आई मी पतंग उडवीत होतो..................

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
12 Jan 2011 - 11:28 am

आई मी पतंग उडवीत होतो..................

काल परवा दोन तीन छोटे शुर शिपाई हातात काठी आणि त्याला पुढे आकडी असा लवाजमा घेऊन काटलेल्या पतंगाच्या मागे पळत होती त्याला पाहून मला पण आमचे लहानपण आठवले "अरे यार आपण पण असेच होतो कि , पतंग पकडायला आकडे घेऊन पळणारे ,कुणाच्या गच्चीत ,कुणाच्या कम्पौंड मध्ये घुसणारे !

पतंग हा शब्द ,लहानपणी ऐकला तरी हवेत तरंगायला व्हायचं आम्हाला....
तुम्ही म्हणाल हे मुलाचं खूळ तुला कस ग ?(लहानपणापासून आम्ही मुलांचेच खेळ जास्ती खेळलो, कॉलनीत १०-१२ मुल आणि दोन चार मुली मग जास्तीची म्याजोरटी कळल !) क्रिकेट पासून विट्टी दांडू , ते फुटबाल पासून लीन्गोर्चा.........सगळ सगळ अगदी मनसोक्त भरभरून ..........
हो तर काय सांगत होते , ह संक्रांत म्हणजे आमच्या सर्व ग्रुपचा आवडता सन ,एक तर मनसोक्त पतंग उडविणे ,दुसर पतंग पकडणे ,आणि तिसरे संध्याकाळी किती भांडण झाली तरी तिळगुळ देऊन मिटवणे
संक्रातीच्य आधी नाताळच्या सुट्ट्या असायच्या सर्वाना मग काय ,सर्वे धंदे त्या सुट्टीत च उरकून घ्यायचे
पहिला म्हणजे मांजा सुतावण्याचा सार्वजनिक कार्यक्रम !
एक दिवस ठरवायचं ,चक्री,शिरस ,आणि दोरा विकत आणायचा
मग छोटीशी चूल करून त्यावर एक जळक मळक पातेलं ठेऊन त्यात
शिरस उकळायच कलर टाकायचं मिश्रण तय्यार !
मग त्यात दाभन किंवा गोधडी शिवायची सुई घेऊन त्यातन दोरा आरपार ,
काच (भुकटी ) कागदाच्या पुडीत घेऊन बोर होत बसायचं काम जास्ती करून मुलींकडच असायचं ,

मग एक मुलगा चकरीला दोरा गुंडाळत दूरवर नेणार आणि मग लपेटत लपेटत येणार चक्री भरेपर्यंत तहान भूक विसरून आमचा हा उद्योग चालायचा , असे सर्वांचे मांजे सुतावाण्यात आमच्या सुट्ट्या संपायच्या , आणि मग आम्ही पतंग बनवायच्या तयारीला लागायचो

पतंग विकत घेण्यापेक्षा घरीच बनवायचो आम्ही ,एक ताव आण्यायचा मग ज्याला जसा आवड्त्तो तसा पतंग बनवायचं ,
छोटुला पतंगाचे भारी वेड !
कुणी टूक्कल ,कुणी झोपडा, कुणाचा bombe top ,तर कुणाचा तिरंगा
कुणाला १ शेपूट ,कुणाला २ आणि कुणी ३ लावायचो ,सुत्तर पाडायचे काम बहुतेक अन्नांकडेच असायचे
शाळा दुपारीच सुटायची त्यामुळ आमचा पतंग महोत्सव ३-४ दिवस आधीपासूनच सुरु !

