
स्वातंत्र्यविर विनायक दामोधर सावरकर यांना ईग्रजांनी दुस-या जन्मठेपेची शिक्षा सुनावली तो दिवस म्हणजे ३० जानेवारी १९११ आज ३० जानेवारी २०११ रोजी त्याला १०० वर्षे पुर्ण झाली, स्वातंत्र्यासाठी दोनवेळा जन्मठेप भोगणा-या स्वां.सावरकरांना विनम्र अभिवादन.
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला ठार केले, त्यानंतर नाशिक मध्ये २९ डिसेंबर १९०९ रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर ऑर्थर मेसन जॉक्सन याला गोळ्या घालुन ठार मारले ब्रिटीशांनी या दोन्ही घटनांचे खरे सुत्रधार म्हणुन स्वा.सावरकरांना १३ मार्च १९१० (रविवार) रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरीया स्टेशनवर अटक केली. त्यांना भारतात आणले गेले आणि त्यांच्यावर खटला चालु झाला.
या खटल्यात एकुन ३७ आरोपी होते, त्यातील १० जन निर्दोष मुक्त झाले परंतु बाकी २६ जनांना कमीजास्त प्रमाणात शिक्षा सुनावण्यात आली आणि स्वा.सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
ही शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी स्वा.सावरकरांचे वय होते २७ वर्षे. त्यांनी जन्मठेपेमध्ये खुप हाल अपेष्टा सहन केल्या.
स्वातंत्र्यासाठी दोनवेळा जन्मठेप भोगणा-या स्वां.सावरकरांना पुनश्च विनम्र अभिवादन.
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 2:22 pm | कच्ची कैरी
स्वातंत्र्यासाठी दोनवेळा जन्मठेप भोगणा-या स्वां.सावरकरांना पुनश्च विनम्र अभिवादन.
सावरकरांविषयी जे काय वाचायला मिळेल ते नक्कीच आवडेल तसे त्यांच्यावर लिहलेले काही पुस्तके वाचली आहेत.
30 Jan 2011 - 2:25 pm | क्लिंटन
तात्यारावांना विनम्र अभिवादन.
30 Jan 2011 - 2:57 pm | अवलिया
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन ! !
30 Jan 2011 - 4:14 pm | चिंतामणी
वक्ता, लेखक, कवी, संघटक, क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ असा चतुरस्त्र नेता.
स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र वाहुन देशासाठी वाहुन घेतलेल्या या देशाच्या महान सुपुत्राला
शत शत प्रणाम
30 Jan 2011 - 5:52 pm | नितिन थत्ते
सावरकरांना अभिवादन.
[छिद्रान्वेषण: या ठिकाणी आणि या ठिकाणी दिलेल्या कालक्रमात शिक्षा ३१ जानेवारीला दिली गेल्याचे म्हटले आहे. ती ३० जानेवारीला दिली गेली असे इन्व्हेण्ट करण्यामागे बहुतेक काही हेतु नसावा अशी अपेक्षा आहे. ]
30 Jan 2011 - 6:54 pm | निनाद मुक्काम प...
विनम्र अभिवादन
ते जेव्हा भारतात परत आले तेव्हा भारत राजकीय दृष्ट्या पार बदलून गेला होता .
31 Jan 2011 - 6:20 am | गुंडोपंत
लेख अजून मोठा असता तर अजून आवडले असते!