्यात 'आदिवासी' कॅटेगरीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शेकडो जागा रिक्त आहेत (बॅकलॉग भरून काढावा असा राज्य सरकारचा त्या त्या खात्याला धोशा लावलेला असतो, पण मुळात ही मंडळी 'नागरी सेवे'च्या प्रवाहात येण्यास तयार नसतात, कारण त्याना ही जंगल भटकंती आवडते....आणि ती आवडावी असेच प्रशिक्षण चळवलीचे म्होरके निर्माणही करत असतात.)

कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सरकार अपेशी ठरते ही उद्रेकाची एक बाजू, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता/आहे तो आर्थिक स्तराचा. स्थूलमानाने सांगायचे तर या नेतेमंडळींनी आपल्या संघटनेच्या ताकदीवर "शासनसत्ता उलथून टाकू शकू आणि सत्ता आपल्या हाती आली की, आर्थिक स्थितीही कशी बदलायची तेही आपणच ठरवू..." अशी परिवर्तनाची मोहिनी याना दाखविली आहे, त्याचा परिणाम असा झाला की, मतपेट्यातून निवडून आलेले सरकार आमचे नाही, मग जर ते आपले नाही तर त्यांचा कायदा तरी आम्ही का पाळू? आणि तसे असेल तर त्या 'कायद्या'चा धाक दाखवून आमच्या रस्त्यात येणार्‍याना आम्ही आमच्या पद्धतीने रोखणार हा आमचा निर्धार.....हे 'माओवाद्यां'नी यांच्यावर असे ठसविले की त्याना अपेक्षित असलेली क्रांती यांच्यातूनच होईल असे मानणारा गट प्रभावी ठरला आहे.

चळवळी उभ्या राहिल्या त्या अशा आशेच्या गाजरावर आणि त्याना शक्ती मिळत आहे ती त्यांच्या अशा 'मोडस ऑपरेन्डी'वर.

२) माओवादी तत्वप्रणालीचा सपशेल पराभव रशिया आणि चीनमध्ये झालेला स्पष्ट दिसत असताना (तोही माओ त्से तुंगसारखा बलदंड नेता असताना) अशी तत्वप्रणाली आजही हे लोक कुठल्या बळावर आदिवासींना पटवून देतात?

~ रशियात कॉ.लेनन यानी कशा रितीने संघटना उभारली यापेक्षा झारच्या 'राजेशाही' ला तिथली जनताच कशी कंटाळली होती हा इतिहास सर्वप्रथम अभ्यासास घेतला पाहिजे. एक लक्षात घ्या, लाल झेंड्याखाली रशियन एकत्र आले ते त्यांच्यासमोर ढळढळीत 'आहे रे' आणि 'नाही रे' असे दोन वर्ग होते म्हणून. लेनिनने त्याना 'भाकरी' पेक्षाही आपल्याला वेगळे काय हवे तर 'समानता' आणि 'बंधुभाव' हे असे काही पटवून दिले की सारा रशिया झारविरोधी एकत्र आला. माओने चीनमध्ये क्रांती कशी घडवून आणली हा प्रश्न सर्वस्वी वेगळा आहे. दोघांनीही संघटना उभारण्यासाठी कधी पुस्तकी सिद्धांतांचा आधार घेतला नव्हता. प्रत्यक्ष पातळीवरचे व्यावहारिक राजकारण हाताळण्याची आणि संघटन उभारण्याची त्यांची क्षमता अगदी वेगळ्या पातळीवरचे होती आणि दुसरे म्हणजे लेनिन काय किंवा माओ काय दोन्हीही नेते अत्यंत प्रतिगामी व अत्याचारी अशा उजव्या राजवटीच्या विरुद्ध लढत होते. आपला संबंध भारताशी येतो. नेहरूंचा काळ हा यशस्वी की अयशस्वी यावर पेपर्स लिहू शकतो, पण कुणीही तो काळ 'अत्याचारी आणि जुलूमी राजवटी'चा होता असे विधान करू शकणार नाही. त्यामुळे कम्युनिस्टातील डावे वा अन्य फळ्यांही नेहरूंच्या समाजवादाच्या व्याख्येला विरोध करत असले तरी त्यांच्याविरूद्ध 'उठाव' करावा अशा मन:स्थितीत कधीच नव्हते, मग त्यानी आपला मोर्चा वळविला तो राज्यपातळीवरील परिस्थितीवर. खंडप्राय असलेल्या आणि अठरापगड जातीजमातीने बनलेल्या या देशात 'वर्गहीन समाजव्यवस्था' कुठल्याच राज्यात नव्हती....आजही नाही. त्यामुळे माओसूत्रावर विश्वास असणार्‍यांना प्रथम राज्य ही चौकट आटोक्यात येणारी वाटली आणि शिवाय लोकशाही निवडणुकांच्या मार्गाने मध्यवर्ती सत्ता ताब्यात घ्यायची असे स्वप्न पाहाणार्‍यांना या माओवाद्यांनी राज्यपातळीपासून त्याची सुरुवात करावी असे वाटणे स्वाभाविक, मग त्यातून पाठिंबा मिळण्यासाठी अशा चळवळी. इथे माओ आणि लेनिन यांच्या तत्वज्ञानाला आता त्यांच्या त्यांच्या देशात अनुयायी मिळत नसले तरी त्यांच्या येथील पित्त्यांच्या मनोवृत्तीत काही फरक पडत नाही.

"....ही तत्वप्रणाली आता scrap झाली आहे/व्हायला हवी! (या दुसर्‍या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळतच नाहीं)....."

~ याचे समाधानकारक उत्तर शोधणारी श्री.विनील कृष्णासारखी कर्तबगार अधिकार्‍यांची पिढी पुढे आली आहे. वर श्री.आ.रा. आणि अन्य ज्येष्ठ्य सदस्यांनी प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे विनीलचे प्रयत्न "नक्षलवाद्यांचा" बिमोड नसून 'नक्षलवादा' ला पूर्णविराम देण्याचा आहे, जे त्यांच्यासारखे अधिकारी नक्कीच करून दाखवतील.....प्रोव्हायडेड, दे सी इव्हन अ‍ॅन ऑर्डिनरी सिटिझन इज रेडी टु गिव्ह देम सपोर्ट फॉर द कॉज !! तत्वप्रणाली स्क्रॅप होण्यासाठी मुळात शासन आणि अधिकारी यांच्यात परस्पर सामंजस्याचा दुवा असावा लागतो. म्हणजे रूट लेव्हलला जाऊन त्या तत्वप्रणालीचा शोध घेऊन जो त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो (उदा.विनील...) त्याच्यावर जर काही संकट कोसळले तर शासन चालविणार्‍यांनी प्रथम प्राधान्याने त्याच्यामागे भक्कम उभे राहून ते संकट दूर केले पाहिजे. असे झाले तरच दुसरा विनीलही तयार होईल आणि तुम्ही म्हणता ती तत्वप्रणालीही अस्तित्वात राहणार नाही.

लेट अस होप...!

इन्द्रा

इंद्रा-जी,
१) पण भारतीय न्यायव्यवस्था अशी काही आंधळी आहे की, हुकूम दिला, पण तो अंमलात कसा येईल याचे कसलेही गणित नाही. म्हणजे अंमलबजावणीचीच उणीव आहे. मग ती दूर का नाहीं करता येत?
२) ज्या देशांत ती प्रस्थापित होती त्या देशांतही या नव्या संघटनांनीही (माओ, स्टॅलिन, ब्रझनेव वगैरेंनी) अनंत अत्याचार केले पण तरीही ती समाजव्यवस्था लोकांचे पोट भरू शकली नाहीं व म्हणूनच scrap झाली. त्यालाही आता वीस-एक वर्षे झाली व या वीस वर्षात चीन हा एक आर्थिक सुपरपॉवर झाला! तरीही आपले 'नाही रे' लोक यांच्या मागे कसे लागतात हे कळत नाहीं!
या बाबतीत काय करायचे हे स्पष्ट आहे व सरकार जो यांना खतम करण्यासाठी पैस ओतत आहे त्याच्या निम्म्यात नक्षलवाद आटोपेल. कै. करकरे याच दिशेने प्रयत्न करत होते ते तिथल्या प्रस्थापित जमीनदारांना आवडले नाहीं व त्यांची बदली करण्यात आली!