घर दुमजली होते ,गच्ची हि बर्यापैकी होती ,दुसर्या मजल्यासाठी भक्कम जिना होता ,पण तिसर्या मजल्यावर चढायला जिना नव्हता ,लाकडी शिडी होती ,त्यामुळे आई अन्ना नेहमी रागवायचे ,खाली उभ राहून पतंग उडवा ,वरती नाही चढायच आजीबात ,तसा एक दोनदा प्रयत्न हि केला पण पतंग कधी गुलमोहरात ,नाही तर लाईटच्या वायरीत,नाहीतर कुणाच्या गाडीला अडकायचं
त्यामुळे नाईलाजाने आम्ही तिसरा मजला सर करत असू ,
(अण्णांना घेतल्याशिवाय वरती चढायच नाही अशी सक्त ताकीदच होती )
अन्ना शिडी धरायचे एक एक करून आम्ही गच्चीत , सर्वात शेवटी छोट्या ,त्याला नाही घेतलं तर त्याच तांडव (अ ग ग ग ग ) विचारूच नका ..........
अशा आमच्या करामती मुळे एक संक्रांत अजूनही लख्ख आठवते
आम्ही ६-७ जन तिसर्या मजल्य्वर चढलो होतो ,पप्पूने आधी ट्रायल म्हणून एक टूक्कल घेतली ,चक्री धरायला मीच होते ,आम्ही आता पारंगत झालो होतो शिडीवरून खालि वर करायला त्यामुळ आईची भीती बरीच कमी झाली होती ,नेमके अण्णा त्या दिवशी बाहेरगावी गेले होते ,त्यामुळ टेन्शनच नव्हते ,फक्त मनसोक्त पतंग उडवायचं ,काटाकाटी करायची ,असे ठरवूनच मैदानात उतरलो होतो आम्ही !
मस्त छान रंग बिरंगी पतंग ऐटीत उडत होते ,
पप्पुने आधि टूक्कल घेतलि उडवायला
टूक्कल जरा डूगायला लागली कि आमचा छोटा मध्येच," ए मला पण दे णा दे ना दे दे ,दे कि "
दे कि नाहितर .........

पप्पू : - कुणी घेतला रे ह्याला ?,च्यायला नसती कटकट
छोट्या :- तुं नै दिली तर ,मम्मीलाच बोलावून आणतो थांब !
पप्पू ; ए ,घे भो धर धर ,
छोतुने टूक्कल घेतली , १ -२ मिनटात झोकांड्या खात कन्नी करून झाडात अडकवून टाकली
पप्पू:- झाल समाधान ! बसा आता
पप्पूने यावेळी मोठा झोपडा लावला गोत घ्यायची म्हणून
झोपडा मस्त ऐटीत डुगत होता
तेवढ्यात पलीकडच्या गल्लीतल्या एका गच्चीवरून आरोळी आली "एय घ्यायची का गोत ?"
पप्पू म्हणाला घेऊ का रे ?
मी म्हटलं नको एवढी ढील दिली कटून गेला तर अर्धी चक्री रिकामी होईल
हो नाही करत गोत बसली
पण त्या कार्ट्याने आखाड्पेच करून आमचा झोपडा खेचून तोडून घेतला ,(गोतीचा नियम भंग )

पप्पू:- "ए भडव्या झोपडा दे चुपचाप ,तिकडे आलो तर मार खाशील बर..
पलीकडचा :-" देत नाई जा ,तुला काय तुझ्या बापाला पण नई घाबरत फुट !
पप्पू ने शिव्यांचा मारा सुरु केला हिकडून, तसा तिकडून पण डबल सुरु झाला
कधी नवात आमच्या सर्व शिव्या कामी आल्या , तो मुलगा काही ऐकत नव्हता डांबिस कुठला !त्याच्या मुरलेल्या खानदानी शिव्या आणि आम्हाला घाबरवण्यासाठी त्याने एक दगड भिरकावला पण त्याचा नेम चुकला
पप्पूचा राग एकदम अनावर झाला
आणि त्याने गच्चीत पडलेला
एक छोटा दगड त्याच्याकडे भिरकावला
गोटयात नेम नाही म्हणू हरणाऱ्या पप्पूचा नेम यावेळी एकदम अचूक लागला होता
दगड त्या मुलाच्या काखेत लागला,
लागल पण ,इतक नाही याची खात्री होती पण झाल उलटच !
तो जोरजोरात बोंबलायला लागला
हिकड भीतीमुळ सर्व
मन्या, पंक्या,राणी, अभ्या सगळे
टाबर(मुल) पटापट आम्हाला सोडू न पळून गेले
उरलो आम्ही तिघे पप्पू मी अन छोटू
त्याला कसे बसे खाली घेतले ,गुपचूप घरात आलो
आई म्हणाली "काय रे काय धाड धड चाललीये पळापळी नुसती ,पतंग चावून खायचे का ?"
तीच वाक्य पूर्ण होतय नाही तोच दाराची बेल वाजली नव्हे वाजतच राहिली पप्पूला आणि मला कल्पना होती (कि त्या मुलाची आई नक्की भांडायला आलेली आहे) आता आमच्या दोघांच काही खर नाही झाडूचा मार एकदम पक्का !
आई:- कुणाचा जीव चालालय एवढी दाणादाण बेल वाजवतोय
तेवढ्यात आमच्या छोट्याने :"मम्मी आपल्या पप्पूने दगड मारलाय एका मुलाला " सांगून मोकळा
आईने दर उघडले तसे दोन चार शेंबडी पोर,(घर दाखवायला )
७-८ बाया माणसाचं लवाजमा घरात घुसला ....
बाहीर काढा आधी,(ज्याच्याशी पंगा घेतला तो वैदुवाडीतला मुलगा होता )

