" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती"
उठवायचस ना.
"रात्री एक वा़जता"?
काय म्हणत होती?
"नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"?
माहीत नाही ब्वॉ?
"तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे"
वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल.
-----------------------------------------------------------------------------------------
"उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ."
हॅलो.
"प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन . जरा काम होते तुमच्या कडे."
माझा नंबर कुणी दिला हो तुम्हाला.
"तुमच्या इथल्या एका मित्राने"
बोला काय काम काढलेत. लवकर सांगा. उगाच जिलेब्या पाडू नका. इथे रात्रीचा एक वा़जला आहे.
"मला लग्न करायचे आहे"
बर मग? त्याचा माझ्याशी काय संबंध. माझे लग्न होउन २५ वर्षे झालीत. आता ह्या वयात आणखी एक करायची काही एक इच्छा नाहीये.
"अहो मला एका होतकरु भारतीय मुलाशी लग्न करायचे आहे. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सुचवा"
सर्व जग सोडुन भारतीय?
"अहो तुम्ही मायलेज ऑब्सेस्ड नेशन आहात ना म्हणुन."
बर बर. काय अपेक्षा.?
" स्मार्ट असायला हवा. शिकला सवरलेला. वर्जीन. देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर"
वयाची अट?
"वरील सर्व गुण असतील तर अधीक उणे चालतय. पण तुमची ओळख महत्वाची."
ते कशाला बॉ?
"ते लग्न झाल्यावर सांगेन. आत त्याची चर्चा नको."
तुम्हाला प्री न्युप इ मेल करते. माझा फोटो पाठवायची गऱज आहे असे वाटत नाही. टाइम्स मधे परवा आला आहेच. अॅगल जर बोल्ड आहे. पण चालुन जाईल. हवे असले तर पत्रिका पण पाठवते. तुमच्या साईट वर जे महाराज आहेत त्यांच्याकडुन जुळवुन घ्या."
अजुन काही?
"ज्यांच्याशी माझी पत्रिका जुळेल त्याचा फोटो व प्री न्युप पाठवा.
___________________________________________________
मी जुळणारी पत्रिका करुन घेतो. जास्तीत जास्त काय महाराज 'विशिष्ट सेवा' म्हणुन जादा आकार घेतील. चालेल. नानासाठी मला दोन पाचशे काही मोठे नाहीत.
----------------------------------------------------------------------------------------
लग्न आमच्या बिल्डींग च्या गच्चीवर.
शाकाहारी जेवण - सौ. मास्तर
मांसाहारी जेवण-गणपा
सनई वादन्-छोटा डॉन
मद्यपान सेवा-पिंडा काका
उठबस्-टारझन
आलेल्या पाहुण्याबरोबर विचारांचे आदान प्रदान- रामदास
पत्रिका छपाई-श्रामो
मंगलाष्टके-शरदीनी आणि रेवती ताई
बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.
सर्वात महत्वाचे नानाला प्री न्युप काय असायला पाहीजे त्या बाबत संपुर्ण सल्ला द्या.
प्रतिक्रिया
3 Feb 2011 - 1:30 pm | श्रावण मोडक
आयला! मास्तर, हसून हसून लोळतोय... :)
पत्रिका छापून मिळतील. मजकूर कळवा लगेच. ;)
3 Feb 2011 - 1:29 pm | सुहास..
_/\_
अगगगग !!
मास्तर , याला म्हणतात पिठ्ठा पाडणे .
अवांतर : मास्तर अलीकडे अंमळ येन्जॉय करायला शिकले आहेत वाट्ट !!
3 Feb 2011 - 1:37 pm | भडकमकर मास्तर
लै बेष्ट...
प्यारीसला वर्जिन नवरा हवा ही मागणी अंमळ रोचक वाटली...
3 Feb 2011 - 1:40 pm | श्रावण मोडक
स्थळ पाहून अटी ठरल्या आहेत असं दिसतंय, मास्तर*. ;)
काय नाना, बरोबर आहे ना?
हे मास्तर क्रमांक दोन. म्हणजे भडकमकर मास्तर. पहिले मास्तर प्रभूमास्तर.
