युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 Oct 2010 - 11:26 pm

बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?
मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
ह्या वर्गात आडवे बेंचेस ठेवू
उभं रहायला उंच प्लॅटफॉर्म करू

मास्तरीणबाई:
समोर टेबल अन आहे खुर्ची बसायला
डस्टर द्या मला, नाही वापरत कापडी बोळा

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
दरतासाला मी हो हजेरी मुलांची घेईन
सार्‍या मुलांना मी लाईनीनं उभं करीन

मास्तरीणबाई:
भरलेली शाळा खुपच आवडते मला
वर्ग कधीच ठेवणार नाही मोकळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
प्रयोग करायसाठी आहे ही प्रयोगशाळा
बाजूलाच उभी केली व्यायामशाळा

मास्तरीणबाई:
कृषीशाळेत घेतला मी हाती विळा
तण काढून दाखवले मी कितीक वेळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
हि घंटा मी अशी हातात पकडीन
शाळा सुटायची घंटा मी वाजवीन

मास्तरीणबाई:
चला शिकवू दोघे मिळून मुलांना
आता मुले झालीत शाळेत गोळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/१०/२०१०

शांतरसकवितानोकरीशिक्षण

प्रतिक्रिया

गणेशा's picture

15 Oct 2010 - 2:24 pm | गणेशा

मस्त कविता ..
शांतरस नसुन हास्य रस पण आहे ही कविता

अवलिया's picture

15 Oct 2010 - 2:26 pm | अवलिया

>>>>बाई इथंच ठोकू का हा खिळा?

बाई इथंच ठोकू का हा हिला ? असं वाचलं .. दचकलो... !!

ठोकू म्हणजे मार या अर्थाने आहे.. उगाच वेगळे विचार मनात आणु नये ही विनंती.

अवलिया's picture

15 Oct 2010 - 2:32 pm | अवलिया

अरे हो... गीत बेस्ट!!! जियो !!

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 2:37 pm | रन्गराव

>>ठोकू म्हणजे मार या अर्थाने आहे.. उगाच वेगळे विचार मनात आणु नये ही विनंती.

ह्या तुमच्या नम्र विनंती मुळे आता उगाचाच वेगळा विचार करनण्यास प्रवृत्त केले आहे :) नवीन दृष्टीकोन समोर ठेवून पून्हा एकदा कविता वाचली. मज्जाच मज्जा ;)

मेघवेडा's picture

15 Oct 2010 - 2:31 pm | मेघवेडा

=)) =))

पाषाण्या पाषाण्या.. लै भारी रे बाबा!

हा दगडफोड्या एक.. काय कशावर गाणी लिहील सांगता यायचं नाही!

परिकथेतील राजकुमार's picture

15 Oct 2010 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

मेव्याशी सहमत आहे बॉस !!

खल्लास खिळा आवडला

नान्या तुला आवरायला कोणालातरी पाठवु का रे ?

प्रभो's picture

15 Oct 2010 - 6:35 pm | प्रभो

पुणेरी पर्‍याशी सहमत..!!!

नगरीनिरंजन's picture

15 Oct 2010 - 2:33 pm | नगरीनिरंजन

:) शांतरसातले गीत वाचून शांत वाटलं.

नितिन थत्ते's picture

15 Oct 2010 - 2:53 pm | नितिन थत्ते

माझे आवडते शाहीर दादा कोंडके यांची प्रकर्षाने आठवण झाली. (काही कडवी वाचताना). ;)