मंडळी, शब्दगारवा २०१० मध्ये गुरूदत्ताची आरती गेल्या दत्तजयंतीला प्रकाशीत झालीय. ती येथे देतोय. शब्दगारवा २०१० त आणखीही लेख अन कविता आहेत. त्या आपण नजरेखालून घालाव्यात. (कवितेत सार्थ बदल प्रकाशकाकांनी केले आहेत. त्यांना धन्यवाद.)
आरती गुरूदत्ताची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची
ब्रम्हा विष्णू महेशाची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||ध्रू||
ब्रह्मदेव सृष्टी रचितो
श्रीविष्णू पालन करितो
महेश संहार करी, पुनर्निर्मितीसाठी
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||१||
शंख चक्र कमंडलू धरीले हाती
खांद्यावरी झोळी, भस्म असे माथी
देवा दत्ता भिक्षा घ्या गरीबाघरची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||२||
जटाजूट घन केशसंभार
रुद्राक्षमाळा गळाभरोनी
गोश्वानासह त्रैमुर्ती अवतरली
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||३||
(पुर्वप्रकाशीत : शब्दगारवा २०१०)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/१२/२०१०
प्रतिक्रिया
1 Jan 2011 - 10:21 am | पाषाणभेद
*
"कवितेत सार्थ बदल प्रमोद देव काकांनी केले आहेत." असे वाचावे.
आरती ऐकायची असेल तर खालील ब्लॉगचा दुवा पाहावा:
http://majhigani.blogspot.com/2010/12/blog-post_23.html
5 Jan 2011 - 7:46 pm | प्रकाश१११
आरती गुरूदत्ताची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची
ब्रम्हा विष्णू महेशाची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची
वा ..वा..!! छान जमलीय आरती. मन प्रसन्न झाले.