3 Feb 2011 - 1:44 pm | Nile
तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी शिकवायचा आनंद घ्यायचा असेल हो, तसंही याशिवाय अजुन तिला काही येत असेल की नाही कुणास ठावुक. ;-) (ह्या मास्तर लोकांना काही कळेल तर शपथ!)
3 Feb 2011 - 2:00 pm | नरेशकुमार
मी गिल्वर घेउन तय्यार आहे,
दिदि तेरा देवर दिवाना, हाय राम कुडियोंको ** **.
बघुनच पळुन जातील कि हो सगळे.
3 Feb 2011 - 1:44 pm | गणपा
मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या उत्सुकतेने लागलीच उघडला....
द्येवा एकदम पोपट केलात. =))
(नानाची परवानगी घेतली असाल अशी आशा करतो ;))
असा निखळ धागा हवा दंगा करायला. =))
3 Feb 2011 - 1:47 pm | Nile
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) म्हंजे नक्की काय हो? ;-)
बाकी नानाशेटना प्रिन्युप म्हणुन काही (श्रेय असलेली) चित्रं दाखवुन 'संसाराचे चार धडे' शिकवा मास्तर तुम्हीच. ;-)
3 Feb 2011 - 3:12 pm | नंदन
--- ऑबॉबॉबॉबॉ, पडोसन पिच्चरमधला शेवटचा शीन आठवला (मेहमूद डोळ्यात पाणी आणून सनई वाजवत असतो तो) =))
3 Feb 2011 - 3:30 pm | रमताराम
नंदन, ही निव्वळ आठवण आहे की 'सुचवण' देखील?
3 Feb 2011 - 4:10 pm | गणपा
हे कात तुम्हा दोघा कोटी बहाद्दरांना दाद द्यायला आलो तोवर दोन्ही कोट्या उडाल्या?
असो.. आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच ;)
3 Feb 2011 - 4:54 pm | सुहास..
आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच >>>
हम्म !! माझा ही प्रतिसाद उडविलेला दिसतो आहे...असो ..ज्याने कोणी उडविली त्याचे देव भले करो..
आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ?
अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?
3 Feb 2011 - 5:12 pm | अवलिया
अलिकडे मी हे सगळं येंजॉय करायला शिकलो आहे,
3 Feb 2011 - 1:50 pm | विनायक प्रभू
एक महत्वाचे राहीले.
हनिमुम प्रेसिडेंशियल सुट मधे असेल.
घरभरणी च्या आधीचे स्मुप्देशन नान्स ला कोण करणार?
3 Feb 2011 - 1:56 pm | Nile
ओ मास्तर,
ती हिल्टनकाकु शेवटी पाश्चिमात्य, आमच्या नान्यालादररोज साधं-वरण भात अन शिकरण कोण करुन घालेल? तीला कुकिंग कोण शिकवणार?? (विंक्षिप्त बाईंना नेमा, या कामावर. ;-) )
3 Feb 2011 - 8:12 pm | आजानुकर्ण
गृहप्रवेशाबरोबरच वास्तुशांतीचेही समुपदेशन केल्यास उत्तम.
3 Feb 2011 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार
चुचु करवली का?
3 Feb 2011 - 1:58 pm | गणपा
हल्कत बाव्लत आच्रतं =))
3 Feb 2011 - 2:06 pm | नरेशकुमार
कान पिळायला कोन येनार हाय ?
3 Feb 2011 - 4:04 pm | विनायक प्रभू
आरे बाबा,
सर्वार्थाने नाना पिळला जाणार आहेच.
कान तरी बा़की ठेवा.
3 Feb 2011 - 2:13 pm | मुलूखावेगळी
म्हनजे बसनार्याना उठवुन उभे आहेत त्याना बसवनारे
ते तर पार झोपव्तील वर्हाडाला
हा नरेशकुमार- संसारोपयोगी, पत्नीनिष्ठ, १ निष्ठ,घनिष्ट अशा टिप्स द्याय्ला.
आनि शिन्दे - वरमाय
3 Feb 2011 - 2:13 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
चुचु सुपारी देते आता मास्तराची!
3 Feb 2011 - 2:49 pm | प्रीत-मोहर
अग्दी !!!!!
त्रिच नान्स चुच्स ला भाव देत नाय असे कुठे तरि ऐक्ले होते
3 Feb 2011 - 2:26 pm | प्यारे१
आग्गागागागागा...
