गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग दूसरा

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जनातलं, मनातलं
22 Apr 2008 - 9:31 pm

गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग पहिला

एक दिवशी नंदू माने तालूक्याला गेला असताना त्याची वासूअण्णाशी भेट झाली. बर्‍याच दिवसांनी भेट झाल्यामूळे दोघांनी एकमेकांची ख्याली खुशाली विचारली.बोलता बोलता वासूने नंदूच्या मुलाची (गंपूची) चौकशी केली आणि पोरगं चांगल्या घरात जाऊन पडल्याचा त्याला मनोमन आनंद झाला.कणसेच्या भितीने वासूने आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाला-बाळूला आपल्याजवळ ठेवून घ्यायची नंदूला विनंती केली. बाळू बेकार होता पण तालमीत तयार झालेला बाळु अंगाने चांगलाच भरदार होता. त्याची कामात काहीतरी मदत होईल असा विचार करुन त्याने वासूला होकार दिला आणि बाळूला आपल्या घरी घेऊन आला. 'ही ब्याद आपल्या घरी कशाला' म्हणून नंदूची बायको त्याच्याशी भांडायला लागली,पण गंपूच्या आग्रहाखातर त्यांनी बाळूला आपल्या घरी ठेवून घेतले.

हळूहळू गंपू आणि बाळूची चांगलीच भट्टी जमली.गंपूच्या दिवसभर चालणार्‍या उद्योगांमध्ये बाळू त्याला हातभार लावू लागला. बाळू खोटं बोलण्यात फारच पटाईत होता.विशेष म्हणजे आपल्या शहरातल्या गमती-जमतींच्या नावाखाली तो त्याच-त्याच गोष्टी तिखट मीठ लावून सांगत असे. त्याच्या या खोट्या कथांना वैतागून काही लोक त्याची चेष्टा करु लागले, बाळूने त्यातील एक्-दोन जणांचे दात(त्यांच्याच) घशात घातले तेव्हापासून बाळूच्या कथा 'दंतकथा' म्हणून गोखूळवाडीत प्रसिद्ध झाल्या.आणि बाळूचा बाळासाहेब झाला.(खोट्या कथांना 'दंतकथा' म्हणण्याचा प्रघात ह्याच काळात पडला असावा.-इति भाषातज्ञ) काही दिवसांनी गंपूने बाळूच्या मदतीने गावात व्यायामशाळा सुरु केली.त्याचे नाव त्यांनी 'गोखूळ वस्ताद तालिम' असे ठेवले.

दिवसें दिवस गंपूची प्रतिष्ठा वाढत होती.त्याचा मित्रपरीवार आणि कार्यकर्ता वर्ग वाढत होता. या ना त्या कारणाने गावात आणि तालूक्यात गंपूच्या नावाचे फलक झळकत होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात म्हणून कुठल्यातरी मुद्द्यावर आंदोलन करणे गरजेचे आहे हे गंपूने ओळखले होते. गावाजवळच्याच हाय-वे वर इंदरसिंग नावाच्या पंजाब्याचा 'इंदर दा बार'नावाचा डान्सबार होता.या बारमधे बेकायदेशीररीत्या बारबालांचे नृत्य चालायचे. या मुद्द्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी गंपूने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली.पोलिसांना इंदरसिंगकडून चिरीमिरी मिळत असल्याने त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली.पण गंपूपुढे त्यांचे काही चालले नाही. वेगवेगळ्या 'न्यूज चॅनेल'मध्ये या आंदोलनाच्या बातम्या झळकवायची गंपूने खबरदारी घेतली. शेवटी खूपच बोंबाबोंब झाल्याने पोलिसांनी डान्सबारवर कारवाई केली. गंपूच्या तक्रारीमुळे बार बंद पडला.यामुळे इंदरसिंगने गंपूचा काटा काढायचे ठरवले. गंपूला मात्र या आंदोलनामुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये गंपूला आपल्या पक्षात खेचण्यासाठी चढाओढ सुरु झाली.
इकडे गोखूळवाडीत जत्रेच्या निमित्ताने धामधूम होती. गावातले सगळे रस्ते माणसांनी फूलून गेले होते.गंपू आणि मंडळीही त्यानिमिताने गावात फेरफटका मारायला निघाले होते.त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या इंदरसिंग व त्याच्या भाडोत्री गुंडांनी गंपू आणि कंपूवर सोडा वॉटरच्या बाटल्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामूळे गंपू आणि कंपूने शेजारच्या 'न्यू गोवर्धन अमृततुल्य' या हॉटेलात आश्रय घेतला. इंदरसिंग आणि त्याच्या गुंडांना सरळ सरळ प्रत्युत्तर देणे शक्य नसल्याने गंपूने गनिमी काव्याचा वापर करायचे ठरवले.हॉटेलाची दारे बंद करुन गंपू आणि कंपू तिथेच लपून बसला. अखेर गंपू बाहेर येत नाही हे पाहून इंदरसिंग आणि त्याचे गुंड तिथून निघून गेले. गंपूच्या या प्रसंगावधानाने 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.(या प्रसंगात गंपूचा पळपुटेपणा दिसून येतो-काही टिकाकार)