चिंतामणी's picture

23 Feb 2011 - 12:32 am | चिंतामणी

इथे स्थानिक पोलिस काय करतात असा प्रश्न तुमच्यापुढे पडत असेल, सुधीर जी. पण त्या जमीनदाराच्या जागी आपल्या वाड्याच्या प्रांगणात वारा खात, मलईचे घुटके घेत पडलेला एखादा उग्रनारायणसम 'अमरीश पुरी' नजरेसमोर आणा....आणि त्याच्या आजुबाजूला अस्ताव्यस्त पसरलेले गुरासम त्याचे पित्ते....बंगालमध्ये तर असे जमीनदारच गाव चालवत असत. आता अशा वळू पोसल्यागत पैलवानाच्या गराड्यात त्या किरकोळ गावातील तितकाच 'रघुवीर यादव' टाईप किरकोळ पोलिस (१९६५-६६ चे चित्र आहे...) थरथरत त्याची सायकल घेऊन कोर्ट हुकूम देण्यास आला तर त्याचे स्वागत कसे होत असेल? "फेकून दे तो हुकूम....आणि सांग जा त्या किसन्याला, असेल हिंमत तर चालवून दाखव नांगर शेतात....मग बघ काय होते ते...!". ..............................................................................................................................................................................................................................................................................................................

परीस्थितीचे वर्णन करीत आहे का सिनेमाची "ष्टोरी" सांगत आहेस??????

तु मुद्याचे खंडन कर. पण तुझे इतर पोस्ट आहेत ना (उदा. फंडीग इत्यादी) त्या पातळीवर कर. याचा अर्थ असा नव्हे की तु नक्षलवाद्यांना विरोध कर. पण तुझ्या लेखनाची जी पातळी आहे ती या पोस्टमुळे खालावली असे माझे मत आहे.

याचा अर्थ हे १००% चुक आहे असे मी म्हणत नाही. पण प्रतीसादाची पध्दत आणि त्याला काहीही आधार त्यात दिसला नाही म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला आहे.

इन्द्र्राज पवार's picture

23 Feb 2011 - 10:56 am | इन्द्र्राज पवार

"....पण प्रतीसादाची पध्दत आणि त्याला काहीही आधार त्यात दिसला नाही ...."

~ श्री.चिंतामणी.... पॉईन्ट नोटेड.

पण हेही सांगणे अत्यंत गरजेचे आहे की, 'आधार' हा जो मुद्दा इथे आला आहे, तो सांगोवांगी माहितीचा वा निव्वळ वाचन तसेच 'फिल्मी नॉलेज' मधून आलेला नसून माझ्या मित्रांसमवेत झालेल्या भटकंतीतील टीपणावर (जरी "नक्षलवाद" या विषयावरील ते भटकणे नसले तरी.....एक बंगाल वगळता देशाच्या नक्षलप्रभावीत जवळपास आठ राज्यात आम्ही भटकलो आहोत) आधारीत आहे.

ओरिसा आणि छ्त्तीसगड या दोन्ही 'नक्षल अफेक्टेड' राज्यांच्या सीमेवर आंध्र प्रदेशातील 'राजमुन्द्री' नावाचा (शैक्षणिकदृष्ट्या) एक प्रगत जिल्हा आहे. कॉलेजच्या काळात त्या जिल्ह्यातील एका गावात दोन दिवस, (तेथील मित्रामुळे जो सध्या ईस्ट गोदावरी येथील आंध्र प्रदेश पेपर मिल्समध्ये अधिकारी आहे), मुक्कामास राहण्याची संधी मिळाली होती. त्याच्या नातेवाईकांचा 'तसला' रूबाब मी दुसर्‍या दिवशी पाहिला होता. म्हणजे अगदी वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे परिस्थिती नसली तरी वाड्यासमोर बैठक आहे, जमीनदार "निशांत" स्टाईलमध्ये लोडाला टेकून आहेत, दिवाणजी काहीतरी अगम्य अशा तुळू भाषेत बोलत आहेत, आणि केवळ कमरेला लुंगी लावलेली रयत - किमान डझनभर तरी होतेच - दीनवाण्या चेहर्‍याने बाजूला उभी आह. [लक्षात घ्या, राजमुन्द्री आणि मेहबूबनगर हे दोन्ही जिल्ह्ये नक्षलवाद्यांच्या कारवाईने गाजत असूनदेखील तिथली जमीनदारी अजुनही संपुष्टात आलेली नाही.]

तिथे विषय काय चालला आहे हे समजले जरी नसले तरी आम्हा मित्रांना 'अमरीश पुरी' सम सीनची आठवण झाली हे तितकेच खरे. त्यामुळे बिमल किशनच्या काळात प.बंगालमध्ये काय परिस्थिती असेल याची झलक दाखविण्यासाठी ते उदाहरण घेतले होते.

राहता राहिला मुद्दा....नक्षलवाद्यांना विरोध....तो तर केलाच पाहिजे, चिंतामणी. भारतीय घटना आणि येथील कायदेकानू मानणार्‍या प्रत्येक नागरिकाने असे शस्त्र घेऊन समाजस्वास्थ्याला नख लावणार्‍यांच्या (आणि ती कीड वाढविण्यास छुपी मदत करणारे सर्व) कारवायांना विरोध हा केलाच पाहिजे. प्रत्यक्ष 'ऑपरेशन' मध्ये भाग घेऊनच हे केले पाहिजे असे नव्हे तर श्री.विनील कृष्णा सारखे जे कर्तबगार अधिकारी हे आपल्या मगदुरीप्रमाणे कार्य करीत आहेत त्याना वेळोवेळी पाठिंबा तर दिला पाहिजे, मग तो एका प्रोत्साहनपर ई-मेलनेदेखील देता येतो.

असो.

इन्द्रा

आळश्यांचा राजा's picture

22 Feb 2011 - 9:26 pm | आळश्यांचा राजा

हे 'सपशेल पडेल' तत्वज्ञान लोकांना इतके कसे पटते?

हे तत्वज्ञान सपशेल पडेल आहे की नाही हे माहीत नाही. हिंसक आहे हे माहीत आहे.

लोकांना पटते की नाही हेदेखील माहीत नाही. हिंसक असल्यामुळे मला तरी संदर्भाशिवाय पटत नाही. हिंसा मी सरसकट नाकारत नाही. शिवाजीचा पॉलिटिकल स्ट्रगल हिंसक होता. गॅरिबाल्डीचा हिंसक होता. चे चा हिंसक होता. नेताजींचा (काही अंशी) हिंसक होता.

प्रस्तुत संदर्भात, नक्षली हिंसा मला पटत नाही. कारण इथे पर्याय आहेत. अधिक चांगले पर्याय आहेत. या तत्त्वज्ञानाचे निमित्त करुन एक नवीन शोषण पद्धती उभी राहिली आहे हे दिसत आहे.

अ‍ॅकॅडेमिशियन्सना हे तत्त्वज्ञान पटत असेल, तर मला त्यांची आश्चर्ययुक्त कीव वाटते. किमान भारतीय संदर्भात तरी.

आदिवासींना हे पटत असेल असे वाटत असेल, तर त्याची चार कारणे मला दिसतात. (पटणे म्हणजे साथ देणे अशा अर्थी) -

साम - खरेच पटणे
दाम - पैशाच्या मोहापायी. नक्षल आदिवासींना पैसे देत असतील असे वाटत नाही.
दंड - भय. भीतीपोटी आदिवासी पॅसिव्ह कोऑपरेशन करत असावेत.
भेद - आदिवासींमधील अँटीसोशल इलेमेंट्स टॅप करणे.

विकास's picture

22 Feb 2011 - 10:14 pm | विकास

ह्या तसेच या संदर्भातील इतर चर्चेतून खूप माहिती मिळाली. त्याबद्दल सर्वांचाच आभारी आहे!

वर श्री. प्रसन्न केसकर यांनी विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात बराच उहापोह झाला आहेच. त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा वाटतो तो उदात्तीकरणाचा. ज्याचा प्रत्यक्षापेक्षा अप्रत्यक्ष संबंध हा कधी कधी फंडींगशी लागतो.

या संदर्भात एक आठवणारे उदाहरण हे श्री. संदीप पांडे यांचे आहे. यांनी अमेरिकेत असताना "आशा" नामक संस्था स्थापली आणि त्याच्या आधारे भारतात शिक्षणासाठी पैसे गोळा करून चांगल्या प्रकल्पांना मदत केली. आता हा प्रकल्प वाईट आहे का तर नाही/नसावा. यात काम करणारे इथले स्वयंसेवक काही माओवादी आहेत का? तर नाही/नसावेत. पण स्वतः पांडे मात्र तसे आहेत का नाहीत या बद्दल साशंकता वाटते. २००२ साली बिहार मध्ये नक्षलवाद्यांच्या स्मारकाच्या समारोहासाठी ते प्रफुल्ल बिडवाई, अरुंधती रॉय आदींबरोबर हजेरी लावून होते. मॅगेसॅसे मिळाल्यावर, त्याला मिळाणारी मदत फोर्ड फाउंडेशन म्हणजे अमेरिकन फाउंडेशनची म्हणत त्यावर टिका करत स्वतःची भांडवलशाही विरोधी प्रतिमा तयार केली. या सर्वांचा त्यांच्या आदर्श कामामधे सहकारी असलेल्या स्वयंसेवकांवर देखील परीणाम होतोच. त्यांना देखील मग नक्षल चळवळ उदात्त वाटू शकते. त्याचे परीणाम मग हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फंडींगवर होऊ शकतात.

