तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे
आता मुकेपणाचा झाला सराव आहे
जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले
आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे
बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला
सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे
आम्ही येथे भुकेले तेही तिथे उपाशी
प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे
गावात आम्ही हरलोच बाजी
सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे
पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या
सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे
प्रतिक्रिया
21 Apr 2008 - 7:52 pm | प्रमोद देव
बिरुटे साहेब तुम्ही छुपे रुस्तम निघालात. एकदम गजल लिहीलीत! तब्येत वगैरे ठीक आहे ना?
प्रयत्न चांगला आहे. फारच निराशावादी सुर लावलाय तुम्ही असे वाटतेय. पण मला त्यात जास्त काही कळत नाही तेव्हा मनावर घेऊ नका बरं का.
आता इथले तज्ञ त्यावर साधक बाधक चर्चा करतीलच. झालंच तर सुचवण्या देतील. तेव्हा तयार राहा मरणाला.(जाल कुठे म्हणा!)
:)))))))))
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
21 Apr 2008 - 11:00 pm | धनंजय
बिरुटे सर,
तुम्ही पुन्हा काव्यस्फुरण आमच्यापर्यंत पोचवू लागलात, ही आनंदाची गोष्ट आहे.
बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच.
(विडंबनाला तयार राहा !! :-)
22 Apr 2008 - 8:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवसाहेब, धनंजय,प्रतिक्रियेबद्दल आभारी !!! 'एका असाहाय तरुणीची जातीय कारणातून झालेली होरपळ' अशा आशयाची रचना गझलेत बांधता येते का ? एक प्रयत्न केला !!! पण ही गझल नसावी असे वाटते. गझलेचे स्वतःची काही वैशिष्टे आहेत. एकतर गझलकार उत्तम कवी असला पाहिजे आणि दुसरी अट की त्याला वृत्तांच ज्ञान असलं पाहिजे. या दोन्हीही अटीत आम्ही बसत नाही !!! :)प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते तेच आम्हाला जमले नसावे असे वाटते. अर्थात गझलप्रेमींची यावर मते येतील, बेहराची साधक-बाधक चर्चा येथील वजनदार गझलकार करतीलच. त्याचीच आम्हीही वाट पाहत आहोत.
22 Apr 2008 - 11:47 am | उदय सप्रे
प्रा.बिरुटे ,
गझल छान आहे , पण याला सुरेश भट यांच्या "एल्गार" या गझलेचा फारच दरवळ आहे .....
या २ शेवटच्या ओळी बघा :
ही जात कोण माझी , जाताच जात नाही
पण "जाती"वादींची , "लोकसभे" त धाव आहे !
पाळू नयेत कोणी जाती-जमाती येथे
सगळ्या गल्लाभरूंचा आरक्षणाचा घाव आहे !
----------------राम नगरकर यांच्या "रामनगरी" मधील वाक्य आठवले : जी जात नाही, ती जात !
22 Apr 2008 - 8:24 am | विसोबा खेचर
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे
आता मुकेपणाचा झाला सराव आहे
या ओळी फारच सुंदर!
क्या बात है बिरुटेशेठ! च्यामारी, तुम्ही इतकं उत्तम काव्य करता हे माहितीच नव्हतं!
अजूनही येऊ द्या!
आपला,
(बिरुटेसरांचा विद्यार्थी) तात्या.
22 Apr 2008 - 3:33 pm | आनंदयात्री
मुकेपणाचा सराव हे भारीच ! येउद्या मस्त मस्त गझला अजुन :)
22 Apr 2008 - 9:05 am | अजय जोशी
जमवा की राव ...
अहो, काही कवी वृत्तबद्ध काव्याशिवाय कशालाच कविता म्हणत नाहीत.
काही कवींच्या मते वृत्तापेक्षा वृत्तीला पहावे.