" कुठ हाये त्यो तुमचा मुलगा ,आण त्याला भाईर, मुलाला मारतो काय ? कुठ लपला (बाथ रूम मध्ये )

वैनी बोलाव त्याला बघा त्याने दगड मारलाय पोराला ,
आईला तर काय सुचेनास झाल ती थांबा थांबा एक मिनिट करत होती पण हे लोक काय ऐकतील तर, स्वताच घरात शोधमोहीम सुरु केली
आमचा छोट्या तर एव्हाना रडू लागला होता मी भीतीने थरथर कापत होते ,आईला एवढ्यानं आवरण कठीण होत ,
तेवढ्यात आमची आज्जींच आगमन झाले
नववारी साडीचा पदर खोचून आजी मैदानात उतरली ........
एय भडव्यानो ,व्हा बाहेर आधी ,तुमच्या बापच घर आहे का हे कुठ घुसताय ? घरात गडी माणूस नाही म्हणून ........
एक बाई मधेच आजीला म्हणाली "ओ तुम्ही मध्ये बोलू नका आजी ,स्वताच्या पोरांची चूक पोटात नका घालू बाहेर काढा त्याला आधि "
त्यांचा रुद्रावतार बघून आई बरीच घाबरली होती ,पण आमची आजी शूर योध्यासारखी त्यांना तोंड(शिव्या )देत होती
तिच्या त्या गावरान शिव्या अर्र्र्रर्र्र्रर्र्र्र ............
तिला बघून मला पण चेव आला मी पण म्हणाले "ओ काकू तुमच्या मुलाने का पतंग पकडला आधी आमचा ? त्याची चूक आहे "आजी हे खोट बोलतायेत ,एवढासा दगड मारला होता पप्पूने ,
बाई (रागाने ) : -ए मैना ,गप राहा जास्त चिव चिव नको करूस (राहील)
आजी ;-काय म्हणन तरी काय ,एवढा कालवा कशाला ?
बाई : ५०० रु दे आत्ताचं आता दवापाणी करायला पैसे नाहीत हॉस्पिटलात घेऊन जायचं
आज्जी :- तुझ्या बापाने तरी नेल होत का हॉस्पिटल मधी दगड लागल्यावर ?
बघू कुठय तो ?किती लागलाय? चल मी पण येते दवाखान्यात तुझ्याबरोबर ,
बाबा : -मग लागलाय त्याला का खोट बोलतो आम्ही ?
आजी :- कुठाय त्यो मुलगा ?कुणाला लागल बघू ?
" चाल ना ,मग दाखव न ,देते न ५०० काय १००० देते दाखव तरी आधी ..
तो पर्यंत हा सावळा गोंधळ ऐकून शेजारचे चौधरी सहकुटुंब धावून आले मदतीला
(चौधरी काका ६ फुट, उंची डोक्यावरचा मंडप पडून झालर राहिलेल ,आवाज एकदम कडक कुणालाही दरारा वाटेल असा )
काका:आधी बाहेर व्हा घरात बाईमाणस पाहून गोंधळ करता का?पोलीस केस करू का?फुकटच पिठल भाकरी खायची हौस आहे का ?
चला व्हा बाहेर अस म्हणत त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी त्यांना अक्षरश बाहेर काढले
शिव्याची देवान घेवाण आता कॉलनीत चालू झाली ,गेटच्या बाहेर त्ये आणि आतमध्ये आम्ही
येणारे जाणारे थांबून आस्वाद घेऊ लागले ,
(काहीजणांना फार बरे वाटल असेल)
त्यांच्या त्या खानदानी शिव्या आमच्या आजीच्या गावरान शिव्यान पुढ मिळमिळीत वाटत होत्या शेवटी एवढ करून हि ऐकत नाही म्हणल्यावर त्यांनी नाईलाजाने माघार घेतली आणि हिरमुसले होऊन परतले
आता आमच्या दोघांचा समाचार !
आजी : -कुठाय पप्पू ,कारटा, मेला नुसता ताप आहे डोक्याला !
येऊ दे तुझ्या बापाला फोकानीच बडवायला सांगते ....
आणि तू ग (मी)काय लाज वाटते का तुला ,गच्चीत जाता? धडपडलीस हात - बित मोडला म्हणजे कोण पत्करेन !
सगळी ग्यांग गेल्याची खात्री करूनच पप्पू बाथरूम मधून बाहेर आला
आजीचे ,आईचे ,काकांचे ,उरलेसुरले शेजार्यांचे मोलाचे सल्ले निमूट पने एकूण घेणे भाग होते
जशी जशी संध्याकाळ झाली तशी तशी हुडहुडी भरायला लागली थंडीने नव्हे आण्णा घरी आल्यावर किती मारतील त्याच्या विचाराने !
एवढा गोंधळ , पतंग पण नाही उडवायला मिळाला ,वरतून आईचा दोन चार धपट्यान्चा मार आधीच बसलेला .........