इकडे गोखूळवाडीचा गंपू आणि बाळू ही वासूची पोरं असल्याची कणसे पाटलाला कुणकुण लागली आणि ज्योतिषाने दिलेली धोक्याची सूचना त्याच्या डोक्यात घुमू लागली.गंपूचे वाढते राजकीय वजन पाहता तो भविष्यात आपले राजकीय वर्चस्व धोक्यात आणु शकतो,याची कणसेला जाणिव झाली. गंपूचा झंझावात रोखण्यासाठी तो योजना आखू लागला. त्यासाठी त्याने आपल्या गटातील सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने 'माथेरान फेस्टीवल'चे आयोजन केले. या निमित्ताने त्याने वेगवेगळ्या मैदानी खेळांच्या स्पर्धा भरवल्या आणि कुस्ती लढतीचे गंपू आणि बाळूच्या 'गोखूळ वस्ताद तालमीला' आमंत्रण पाठवले.गंपूनेही आमंत्रण स्विकारले.

सकाळी -सकाळीच गंपू,बाळू आणि त्यांचे सहकारी व तालमीतील काही मोजकी पैलवान मंडळी माथेरानला निघण्यासाठी तयार झाले.त्यांना निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीवर गावकरी जमा झाले.गंपूची शरीरयष्टी पाहता तो धड परत येईल की नाही या विचाराने गावातल्या पोरी व्याकूळ झाल्या.काही पोरी तर गंपूच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेनेच रडू लागल्या.त्यांना जवळ घेऊन त्यांचे अशृ पुसावे अशी परोपकारी भावना गंपूच्या मनात तरळून गेली,पण सगळ्या गावासमोर हे शक्य नसल्याने आपल्या उदात्त विचारांना गंपूने मनातच दाबून टाकले.काही लोकांनी कुत्सितपणे गंपू आणि त्याच्या सहकार्‍यांवर टिका केली त्यावेळी गंपू आणि मंडळींनी त्या लोकांना बाजूला नेऊन 'नम्रपणे' आपला हेतू समजाऊन सांगीतला.तेव्हा त्यांचेही हृदयपरीवर्तन झाले व डोळ्यात अशृ दाटले. निरोप समारंभ आटपून गंपू आणि मंडळीने माथेरानच्या दिशेने कूच केले.

