नुकतेच घर शिफ्ट केले. जुण्या घराच्या काही आठवणी लिहावे म्हणत होतो .. पण काही केल्या लिहिताच येइनात.. कीती आहेत त्या आठवणी .. कधी एक गोष्ट आठवते तर लगेच दुसर्या गोष्टीमुळे मन भावुक होते.. त्यामुळे काही निटसे लिहिताच येत नव्हते. तरीही काही तरी लिहित आहे .. व्यवस्थीत नाहीये जास्त पण मनाच्या हळवेपणामुळे नाही लिहु शकत आहे चांगले ..आणि येथेही विचार करुन नाही ..जसे आठवत आहे तसेच शेअर करावेशे वाटत आहे म्हनुन आपणा समोर देतो आहे
---
मी पहिलीत जावु लागलो तेच आमच्या छोट्याश्या पण मस्त घरातुन . शाळा जवळच होती पण रेल्वे लाईन मुळे आई सोडवायला यायचीच पण नेहण्यासाठी यायची ...
घरी आल्यावर छोट्याश्या ताईडी बरोबर खेळण्यात कसा वेळ जायचा कळायचा नाही.
आता घर सोडताना सर्व जागा .. त्यांच्या आठवणी मनात घर करुन राहिल्या आहेत.
तीच ताइडी आता तिला ही गोड असे पिल्लु आहे .. तीच कीती गोड दिसायची.. दात किडकी म्हतारी असे म्हणत आमची होणारी भांडणे .. भातुकली मध्ये तीने माझ्यासाठी घराच्या बागेत केलेली बाभळीच्या पाल्याची भाजी आणि कधी कधी घरातील शेंगदाण्याचा कुट आणि आवर्जुन पाहुना म्हणुन बोलवल्यावर .. पाटावर बसलेला मी अजुन स्पष्ट आठवत आहे.
घर सोडताना, एक जुना पडलेला बॉल पाहुन, पाच रुपये चोरुन रबरी बॉल आणल्याने ५ तास अंगठे धरलेलो मी पण आठवले .. घराच्या रुम्स कमी पडत होत्या म्हणुन शेजारील आर्ध्या बागेत पुन्हा नविन घरासाठी पाया घालतना .. तेथील मोगरा , जास्वंद आणि आमची भातुकलीची जागा मन भरुन पाहुन घेतले होते ..आणि राहिलेल्या आर्ध्या बागेत आता झाडांचीच गर्दी होउ लागली होती ..
घराचा पाया भरताना वडलांनी उचललेले दगड आणि आई ने केलेली मदत अजुन आठवते आहे. घर कसे का असेना पण आई जेंव्हा म्हंटली ना .. ओटा बांधताना आम्ही लांबुन माती आणली होती घम्याल्या मध्ये .. स्वताच्या हाताने बांधलेले घर सोडताना कसे तरी होते आहे .. मला ही तसेच वाटत होते
घराच्या एका एका इंचा मध्ये ही बर्याच गोष्टी दडल्या आहेत. दारात तासा पेक्षा ही जास्त वेळ रांगोळी काढणारी तायडी आठवली.. लहानपणी आई ने टिपक्यांचे कासव काढल्यावर आम्ही वाकडे तिकडे काढलेले मोर आणि कसलेसे प्राणी आठवले .
बागेतील कडेला उभे असलेले नाराळाचे झाड .. आणि जास्वंदाची वेगळी वेगळी फुले असणारी झाडे आमच्याकडे पहात होती. लहान लहान झाडे आम्हाला आता कोण बघणार म्हणुन नाराज दिसत होती.
मला सिताफळ खुप आवडते म्हणुन पुरंधर च्या सिताफळाचे आलेले झाड हळुच माझ्याकडे डोकावत होते..
घरात आवरताना.. सापडलेल्या जुन्या गोष्टी मन त्या त्या काळात न्हेत होत्या.
एक ग्रिटींग सापडले तरी ते वाचताना .. त्याच्यावर फ्रॉम म्हणुन असणारे नाव वाचले की तो काळ त्या आठवणी पुन्हा मनात घर करत होत्या.
इवल्याश्या घरातील २५ वर्षाचा कालावधी डोळ्यासमोर फटकण तरळुन जात होता.
एकदाचा तो दिवस उजाडलाच जेंव्हा आमचे सगळे सामन घेवुन गाडी निघाली ... आई आणि शेजार्यांचय डोळ्यात पाणी होते. समोरच्यांचा मुलगा आई साठी रडत होता. आमचे घर - माझ्या बालपणीच्या सगळ्या गोष्टी अस्याच मागे ठेवुन आम्ही नविन घरी चाललो होतो .
ज्या उरुळी कांचन ला जाताना UK ला जातो आहे म्हणुन मित्रांच्यात हस्या निर्माण करत होतो .. त्या UK सोडुन जाताना माझ्या मित्र , शाळा , कॉलेज च्या आठवणींना बिलगुन मन अगदीच भारावलेले होते .. घर आम्ही विकले नाही त्यामुळे पुन्हा येथे येता येइल त्या काळाला हळुच अनुभवता येइल हाच तो काय आनंद होता .. बाकी या आठवणी अश्याच वेड्या एकदम मन हेलावुन टाकतायेत ..
