भसभसून उसळे नरड्यामधुनी धार

Primary tabs

शहराजाद's picture
शहराजाद in जे न देखे रवी...
8 Oct 2010 - 12:58 pm

प्रियाली यांच्या भेसूर अमानवी काव्याच्या धाग्यावर बऱ्याच भारतीय भुताखेतांच्या कविता आलेल्या दिसल्या. ही एक कविता अभारतीय पिशाच्चांची. मूळ प्रेरणा मर्ढेकरांची कविता (खाली उद्धृत केली आहे)

भसभसून उसळे नरड्यामधुनि धार
हे तुषार केसर रक्तथेंब अलवार
चाटीत तयांची खारट मादकता ती
कुणी करतो ओले ओठ पुनेच्या राती

नाजूक कंठ तो कुमारिकेचा गौर
रसरसते यौवन मदिर रुधिर ते और
तो दुरून येई सावज-गंधित वारा
अन् उडति वाघळे वाड्यामधुनि भरारा

परी फटीत दिसता सूर्यकिरण गगनात
राहते मनातिल मृगया हाय मनात
पेटीत ड्रॅक्युला स्वप्न पाहतो लाल
भीती न तयाला वाढे कोलेष्ट्राल

मूळ कविता
कवी - बा. सी. मर्ढेकर.

फसफसून येतो सोड्यावरती गार
हा तुषार केसर फेसगेंद अलवार
हुंगीत तयाची खारट मादकता ती
कुणी करतो ओले ओठ इथे मध्यान्ही

घाशीत कंठतो काळ मनातिल खरडे
फुंकीत धुराचे एकलकोंडे कोडे
तो हळूच येई रांगत फाल्गुन वारा
अन् गळती वेफर झाडावरुनि भरारा

परी खिशात जाता चवलीसाठी हात
राहती मनातिल वेफर हाय मनात
गुर्मीत इराणी स्वप्न पाहतो ऐसे
स्वप्नातही स्मरतो सोड्याचे पै-पैसे

भयानकबिभत्सअद्भुतरसकविताविडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 Oct 2010 - 1:03 pm | श्रावण मोडक

आज काही खरं नाही!

बेसनलाडू's picture

9 Oct 2010 - 1:32 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2010 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोलेष्ट्राल हा शब्द हृदयाला भिडला! ;-)

मेघवेडा's picture

8 Oct 2010 - 1:25 pm | मेघवेडा

कोलेष्ट्राल हा शब्द हृदयाला भिडला नि धमन्या तडतडल्या! ;)

विजुभाऊ's picture

9 Oct 2010 - 9:11 pm | विजुभाऊ

कोलेष्ट्राल
आहे की नाय भरभक्कम शब्द आन लोक म्हन्तात की कोलेती बिघदली म्हणून ;)

नितिन थत्ते's picture

8 Oct 2010 - 1:15 pm | नितिन थत्ते

शीर्षक वाचून हे 'म्यानातुन उसळे'चे विडंबन आहे असे वाटले होते.

पण एकदम भन्नाट विडंबन.

पैसा's picture

8 Oct 2010 - 2:10 pm | पैसा

शीर्षक वाचून त्याच अपेक्षेने धागा उघडला. पण हे प्रकर्ण वेगळं निघालं!

ज्ञानेश...'s picture

8 Oct 2010 - 1:26 pm | ज्ञानेश...

एक नंबर.
अतिशय दर्जेदार विडंबन केलेत.

अभिनंदन.

चित्रा's picture

8 Oct 2010 - 5:00 pm | चित्रा

मस्त विडंबन.

सहज's picture

8 Oct 2010 - 1:27 pm | सहज

मस्त!

चेतन's picture

8 Oct 2010 - 1:44 pm | चेतन

मस्त जमलय

लै भारी ! भयालीतैंना इनंति की या विडंबनाबद्दल शहराजादभौंचे कवट्यांची माळ घालून मसनातल्या पिंपळाखाली समस्त भूतसमुदायातर्फे सत्कार कर्न्यत येवा !

शहराजाद's picture

8 Oct 2010 - 11:50 pm | शहराजाद

कवटी माळा गळा करि ठेवी कवटी |
कसचे पितांबर, रुधिरे लवथवती ||

माझे साजिरे रुप डोळ्यापुढे उभे राहिले!

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2010 - 1:59 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! मस्त जमलंय एकदम.

अवांतरः लागण झाली तर विडंबन रोगाची. ;)

नावातकायआहे's picture

8 Oct 2010 - 2:27 pm | नावातकायआहे

'मी हजार चिंतांनी डोके खाजवतो' गाण्याच्या कडव्यांच्या चालीत हे विडंबन परफेक्ट फिट्ट बसतय.
ट्राय मारुन बगा...आणि ह्या विडंबनाला फिट्ट अस ||ध्रु|| द्या...

शहराजाद's picture

8 Oct 2010 - 3:00 pm | शहराजाद

हे गाणं कुठलं? लिंक दिली तर वाचायला आवडेल.
मूळ कवितेला मर्ढेकरांनी ध्रूपद दिले नसल्यामुळे मीदेखील दिलेले नाही.

संदीप खरेंची कविता, सलील कुलकर्णींचे संगीत. छान म्हणले आहे. माझ्या माहीतीप्रमाणे जालावर उपलब्ध नाही...

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

शहराजाद's picture

10 Oct 2010 - 10:58 am | शहराजाद

छान आहे गाणं. माहिती करून तिघांचे दिल्याबद्दल आभार.
अशा छानशा गाण्याशी ओळख व्हायला निमित्त मात्र झाले ड्रॅक्युलाचे :)

वावावा!!!!!

क्या कहने!

साक्षात आमच्या लाडक्या ड्रॅक्युलाला काव्यात स्थान मिळाले. आत्मा तृप्त झाला.

पुष्करिणी's picture

9 Oct 2010 - 12:07 am | पुष्करिणी

मस्तच..:)

विकास's picture

9 Oct 2010 - 12:52 am | विकास

घामाने डबडबून गेलो आहे! :-)

प्रियाली's picture

9 Oct 2010 - 12:55 am | प्रियाली

घामाने डबडबून गेलो आहे!

काळजी करू नका. इथला हैदोस बघून सर्व भुतेच "भीमरूपी महारुद्रा" आळवत असणार. ;)

प्रभो's picture

9 Oct 2010 - 12:55 am | प्रभो

लैच भारी!!!

शहराजाद's picture

9 Oct 2010 - 1:58 pm | शहराजाद

प्रतिसादांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.

अविनाशकुलकर्णी's picture

9 Oct 2010 - 2:18 pm | अविनाशकुलकर्णी

जानव्याच्या गाठीला धरुन हल्ली मिपा क्लिकावे लागते....कुठल्या घाग्यावर काय निघेल ते सांगणे कठिण आहे.

जानव्याच्या गाठीला धरुन हल्ली मिपा क्लिकावे लागते....
नाहीतर धागे वाचून जानवे कानावर जाते ;)