सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ...
आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ...
किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी. शिवाय मागच्या १० वेळच्या पासवर्ड शी जुळल्यास पुन्हा बोंब ....
माझी तर आत्तापर्यंत माझ्य नाव, मित्रांची नावे, काही खास मैत्रीणींची नावे, जन्मतारखा, गाडीचे मॉडेल्स, आवडते खाद्य, खेळ नकोनकोते शब्द, आकडे सर्व वापरून झाले आहे, आता ह्यापुढे बुद्धी चालत नाही ....
बर एखादे खासगी "नाव" टाकावे म्हणले की लगेच दुसर्या दिवशी रात्री "कलीग" चा फोन " तेरा पासवर्ड बता, मुझे थोडा तेरे लॉग्-इन पे काम करना है ". आली का पंचाईत आता, पुढचा प्रश्न " कौन है वो ? साले हमसे छुपाता है ... *** **** ** "
आता तुम्हीच मला मदत करा, तुम्ही काय वापरता ते सांगा म्हणजे माझा मी योग्य तो लेसन घेईन ...
जास्त अवघड सांगू नका कारण मी अल्पमती आहे असे माझे सर म्हणायचे.[ त्यांचे नाव पण मी विसरलो आहे ...]
प्रतिक्रिया
24 Apr 2008 - 5:04 pm | मनस्वी
पिक्चरची नावे ठेवावीत :)
24 Apr 2008 - 5:04 pm | धमाल मुलगा
ही मदत मलाही हवी आहे!
सगळ्या आवडत्या पुस्तकांची नावंही संपली आहेत.
आता मी 'न्यू बॉर्न बेबी नेम्सच्या ' साईटवरुन क्रमाने नावं उचलतो आणि त्या क्रमानेच त्यांचा क्रमांकही वापरतो...आहे की नाही मज्जा?
5 May 2010 - 12:44 pm | विशाल कुलकर्णी
मी सुशिंच्या पुस्तकांची नावे वापरतो. त्याच्याबरोबर एखादे हॅश किंवा डॉलरचे चिन्ह आणि एखादा दोन आकडी क्रमांक :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
24 Apr 2008 - 5:07 pm | नारदाचार्य
बदल म्हटला की, हे राम. त्यानंतर देवा पांडुरंगा, हाय रे दैवा, आस्तीक - नास्तीक काळभैरव, जय महांकाली की, बं भोले, शिव - शिव, हरे रामा - हरे कृष्णा, हरी - हरी, वेतोबा प्रसन्न... एवढ्यावर भागत नसले तर, जाऊ तिथं खाऊ, देता की जाता, वगैरे वगैरे. क्ल्यू आहेत बरं हे.
24 Apr 2008 - 5:08 pm | धमाल मुलगा
अहो पण एव्हढ्यावर भागतं का?
सतरा लफडी असतात ना...इतकीच अक्षरं हवीत...अंक असायलाच हवा...पेश्शल क्यारेक्टरपण हवं...
नस्तं झेंगाट तिच्याआयला!
24 Apr 2008 - 5:15 pm | नारदाचार्य
आता हे क्ल्यू. म्हटल्यावर ती बाकीची झेंगटं याच्या आसपास जमवायची राव. आम्ही तरी जमवतो. उदा: रामरामचे - १रामराम२ किंवा (आ)राम(ह)राम वगैरे. थोडं चालवा की राव, भन्नाट प्रतिसादांसारखं. जमेल मग.
24 Apr 2008 - 5:10 pm | मनस्वी
खूपच आवडले.. सगळेच सही..
24 Apr 2008 - 5:22 pm | नारदाचार्य
पीसी सारखा टुण्ण व्हायचा. येकबी मंतर कामी येत नव्हता. मग घातलं वेतोबाला साकडं. तवा कुठं आला लायनीवर.
24 Apr 2008 - 5:09 pm | स्वाती राजेश
अरे, आत्तापासूनच का बेबीनेम साईट पाहतोस?
:)))))))))))))))))))))
पासवर्डः लहानपण च्या टोपण नावाचे सुद्धा चालतील, पण दुसर्या कोणाला देताना जरा सावधान नाहीतर हसे होईल (जर मजेशीर नाव असेल तर)
24 Apr 2008 - 5:14 pm | धमाल मुलगा
ठ्ठप्पाक्क !!!!
जोरात कपाळावर हात मारुन घेतला मी!
आयला, इथं सरळपणाने सांगायची काही म्हणता काही सोय नाही! जरा कुठं चान्स मिळाला की टाकलंच मुंडक्यावर!