मुलीचे मामा(आवाज कमी), मुलीचे मामा (आवाज मध्यम) मुलीला (असेल तशी) घेऊन या.
मुहूर्ताची वेळ टळून गेली असली तरी लग्न लागणारच.
नवरा मुलगा आला का...??? घोड्याचं- अहो नवर्याचं नाही- खर्या घोड्यांचं काय????
आटपा, आटपा लवकर.
टारु, त्याला नाही त्याला नाही, पलिकडचा. दोनच दे. चुचुला बघतोय बघ.
निळ्या, अक्षता... अरे मुलगी नाही. तांदूळ मेल्या....
4 Feb 2011 - 2:29 pm | वपाडाव
अव्वल लिवलाय बगा..
ह.ह.पु.वा. झाली आमची...
परसंग जसाच्या तेसा उम्टीला...
3 Feb 2011 - 2:43 pm | टारझन
काय मास्तर ? आज दुपारी ? :)
हे उठबस मधे काय करायचं असतं बुवा ? हो , कोनी पंगा केला तर आडवा करायचे काम असेल तर आणंदाणे करु :)
बाकी प्यारिस हिल्टण ? जगदंब .. जगदंब .. ह्यांनी म्हणे एका वॅलेंटाईन डे ला बेकहॅम काका बाहेरदेशी दौर्यावर असताना स्वत:ला विवस्त्र एका गिफ्ट पॅक मधे बंद करुन घेतलं होतं , आणि ते गिफ्ट पॅक बेकहॅम ला पोच केलं होतं !
आता हे असं वळवलेलं गिफ्ट णाणांणा चालेल काय ? ह्या वर त्यांचे विचार जाणुन घेण्यास उस्तुक .. बाकी पॅरिसकाकुंचं अॅव्हरेज काय आहे ? :)
-(एलिशा कथबर्ट प्रेमी) टारझन उठाबशे
3 Feb 2011 - 5:34 pm | llपुण्याचे पेशवेll
नान्या उष्टं खातो का?
4 Feb 2011 - 12:44 pm | विकाल
न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट चालतय न्हव...?
नाय कवा कवा पाकीट फोडुन वाचत्यात...न मन्ग प्राबलेम म्नताना ईचारल ओ?
3 Feb 2011 - 2:43 pm | मी ऋचा
वा व्वा अगदी लग्नघर करून टाकलत की हो मिपाचं..मज्जाच मज्जा...
हाहाहाहा हाहाहाहा ( हे राजश्री प्रोडक्शन्स च्या पिच्चर मधील लग्नात नवरीच्या भोंगड्या मैत्रिणी हसतात त्या चालीवर वाचावे ;) )
3 Feb 2011 - 2:47 pm | अवलिया
ड्या नीट टंकल्याबद्दल आभार.
3 Feb 2011 - 2:45 pm | अवलिया
अगगागागागागागा
____/\_____
मास्तरने पार बाजार उठवला
मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
@गणपा - मास्तरला असे विचारतात? ऑ ! चावट !
* गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध
3 Feb 2011 - 3:03 pm | रमताराम
* गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध
सहमत.
मग नाना 'घरजमाई' होणार का? तसे झाले तर मग 'हिरवा माज' क्याटेगरीत जाणार तर. सगळी समीकरणेच बदलतील की हो.
अरे हो अभिनंदन करायचे राहिलेच. जोरदार हाबिणंदण!
4 Feb 2011 - 3:09 pm | वपाडाव
मास्तरने पार बाजार उठवला
मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो
*गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध
एक ७-८ वर्ष तरी मागे गेलो राव मी..
गोबोगामा ::
तर टोपिक एवढा भन्नाट सुरु आहे...
त्यात पुन्हा असल्या phrases... जाम मजा आलीये आज तर...
------------
बाकी चालू द्या...
------------
3 Feb 2011 - 2:57 pm | llपुण्याचे पेशवेll
पण नान्याचे वय लग्नाचे आहे?
3 Feb 2011 - 5:24 pm | वारकरि रशियात
+१
कालच थत्ते काका म्हणत होते, "नानांना अजून थांबायला लागणार. वय १६ च वर्षांचं राहणार आहे."