आता आन्नाच्या ढाई किलोचा हाताचा प्रसाद आज तरी नको होता

आई शेवटी आजीला म्हणाली "जाऊ दे ,चूक झालीये पण ह्यांना नको सांगायला सणासुदीचा मार बसेल ",नंतर सांगूया निवांत !
एकमत झाले, पण आमचा छोट्या, तो अशी imotinal ब्ल्याक मेल ची सुवर्णसंधी एवढी सहजासहजी सोडणार होता का ?
एक drawing बुक , कलर पेन्सिल , २ चीक्क्या , आणि खूप सारी आवडत्या चोकलेट ची रिश्वत घेऊन छोट्या गप्प बसला ........
संध्याकाळी अन्ना घरी आले सर्व एकदम चिडीचूप ,छोट्या दिवाणवर पालथा पडून चित्र काढण्यात बीजी होता.
अण्णा :- " हे काय पप्प्या,पियू आवरलं नाही अजून? तिळगुळ घ्यायला जाणार नाही का ?तुमची ग्यांग नाही आली अजून?
(आमची १०- १२ जनाची ग्यांग ,प्लास्टिकचे छोटे डबे ,रुमाल नाहीतर ,छोटी क्यरीब्याग घेऊन तिळगुळ घ्यायला (लुटायला) निघणार ,खाणार नाही,साचवाणार, कुणाचे किती झाले ते ,दरवर्षीचा नियम ह्या वर्षी चुकला )
मी :- नाही, नको अन्ना तब्येत ठीक नाही आज दोघांची पण !
अन्नाच्या कपाळावर आठ्या (ह्यांच्या कडे बघून कोण म्हणेन आजारी ?असो)
चला आजच दिवस तर टळला ह्या भ्रमात आम्ही टी व्ही पाहत बसलो
तेवढ्यात शेजारच्या बडबड्या आजी तिळगुळ घ्यायला आल्या आमच्या आजीकडून ,दरवर्षी यायच्या ........
कुठाय पप्पू , ये बाला ये तीळ गूळ घे ये, ये ग तू पण , "कारे मारलं बिरल का तुला त्या लोकांनी ?"
>"कारे मारलं बिरल का तुला त्या लोकांनी ?" हे वाक्य ऐकून अण्णा बाहेर आले काय झाल ? ,कोणते लोक ? कुणाला मारलं ?
मला काही कळेल का? (आईकडे रागाने )
आई :- अहो काही नाही , काही विशेष नाही ,मुला मुलांची भांडण बाकी काय ?
अण्णा : हम्म्म ,कुणाशी आज ?
आई : जाऊ द्या न ,लोक येतील तिळगुळ घ्यायला तुम्ही आवरा लवकर
पण ती आजी गप्प बसेल तर ,"आमची सुपारी घेऊन आली होती कि काय"