24 Apr 2008 - 5:12 pm | इनोबा म्हणे
पिक्चरची नावे ठेवावीत :)
हि आयडीया बेस आहे.
अवांतरः बाकी 'नावं ठेवायची' मला सवय नसल्यामूळे या बाबतीत आम्ही तुमची काही मदत करु शकणार नाही.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
24 Apr 2008 - 5:21 pm | शितल
तुम्ही पहिल्या॑दा भारताचे पहिले राष्ट्र्पती या॑चे नाव व त्या॑चा ते पद भुषविल्याचा कालावधी (आकड्या॑साठी) ते चालु राष्ट्र्पती, (कोण आहेत हो? ), ते स॑पले की मग उपराष्ट्र्पती, प॑तप्रधान, मुख्य॑म्॑त्री इथपर्य्॑त गाडी येऊ दे.
24 Apr 2008 - 5:24 pm | छोटा डॉन
एवढ्या तत्पर प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद ...
पण गावाचे नाव, देवाचे नाव, राजकारणी [ छ्या बुवा ], सिनेमे असले काही कॉमन सांगू नका ...
जे ४ लोक करतात ती गोष्ट मी कधीच करत नाही ...
थोडं हटके, सटके, रोमँटीक, मजेशीर पण लक्षात रहायला सोप असं सांगा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
24 Apr 2008 - 5:34 pm | इनोबा म्हणे
दोन पिक्चरांची नावे एकत्र करुन लिही.म्हणजे जरा मजेदार नावे तयार होतील.
उदा:
हम आपके है कौन+जानी दूश्मन
वहीनीच्या बांगड्या+दादाच्या तंगड्या
माहेरची साडी+सासरचं धोतर :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
24 Apr 2008 - 5:39 pm | धनंजय
मला अशी सुचली आहे.
मला "भीमरूपी महारुद्रा..." हे स्तोत्र पाठ आहे.
त्याचे गमभन-रोमन लेखनही माहीत आहे.
तर पहिला पासवर्ड असा घ्यायचा :
bhImarUpI#1
मग क्रमाने असे :
mahArudrA#2
vajrahanumAna#3
mArutI#4
...
prabhaMjanA#8...
अशा प्रकारे "आकडा घातला पाहिजे" "स्पेशल चिह्न घातले पाहिजे" असले नियम सहज पाळता येतात.
(हे सर्व उदाहरणादाखल! मी हे विशिष्ट स्तोत्र वापरत नाही आणि गमभनची रोमन न वापरता दुसरीच कुठली रोमन वापरतो. विशेष अक्षर # असेही वापरत नाही. त्यामुळे माझा पासवर्ड वरच्या सांगण्यावरून सहज शोधता येणार नाही.)
पण सगळ्यात चाट पडलो ते तुमच्यावर आलेला हा प्रसंग वाचून :
बर एखादे खासगी "नाव" टाकावे म्हणले की लगेच दुसर्या दिवशी रात्री "कलीग" चा फोन " तेरा पासवर्ड बता, मुझे थोडा तेरे लॉग्-इन पे काम करना है ".
माझ्या कलीगला आणि मला एकाच लॉग-इन वर काम करावे लागले अशी वेळ आली आहे. पण अशा वेळी एक नवीन आय-डी तयार करून दोघांनी मिळून पासवर्ड ठरवला. माझा वैयक्तिक पासवर्ड मी कदाचित जिवाच्या जोडीदाराला देईन. नाहीतर पासवर्ड माझ्या सहीइतका खाजगी आहे.
24 Apr 2008 - 5:48 pm | नारदाचार्य
सहीइतका खाजगी (की खासगी?) म्हणजे? उघड गुपीत असलं काय तरी होतंय ते. कारण सही तर दिसते राव. हां आता सरदार असू तर तोबी दिसत्योच म्हना. *****
24 Apr 2008 - 6:07 pm | धनंजय
दोन्ही मला हव्या त्या अर्थाने चालतात :-)
(इति माझ्याकडील शब्दकोश)
सही दिसते, पण तो विशिष्ट फर्राटा खरडण्याचे कौशल्य (??वाईट हस्ताक्षराला कौशल्य म्हटले!!!) मात्र माझ्याकडेच आहे. पासवर्ड म्हणजे ते कौशल्य - दर्शनी सही नव्हे.
आमच्या विद्यापीठाच्या अध्यक्षाची एक "सार्वजनिक अध्यक्षीय" सही आहे. ती खरडण्याचे प्रशिक्षण त्यांच्या मदतनिसाला दिलेले आहे (तशी सही उमटवणारे यंत्र मदतनिसाला दिले आहे.) ही सही विद्यापीठाच्या चेकवर चालते. पण अध्यक्षांच्या वैयक्तिक बँकखात्यात चालणार्या सहीचे प्रशिक्षण त्या मदतनिसाला दिलेले नाही. ती खासगी/खाजगी आहे.