3 Feb 2011 - 2:57 pm | पर्नल नेने मराठे
माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले तर ह्यानी नानाच लग्नच लावुन टाकले..
आणी मी करवली...कुठे फेडाल हि पापे ?
4 Feb 2011 - 6:12 am | शुचि
चुच्स अजून लग्न लागायचय. खूप कामं आहेत बाई.
मुंडवळ्या, लज्जाहोमाच्या लाह्या, अष्टगंध, नारळ, कलश, तांदूळ, सुपारी, विड्याची पाने, हळद, कुंकू, खण वगैरे सामुग्रीची व्यवस्था मी करेन.
किती लोक केव्हापासून पुण्यात बोलवलेत? नाही फराळाचं करवून घ्यायला लागेल. पाहुण्यांची झोपायची व्यवस्था गच्चीवर करू. गुलाबी गारव्यात.
________________________________________
मुलगा कसा राजबिंडा आहे..... मुलगी अगदीच सो सो आहे त्यामानाने ........आता एकमेकांना पसंत पडलेच आहेत म्हणून काही बोलत नाही पण अगदी खरं सांगायचं तर आमच्या नानांना नाही हो शोभत ही पॅरीस .
3 Feb 2011 - 2:59 pm | यकु
3 Feb 2011 - 3:11 pm | वारकरि रशियात
बाकी नाना म्हणतात तसा खरंच बाजार उठवलाय !
अवांतरः येश्वंत्राव, इतका उत्साह बरा न्हवं ! फटुंचा श्रेयाव्हेर कसं इसरता ? (लग्नाचा आहेर न्हवं)
3 Feb 2011 - 3:20 pm | यकु
म्हणजे? फोटू आत्तापासूनच नानांना विचारून टाकावा असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
बाकी इतर काही असेल तर चि. सौ.का.पॅरिस हिल्टन आणि चि. बॅटमॅन च्या कायदेशीर प्रतिनिधीला पाठवा; की तुम्हीच आहात?
3 Feb 2011 - 4:06 pm | वारकरि रशियात
न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल, आंजा, वेबसाईट चा पत्या) मिळाले वगैरे ल्हीलं नाय तर त्यांना 'पंछी बनु उडते फिरु' आसं गानं म्हनावं लागल ना म्हनुन सुचवलं.
बाकी आमी विजुभाऊंबरोबर (त्यांच्या संमतीने) आहेर जमा करायला ष्टेजवर असु की.
3 Feb 2011 - 5:13 pm | अवलिया
सहमत आहे.श्रेय नोंद आवश्यक आहे असे सध्याचे आमचे मत आहे.
3 Feb 2011 - 4:13 pm | टारझन
पॅरिस् बाई अजुन ही चि सौ का आहेत ? =)) =))
3 Feb 2011 - 7:55 pm | रामदास
त्या अखंड चिसौकां असाव्यात.
3 Feb 2011 - 8:06 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
_/\_
4 Feb 2011 - 8:11 am | llपुण्याचे पेशवेll
किंचितसा असहमत. त्या कदाचित अखंड सौभाग्यवती असाव्यात. ;)
(गोंएकर) पेशवे.
3 Feb 2011 - 3:23 pm | पाषाणभेद
नेहमीचे क्रिप्टीक नाही त्यामुळे मजा नाही आली.
3 Feb 2011 - 3:48 pm | विजुभाऊ
मास्तर स्टेजवर आलेले "आहेर " घेण्याचे काम मी करेन.
धम्या माझ्या सोबतच राहील. तेवढीच कंपनी होईल
3 Feb 2011 - 4:09 pm | मृत्युन्जय
ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण करणार आहे ते पण सांगा की. आणि शूटिंग मध्ये कशाकशाचा अंतर्भाव असेल ते पण सांगा. काय आहे की वधूच्या आवडीनिवडी लक्षात घेउन प्रश्न विचारला. गरज पडल्यास मी शूटिंग करायला तयार आहे.
आणि हो, वॉर्डरोब डिझायनिंगचे काम कोणाकडे आहे ते पण सांगा.
3 Feb 2011 - 4:29 pm | कुंदन
व्हिडीयो शूटिंग सर्वसाक्षी , जयपाल करतील , दोघेही ठाण्यातच राहतात.