सर्व पतंग पुराण एका दमात सांगून टाकल म्हातारीने (अस वाटल म्हातारीला ................कायमच गप्प .............) वाईट विचार ...........
आपल्या रतणांचा दिव्य पराक्रम ऐकून अन्ना चांगलेच तापले ,पप्पू बाहेर ये लवकर कार्ट्या २-३ रु च्या पतंगी साठी एवढे तमाशे करता नालायाकानो ,एवढी मुल आहे कॉलनीत कुणाच आवाज नाही ,तुम्हालाच माज चढला ?उतरवतो चांगला ,तेवढ्यात शेजारचे काका काकू तिळगुळ घ्यायला आले आणि आम्ही वाचलो ,
(अण्णांची अवस्था "एकीकडे खोट खोट हसतायेत , एकीकडे आमच्याकडे नि आईकडे रागाने पाहतायेत )
असे लोक १२ वाजेपर्यंत येऊ दे रे देवा ,म्हणजे आम्ही वाचलो अशी प्रार्थना करून आम्ही आजीच्या कुशीत निवांत झोपी गेलो .......................

त्या नंतर २-३ वर्ष अण्णा बरोबरच पतंग उडवला आम्ही
नन्तर ग्यापच पडत गेला .............

आता बर्याच वर्षांनी पुन्हा पतंग उडवणार आहे ह्या संक्रांतीला

"देखेंगे क्या होता हे "......................

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

12 Jan 2011 - 11:41 am | नावातकायआहे

झकास!

लिहित रहा.
पु.ले.शु.

डावखुरा's picture

12 Jan 2011 - 12:46 pm | डावखुरा

मस्त..लगे रहो..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Jan 2011 - 11:57 am | घाशीराम कोतवाल १.२

मस्त

नगरीनिरंजन's picture

12 Jan 2011 - 11:58 am | नगरीनिरंजन

अय भो.. हे तं आमच्याच घरातलं लिहीलंय. भारी मज्जा.. ल्हानपण आठवलं. पतंग, गोट्या, भोवरे, विटीदांडू आणि त्यावरून खाल्लेले मार आठवले. :-)

नन्दादीप's picture

12 Jan 2011 - 12:09 pm | नन्दादीप

>>>>>"आमची सुपारी घेऊन आली होती कि काय"
लय भारी.....

स्वानन्द's picture

12 Jan 2011 - 12:24 pm | स्वानन्द

एकदम झक्कास!

>>असे लोक १२ वाजेपर्यंत येऊ दे रे देवा ,म्हणजे आम्ही वाचलो
हा हा! हे तर एकदम भारी :)

भीडस्त's picture

12 Jan 2011 - 12:28 pm | भीडस्त

आवडलं :smile:

मुलूखावेगळी's picture

12 Jan 2011 - 12:49 pm | मुलूखावेगळी

वा
पियु १ नम्बर मस्त
खुप छान लिहिलेस अगदी सगळी द्रुश्य डोळ्यन्समोर आलि
ह्या वर्शी चा पन अनुभव शेअर कर

टारझन's picture

12 Jan 2011 - 12:57 pm | टारझन

खुप छान लिहिलेस अगदी सगळी द्रुश्य डोळ्यन्समोर आलि

दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन अगदी मनात पतंग उडु लागलेत .. आता मी काटाकाटी खेळतोय .. वा खुप मजा येतेय .

पतंग असावी तर भुंडी :) की भुंडा ? जाणकार विजुभाऊ , पतंग स्त्रीलिंगी की पुलिंगी हो ? प्रकाश टाका प्लिज.