सबंध माथेरानातच फेस्टीवलच्या निमीत्ताने उत्साह संचारला होता. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कमानी उभारल्या होत्या.ठिकठिकाणी कणसे पाटील आणि त्याच्या सहकार्‍यांच्या जय-जयकाराचे फलक लागले होते.गंपू माथेरानात पोचला असल्याची वर्दी कणसेला मिळाली आणि त्याने आपल्या खास लोकांना कामगिरीवर पाठवले.
गंपू प्रथमच मोठ्या शहरात आल्याने भारावून गेला होता.(गंपूचा स्त्रीलंपट स्वभाव पाहता,तो शहरातील पोरी पाहूनच भारावून गेला असावा-पुनश्च काही टिकाकार)गंपू आणि मंडळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर मारत फेस्टीवल भरवल्या गेलेल्या मैदानाकडे चालू लागले. मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी भव्य अशी कमान उभारली होती.कमानीच्या दोन्ही बाजूला हत्तीच्या दोन भव्य अशा प्रतिकृती उभारल्या होत्या.गंपू आणि मंडळी प्रवेशद्वारातून प्रवेश करणार तेवढ्यात त्यातला एका बाजूचा हत्ती धाडकन खाली कोसळला.प्रसंगावधान राखून गंपूने आधीच बाजूला उडी मारल्यामूळे तो थोडक्यात बचावला.या हलगर्जीपणाबद्दल व्यवस्थापनाला जाब विचारायचाच असा निश्चय करुन गंपू आणि त्याचे सहकारी मैदानात प्रवेश करते झाले.मैदानाच्या एका बाजूला मोठेसे व्यासपीठ मांडले होते.व्यासपीठावर कणसे आणि त्याचे सहकारी बसले होते.व्यासपिठाच्या समोरच कुस्तीचा मंच होता.गंपूला समोर पाहताच कणसेला घाम फूटला,ज्योतिशाचे शब्द त्याला पुन्हा पुन्हा आठवू लागले.त्याने बाजूलाच असलेल्या आपल्या साथीदारांना इशारा केला.गंपू आणि मंडळी जशी कुस्तीच्या मैदानाजवळ पोचली तशा दहा -बारा पैलवानांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.गंपू आणि त्याच्या सहकार्‍यांचे धाबे दणाणले.पण आधीच्या कुस्त्या बघून चेकाळलेले प्रेक्षक स्वतःला पैलवान स्मजत त्यांच्या मदतीला धावून आले.त्यामूळे गंपू आणि त्याचे सहकारी बचावले. या प्रकारामुळे संतापलेला गंपू कणसेकडे तक्रार करण्यासाठी तरातरा व्यासपीठाच्या दिशेने चालू लागला.गंपूला आपल्या दिशेने येताना पाहून आधीच भयभीत झालेला कणसे डोळे फिरवत खुर्चीवरुन खाली कोसळला आणि गतप्राण झाला. शवविच्छेदनानंतर हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्याचे निधन झाल्याचे जाहीर केले गेले.

क्रमशः

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

शितल's picture

5 Oct 2008 - 1:37 am | शितल

हा भाग ही आवडला.
मस्त लिहिले आहेस इनोबा. :)
आधुनिक आणी ऐतहासिक अशी सागंड घालत गंपु छान साकारला आहेस. :)
अजुन लिहुन पुर्ण कर हा भाग.

प्राजु's picture

5 Oct 2008 - 1:52 am | प्राजु

कधी लिहिलास हा भाग??
वाचलाच नव्ह्ता मी. मस्त झालाय की. हरकत नाही... पौराणिक कथा कलियुगात छान रंगवली आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

5 Oct 2008 - 2:25 am | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

खवाट ... माथेरान, कणसे बेष्ट ... चियर्स इन्याभौ .. जबराट .. पहिला भाग ही आत्ताच वाचला .
तुझ्या बागायती डोक्याच्या सुपिकतेला सलाम :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

मदनबाण's picture

5 Oct 2008 - 3:58 am | मदनबाण

इन्या मस्त लिहले आहेस तु.. :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2008 - 7:55 am | पिवळा डांबिस

आयला, मस्त लिखाण रे इन्या!!! हे वाचून झाल्यावर पुन्हा पहिला भाग आणि हे सलग वाचून काढलं......
मर्‍हाटी पिच्चर काढूयात का रे याच्यावर?
तू रायटर कम डायरेक्टर हो.......
आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!):)
मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! :)
(स्वगतः तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! :)देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा!! अगदी "दक्षिणेची" नसली तरी चालेल पण सावळी हवी!!!! नायतर गंपूला बघून, "वासूआण्णा, हा तुमचाच ना?" असं लोकं विचारायची!!!!! आमचा कोकणस्थी रंग नको तिथे आडवा येतो तिच्यायला!!!!:))
कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर!! :))

चावट,
डांबिसकाका

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडाकाका, तुम्ही पहिला भाग नीट वाचलेला दिसत नाही आहे; वासूअण्णा सावळेच आहेत. अर्थात तुम्ही इनोबांना लाच देऊन, पटवून थोडी "सिनेमॅटीक लिबर्टी" घेऊ शकता! ;-)

अवांतरः इन्या, भारी लिवतो आहेस रे, आता पुढचे भागही पटापट टाक. नाहीतर रोज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन! ;-)

अदिती (बाणेर खुर्द)

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2008 - 10:23 am | पिवळा डांबिस

आमचा अभिप्राय कधी दिसतो, कधी दिसत नाही....
हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची?
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 10:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची?
पिडाकाका, यूएस ऑफ ए च्या कोकणातही लोडशेडींग असतं का हो?