मिडिया पार्टनर : सहज राव अन मदन बाण ( जालावर प्रदर्शित करायची जबाबदारी यांची)
3 Feb 2011 - 7:00 pm | पर्नल नेने मराठे
आम्हाला पण 'डिझायनर्स सारीज' हव्यात !!!
3 Feb 2011 - 9:32 pm | मुलूखावेगळी
तुझे सोड
पन नाना आनि ती हिल्ट्न बाइ हे वरवधु ,उत्सवमुर्ती काय कपडे घालनारेत?
कोनता डीझायनर अपॉइन्ट्ट केलाय?
बाकि पिन्क फेफुरवारीत लग्न करनारेत फारच रोमॅन्टिक मुहुर्त ;)
3 Feb 2011 - 9:39 pm | टारझन
चित्रप्टात पाहिल्याप्रमाणे जर पॅरिस हिल्टण ने हनिमुनच्या रात्री आपल्या सहितले गाणे गायले तर ? हे इमॅजिन केले , आणि ठसका लागला :)
- फिल्मी
3 Feb 2011 - 9:41 pm | नितिन थत्ते
=))
4 Feb 2011 - 9:58 am | मुलूखावेगळी
तुमचे आपले काहीपन हा
ती हे गाणं म्हन्नारच नाही मुळी
ती नाना वाले गाने म्हनेल
उदा-
नाना ना रे नाना ना रे,
नाना करते प्यार है मै कर गयी
नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे , वगेरे
4 Feb 2011 - 10:19 am | टारझन
तुला बरं एवढं कणफर्म माहित ती काय म्हणेल काय नाय ते :)
ठिकाय , नाना दुध पिता पिता हे गाणे म्हणेल ...
भावार्थ तोच !
4 Feb 2011 - 10:22 am | मुलूखावेगळी
तुला बरं एवढं कणफर्म माहित कि नाना दुधच पितो :)
4 Feb 2011 - 10:33 am | टारझन
हो माहित्ये !! नानाशी रोज खर्डाखर्डी होते ... तुमची न प्यारीस काकुंची होते का हो अशी खर्डाखर्डी मावशी ?
4 Feb 2011 - 11:05 am | मुलूखावेगळी
नाही खर्डाखर्डी नाही पन त्या गबोल वर भेटतात
अजुन नाहीत त्या मिपावर
नानानी मांग भरलयाशिवाय आनि दोरलं बान्धल्याशिवाय त्या मिपावर येनार नाहीत असे म्हनत होत्या
4 Feb 2011 - 11:46 am | प्यारे१
प्यारीस नाना समोर नववारीत उभी राहून हातात कुंकवाचा करंडा घेऊन
'माँग भरो सजना'
हे गाणं म्हणतेय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले
...आणि डोळे पाणावले.
4 Feb 2011 - 2:52 pm | वपाडाव
मला थोडा वेगळे आठवलाय...
प्यारीस अन नाना दोघेही हुबे राह्यलेत...
(ममता कुल्कार्ण्याची हो... अन अक्षय कुमार सारखे ,सब्से बडा खिलाडी चित्रपटात)
नाहीत का ते एका गाण्यात...
जवा ती म्हणते "भरो, मांग मेरी भरो..."
3 Feb 2011 - 5:38 pm | पर्नल नेने मराठे
मी व माधुरी फुले व पेढे वाटु..तेवढेच मिरवायचा चान्स ;)
3 Feb 2011 - 6:51 pm | रेवती
मंगलाष्टकात मला भडकमकर मास्तरांची मदत?
3 Feb 2011 - 7:03 pm | पर्नल नेने मराठे
आणी नविन वहिनिला नाव घ्यायला पण शिकवा ;)
3 Feb 2011 - 7:16 pm | नरेशकुमार
मंगलाष्टके इथे ऐका !
3 Feb 2011 - 7:02 pm | पिंगू
हाहाहाहा... हसुन हसुन लोळतोय... नान्याचं लग्न... म्हणजे नान्याची वरात लंडनच्या घरात...
- पिंगू
3 Feb 2011 - 7:08 pm | पर्नल नेने मराठे
आइया आम्हाला पण विमानाने ळ्ण्द्णला जाता येइल त्या निमित्ताने... काय मज्जा ना!!!