5 May 2010 - 1:30 pm | वेदश्री
+१०००
माझे पासवर्ड मी कोणालाच सांगत नाही.. हो पण इतरांचे मला माहिती असतात/होतात/करून घेता येतात! ;-)
24 Apr 2008 - 6:08 pm | वेदश्री
ही डोकेदुखी मलाही आजकाल फारच त्रास देते आहे.
१.हापिसातल्या संगणकाचा पासवर्ड,
२.घरच्या लॅप्टॉपचा पासवर्ड,
३.प्रत्येक बँकेच्या खात्याचा पासवर्ड,
४.डिमॅट खात्याचा पासवर्ड,
५.खाजगी संस्थांकडे केलेल्या गुंतवणुकीचा पर्फॉर्मन्स बघण्यासाठीचा पासवर्ड,
६..
७..
..
..
आणि परत या सर्व गोष्टी माझ्याबाबतीतल्या तर लक्षात ठेवायच्याच आणि घरातल्या इतरांसाठीच्यापण ! प्रत्येक पासवर्ड बदलण्याची वेळ वेगळी - प्रत्येकवेळी सुचेल असा पर्यायी पासवर्ड वेगळा.. तो लक्षात ठेवणे हे आणखी जिकीरीचे काम ! डोक्याची पाऽऽऽर मंडई होते कधी चुकूनमाकून पासवर्ड आठवत नाही म्हटले की. एकदा अशीच एका बँकेच्या एटीएमचा फुटकळ ४ आकडी पासवर्ड विसरले होते.. कुठे तो लिहूनही ठेवलेला नव्हता. लागोपाठ २ दिवस आपली चोरासारखी जाऊन वेगवेगळे पासवर्ड टाकून पाहत होते.. अचानक एकदा आठवला आणि नविन एटीएम कार्ड घेण्याच्या व्यापातून सुटका झाली !
हे सगळे पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी काही सोपी क्लृप्ती आहे का? नविन पासवर्ड बनवण्यासाठी तर काही प्रश्न आला नाही आजवर...
24 Apr 2008 - 9:02 pm | आनंदयात्री
सोप्पय रे डान्या .. एकसलग असणार्या कोण्त्याही ३ अक्षरी की, मग ३ आकडे मग तेच आकडे शिफ्ट दाबुन !!
बाकी हे उदाहरणादाखल ..... (पुढचे सगळे धनुदादा सारखे)
24 Apr 2008 - 9:40 pm | देवदत्त
सिनेमाची आद्याक्षरे आणि त्याचे प्रदर्शन साल ह्यांची जोडी :)
पण सिनेमाची नावे नाही आवडत ना? मग......????
अरे वा, मला ही एक कल्पना सुचली. दिल चाहता है पाहिला असेलच. त्यात सुबोध ज्याप्रमाणे भेटण्याचे ठिकाण व वेळ लक्षात ठेवायचा तसेच काही तरी वापरत जा. त्या गोष्टी लक्षात राहिल्याने गर्लफ्रेंडही खुष राहील ;)
पण खाजगी ही नाही चालणार ना ? :(
मग ऑफिसमध्ये भींतीवर/टेबलावर काही कॅलेंडर/जाहीराती काहीतरी असेल ना? त्यातील अक्षरे व आकडे वापरून बघा. एखाद्याला सांगतानाही सोपे पडेल :)
24 Apr 2008 - 10:35 pm | पिवळा डांबिस
आम्ही मराठी/ कोकणी शिव्या वापरतो, पासवर्ड म्हणून!!
सध्याचा " तदमाताय!"
कामही होतं आणि स्वतःलाच जरा हसूही फुटतं!!!:))
-पिडा
25 Apr 2008 - 6:49 am | छोटा डॉन
डांबिसकाका, अल्टिमेट ...
पण तिच्यायला बाकीच्या अमराठी लोकांनी त्याचा अर्थ विचारला तर ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Apr 2008 - 7:23 am | पिवळा डांबिस
अमराठी माणसांना तू सांगशील तो अर्थ!!
मी अमेरिकनांना 'भिकारचोट' चा अर्थ 'ईश्वराची कृपा' असा सांगितला होता. त्यांनी समजल्याप्रमाणे मान डोलावली!!:)))
पार पोचलेला,
डांबिसकाका
:)))
25 Apr 2008 - 7:28 am | छोटा डॉन
"मी अमेरिकनांना 'भिकारचोट' चा अर्थ 'ईश्वराची कृपा' असा सांगितला होता. त्यांनी समजल्याप्रमाणे मान डोलावली!!:)))"
धन्य आहे तुमची डांबिसकाका ...