मला आपल्या काव्यात सचोटी वाटली.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
22 Apr 2008 - 3:14 pm | मदनबाण
बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला
सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे
व्वा क्या बात है डॉक्टर साहेब..... मस्तच.
(गझल प्रेमी)
मदनबाण
22 Apr 2008 - 6:02 pm | शितल
गझल म्हणत नाही पण तुम्ही केलेली रचना, तुम्हाला काय सा॑गायचे आहे ह्याचा उलघडा करते,
कारण, आन॑द समजुन घेण्याच्या अनेक वाटा आहेत , पण दु:खाचे तसे नाही, म्हणुन दर्दी काव्याच्या वाटा फार विरळ.
तुमच्या आणखी काव्य रचना वाचायला आवडतील.
23 Apr 2008 - 10:55 am | विदेश
एकदम उत्तम ,सर!
23 Apr 2008 - 12:04 pm | सूर्य
टेक्नीकली गझल म्हणुन कशी आहे हे सांगता येणार नाही. परंतु अतिशय संवेदनशील कविता आहे हे एक सामान्य वाचक म्हणुन म्हणू शकतो. आवडली सर.
- सूर्य
23 Apr 2008 - 12:59 pm | विसुनाना
बिरुटेसर, पहिलाच प्रयत्न चांगला आहे.
आणखी लिहा.
पु.ले.शु.
23 Apr 2008 - 5:46 pm | शेवटचा बाजीराव
बिरुटे सर, तुमचा पहिलाच प्रयत्न एवढा चा॑गला आहे कि असे वाटत नाही हा तुमचा पहिला प्रयत्न आहे. तुमच्या अजुन काच्यरचना वाचायला आवडतील. जर आशावादी असतील तर अजुन आवडतील.
तुमचा एक विद्यार्थी,
शेवटचा बाजीराव
23 Apr 2008 - 6:02 pm | चतुरंग
भावले. अजून येऊ देत.
पुलेशु.
चतुरंग
23 Apr 2008 - 8:13 pm | स्वाती दिनेश
आतून आलेले काव्य भावले,
असेच म्हणते.
स्वाती
24 Apr 2008 - 8:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गझल शिर्षक असलेल्या पण मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता ( शब्द माहित आहेत हो, उपयोग करता येत नाही ) यांचा कोणताच ताळेमळ नसतांना केलेल्या कौतुकाने प्रा.डॉ. मिसळनवाज खूष झाले आहेत. पुढे जेव्हा गझल लिहू तेव्हा गझलेचे सर्व धर्म पाळण्याचा प्रयत्न करु !!!
प्रमोद देव, धनंजय, तात्या,सप्रेम साहेब,आनंदयात्री, अजय जोशी,मदनबाण,शितल, विदेश,सुर्य, विसुनाना,शेवटचा बाजीराव्,चतुरंग,चित्रा,आणि स्वाती....आमच्या अशा प्रकारच्या पहिल्या वाहिल्या प्रयत्नाला मनापासून दाद दिल्याबद्दल आम्ही आपले आणि वाचकांचेही शुक्रगुजार आहोत.
विशेष आभार :- मिसळपाववर अक्षररंगाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल निलकांतचे, तात्याचे, आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
24 Apr 2008 - 1:34 pm | प्राजु
बिरूटे सर.. यू टू???? :))
आवडली कविता. ..अतिशय सुरेख अर्थ..
गझल लिहिण्याचा मी ही कित्येक दिवस प्रयत्न करते आहे पण जमत नाहिये... पण नक्की जमेल एकेदिवशी...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Jan 2011 - 9:33 pm | निखिल देशपांडे
बिरुटे सर गझल करतात हे माहित नव्हते.
गझल आवडली.
(जुने धागे उचकटत असताना सहजच सापडली. नवीन लोकांच्या वाचनात आली नसेल म्हणुन सहजच वर आणली.)
3 Feb 2011 - 6:06 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद निखिलजी.
यानिमित्ताने बिरुटे सरांचे काव्य वाचायला मिळाले.