हिर्व्या नोटंचा माज म्हणुन हिणवणार्या नानाने शेवटी फॉरेनची बायकोच केली अशी आंतरजालावर चर्च्चा सुरु आहे
3 Feb 2011 - 8:15 pm | असुर
लंटनाला सर्व वर्हाडी मंडळींची सोय पुष्कावतीदेवींच्या गावातील जंगलात संपूर्ण नैसर्गिक वातावरणात केली जाईल. कृपया खालील अटी वाचून मगच येण्याचा विचार करावा.
१. येताना आपापली पथारी,ताट,वाटी,बॅटरी,शिधा,टिश्यू पेपर घेऊन येण्याचे करावे.
२. नुस्ते रिकामे येणार्यांची गैरसोय झाल्यास आयोजक जबाबदार नाहीत!
३. फटाके आणू नयेत. आणल्यास वाजवू नयेत.
४. इतके सांगूनही न ऐकल्यास ऐन लग्नात खुर्चीखाली सुतळी बॉम्ब लावायची व्यवस्था करणेत येईल.
५. जंगल आपले नाही. नैसर्गिक मालमत्ता आहे. जपून वापर करावा. उगाच पाने-फुले तोडत फिरु नये.
६. फुंक्या लोकांची सोय निकोटीनयुक्त 'चिंगम' देऊन करणेत येईल. ते खाऊन इकडे-तिकडे थुंकू नये.
७. येण्या-जाण्याचा खर्च स्वत:च करावयाचा असल्याने ज्यांना झेपेल अशांनीच यावे. इकडे आल्यानंतर परतीचे तिकीट नाही म्हणून गळे काढू नयेत. त्यांचा श्री. मेघवेडा यांचेतर्फे व्यायामशाळेत जाहीर सत्कार करणेत येईल!
८. एकदा बुकिंग केल्यावर ते कॅन्सल होणार नाही, किंवा पैसेही परत मिळणार नाहीत.
धन्यवाद,
असुर
सेक्रेटरी, नान्स लगीन लंटन निवास योजना
3 Feb 2011 - 8:17 pm | नरेशकुमार
माझं करा एक बुकिंग.
economic class नको business class चेच करा.
बाकी पैसे कसे पाठवु, चेक नि कि मनी ऑर्ड्रने ?
४ जण आल्यावर काही डीस्काउंट वगेरे काही आहे का ?
3 Feb 2011 - 9:35 pm | मुलूखावेगळी
४ कोन ब्वॉ
तुम्ही आनि तुमची बायको २
आनि कोन? मुलं बाळं का यन्दा सासु सासरे ;)?
यान्न्ना पन खुश करनार का नानाच्या लग्नाच्या निमित्ताने :)
3 Feb 2011 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला सर, सिरियसली वाचायला सुरुवात केली होती. '' देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर" इथून उमेदवार कोण आहे त्याची खात्री झाली. :)
बाकी, चालू द्या....!
- दिलीप बिरुटे
4 Feb 2011 - 9:23 am | sneharani
हे वाचल्यावरच कळालं कुणासाठी इतका खटाटोप तो!
अभिनंदन!!!
:)
3 Feb 2011 - 9:04 pm | सूर्यपुत्र
या वाक्यात थोडासा बदल :
बाकी काही राहीलेली नावे आहेत, तर कामे सुचवा!!
-सूर्यपुत्र.
3 Feb 2011 - 11:23 pm | ५० फक्त
वेबकास्टिंग परांकडे काय ?
4 Feb 2011 - 10:16 am | ब्रिटिश टिंग्या
नान्या वेटर आहे हे माहिती नव्हतं!
4 Feb 2011 - 10:42 am | नरेशकुमार
दादा वहिनींचा नुकताच एक फोटो काढुन आनला आहे.
![]()
" alt="" />
साभार : http://photofunia.com/effects/couple
4 Feb 2011 - 11:50 am | ५० फक्त
नरेशकुमार, हा फोटो पुल उद्यानातला वाटतोय. होती खरी आज सकाळी तिकडे काहितरी गडबड, आणि दोन तिन दिवस बंद पण होती बाग,
आधी पुतळा आणि आता हे.
4 Feb 2011 - 12:05 pm | विनायक प्रभू
प्री न्युप बद्दल कुणीही सल्ला अजुनही दिलेल नाहीये.