सुरूवात कुठून करावी आणि कशी करावी हा स्वाभाविक प्रश्न पडलाच आहे, तरीपण नोकरी(की चाकरी जे हवे ते म्हणा!!!)ला लागल्यानंतरपासुन सुरू करतो.
तर मला बर्याच कटु प्रयत्नानंतर हवी तशी नोकरी मिळाली.इथे पुण्यात आल्यावर एकच प्रश्न कायम पडायचा की मीच काय पाप केलंय की मला एकही मैत्रिण नसावी. काय उपयोग अश्या आयुष्याचा जिथे एक मैत्रिण नसावी. मग अर्थातच मी आपला चॅटिंग मधे रममाण रहायला लागलो.अशीच २ - ३ मैत्रिणी मिळाल्याही पण अशी एक पण नाही.
अचानक एकदा एक जुना कॉलेजचा मित्र चक्क online दिसला. मग काय दिल्या खंडिभर शिव्या....(प्रेमानेच हं)
आणि एकदम तो म्हणाला तो मी नव्हेच!!!!!!!!
म्हणल गप रे xxx, तुला मी कॉलेजपासुन ओळखतो, मलाच शेंडी लावू नकोस. तर अचानक मेघगर्जनेप्रमाणे chat window मधे अक्षरे उमटली. "मी त्याची मैत्रिण आहे!!!! तो इथे नसतो, त्याच्या mails चेक करतेय."
मी clean bold..... Ice Cold
काय बोलावे ते सुचेना. आता मी काही मुळचा पुणेकर नाही, त्यामुळे माझे घाबरणे स्वाभाविकच होते.
तरीपण उसन्या अवसानाने म्हणले "Sorry ! मला वाटले माझा मित्रच आहे. त्यामुळे आनंदाच्या भरात जरा बेभान होउन उद्धार केला!!" तर पलिकडून उत्तर आले "हरकत नाही. मी पण तेच करते."
तेव्हा मग नंतर माझी चौकशी झाली. मग तिने माझा नंबर मागितला. म्हणाली मी miss call देते. त्या कॉलची मी २ तास वाट पाहिली. पण माझे अधुरे स्वप्न काही पुर्ण होण्याच्या मार्गावर दिसत नव्हते.
आणि अचानक ४ दिवसानी एक कॉल आला. एक मुलगी (होय चक्क एक मुलगी) बोलली, "उत्कर्ष??? "
मी एव्हाना मागचा संदर्भ विसरलोदेखिल होतो. दबकत म्हणालो
"हो ... मीच बोलतोय. आपण कोण?"
"मी xxx , आपण परवा बोललोत ना!!!!"
"अच्छा !!! मला वाटले, तु विसरली पण असशील."
मग इकडच्या ति़कडच्या गप्पा झाल्या.त्यात तिचा एक भाऊ (दुरचा) माझ्याच कंपनीत होता.
मग त्याची ओळख निघाली.मग असच calling जवळ जवळ ३ महिने चालू होते.हळु हळु मला पण एक छानशी मैत्रिण मिळत होती. एकमेकांचे problems ऐकणे , त्यावर सल्ले (फुकट!!) देणे हे चालू होतेच.
मग एक दिवस तिने विचारले,
"तु राहतोस कुठे???"वेळ रात्रीची ८.३०.
"मी कोथरुड ला. सांगितले होते ना तुला. माझ्या मामाचा flat आहे. "
"आता जमेल का भेटायला? मी माझ्या मामाकडे आहे. XYZ Colonyत"
" अग पण मला नाही माहित कुठे आहे. मी नाही अजुन पुण्यात एवढा फिरलेलो!!!"
"अरे कोथरुड मधेच आहे."
"जवळपासची मोठी खूण सांग ना"
"अंअअ इथे ना IDBI ची बँक आहे बघ. आणि हॉटेल पण आहे."
"बास एवढच अग अजुन सांग ना"
"तुला दुर्गा कॅफे माहित आहे?"
"नाहि ग........"
"जाउ दे मग!"
मग मी विचार केला. काढुयात शोधुन्.आणि म्हणले येतो मी. घरी सांगितले आलो मित्राला भेटुन.गावाकडुन आलाय...
मग रिक्षावाल्यांची मदत घेत पोहोचलो एकदचा XYZ Colonyत!!!
.
.
.
.
.
.
दमलो टंकुन...... बाकी परत जर आवडलेच कोणाला!!!!!!!!
(क्रमश...)
प्रतिक्रिया
28 Sep 2010 - 12:05 am | नेत्रेश
वाचतोय. अजुन येऊदे.
28 Sep 2010 - 12:15 am | शिल्पा ब
अजुन थोडं वाचुन बघु कुठे जातेय गाडी...मग ठरवणार आवडलं का नाही ते..
येउ द्या पुढचा भाग.
28 Sep 2010 - 3:04 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>मग ठरवणार आवडलं का नाही ते..
लेखाचे नंतर बोलू, मात्र वरील वाक्य सर्वात जास्त आवडले (हे माझे आत्ताच ठरवून झाले आहे).
बाकी लेख वाचतो आहे. उत्कंठा निर्माण करण्यात उत्कर्ष यशस्वी झाले आहेत हे नक्की. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
28 Sep 2010 - 3:22 am | बकुळी
अजुन थोडं टाकल असत तर ठरवता आल असत...
अवान्तर : अनुस्वार कसा देतात हो... ???
28 Sep 2010 - 3:44 am | नेत्रेश
मोठा एम (M)
28 Sep 2010 - 4:36 am | शुचि
उत्कंठावर्धक
28 Sep 2010 - 5:55 am | नगरीनिरंजन
चांगलं आहे. बिनधास्त लिहा. आवडलं नाही तर प्रतिक्रिया येणार नाहीत एवढंच, आवडलं तर कौतुक करायला कोणी मागेपुढे पाहणार नाही आणि प्रक्षोभक वगैरे असेल तर संपादक समर्थ आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे लिहा.
बादवे,
>>आता मी काही मुळचा पुणेकर नाही, त्यामुळे माझे घाबरणे स्वाभाविकच होते.
अशी प्रतिसादखेचक वाक्यं वापरल्याबद्दल सौम्य णिषेद. ;-)
28 Sep 2010 - 11:08 am | चिगो
आता मी काही मुळचा पुणेकर नाही, त्यामुळे माझे घाबरणे स्वाभाविकच होते.
झालात, झालात तुम्ही "खेचक" ! चांगलं लिहीताय. पुढे वाचायला आवडेल.
28 Sep 2010 - 11:26 am | टुकुल
च्यायला गाडी चालु होण्याआधीच बंद पडली, पुढे काय झाल ते लिव्हा लव-कर
--टुकुल
28 Sep 2010 - 11:44 am | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा.. एका जालकाकांचा मुलिच्या नावाने चँटिंग करून स्वतःच्या मित्राला भेटायला बोलवून त्याची फजिती बघणे हा उपक्रम आठवला. :)
चालूद्या. मधल्या त्या ठिपक्यांऐवजी काही कंटेंट लिहीले असतेत तर जास्त आवडले असते.
28 Sep 2010 - 11:49 am | अब् क
येउ द्या पुढचा भाग.
28 Sep 2010 - 12:11 pm | कवितानागेश
ठिपक्यांऐवजी काही कंटेंट लिहीले >>>>>>>>>>
ते ठिपके पुण्यातल्या रिक्षाच्या प्रवासाचे असावेत...............
28 Sep 2010 - 6:38 pm | गणेशा
एकदम मस्त लिहित आहात ...
लवकर पुढचे लिहा ...