टारझन's picture

5 Oct 2008 - 1:29 pm | टारझन

आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!)
एनी टाइम काका =)) कलर तर फुल्टू मॅच होतोच पण पाप्या घ्यायच्या सिन चे कमीत कमी ५०-६० तरी रि-टेक पायचे .. मंग मानधन नाय मिळालं तरी चालेल...
मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!!
आहो त्याच पाकळीने ८ फुलं तयार केलेली ... वासूअण्णा असलात तरी अंघोळ मात्र करा .. नाहीतर जाल नावावर.. पुर्ण कथेत घुसायचात आणि देवकीला नाकाला चिमटा लाउन बसायला लागायचं .. परत त्यामुळे किती काँप्लिकेशन्स होतील ते वेगळंच =))

तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!!
आगायायाया =)) =)) =)) ते च्यवनप्राश स्वर्णभस्मयुक्त आहे का ते चेक करा नाय तर पोपट व्हायचा . बाकी च्यवनप्राश विकत आणायचे कष्ट करण्यापेक्षा कुठून उकिरड्यावरुनच उचलून आणायची ना पोरं .. नाय तरी पुन्हा तिथेच जाणार :) मग कणशाचा पोपट ...

देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा!
मला अर्ध्या सेकंदांसाठी देवकाका चं की काय असं वाटून गेलं, सॉरी शक्तीमान. तसही देवकी मिपा बाहेरचीच घ्या.. याला अनुमोदन .. बाकी पाप्या देणार्‍या पोरी कुठ्ल्या हो घ्यायच्या काकानु ?

कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर!
+१००, लै वेळा असेच म्हणतो, लै लै लै लै सहमत

सावळ्या रामोशी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

यशोधरा's picture

5 Oct 2008 - 10:37 am | यशोधरा

वा, वा!! इणूभाव, तू पण जमात- ए- क्रमशः मधे शामिल का??? लिही पटापटा!!

प्रमोद देव's picture

5 Oct 2008 - 10:56 am | प्रमोद देव

हा भागही मस्त जमलाय.
येऊ दे पुढचा भाग केव्हाही..पण असाच मस्त असू दे! त्यात कोणतीही तडजोड नको.

इनोबा म्हणे's picture

5 Oct 2008 - 4:25 pm | इनोबा म्हणे

खरेतर हा भाग मनासारखा झाला नाही म्हणून अप्रकाशित ठेवला होता. कसा आणि कधी प्रकाशित झाला मलाच माहीत नाही.
तरीही तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. पुढचे भाग देतो लवकरच...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मृदुला's picture

5 Oct 2008 - 9:30 pm | मृदुला

उत्तम चालले आहे.
गोवर्धन अमृततुल्य विशेष.
नम्रपणे हेतू समजावून डोळ्यात अश्रू ...!

आता शिशुपाल, रुक्मिणीहरण वगैरे कसे येते याची उत्सुकता आहे.

आनंदयात्री's picture

6 Oct 2008 - 12:54 pm | आनंदयात्री

आनदो भाय .. जल्दी जल्दी आनदो !!

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 1:14 pm | विजुभाऊ

बाळूने त्यातील एक्-दोन जणांचे दात(त्यांच्याच) घशात घातले तेव्हापासून बाळूच्या कथा 'दंतकथा' म्हणून =))
आपले डॉ.दाढेभाव देतील तालीम हीरोला त्याची.
आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे.
बेष्ट लेख ल्हिलास ..इन्या लेका ही असली माणके झाकुन ठीवतोस व्हय ?
"आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

इनोबा म्हणे's picture

6 Oct 2008 - 3:32 pm | इनोबा म्हणे

आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे.
या प्रतिसादामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडण्याची गरज होती काय? :? आता यावर ही एखादा कौल घ्यायला पाहीजे. :B

"आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ
आपली इच्छा असल्यास आम्ही पुढच्या वेळी 'न झाकता' दर्शन देतो. :)

(दिगंबर) -इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अनिल हटेला's picture

6 Oct 2008 - 3:14 pm | अनिल हटेला

क्या बात है ?

एकदम ढींच्याक ईष्टाईल मधी ईष्टोरी ल्हिवली की राव !!!

येउ द्यात , हवे तेवढे क्रमशः येउ द्यात !!!

पण जरा फटाफट काय !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..