संदीप पांडे हे केवळ एक उदाहरण आहे. असे उदात्तीकरण करणार्‍यात, अरुंधती रॉय, मेधा पाटकर, प्रफुल्ल बिडवाई, माहेश्वरी देवी आदी आहेत. (बिडवाईंचे माहीत नाही पण) ज्यांचे इतर कार्य प्रशंसनीय असेलही पण असल्या समर्थनांमुळे त्या कार्याला देखील उपहास सहन करावा लागू शकतो.

इन्द्र्राज पवार's picture

22 Feb 2011 - 11:04 pm | इन्द्र्राज पवार

एक चांगली बातमी ~ आत्ताच जाहीर झाले की, श्री.विनील कृष्णा आणि श्री.पबित्र माज्झी यांची, माओवाद्यांनी त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्यामुळे, सुखरूप मुक्तता केली आहे....[मिडियाची खबर]

(पण आकाशवाणीवरील वृत्तात - ११.०० च्या बातम्या - म्हटले आहे की येत्या ४८ तासात त्यांची सुटका होईल)

असो...पण सदस्यांना विनंती की, इथे असलेली चर्चा पुढे चालू ठेऊ या....या निमित्ताने बर्‍याच गोष्टी चर्चेला येतील असा विश्वास वाटतो.

इन्द्रा

विकास's picture

23 Feb 2011 - 1:06 am | विकास

श्री.विनील कृष्णा आणि श्री.पबित्र माज्झी यांच्या सुटकेची वार्ता ऐकून आणि पाहून आनंद झाला. जनतेचा दबाव आणि तो देखील एका सरकारी अधिकार्‍यासंदर्भात, यशस्वी झाला. केवळ आदीवासीच नाहीत, तेथील स्थानिक जनताच नाही, तर त्याहूनही अधिक संख्येने विविध संस्थळांवर चर्चा झाल्या, फेसबूकसारख्या ठिकाणी ७०००च्या वर सभासद गोळा झाले... तुर्तास त्याच्यामुळे अतिरेकी नक्षलवाद्यांच्या ज्या काही मागण्या मान्य केल्या गेल्या त्यांचा परीणाम कमी वाटतो आहे.

कधी बघण्याचाच काय, ज्याचे नाव पण आठवड्यापूर्वी ऐकलेले नव्हते अशा या श्री.विनील आणि पवित्र साठी जनता एक येऊ शकते, यातून सर्वांनाच संदेश मिळाला आहे - तथाकथीत सेक्युलर्सना, राजकारण्यांना, माध्यमांना आणि अतिरेकी नक्षलवाद्यांना.

तसाच चांगल्या अर्थाने सरकारी अधिकारी, पोलीस आणि तत्सम इतर सुरक्षा दलांना देखील वाटले असेल की आपले काम अगदीच दुर्लक्षित झालेले नाही....

श्रावण मोडक's picture

23 Feb 2011 - 11:22 am | श्रावण मोडक

चर्चा वाचतो आहे. काही नवे दृष्टिकोन दिसतात. काही जुने घीसेपीटे; पण म्हणून चर्चा घसरत नाहीये.
पुढे काही लिहायला वेळ मिळाला तर भाग घेईन.

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 11:44 am | विजुभाऊ

नक्षलवाद फोफावतो तो आदिवासींच्या शोषणातून.
याला बर्‍याचदा स्थानीक लोकांवर बाहेरून आलेले लोक राज्य करण्याचा प्रयत्न करतात यामुळे होतो.
आरापल्लीत तेंदू पत्त्यांचे ठेके सरकार देते. आदिवासींच्या मुळ व्यवसायावर हा घाला होतो.
आदिवासी व्यवसायासाठी जंगलतोड करीत नाहीत पण सरकार जंगलतोडीचे ठेके देते. आदिवासीला घरातल्या चुलीसाठी साधी मोळी डोक्यावरुन नेउ दिली जात नाही.
आदिवासी हे नागरी लोकांसारखे पैसे साठव त्यातून काही भविष्याची तजवीज कर असल्या विचारांचे नसतात. नागरी करण हा संस्कृतीवरच वार असतो. त्यामुळे शरातून आलेला तो आपले शोषण करणाराच हे त्यांच्या मनात ठसलेले असते.
सरकारचे कायदे आदिवासीना उमगत नाहीत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवला जातो. पोलीस देखील त्यांच्यावर जबरदस्ती करत असतात .
या सर्वात भरडला जातो तो स्थानीक आदिवासी. त्याच्या व्यवस्थेविरुद्धा काही आवाज उठवावा असे काहीच नसते. मिडीया वगैरे शहरी मध्यमवर्गीयांकडे ज्या सहजपणे उपलब्ध असतो तितका आदिवासींकडे नसतो. यातूनच शोषणाचे एक चक्र सुरू होते.
यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणून चळवळींकडे पाहिले जाते.
शिक्षण वगैरे देखील नागरी पद्धतीनेच आदिवासींच्या माथ्यावर मारले जाते. आदिवासी संस्कृतीचा र्‍हास होत रहातो. त्यांची जगण्याची पद्धत बदलली जाते. त्यांची भाषा नष्ट होते.
गुजरात मध्ये तेजगडच्या आदिवासी भागा डॉ गणेश देवी गेले वीस वर्षे आदिवासी साठी त्यांची भाषा जगावे .संस्कृती जगावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.
तेथे असल्या चळवळी उभ्या राहिल्या नाहीत.
आदिवासीना त्यांच्या पद्धतीने शिक्षण ,काम मिळाले तर बर्‍याचशा नक्षली चळवळी उभ्याच रहाणार नाहीत

श्रावण मोडक's picture

23 Feb 2011 - 12:20 pm | श्रावण मोडक

तेजगडच्या त्या अहिंसात्मक प्रक्रियेला पाठबळ द्यावे लागेलच. अन्यथा तेथील असे काही हक्कसंबंधित मुद्दे अहिंसात्मक चळवळीतून सुटत नाहीत अशी स्थिती झाली तर ती माओवाद्यांसाठीची सुपीक भूमी ठरेल. आधीच मुंबईच्या उत्तरेला गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशात एक लाल वर्तुळ निर्माण झाले आहे. यासंदर्भात समाज-सरकार कोठे आहे हे पाहणे महत्त्वाचे. विजूभाऊ लिहा.

नितिन थत्ते's picture

23 Feb 2011 - 12:45 pm | नितिन थत्ते

>>मुंबईच्या उत्तरेला गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशात एक लाल वर्तुळ निर्माण झाले आहे.

हे वर्तुळ बहुधा गोदावरी परुळेकरांच्या काळापासून आहे.

श्रावण मोडक's picture

23 Feb 2011 - 1:28 pm | श्रावण मोडक

माझ्या मते, त्या काळचा लाल रंग केवळ कम्युनिस्ट म्हणून असावा. त्यामागे उगाचच कांगावा असाही भाग होताच. पुढे तो लाल रंग फिक्कट होत गेला. नंतर आत्ता जे लाल वर्तुळ दिसते आहे ते मात्र भडक लाल आहे. ते नव्याने दाखवले जात आहे. आणि त्यात काही अर्थी आत्ताचा नको असलेला खराखुरा लाल रंग आहे.

प्रसन्न केसकर's picture

23 Feb 2011 - 1:43 pm | प्रसन्न केसकर

हा महत्वाचा भाग आहे. मुळात नक्षलवादी म्हणजे नक्की कोण याची व्याख्या काय आहे यावर ही रंगरंगोटी अवलंबुन असते. आणि जर सगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स वगैरेचा प्रेझेन्स नक्षलवादाच्या लाल रंगात दर्शवायच्या झाल्या तर अगदी पुणे मुंबई पण लाल होईल.

श्रावण मोडक's picture

23 Feb 2011 - 2:14 pm | श्रावण मोडक

मी व्याख्येत जातच नाही. कारण लोकशाही व्यवस्थेत हिंसेचे कोणतेही तत्वज्ञान निषेधार्ह आणि त्याज्य. मग ते चारू-कनूंचे असो वा आजचे. अर्थात, काही सुरक्षीत अंतरावरून मी हिंसा नाकारतो आहे, असेही म्हटले जाऊ शकते याची मला कल्पना आहे.
नकाशासंदर्भात मी जो लाल रंग म्हणतो आहे, तो माओवाद प्रभावीत क्षेत्रासंदर्भातच. त्या माओवादाविषयी तुम्ही खाली दिलेली माहिती वाचली आहे. त्यातील काही माहितीशी मी सहमत असलो तरी, त्याच्या तुम्ही मांडलेल्या इण्टरप्रिटेशनशी मात्र मी पूर्ण सहमत नाही.
लेट्स ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन ऑन अ बिट डिफरण्ट ट्रॅक्स!!!

