३. माहेर .. एक आठवण..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
30 Nov 2010 - 7:04 pm

भाग २ - कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस...

१९९३ च्या भुकंपामध्ये ज्या भगीनींची माहेरची घरे उदध्वस्त झाली.. त्यांचे दु:ख मला शब्दात मांडता येणारच नाही परंतु त्या मायेचे छप्पर कोसळलेल्या भगिनींची ही कविता ...

माहेर .. एक आठवण..
आता कोणीच नाहीये तेथे
हा.. आहे तो पडका वाडा
अन ती ओसाड चावडी

माझी शेजारची मैत्रीण
माहेराला जाते तेंव्हा
ओल मन माझ
जात त्या गावाला .. माझ्या माहेराला
त्यास मग पडका वाडा नाही दिसत
की नाही दिसत ओसाड चावडी
त्यास दिसते ते बालपण...त्या वाड्यातील,
मजेशीर गप्पा आणि तो पत्त्यांचा डाव ..त्या चावडीवरील

दिसते नववारीतील आई
गोठ्यातून दुधाची कळशी घेवून येताना
अन दिसते ती बकुळी गाई अन
तीची ती, माझ्या आवडीची चंद्रीका

अन अडखळते माझ मन ही
मी ही अडखळायची तसेच
अप्पांच्या खोलीत जाताना
तोच तो धुंद सुवास अन
अन प्रार्थनेचा आर्त सूर

दिसते मनाला माझ्या
ते अंगण अन माझ्या जिवलग मैत्रीणी
अन त्या सोबत ते चींचेचे झाड
अन त्या खालील आमचा भातुकलीचा डाव

दिसते ती शाळा छोटीशी
अन ते पाटिल गुरुजी
अन दिसते मधल्या सुट्टीत
फ़ळ्यावर ओभड चित्र रेखाटणारी मी...

ओभड चित्र (?) .. मन थार्यावर आल
माहेरच चित्र माझ्या पुन्हा
ओल ते मन, नकळत फ़िरुन आल
अन आठवणींना माझ्याच भिजवून गेल

---- ---- शब्दमेघ ( "स्त्री..भावनांचा प्रवास" या माझ्या डायरी मधुन )

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

30 Nov 2010 - 9:32 pm | प्रकाश१११

ओभड चित्र (?) .. मन थार्यावर आल
माहेरच चित्र माझ्या पुन्हा
ओल ते मन, नकळत फ़िरुन आल
अन आठवणींना माझ्याच भिजवून गेल

छान चित्र रंगवलेयस मित्रा. आवडले.!!

निवेदिता-ताई's picture

1 Dec 2010 - 11:31 am | निवेदिता-ताई

छान ...आवडले