गाभा:
समस्यापुर्ती साठी विषय होता-
"तरिही दिव्यात जिवंत वाती"
ह्या समस्येचे उत्तर म्हणून चार ओळी लिहील्या. ती चारोळीच एक समस्या बनली.
ओळखा, आणि व्य. नि. ने उत्तर कळवा.
पहिल्या बरोबर आलेल्या उत्तराच्या प्रेषकाच्या खरडवहीत "समस्या निवारण मार्तंड" अशी पदवी दिल्या जाईल.
काजळमाया घट्ट दाटती
उर्मी कशा आणि कोटीनी येती
दिसामाजी शतकेही मोजती
तरिही दिव्यात जिवंत वाती!
प्रतिक्रिया
14 Nov 2010 - 6:52 pm | अरुण मनोहर
१०६ वाचनांनंतर एकही उत्तर सापडू नये म्हणजे काय?
दुसरी ओळ लिहीतांना जर्रा टायपो झाला होता. दुरुस्ती देत आहे.
समस्या अशी- ओळखा पाहू!
काजळमाया घट्ट दाटती
उर्मी कशानि कोटीनी येती
दिसामाजी शतकेही मोजती
तरिही दिव्यात जिवंत वाती!
14 Nov 2010 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला कै जमलं नाही. सांगा बरं तुम्हीच उत्तर...!
एक मित्र म्हणतो की सूर्य हे त्याचे उत्तर !
-दिलीप बिरुटे
14 Nov 2010 - 7:58 pm | नगरीनिरंजन
डोळे असावं बहुधा...
14 Nov 2010 - 8:47 pm | रेवती
समुद्र
16 Nov 2010 - 8:02 am | आनंद
रोखपाल