प्रसन्न केसकर's picture

23 Feb 2011 - 2:27 pm | प्रसन्न केसकर

टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन्स आर डिफरंट दॅन ऑदर ऑर्गनायझेशन्स. लाल ठिपका दिसतो याचा अर्थ नक्षल प्रेझेन्स हे मान्य केले तर तो कुठल्या स्वरुपात हे स्पष्ट हवेच. नाहीतर सगळाच गोंधळ होईल. दहशतवादी संघटना रजिस्टर्ड ऑफिसेस उघडत नसतात मोजुन प्रेझेन्स दाखवायला त्यामुळे तो अ‍ॅक्टीव्हिटीज मधुनच दिसतो. त्या अ‍ॅक्टीव्हिटीज कोण करते, कोणत्या स्वरुपाच्या आहेत हे लक्षात घेणे अत्यावश्यक असतेच अश्या अभ्यासांमधे. नाहीतर तो अभ्यास नाही. ते म्हणजे नेहमी आम्ही पत्रकार मंडळी उडवतो तसे पतंग उडवणे झाले. झाला स्फोट जर्मन बेकरीत आणि नाही काही नविन मिळाले की घ्या एखादे नाव इंडियन मुजाहिदीन, सिमी, अभिनव भारत वगैरेसारखे. अन मग संबंधीत मंडळी अजुन गोंधळ करतात. ते देतात एखादे पत्र पाठवुन डेक्कन मुजाहिदीन नावाने. झालं आली नवी संघटना अस्तित्वात.

अन सहमतीबद्दल धन्यवाद. ते इंटरप्रिटेशन वगैरे काही मला कळत नाही. मी फक्त फॅक्टस मांडतो. माझ्या प्रतिसादात ज्या फॅक्टस आहेत त्या बाबतच महत्वाचे. इंटरप्रिटेशन वगैरे वाटल्यास इतरांनी करावे या फॅक्टसचे अन वेगळे तार्किक निष्कर्ष काढावेत.

आय टोटली अ‍ॅग्री इफ समवन अ‍ॅग्रीज टु डिसअ‍ॅग्री अ‍ॅज लाँग अ‍ॅज ही इज नॉट डिस्प्युटिंग फॅक्टस विथ सबटरफज!

श्रावण मोडक's picture

23 Feb 2011 - 4:53 pm | श्रावण मोडक

वेल, इन दॅट सेन्स -
मी तर हिंसेवर आधारलेल्या तत्वज्ञानाचाच किंवा त्या आधारे चालणाऱ्या कारवायांचा निषेध करतोय. मग ते दहशतवादी असतील, माओवादी असतील, चारू-कनूचे अनुयायी असतील वा उद्या, तुमच्या येथील व्यापक मांडणीनुसार, गँगस्टर्स असतील. पण या चारही गटांत मी फरक करतो. निषेध केला. पुढे काय, असा प्रश्न मी मलाच विचारतो तेव्हा मी भिन्न मार्ग सांगेन. त्याविषयी इथे लिहित नाही. स्वतंत्र बोलतो.

प्रसन्न केसकर's picture

23 Feb 2011 - 1:37 pm | प्रसन्न केसकर

नक्षलवाद हे तत्वप्रेरित चळवळ आहे असा बर्‍याच जणांचा समज दिसतो. बहुतांश हा समज सेकंड हँड माहितीवर किंवा पॉप्युलरिस्ट लिखाणावर आधारित आहे. सध्या भारतात नक्षलवाद या नावाखाली जे विकले जाते तो नक्षलवाद नाही, कधीच नव्हता. तो स्युडो नक्षलवाद किंवा प्रोफेशनल टेरेरिझम आहे, गँगस्टरीझम बळावुन त्याचे दहशतवाद, क्रांतीवाद असे ग्लोरिफिकेशन झालेले आहे. नक्षलवाद ७० च्या दशकात बंगालमधेच संपला. हे समजुन घेतले नाही तर त्याच्या कुठल्याच अ‍ॅनॅलिसिसला मग ते नक्षलवादाचे ग्लोरिफिकेशन असो किंवा निषेध असो.
सर्वप्रथम एक मिथ मनातुन काढणे आवश्यक आहे. ती म्हणजे नक्षलवाद शोषितांना न्याय देतो किंवा ती शोषितांची क्रांती आहे. नक्षलवाद्यांच्या विविध गटांच्या फ्रंट ऑर्गनायझेशन्सनी हेतुपुरस्सर पसरवलेली ही भाकडकथा आहे. नक्षलवाद आदिवासी, शोषित यापैकी कुणालाच न्याय देण्यासाठी नाही. तो प्रस्थापितांनी शोषितांचे पिळवणुक करुन, त्यांना दहशतीखाली ठेऊन स्वतःच्या फायद्यासाठी चालवलेला धंदा आहे. त्यातुन अब्जावधी रुपयांची उलाढाल होते आणि त्यातील कोणताही पैसा शोषितांसाठी वापरला जात नाही. दंड व भेद या दोन मार्गांचा वापर कसुन नक्षलवादी स्थानिकांना सहकार्य करण्यास भाग पाडतात. विनिल, माझी यांच्यासारख्या अधिकार्‍यांच्या अपहरणानंतर ज्या प्रकारे स्थानिक जनता व शोषित लोक नक्षलवादाविरोधात उभे राहिले यातुन हे सिद्ध झाले आहेच. विनिल प्रकरणामुळे हे स्पष्ट झाल्याने गेल्या काही दिवसात भारतभरचे स्ट्रॅटेजी अ‍ॅनॅलिस्ट सध्या सर्वच गृहितके तपासुन पाहत आहेत. (यात मीडीयातील अत्यल्प संख्येने असलेले प्रगल्भ पत्रकार आणि थोडेफार प्रामाणिक अशासकीय कार्यकर्ते देखील आलेच. पण त्यांची संख्या अगदीच कमी आहे.)
नक्षलवादाच्या इतिहासावर एक दृष्टीकोण टाकल्यास सध्या सात, आठ राज्यात जे सुरु आहे ते नक्षलिझम नसुन प्रोफेशनल टेरेरिझम कसा आहे हे स्पष्ट होते. बंगाल, नक्षलबारी, नक्षलवादाची मुलतत्वे, चारु-कनु, ७० च्या दशकाच्या शेवटी त्यांना आलेले फ्रस्ट्रेशन वगैरे इतिहास वर इंद्रराज पवार यांनी लिहिलाच आहे. हा इतिहास सर्वज्ञात आहे, कोणत्याही पुस्तक-लेखात तो आढळतोच त्यामुळे त्यावर परत लिहित नाही.
चारु-कनु च्या बहराच्या काळात नक्षलवादाला बिहारबाहेर फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. तो मिळायला सुरुवात झाली ती चारु कनु फ्रस्ट्रेट व्हायला सुरुवात झाली तेव्हा. सर्वप्रथम हा प्रतिसाद मिळाला बिहार, ओरिसा, आंध्रप्रदेशात. बिहारमधे नक्षलवाद फोफावला तो आर्थिक, सामाजिक विषमतेचा फायदा घेऊन. नक्षलवाद ज्या काळात तेथे रुजला त्याच काळात बिहारमधे वेगवेगळ्या सेना उदयाला येत होत्या. या सेनांमधील लोक आपापसात भांडत आणि त्यातील अनेक उपेक्षित सेना नक्षलवादाच्या निमित्ताने एकत्र आल्या. बिहार व नॉर्थ ईस्टमधील नक्षलवादाला आसाम, नागालँड, मिझोराम, चिन, भुतान, नेपाळ येथील शक्तींशी संबंधित आयाम देखील होते.
ओरिसा, आंध्र प्रदेश मधील नक्षलवादाच्या फोफावण्याचे मुळ वेगळेच होते. ते होते आंध्रप्रदेशात कित्येक वर्षे सुरु असलेल्या रवि-सुरी गँगवॉर मधे. या गँग्जनी स्वतःची शक्ती वाढविण्यासाठी नक्षलवादाची कातडी पांघरली. तेथुनच पसरत हे लोण महाराष्ट्र, मध्यप्रदेशमधे पसरले.
रेड कॉरिडॉर समजल्या जाणार्‍या या संवेदनशील पट्ट्याची वाढ ही कोणत्याच एका तत्वज्ञानाने प्रेरित झालेल्या चळवळीचे बाळसे नव्हते तर ती केवळ स्थानिक पातळीवरील गुंडांची, असामाजिक क्षेत्राची सुज होती. या सुजेला नक्षलवादाचे बाळसे समजुन काही कट्टर डावे त्यात सामील झाले पण ९० च्या सुमारास त्यांचा बराचसा भ्रमनिरास झाला होता आणि त्यातील बरेचसे लोक परत लोकशाही मार्गाकडे वळले होते. परंतु त्यांची राजकीय, आर्थिक ताकद खुपच कमी पडली. दरम्यान नक्षलवाद्यांनी बळाने जमवलेल्या अमाप संपत्तीचा वापर करुन अनेक फ्रंट ऑर्गनायझेशन्स निर्माण केल्या होत्या व त्यांच्या प्रचाराला अनेक राज्यातले अनेक नवविचारवंत, कार्यकर्ते बळी पडत होतेच. परिणामी नक्षलवादाची ताकद वाढणे अपरिहार्य होतेच.
८० व ९० ची दशके नक्षलवादाच्या प्रसारासाठी अत्यंत महत्वाची ठरली. याकाळात विखुरलेल्या नक्षलवादी गटांनी आपापसात व अन्य शक्तींशी अनेक संपर्क प्रस्थापित केले व त्यायोगे स्वतःची शक्ती वाढवली. यामधे एल्.टी.टी.ई, लष्कर्-ए-तोयबा, आय एस आय इ. संपर्क महत्वाचे होते. याच काळात विविध ठिकाणचे नक्षलवादी गट एकत्र येण्याची सुरुवात झाली व २००१-२००२ मधे त्याची परिणिती दक्षिण अशियातील १२ माओईस्ट व नक्षल गट एकत्र येऊन Coordination Committee of Maoist Parties and Organisations of South Asia (CCOMPOSA) स्थापन होण्यात झाली.
लष्कर व नक्षल यांच्यातील संपर्क त्याआधीच, ८० च्या दशकातच, सुरु झाला होता. १९८५ मधे अहल्-ए-हादिसच्या नेत्यांनी एकत्र येऊन विविध अतिरेकी गटांचे एकीकरण करुन समन्वय साधण्यासाठी तंझील इशाहुल मुसलमीन स्थापन केली तेव्हा त्या बैठकीत पीपल्स वॉर ग्रुपचा अझम घोरी उपस्थित होता. या संबंधांमुळे नक्षलवाद्यांना अब्दुल करीम तुंडा, अब्दुल जलीस अन्सारी यांनी रिसर्च केलेले आयईडी असेंब्ली टेक्निक मिळाले व विविध अत्याधुनिक शस्त्रे व स्फोटके उपलब्ध झाली. यानंतर फंडिंगबाबतही अनेक मार्ग उपलब्ध झाले.
नक्षलवाद्यांसाठी अंमली पदार्थ हा फंडिंगचा सर्वात मोठा मार्ग उपलब्ध झाला तो यानंतरच्या काळात आणि त्यानंतर नक्षलवादाची वाटचाल नार्को टेरेरिझमच्या दिशेने झपाट्याने सुरु झाली. ९० च्या दशकापर्यंत अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर हे नार्को टेरेरिझमचे मॅन्युफॅक्चरिंग फील्ड होते व त्यात अफगाणिस्तानचे महत्व सर्वाधिक होते. परंतु शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर युरोप-अमेरिकेचे लक्ष अफगाणिस्तानकडे वळले आणि तो मार्ग धोक्यात आला. अश्यावेळेस नक्षलवाद्यांनी अंमली पदार्थांची शेती व निर्मिती सुरु करणे सर्वच दहशतवादी गटांना फायदेशीर होते. आज अंमली पदार्थांचे उत्पादन व निर्मिती हे नक्षलवादच नव्हे तर अन्य दहशतवादी संघटनांसाठीही मेजर फंडिंग सोर्स ठरत आहे.
हा सर्व इतिहास लक्षात घेता नक्षलवाद शोषितांचे प्रश्न हाताळतो, ती शोषितांची क्रांती आहे ही केवळ फँटसी आहे. नक्षलवादाला कोणतेही तत्वज्ञान नाही हे देखील सिद्ध होते.
दुर्गम भागात सुशासनाचा अभाव आहे, तेथील जनता शोषित पीडीत आहे. त्यांचे प्रश्न हाताळणे अत्यावश्यक आहे. याबाबत कोणतेच दुमत असण्याचे कारण नाही. परंतु हे नक्षलवाद करत नाही. फुटिरतावाद्यांना जेव्हढे तात्विक अनुष्ठान असु शकते तेव्हढेही नक्षलवादाला नाही हे सत्य देखील नजरेआड करता येत नाही. नक्षलवाद हे शोषित जनता वगळता सर्वांनाच हवेहवेसे दुखणे आहे.
अश्या परिस्थितीत विनिल आणि त्यांच्या चमुसारखे अधिकारी हेच नक्षलवादी व अन्य गटांना असलेले एकमेव आव्हान आहे. नक्षलवादी त्यांना टार्गेट करणारच हे अपेक्षित धरायलाच हवे. आणि अश्या अधिकार्‍यांना शासन यंत्रणा, राजकारणी, भ्रष्ट एनजीओज या घटकांकडुन कोणतेच सहकार्य मिळणार नाही हे देखील गृहित धरावेच लागेल. शोषित जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व आदरभाव हे त्यांचे एकमेव संरक्षक कवच असेल. या सर्व घडामोडींपासुन दुर अंतरावर सुरक्षित असलेल्या आपण आपला वैचारिक पाठिंबा अश्या लोकांना देणे हे देखील त्यामुळेच महत्वाचे आहे.