बाकी आम्ही पण आमच्या एका जर्मन कलिग ला "डिअर फ्रेंड" चे हिंदी " उल्लू का पठ्ठा " असे शिकवले होते. ४ दिवस हसू हसून येडे झालो होतो ...
तो असे म्हणला की बाकीचे अज्ञानी त्याच्याकडे आश्चर्याने बघायचे आणि हे बेणं एकदम खूष व्हायचं, सगळी धमाल .....
नंतर त्याला सत्य कळल्यावर त्याने आम्हाला "जर्मनमधून" दे दणादण शिव्या हाणल्या ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
5 May 2010 - 12:50 pm | विशाल कुलकर्णी
पण आमच्या एका जर्मन कलिग ला "डिअर फ्रेंड" चे हिंदी " उल्लू का पठ्ठा " असे शिकवले होते.>>>>>
परवा बार्बरा मोरी (?) (आयला हे कसलं आडनाव? ;-)) च्या एका मुलाखतीत वाचलं होतं , तिला फक्त एकच हिंदी वाक्य बोलता येतं.....
"मै उल्लू की पठ्ठी हूं.....!" आणि त्याचा अर्थ आय लव यू असा होत नाही हे देखील तिला माहीत आहे म्हणे. :))
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
5 May 2010 - 1:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
न्हावीण मोरी या शब्दांवरून बरेच विनोद आठवले, पण नकोच ... (बघा ना, या नावातच विनोद आठवले असं नावही आहे!)
अदिती
25 Apr 2008 - 11:23 am | अजय जोशी
माणसाला हृदय १, कप्पे ४ आणि पासवर्ड किती?
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
25 Apr 2008 - 12:51 pm | मनस्वी
एकदम सोप्पय हो.. त्यात काऽही अवघड नाही.
समजा, तुमचं आवडतं गाणं कोणतं?
समजा, "देखा जो तुझे यार दिलमे बजी सितार"
१) देजोतुयादिबसि - DeJoTuYaDiBaSi
२) आता, A=1, B=2....
याप्रमाणे, D=4, J=10, T=20, Y=25, D=4, B=2, S=19
३) आता, 4 + 10 + 20 + 25 + 4 + 2 + 19 = ८४
DeJoTuYaDiBaSi84
४) आता विशेष अक्षरे अर्थात स्पेशल कॅरॅक्टर्स:
तर ८४ मधल्या ८ आणि ४ च्या डोक्यावर काय आहे.. तेच पण.. क्रम बदलून! म्हणजे $*
एक सुरुवातीला आणि एक शेवट
झाला पासवर्ड तयार!
$DeJoTuYaDiBaSi84*
आहे की नाही सोप्पा!
असेच निरनिराळ्या आवडीच्या गाण्यांप्रमाणे चेंज करत रहावा.
म्हणजे लक्षात ठेवायलाही अगदी सोप्पा.. हो की नाही?
25 Apr 2008 - 1:08 pm | विजुभाऊ
'भिकारचोट' चा अर्थ 'ईश्वराची कृपा' .:))))))
तुम्ही इथे घेतलेले तुमचे नाव एकदम योग्य आहे.
यापेक्षा डांबीसपणा दुसरीकडे भेटणे अवघड आहे.
......अवांतर : काही लोक प्रेम करतात. काही आपल्या प्रेयसी/प्रियकराशी लग्न करतात त्यांच्या नावासोबत प्रेयसी/प्रियकाराचे नाव जोडले जाते. ज्याना हे जमत नाही ते (जे प्रेम पात्राशीलग्न करत नाहीत) त्यांच्या प्रेयसी/प्रियकराचे नाव पहिल्या मुला/मुलीच्या नावात शोधतात. ज्याना हेही जमत नाही त्यांच्या प्रेयसी/प्रियकराचे नाव जालावर त्यांची लॉग इन नेम अथवा पासवर्ड बनुन येते.
.......अशाच एका पासवर्डच्या शोधात विजुभाऊ
6 May 2008 - 6:20 am | पिवळा डांबिस
रावण हश्या!!!:))
3 May 2008 - 8:26 pm | नि३
लॉग इन पासवर्ड हा गोपनीय ठेवावा असा नसतो म्हणजे तु सांगीतल्याप्रमाणे तो आपल्याला आपल्या कलीग बरोबर शेअर ही करावो लागतो . मग राहील्या दोन कंडीशन
तो लक्षात राह्ण्यासाठी सोपा असावा आणी पासवर्ड च्या अटी
तर मी जी पद्ध्त वापरतो ती अशी
jan@2008
feb@2008
mar@2008
apr@2008
and so on..