( भुंडा पतंग प्रेमी) टाईट

मस्त. माझ्याही जुन्या आठवणी जाग्या केल्यास. मलाही पतंग उडवायला आवडायच. पण मला फार कमी अंतरावरच यायची. माझा आते भाउ उडवायचा आणि मला मांजा धरायला सांगायचा. मग मला हातात द्यायचा. पण माझ्या हातुन ती खाली यायला लागायची. मग थोडा त्याचा ओरडा खायचे. लग्न झाल्यावर माझ्या पुतण्याने एकदा माझ्या हातात दिली पतंग तेव्हा ही तिच गत झाली. तो पण काय करतेस काकी ? करत ओरडला. (ओरडा खाणारी दु:खी बाहुली)

प्रकाश१११'s picture

12 Jan 2011 - 1:42 pm | प्रकाश१११

पियुषा- एकदम चित्र शैली

झकास ....!!!

जोशी 'ले''s picture

12 Jan 2011 - 1:48 pm | जोशी 'ले'

खरच खुपच छान लिहलय...आम्हिपन लहानपनी असाच दंगा करायचो, ते मांजा सुतावने,त्या साठी काच कुटने (ति पन सोडा लेमन ची ) , दोरा वर्धमान चा, शीर्रस, सारा लवाजमा गोळा करुन एका निवांत दुपारी मांजा सुतवने, सगळ-सगळ आठवलं..धन्स.

अवांतर : तुम्हि नगर च्या का?

चांगले स्मरण.. :) मजा आली.

लेख न वाचताच प्रतिक्रिया देत आहे, कारण मला खात्री आहे की लेख मस्तच आहे. :)
पतंग उडवणे म्हणजे निखळ आनंद !!! कधी उगाचच दुसर्‍याची फिरकी हातात धरुन पतंग उडवणार्‍याला मदत करा, कापलेल्या बोटांना हळद लावा, किंवा बोटांना बँडेडच्या पट्ट्या चिकटवुनच मग मांजा हातात धरा... अनेक मांजांच्या जोडातुन मी बनवलेली अफलातुन फिरकी. छ्या. पतंग म्हंटल की लयं आठवन व्हते जुन्या दिसांची !!! च्यामारी काय सोनेरी दिस व्हते... !!!
संक्रांत जवळ येत आहे तवा... सर्वांसनी आदीच सांगतो,,, तिळगूळ खा आणि ग्वाड ग्वाड बोला. :)

(पतंग आणि तिळगूळ प्रेमी) ;)

खूप छान अनुभव ..

लेख आवडला !

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2011 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार

खुप छान.

sneharani's picture

12 Jan 2011 - 2:33 pm | sneharani

मस्त लिहलस ग!
:)

मृत्युन्जय's picture

12 Jan 2011 - 3:26 pm | मृत्युन्जय

छान लिहिले आहे. जास्तीची मेजोरिटे वगैरे शब्द ऐकुन लहानपणीची आठवण झाली.

प्राजक्ता पवार's picture

12 Jan 2011 - 3:50 pm | प्राजक्ता पवार

मस्तं .

मेघवेडा's picture

12 Jan 2011 - 4:21 pm | मेघवेडा

मस्त! पीटीउषा बॅक ऑन ट्रॅक.
मजा आली वाचून. पुलेशु.

अनुराग's picture

12 Jan 2011 - 5:37 pm | अनुराग

खुप छान ! आवडले.

गणेशा's picture

12 Jan 2011 - 7:54 pm | गणेशा

खुप छान ..
एकदम सर्व जण डोळयासमोर आले.
मस्त लिहिता तुम्ही

यशोधरा's picture

12 Jan 2011 - 7:57 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय! :)

स्वाती२'s picture

12 Jan 2011 - 8:24 pm | स्वाती२

मस्त ! जूने दिवस आठवले.

हाहाहा.. पियु तुला तर "मैना" भारी बनवलं भांडखोर शेजारणीने...