ग्रेट! अभ्यासपूर्ण आणि नेमके विश्लेषण !

नितिन थत्ते's picture

23 Feb 2011 - 2:35 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

सदर गटांचे विरोधकही त्यांना माओवादी आणि नक्षलवादी म्हणत असतात त्यामुळे सर्वांना तसे वाटत असावे.

त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे.

या सगळ्याबरोबर "पडेल तत्त्वज्ञानाच्या" मागे लोक का जातात वगैरे प्रश्न पडणे पण बंद होईल.

प्रसन्न केसकर's picture

23 Feb 2011 - 2:54 pm | प्रसन्न केसकर

या गटांना नक्षलवादी म्हणणे म्हणजे त्या प्रवृत्तींना तात्विक मुलामा देऊन ग्लोरिफाय करणे आहे. तो नक्षलवादाचाही अपमान आहे.
नक्षलवादाला जे व्यापक तात्विक अधिष्ठान होते ते या गटांना नाही. नक्षलवादी विचारसरणीत प्रादेशीक, जातीय, धार्मिक, वांशीक, लैंगिक भेदांना जागा नाही. नक्षलवादामध्ये अर्थव्यवस्था संपुर्णतः वेगळी असते. इथे ते मुलभुत फरक आहेत. शिवाय नक्षलवाद्यांकडुनच होणार्‍या शोषितांच्या शोषणाचेही मुद्दे आहेतच. नक्षलवादी जसे तेंदुपत्ता कंत्राटदारांकडुन खंडणी वसुल करतात तसेच आदिवासींकडुनही पैसे उकळतातच. त्या बदल्यात ते आदिवासींना काहीच देत नाहीत. हे शोषणच आहे.
दुसरे म्हणजे नक्षलवादाचे असे सबगोलंकार व्यापक चित्र उभे केले की त्याविरुद्धची लढाई अधिक अवघड होऊ शकते. मुळात आदिवासी, शोषितांना त्यांचे हक्क मिळवुन देण्यावर भर देण्याऐवजी, विकास करण्याऐवजी विकासाला विरोध करणार्‍या त्यांच्या शोषकांना पाठिंबा व्यक्त करण्याकडे समाजमनाचा कल होऊ शकतो.

अवांतरः नक्षलवाद व लष्कर-ए-तोयबा संबंध हा तसा बर्‍याच जणांना नवीन असु शकतो. या विषयावर यापुर्वी देखील उहापोह झालेला आहे. प्रसिद्ध पत्रकार, अ‍ॅनॅलिस्ट प्रविण स्वामी यांचा या संदर्भातला एक लेख जालावर http://www.countercurrents.org/comm-swami250803.htm येथे उपलब्ध आहे.

इन्द्र्राज पवार's picture

23 Feb 2011 - 3:19 pm | इन्द्र्राज पवार

"....नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. ..."

~ नाही. असे म्हटल्याने गोंधळ होऊ शकतो. डाकू काय दरोडेखोर काय ते अगदी राष्ट्रीय महामार्गावरदेखील आपल्या कारवाया करीत असल्याचे दिसते आणि त्यांचे उद्देश हे उघडउघड आर्थिक 'लूटमारी' हेच असतात. पण विनील यांचे अपहरण तर धडधडीत माओवाद्यांनी त्यांच्या साथीदारांच्या सुटकेसाठी केले आहे हे तर उघडच आहे....आणि त्याला ओरिसा+आंध्र सरकार यानी सुटकेचे हिरवे कंदील दाखविले असल्याने आता 'डाकूं'नी विनीलचे अपहरण केले असे म्हणण्यात काय हंशील?

श्री.केसकर यांच्या प्रदीर्घ प्रतिसादातील भूमिकेबाबत इतकेच म्हणू शकतो की, सर्वसाधारणपणे आदिवासी लढ्यातील (सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणार्‍या) सर्वच आदिवासींना 'नक्षलवादी' म्हणण्याची एक प्रथाच पडली असून ती बरोबर किंवा चूक याच्या खोलात 'आमआदमी' जात नाही.