-- या आठवणी असंख्य आहेत येथे थांबतो .. कारण कवितेत रमणारा मी मला गद्य जास्त जमत नाही म्हनुन थांबतो .. बाकी भावना पोहचल्या असतील अशी आशा करतो ... आणि कधी पुण्याला आला तर आमच्या पुण्याच्या (पिंपळे सौदागर) "पारिजात" मध्ये आपण नक्की यावे अशी विनंती करतो ..
आपला
गणेशा
प्रतिक्रिया
11 Nov 2010 - 9:15 pm | बहुगुणी
बहिणीशी भांडणं, घराचा पाया भरताना आई-वडिलांनी उचललेले दगड, शिक्षा म्हणून आंगठे धरणं, ...सगळं-सगळं आठवणींसकट पोहोचलं.
आणि तुमचं पिंपळे-सौदागरच्या घराचं आमंत्रणही मिळालं, पत्ता कळवा, नक्की येऊ!
11 Nov 2010 - 9:23 pm | रेवती
चांगल्या आठवणी.
भावनेनं ओथंबलेलं लेखन.
11 Nov 2010 - 11:53 pm | पैसा
आपण लहान असताना जिथे राहिलेले असू, ते घर कधीच पाठ सोडत नाही...तर नंतर मनात घर करून रहातं...
पण तरीही, तुझं नवीन घर जसं जुनं होत जाईल, तशी त्याचीही सवय होत जाईल आपोआप...
12 Nov 2010 - 8:40 am | चित्रा
आपण लहान असताना जिथे राहिलेले असू, ते घर कधीच पाठ सोडत नाही...तर नंतर मनात घर करून रहातं...
+१.
लेख आवडला. लेखनाला शुभेच्छा.
12 Nov 2010 - 8:44 am | नगरीनिरंजन
>>आपण लहान असताना जिथे राहिलेले असू, ते घर कधीच पाठ सोडत नाही...तर नंतर मनात घर करून रहातं..
अगदी खरं आहे. मी नववीत असताना आम्ही नव्या घरी राहायला गेलो पण कित्येक वर्षे मी सकाळी उठलो की असं वाटायचं जुन्याच घरात आहे. अजूनही माझं बालपण आठवतो तेव्हा नवे घर डोळ्यासमोर न येता जुन्याच घराच्या आठवणी येतात.
12 Nov 2010 - 1:51 am | इंटरनेटस्नेही
+१
12 Nov 2010 - 2:39 am | माजगावकर
फार छान व्यक्त झाल्यात मित्रा आठवणी तुझ्या.. ओघवतं झालंय लेखन!
12 Nov 2010 - 5:22 am | राजेश घासकडवी
पंचवीस वर्षं राहिलं की घर हे व्यक्तिमत्वाचाच भाग होऊन जातं. त्या आठवणींनी ऊर भरून येऊन या छोटेखानी लेखाची बाराबंदी ताणलेली जाणवते. जमल्यास जुने फोटो गोळा करा आणि प्रत्येक कोपऱ्याविषयीच्या आठवणी अधिक खोलात जाऊन लिहा. वाचायला आवडतील. तुम्हालाही एक देणं चुकतं केल्यासारखं वाटेल.
12 Nov 2010 - 5:29 am | Pain
आठवणी आणि भावना हा वेगळा आणि व्यक्तीसापेक्ष भाग झाला, मला निव्वळ सगळे सामानसुमान आवरून दुसरीकडे न्यायचे हेच कटकटीचे वाटते. पुन्हा सरकारी कार्यालयात पत्ता बदलणे वगैरे सोपस्कार करावे लागतात ते वेगळेच.
12 Nov 2010 - 6:01 am | फारएन्ड
छान लिहीलंय. अजून मोठा लेखही चालला असता.
घराच्या एका एका इंचा मध्ये ही बर्याच गोष्टी दडल्या आहेत. >>> हे मस्त! पूर्वी व्हिडीओ कॅमेरे सर्रास उपलब्ध नव्हते, नाहीतर आपलेच लहानपण, त्यावेळचे वातावरण पुन्हा बघायला काय मजा आली असती!
12 Nov 2010 - 12:41 pm | चिगो
छान लिहीलयंस...
12 Nov 2010 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच.
12 Nov 2010 - 2:12 pm | स्पंदना
आपण घरात रहातो. घरी येतो. घरी जातो. घर म्हणुन राखतो. घरासाठी म्हनुन करतो. मग हे घर आपला एक भाग नाही बनल तरच नवल!
गणेशा तुझ दु:ख अगदी भिडल बघ! छान लिहिल आहेस. अगदी माझ्या तोंडच वाक्य सांगु का? कुणी स विचारल कशाला येतेस? मी उत्तरले भिंतींना भेटायला.