- (नेहमी खुल्या मैदानात पतंग उडवणारा) पिंगू

डावखुरा's picture

13 Jan 2011 - 12:19 am | डावखुरा

आयला चांगलं लिहिते की तु..
दोनदा येउन गेलो ह्या धाग्यावर पहिल्यांदा नुसता आलो,दुसर्यांदा प्रतिसाद वाचुन गेलो..पण आता म्हटलं वाचुनच जाउ..
चांगले प्रकटन..अगदी प्रसंग नजरेसमोर येतो..
मी कधी पतंग नाय उडवला पण माझे भाउ पतंग तर उड्वीतच सोबत थोडा हवेत उंच गेल्यावर ढील देण्याआधी त्याला जिलेटिन आणि बारीक पुट्ठ्याचा कंदील त्यात सेल वर्चा लाईट किंवा मेण्बत्ती पण सोडत दिवाळीत्,संक्रांतीला रात्रीच्या वेळी..खुप मजा येत असे ..
पण आता सगळे बाहेर ज्याच्या त्याच्या शिक्षणात व्यस्त..
"हरवले ते बालपण उरल्या फक्त आठ्वणी.."
त्या उनाड वयात परत एकदा घेउन गेल्याबद्दल धन्यु..

प्रीत-मोहर's picture

13 Jan 2011 - 12:23 am | प्रीत-मोहर

पियु मस्त ग :)

आत्मशून्य's picture

13 Jan 2011 - 12:56 am | आत्मशून्य

पतंग ऊडवल्याने नजर (?) चांगली बनते असा वडीलांचा ठाम वीश्वास असल्याने या एक गोश्टीला कधीच वीरोध झाला नाही.

काय ती मजा कापाकापीची, काटलेल्या पतंगामगून पळून पळून अख्या गावातले रस्ते एक्स्प्लोर झाले.

मांजा बनवणे म्हणजेतर नीव्वळ अल्केमीच म्हणाना, समूद्र्फेस्,वर्धमानचा १० नंब्री घागा, सोडावोटर्च्या बाटल्या फोडून कूटलेली काच, खळ, आणी इतर सीक्रेट रेसीपीज व अख्खी दूपार घालून बनवलेला कडक धारेचा १ रीळ मांजा, आय्ला आपण नवीन माण्जा बनवला हे एकूनच शत्रूपक्षाला धडकी भरायची.

आपले पाय जमीनीला टेकलेले असताना एका हाताला जाणवणारा हवेत भरारी मरणार्‍या पतंगाचा ताण, तर दूसर्या हाताने चक्रीचा वेग नीयंत्रीत करत डोळ्यावर येणार्‍या सूर्याशी लपंडाव खेळत आधीच आपल्याच मांज्याने कापलेल्या बोटावर चीकट्पट्टी लावून पून्हा कापणार नाही याची काळजी घेत (प्रसंगी काळजी सोडून) इतर पतंगांशी काटाकाटी खेळणे म्हणजे नीव्वळ हा पूरूष जन्म सार्थकी लागल्याचीच भावना होय. असे समाधान जावे त्याच्या वंशाच.....

आता एखादे ओनलाइन पतंग उडवण्याचे अ‍ॅप्लीकेशन डेवलप करावे म्हणतो :(

पिवळा डांबिस's picture

13 Jan 2011 - 1:11 am | पिवळा डांबिस

खूप जुन्या आठवणी मनात उभ्या राहिल्या!
काचेची पूड हाताळतांना रक्ताळलेली बोटं आणि असा उद्योग केल्याबद्दल मार खाल्लेली पाठ आतासुद्धा हुळहुळली!
:)

मितान's picture

13 Jan 2011 - 2:29 am | मितान

मस्त लिहिलंय गं ! मजा आली.
आम्ही भावंड एकदा पतंगाच्या मागे पळत मेन रोडला गेलो आणि नेम धरून बाबांच्या गाडीसमोर पडलो. त्यानंतर पतंग म्हटला की पाठ हुळहुळते !!!!

प्राजु's picture

13 Jan 2011 - 2:45 am | प्राजु

छान झाला आहे लेख.
आवडला.

स्पंदना's picture

13 Jan 2011 - 9:10 am | स्पंदना

किती छान लिहिलय पियु !

मी पहिला पतंग उडवला लग्न झाल्यावर ! तोवर पतम्ग उडवायची परवानगी नव्हती. बर्‍याच मनात राहिलेल्या उनाडक्या मी लग्न झाल्यावरच केल्या. अजुनही करते.
तु डायलॉग छान लिहिते .

सर्व वाचकाना मनापासुन धन्यवाद :)