वास्तविक भारतीय घटनेला मानणार्‍या कम्युनिस्टांच्या (कॉ.ज्योती बसूंच्या छायेखाली वाढलेल्या) कित्येक फळ्यांना माओवादीप्रणित नक्षलींचा हिंसाचार मान्य नाही. सीपीआयच्या राजकारणाला आपण जर Soft Ideology म्हणत असू तर माओवाद्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसला जात असलेला नक्षलवाद (जरी श्री.केसकरांच्या मते तो आजच्या घडीला अस्तित्वात नसला तरी....) हा Raw Ideology चे द्योतक आहे असे मानले पाहिजे.

इन्द्रा

प्रसन्न केसकर's picture

23 Feb 2011 - 3:39 pm | प्रसन्न केसकर

काही मुद्यांशी सहमत आणि काहिंशी असहमत.
नक्षलवाद या नावाने ओळखल्या जाणार्‍यांना काय म्हणावे याला बरेच पर्याय उपलब्ध असु शकतात. डाकु किंवा दरोडेखोर हे शब्द त्यांच्यासाठी नक्कीच योग्य ठरणार नाहीत. (चंबलघाटीत दरोडेखोर `बागी' होतातच की.)

सर्वसाधारणपणे आदिवासी लढ्यातील (सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणार्‍या) सर्वच आदिवासींना 'नक्षलवादी' म्हणण्याची एक प्रथाच पडली असून ती बरोबर किंवा चूक याच्या खोलात 'आमआदमी' जात नाही.

आम आदमी कसल्याच भानगडीत पडत नाही. तो बिचारा रोजच्या जगण्याच्या मारामारीतच अडकलाय. तो फारतर चार दोन पुस्तकं वर्तमानपत्रं वाचतो अन एकुणच परिस्थितीबाबत हळहळतो. हे नावं ठेवणारे, प्रथा पाडणारे लोक आम नसतात. म्हणुनच त्यांनी सत्य समोर आणलं पाहिजे.
सीपीआयच्या राजकारणाला आपण जर Soft Ideology म्हणत असू तर माओवाद्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसला जात असलेला नक्षलवाद (जरी श्री.केसकरांच्या मते तो आजच्या घडीला अस्तित्वात नसला तरी....) हा Raw Ideology चे द्योतक आहे असे मानले पाहिजे.
इथेच तर ग्यानबाची मेख आहे. माओवाद्यांचे मार्गदर्शन वगैरे काहीच नाहिये. इथे उघडा नागडा स्वार्थ आहे, आयडिऑलॉजी वगैरे काही नाही. ती होती तोवर नक्षलवादी कोणत्याच फॅनॅटिक रिलिजस किंवा रीजनल ग्रुपबरोबर नव्हते. ती आयडिऑलॉजी असलेले लोक नक्षलवादातुन बाहेर गेले आणि मग उरले ते केवळ प्रोफेशनल टेरेरिस्ट, धंदेवाईक. त्यांनी स्वार्थासाठी माओवादी ज्यांना शत्रु समजत त्यांच्याशीच हातमिळवणी केली अन त्यांच्याच तालावर नाचायला सुरुवात केली. (याच कंपल्शन्समधुन अंमली पदार्थ वगैरे भाग नक्षलवाद्यांसाठी महत्वाचा ठरत गेला.) यात कसली आलीये आयडिऑलॉजी?

विकास's picture

23 Feb 2011 - 8:13 pm | विकास

त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे.

भुरटे चोर म्हणले तर जास्त योग्य ठरेल का?

आळश्यांचा राजा's picture

25 Feb 2011 - 11:32 pm | आळश्यांचा राजा

त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे.

या सगळ्याबरोबर "पडेल तत्त्वज्ञानाच्या" मागे लोक का जातात वगैरे प्रश्न पडणे पण बंद होईल.

श्री थत्ते यांनी हे उपरोधाने म्हटले असावे असा दाट संशय आहे. खुलासा केल्यास बरे होईल. चर्चेसाठी.

(उपरोधाची नोंद घेतली जात नसेल तर मजा नाही!)

आळश्यांचा राजा's picture

23 Feb 2011 - 4:02 pm | आळश्यांचा राजा

शोषित जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व आदरभाव हे त्यांचे एकमेव संरक्षक कवच असेल. या सर्व घडामोडींपासुन दुर अंतरावर सुरक्षित असलेल्या आपण आपला वैचारिक पाठिंबा अश्या लोकांना देणे हे देखील त्यामुळेच महत्वाचे आहे.

हे नेमके आहे.

बाकी भागाबद्दल किंचित असहमती आहे. म्हणजे, नक्षलवाद नावाचे तत्त्वज्ञान नाहीच हे पटत नाही.

अजून लिहावे ही विनंती.

प्रसन्न केसकर's picture

23 Feb 2011 - 4:48 pm | प्रसन्न केसकर

या विषयावर फॅक्टस मिळवणे दुरापास्त कारण तिथे परिस्थिती रोज बदलते.
मी वीस वर्षे अभ्यास करुन मिळवलेल्या फॅक्ट्स फक्त मांडतो. ते माझे मुळ काम.
इंटरप्रिटेशन करणे सब्जेक्टिव्ह.
माझे मत ज्या फॅक्टसच्या आधारे आले त्या मी मांडल्या. त्या सिद्ध करणे सहज शक्य आहे कारण ही डॉक्युमेंटेड हिस्ट्री आहे.
ते कुणाला पटो अथवा न पटो.
शेवटी ज्याचा त्याचा अभ्यास, ज्याच्या त्याच्या फॅक्ट्स आणि ज्याचे त्याचे इंटरप्रिटेशन. प्रत्येकाला स्वतःचे मत बनविण्याचा अधिकार आहेच.
पण तत्वज्ञान नाही असे म्हणताना सपोर्टिंग फॅक्टस मी दिल्या.
तत्वज्ञान आहे असा दावा कुणाचा असेल तर त्याच्या सपोर्टिंग फॅक्ट्स त्याने द्याव्यात. माझी अजिबात हरकत नाही.
फक्त किमान इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास असावा, दहशतवाद म्हणजे नक्की काय ही किमान पुसटशी तरी कल्पना असावी ही अपेक्षा.
अर्थातच ही अपेक्षाच आहे. पुर्ण व्हावीच असा आग्रह धरताच येत नाही.
पण नक्षलबारी ते रेड कॉरिडॉर हा एका तत्वज्ञानाचा अखंड प्रवास कसा आहे हे कुणी फॅक्ट्स देऊन पटवु शकत असेल तर स्वागतच आहे.
अन्यथा मी आधीच (अगदी पहिल्या प्रतिसादात म्हणले तसे) शंका उपस्थित होणे यात कुणालाच काहीच गैर वाटु नये.

विकास's picture

23 Feb 2011 - 8:03 pm | विकास

आपल्या वरील (अनेक) प्रतिसादांमधून बरीच नवीन माहिती मिळाली आणि नवा दृष्टीकोनही कळला.

एकूण आपले म्हणणे असे दिसते की, "सध्या जे नक्षलवादाच्या नावाखाली घडत आहे त्याचा आणि नक्षलवादी तत्वज्ञान अथवा कम्युनिस्टांशी संबंध नाही." तसे जर असेल तर ज्यांना डावे विचारवंत/डाव्या विचारांशी जवळीक असलेल्या चळवळीत सहभागी आहेत असे म्हणता येईल असे अनेक दिग्गज हे नक्षलवाद्यांना पाठींबा देताना कसे दिसतात? त्यात मग अरुंधती रॉय, मेधा पाटकर, प्रफुल्ल बिडवाई, सारखे अनेक जण येतात. त्यातील एकानेही विनील-माझींच्या बाबतीत तोंड देखील उघडलेले दिसले नाही आणि त्यांच्या एकंदरीत भुमिकांमधे नक्षलवाद्यांचे समर्थनच असते. असे का असावे?