(संत्र्याच्या बागेत रमणारा नागपुरवासी) नितिन
5 May 2010 - 5:58 am | शुचि
मला अल्झेइमर आहे की काय स्वतःला अशी शंका येते :( ..... इतके पासवर्ड असतात मी एखादा विसरतेच.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
5 May 2010 - 6:59 am | राजेश घासकडवी
एखादं वाक्य घ्यायचं आणि शेवटचा शब्द बदलत राहायचा
उदाहरणार्थ
passwords I hate
passwords I abhore
passwords I detest
passwords I loath
pwds*4hate
४ ही त्या शब्दातली अक्षरं. या मालिकेत अनेक पासवर्ड बनवता येतात. त्यात 'आय' घातला की दुप्पट पासवर्ड होतात. बहुतेक ठिकाणी काही महिन्यांनंतर तेच पासवर्ड वापरता येतात.
वरच्या मालिकेतले पुरेसे शब्द माहीत नसतील तर तुमच्या मूळ लेखाच्या भावना कितपत शुद्ध याची शंका येईल... :)
मी अर्थातच वेगळी मालिका वापरतो, किंवा हा माझा लोकांची दिशाभूल करण्यासाठीचा दावाही असेल.
5 May 2010 - 8:42 am | पाषाणभेद
तुमचे 'आत जा'ण्याचे नाव चलशब्द बदलण्याचे वेळी आम्हास व्य. नी . करत चला. त्यात तुमचा जाल नियम पत्ता ( जा. नि. पत्ता ) व संगणकाचे नाव ही असू द्या. म्हणजे आम्ही तुम्हास दरवेळी चलशब्द बनवून देत जावू.
दरवेळी चलशब्द तयार करणे अन लक्षात ठेवणे जिकीरीचे काम आहे हे आम्ही जाणतो. आम्हीच तो चलशब्द बनवून देत असल्याने तो तुम्हास लक्षात ठेवण्याचीही काही आवश्यकता नाही. तुम्ही आम्हास फक्त एक ल.नि.से. (लघू निरोप सेवेने) एक निरोप पाठवा, आम्ही लगेचच तुम्हास तुमचा सध्याचा चलशब्द उलट निरोपाने मोफत पाठवू.
सध्या आमच्याकडे तुमच्यासारखी ४७ गिर्हाईके आहेत. त्यात तुमच्यासारखी मोठमोठी आसाम्या आहेत. काही मुद्रा विनीमय केंद्राचीही मंडळी आहेत. आमची सेवा सध्या विनामोबदला आहे.
आम्ही केवळ मनाच्या समाधानासाठी हा शोक लावून घेतलेला आहे.
पुढेमागे कामाचा विस्तार झाल्यास आपणास या सेवेसाठी नाममात्र मोबदला द्यावा लागेल.
असलीच सेवा आम्ही आ रो ग ('आपोआप रोखमुद्रा गणकयंत्रा') साठीच्या चलअंका साठीही पुरवीत आहोत.
हा प्रतिसाद वाचणार्यांनीदेखील आमच्याशी संपर्क करावा.
आम्हास भेट द्या:
चलशब्दसेवा.कॉम
व्यनि: सेवा@चलशब्दसेवा.कॉम
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
5 May 2010 - 1:24 pm | डावखुरा
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
5 May 2010 - 2:28 pm | पाषाणभेद
निट सापडव बाबा पान. इतरांना सापडते तर तुला का नाही? कॉम्पुटरमध्ये व्हायरस असेल, किंवा कुकीज क्लियर कर. (म्हणजे ताटात वाढलेल्या कुकिज नाही, ब्राउजरच्या!)
सापडेल हो पान.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
6 May 2010 - 2:43 pm | सुधीर१३७
आणि सापडलेलं पान :-
5 May 2010 - 12:02 pm | सुकामेवा
स्वातंत्र्या करिता बलिदान करणार्यांची नावे वापरुन बघा.
उदा. टिळक आणि त्यांची जन्म तारिख असे एकत्र करुन वापरा
5 May 2010 - 2:54 pm | दिगम्भा
खालील दुवा पहावा.
सशक्त पासवर्ड साठी सोपी पद्धत
- दिगम्भा
5 May 2010 - 6:58 pm | मिलिंद
लहान मुलांची नावं देऊ ऩका. नाहीतर असं काहीतरी व्हायच