असे माझा वीस वर्षातला फील्ड एक्स्पिरियन्स सांगतो.
सर्वप्रथम अश्या गँग आणि गटांना प्रचंड मोठे फंडिंग उपलब्ध होते. त्याचे अंतर्गत सोर्सेस इंद्रराज पवार यांनी स्पष्ट केलेले आहेतच पण त्यातीलही सर्वात महत्वाचे सोर्सेस म्हणजे अंमली पदार्थ व अन्य प्रतिबंधीत गोष्टींची तस्करी (यात दरवर्षी अब्जावधींची उलाढाल होते.), ह्युमन ट्रॅफिकिंग आणि इम्मॉरल ट्रॅफिकिंग (यातही बहुसंख्य गँग्ज व गट, त्यात नक्षलवादी व एलटीटीई यांचीही गणना होऊ शकेल, प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे सामील असतात.) व कॉन्ट्रॅक्ट किलिंग.
त्याखेरीज परकीय शक्तींकडुनही अश्या गटांना मोठ्या प्रमाणात फंडिंग होते.
या फंडसचा वापर करुन अश्या गँग्ज व गट हजारो फ्रंट ऑर्गनायझेशन्स उघडतात. या फ्रंट ऑर्गनायझेशन्स बहुतेकदा प्रत्यक्षपणे अतिरेकी कायवायात किंवा गुन्ह्यांमधे सामील होत नाहीत परंतु त्यांच्यामार्फत अश्या संघटनांचा उघड अथवा छुपा प्रचार्-प्रसार केला जातो, त्यांच्याबाबत सकारात्मक जनमत तयार केले जाते, सहानुभुतीदार व समर्थक निर्माण केले जातात, मनुष्यबळाची भरती केली जाते, वेळप्रसंगी कारवाईच्या पुर्वतयारीमधे टेहेळणी करणे, लॉजिस्टिक्स पुरवणे अश्या मार्गांनी सहभागही घेतला जातो, फरारी असलेल्या गुन्हेगार व अतिरेक्यांना आश्रय दिला जातो, खटल्यांदरम्यान कायदेशीर मदत उपलब्ध करुन दिली जाते, शासन यंत्रणेविरुद्ध प्रचार केला जातो. या फ्रंट ऑर्गनायझेशन्स जसजश्या प्रस्थापित होतात तसतसे त्यांना स्वतःचे स्टेटस येते, त्यांचे स्वतःचे आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय फंडिंग सोर्सेस निर्माण होतात. या फंडसमधला काही भाग सायफन ऑफ करुन गँग व गटाकडे देखील जातो. अश्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स ओळखणे अत्यंत अवघड असल्याने त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची लाईन टो करणे अपरिहार्य होते व त्यातुन अनेकदा दहशतवादाचे समर्थन होऊ शकते.
दुसरे म्हणजे दुर्गम भागात काम करताना तेथे सुशासन उपलब्ध नसल्याने तेथील सर्व अ‍ॅक्सेस अश्या गटांच्या ताब्यात असु शकतो व त्यामुळे त्यांच्या कारवायांबाबत मौन पाळणे आवश्यक बनते. जर ते केले नाही तर त्या भागात काम करणे शक्य होत नाही.
तिसरे कारण म्हणजे बहुतेक सर्व प्रतिष्टित नेते, कार्यकर्ते व बहुतेकदा पत्रकार देखील या गट व गँग्ज, त्यांची कार्यक्षेत्रे व त्यांचे टार्गेट ऑडियन्स यापासुन दुर असतात. त्यांचा ग्रास रुटला संपर्क येतो तो मध्यस्थांमार्फतच. त्यामुळे फील्ड वर्क करताना देखील वस्तुस्थिती लपवुन ठेवुन देखावा उभा करणे शक्य होते व वरवर पाहणार्‍याला तो देखावाच खरा वाटु शकतो.
चौथे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अश्या गँग्ज व गट स्वतःची प्रतिमा जुलुमी शासन यंत्रणेचे विरोधक, शोषितांचे कैवारी, महान ध्येयवादी, तत्वनिष्ठ अश्या प्रकारे निर्माण करत असल्याने त्यांना समर्थन देणे हे फॅशनेबल व प्रतिष्ठेचे ठरते. कोणत्याही प्रस्थापित यंत्रणेत कोणी ना कोणी शोषित, पीडीत असतेच. अश्या गटांची बाजु घेणे म्हणजे शोषितांचा कैवार घेणे असे सर्वच पातळ्यांवर समजले जाते. असे करण्याने एका बाजुला प्रतिष्ठा मिळते आणि त्याचवेळी स्वतःला फंडिंग मिळवणे सुकर जाते. हा मोठाच दबाव असतो.

नितिन थत्ते's picture

24 Feb 2011 - 3:04 pm | नितिन थत्ते

>>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अश्या गँग्ज व गट स्वतःची प्रतिमा जुलुमी शासन यंत्रणेचे विरोधक, शोषितांचे कैवारी, महान ध्येयवादी, तत्वनिष्ठ अश्या प्रकारे निर्माण करत असल्याने त्यांना समर्थन देणे हे फॅशनेबल व प्रतिष्ठेचे ठरते.

येथेच मला प्रश्न पडतो आहे. त्या गटांची प्रतिमा तशी आहे म्हणून मेधा पाटकर वगैरे समर्थन देतात की उलट आहे?

प्रसन्न केसकर's picture

24 Feb 2011 - 3:14 pm | प्रसन्न केसकर

दुर्गम भागात काम करताना येणार्‍या अनेक कंपल्शन्सपैकी एक असावे ते असे मला वाटते.
मेधा पाटकर फॅशनेबल म्हणुन काही करण्याएव्हढ्या उथळ मला वाटत नाहीत.

चिंतामणी's picture

24 Feb 2011 - 3:15 pm | चिंतामणी

प्रसन्न केसकर, हे पोस्टस वाचल्यावर मला असे वाटते की "नक्षलवादाचा उहापोह" अश्या किंवा तत्सम नावाखाली ही माहिती एकत्रीत पोस्ट कर. आत्ता एक पोस्ट, त्याच्यावर मग ब-याच प्रतिक्रीया, मग एक पोस्ट असे स्वरूप आले आहे. ते सलग आल्यास वाचण्या-या जास्त बरे वाटेल असे वाटते.

श्रावण मोडक's picture

24 Feb 2011 - 3:34 pm | श्रावण मोडक

+१. लवकर कर एकत्र. एक नवा लेख होईल.

आळश्यांचा राजा's picture

25 Feb 2011 - 11:35 pm | आळश्यांचा राजा

आपल्या अनुभवाविषयी आणि व्यासंगाविषयी आदर आहे.

पण आपण "फॅक्ट्स मांडतो फक्त" असे म्हणत इंटरप्रिटेशन मांडत आहात.

आपल्या इंटरप्रिटेशनवर विचार करतो आहे.

चिंतामणी's picture

23 Feb 2011 - 9:41 pm | चिंतामणी

इंद्राच्या "फंडीग"बद्दलच्या पोस्ट नंतर अजून एक छान पोस्ट आहे हा.

सर्वप्रथम एक मिथ मनातुन काढणे आवश्यक आहे. ती म्हणजे नक्षलवाद शोषितांना न्याय देतो किंवा ती शोषितांची क्रांती आहे. नक्षलवाद्यांच्या विविध गटांच्या फ्रंट ऑर्गनायझेशन्सनी हेतुपुरस्सर पसरवलेली ही भाकडकथा आहे. नक्षलवाद आदिवासी, शोषित यापैकी कुणालाच न्याय देण्यासाठी नाही. तो प्रस्थापितांनी शोषितांचे पिळवणुक करुन, त्यांना दहशतीखाली ठेऊन स्वतःच्या फायद्यासाठी चालवलेला धंदा आहे.

मी सुध्दा हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न केला होता.

http://www.misalpav.com/node/16012#comment-271561 पण तुझ्या इतका प्रभावीपणे मांडु शकलो नसणार म्हणून त्याची दखल घेतली गेली नसणार.

बाकी "तथाकथी नक्षलवाद्यांची दहशवाद्यांबरोबरची युती" हा महत्वाचा मुद्दा तु मांडलास त्याबद्दल आभार. हा मुद्दा महत्वाचा असून देखील सगळ्यांच्या लिखाणातून सुटला होता.

आता याबद्दलसुध्दा चर्चेत भाग घेणा-या सर्व सभासदांची प्रतिक्रीया वाचायला आवडेल.

सुहास..'s picture

23 Feb 2011 - 1:49 pm | सुहास..

हेयर कम्स द ट्रुथ !!

बराच वेळ चर्चा वाचुन लोक्स जुने संदर्भ का देत आहेत तेच कळत नव्हत !!

धन्स..

धमाल मुलगा's picture

23 Feb 2011 - 4:48 pm | धमाल मुलगा

एकुणच चर्चा (हीच नव्हे, विनील अपहरण संदर्भातील इतरही धागे) वाचत आहे.
नक्षलवाद (खरा/खोटा), माओवाद, रेड कॉरिडोर ह्यासंदर्भातील अत्यल्प आणि बहुतांश ऐकिव माहिती ह्यामुळं चर्चेत भाग घेण्याची लायकी नसल्याने शांतच बसुन होतो.
आज वर्तमानपत्रातील 'विनील कृष्णा आणि पवित्र मांझी ह्यांची येत्या ४८ तासात सुटका' ही बातमी वाचून मात्र हायसं वाटलं.
आजही 'अपवादांनीच नियम सिध्द होतात' असं ठळकपणे जाणवून देणारे विनील कृष्णा ह्यांच्यासारखे सरकारी अधिकारी आहेत आणि ते खरोखरच मनापासून कामे करण्यासाठी झगडत आहेत ह्याचीही सखोल माहिती ह्या विषयीच्या धाग्यांमुळे कळत गेली. आ.रा., मोडक, आणि माहितगार मंडळींचा अत्यंत आभारी आहे. (मला ठाऊक आहे, सरकारी अधिकार्‍यांबद्दल माझे हे विधान पुर्वग्रहदुषित म्हणा किंवा झोंबणारे म्हणा वाटू शकते. पण माझा नाईलाज आहे. आणि हा ग्रह जरुर बदलला जावा अशी मनोमन प्रार्थना आहेच.)

IAS अधिकारी श्री. सचिन जाधव ह्यांच्या पत्रातील

पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला?

ह्या अनुशंगाने मलाही प्रश्न पडलाच की आता अशा सुटका झालेल्या गुन्हेगारांबद्दल सरकार काय करणार?
कंदहार अपहरणाच्या बदल्यात सुटलेल्या अजहर मसूद आणि कंपनीने अधिक प्रबळ होऊन देशाला आणखी त्रास दिला. तसं न होण्याची खबरदारी कायदा आणि सुव्यवस्था हयंची जबाबदारी असलेल्यांकडून कशी घेतली जाणार? असे सर्वसामान्य पातळीवरच्या 'layman'ला पडणारे प्रश्न मलाही पडलेच.

अर्थात, विनील ह्यांचे कार्य, त्यांना आदिवासींकडून मिळणारे प्रेम व पाठिंबा ह्याबद्दल दुमत नाहीच..आदरच आहे.

सुटका झाल्यावर श्री. विनील ह्यांनी ह्या अनुभवांचा वापर करुन अधिकाधिक अधिकार्‍यांना आपल्या मार्गावर चालत हे कार्य सर्वदूर पसरण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करुन हा त्यांचा एकाकी लढा प्रबळ करावा अशी सदिच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2011 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान चर्चा.

'अक्षर' च्या दिवाळी अंकात विशेष लेखमाला आहे. ''नक्षलवादी : देशद्रोही की गरिबांचे कैवारी'' मेधा पाटकर, जयंत उमराणीकर अरुंधती रॉय, प्रकाश बाळ, एकनाथ साळवे, मीना मेनन, बंधुराज लोणे यांनी वरील विषयासंबधी आपापल्या भुमिका मांडल्या आहेत. जरासा वेळ मिळाला की काही मुद्दे इथे डकवेन म्हणतो. जसे-

नक्षलवाद म्हणजे काय ? त्याची व्याख्या करण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. ७० च्या दशकात नक्षल चळवळ सुरु झाली, चारु मुझुमदारांनी सुरु केली तेव्हा त्याला आदर्शवादाचा पाया होता.
त्यांना गरिबांसाठी आंदोलन करायचं होतं, क्रांतीकरायची होती. अनेक हुशार मुलं क्रांतिकारी विचारसणीने प्रेरित होऊन त्यात सामील झाली होती. पण हळूहळू ही चळवळ तशी राहिली नाही. तिचा वैचारिक पाया ठिसूळ झाला आणि तेही वेगळ्या प्रकारचं असेल पण शोषणच करु लागले मुख्य म्हणजे ही मंडळी बुद्धिभेद करण्यात अतिशय हुशार आहेत. आपली चळवळ ही गरिबांसाठीच आहे, अदिवासींची आहे असं ते भासवतात. या चळवळीला ते क्रांती म्हणतात हे थोतांड आहे, नक्षलवादी हे माझ्या दृष्टीने निव्वळ ठग आहेत. [माओवादी सर्वात मोठे शोषक : जयंत उमराणीकर, निवृत्त पोलीस महासंचालक(विशेष अभियान) ]

आणि पुढे माओवाद्यांनी अदिवासी लोकांचा विकास केला आहे काय ? असे प्रश्न विचारतात. शाळा सुरु केल्यात का. रस्ते बांधलेत का. रस्ता केला की तो पोलिसांसाठी आहे असा अप्रप्रचार करायचा..! माओवाद्यांनी कोणते विकासाचे मॉडेल अदिवासींना दिलं आहे. अदिवासींना मूळ प्रवाहात यायची इच्छाच नाही हे नक्षलवाद्यांनी बळजबरीच लादलं आहे. पोलीस भरती असेल आणि जागा शंभर असतील तर दहा हजार मूले तिथे भरतीसाठी येतात. मुलं भरतीसाठी का येतात तर त्यांना त्यातून बाहेर पडायचं आहे. सरकारी नोकरी करु इच्छिना-या तरुणांना माओवादी धमकवतात. तेव्हा ही कोणती विचारसरणी असते वगैरे आशय या अधिका-याच्या लेखनातून उतरतो.

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

23 Feb 2011 - 10:05 pm | धमाल मुलगा

ह्यासंदर्भात श्री. जयंत उमराणीकरांचं एक वाक्य आहे, "अशी कोणती क्रांती असते की जी ४० वर्षं चालू आहे?" (शब्द जसेच्या तसे नसतील, चु.भू.दे.घे.) ह्यातच बरंच काही यावं.

चिंतामणी's picture

24 Feb 2011 - 1:27 am | चिंतामणी

;)

चित्रा's picture

24 Feb 2011 - 7:10 am | चित्रा

वरील विषयासंबधी आपापल्या भुमिका मांडल्या आहेत. जरासा वेळ मिळाला की काही मुद्दे इथे डकवेन म्हणतो.

जरूर करा. हा अंक वाचला होता, मेनन यांचे रूपांतर रोचक होते. उमराणीकर यांचाही लेख दुसरी बाजू सांगणारा होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2011 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''मला आणखी एका मुद्याचं स्पष्टीकरण इथं द्यायचं आहे. नक्षलवादाच्या सशस्त्र लढ्याचं समर्थन आम्ही करतोय, जे जो आरोप केले जातायत ते खोटे आहेत. फार मोठं लक्षं या नक्षलवादी लढ्यावर सध्या केंद्रित झालं आहे. ही सशस्त्र संघर्षाची सफलता म्हणता येणार नाही, पण एवढंच लढ्याने साधलंय निश्चित. यामधे अदिवासींचं शोषण, सांस्कृतिक आघात, विस्थापन,जागतिक व राष्ट्रीय कंपन्यांची तूट, विषमता हे मुद्दे काहीशा अस्पष्टपणे पुढे आले आहेत'' [हिंसा हा मार्ग नाही : मेधा पाटकर]

नक्षलवादाच्या संदर्भात मेधा पाटकरांच्या लेखातून जाणवते की नक्षलवाद्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. मागण्या मान्य होत नाही म्हणून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा त्यांना तो एक मार्ग आहे असे त्यांना वाटते. असे जरी त्या म्हणत असल्या तरी त्या कुठेतरी नक्षलींच्या समस्यांचे समर्थन करतांना दिसतात. ते समर्थन पाहा-
''कुठेतरी घरातलं पोर जर बंडखोर झालं तर त्याला नुसतं उत्तर देता येत नाही, त्याचा मागचा पुढचा विचार करावा लागतोच. त्या भूमिकेतून नक्षलवादाचं विश्लेषण करावं लागतंय. आणि ते जर करायला गेलो तर लगेच आम्ही नक्षवाद्यांच्या सगळ्याच गोष्टींचे समर्थन करतो असंही म्हटल्या जातं म्हणजे हाही पुन्हा या संघर्षाचा परिपाक आहे''

मेधा पाटकर लेखातून काहीप्रश्न विचारतात जसे की, या माओवाद्यांना सत्ता काबीज करायची आहे का ? सत्तेत आल्यावर राज्य चालवणार काय ? असे काहीही नक्षलींना करायचे नसावे. कारण नक्षलींच्या अत्याचाराच्या कहाण्याही पुढे येताहेत. सत्तेत आले तर व्यवस्था बदलवणार आहेत काय ? असे अनेक प्रश्न त्या विचारतात. उदा. म्हणून माओवादी सत्तेत आल्यावर कसे जागतिकीकरणवादी झाले असे दाखलेही देतात. त्यामुळे नक्षलींच्या संघर्षाचे पुढे काय ? तर त्याला काही दिशा नाही. या सर्व गोष्टींना एकच उपाय तो म्हणजे 'संवाद'. दोन्हीही बाजूने संवाद झाला पाहिजे. अदिवासींचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटले पाहिजे..इत्यादि..इत्यादि.

बाकी, मीना मेनन [माजी नक्षलवादी] ती काय लिहिते ते मात्र लवकरच डकवतो.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

24 Feb 2011 - 2:37 am | विकास

कालचा दिवस विनीलच्या हितचिंतकांसाठी मृगजळासारखाच ठरला... तरी देखील माझींची सुटका झाली ही त्यातला त्यात आशादायी बातमी.

आता माओवाद्यांनी सुटका केलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्या भागात जनतेसमोर द्यावे वगैरे मागण्या असलेले तेलगू भाषेतील पत्र माझींबरोबर पाठवले आहे.


Junior engineer Pabitra Mohan Majhi (sporting a red helmet) being taken to the Malkangiri district headquarters after he was released by Maoists at Chitrakonda on Wednesday. (PTI)