ईंग्लिश व्याकरणाबाबत मदत हवी आहे Expla'i'nation का नाही?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
26 Sep 2010 - 8:06 pm

'explain' ह्या क्रीयापदाला '-tion' हा प्रत्यय(suffix) लावताना 'explaination' असे न होता 'explanation' का होते?
'n' च्या आधी 'i' हे vowel असल्यामुळे एखादा नियम लागु झाला असावा अस वाटत्,पण गुगलवर काही माहीती मिळाली नाही.म्हणुन ईथे आपणास विचारतो आहे.

मला खुप दीवसांपासुन हा प्रश्न होता.मधे हा प्रश्न मनातुन अनुत्तरीतच(?) राहुन निघुन गेला,पण आज पुन्हा लक्षात आला तेव्हा रहावले नाही.

कृपया माहीतीगारांनी शंका दुर करावी.

भाषामाहिती

प्रतिक्रिया

सुनील's picture

26 Sep 2010 - 8:34 pm | सुनील

... ह्याला Explanation नाही!

शानबा५१२'s picture

26 Sep 2010 - 9:07 pm | शानबा५१२

'hairs are' न होता 'hair is' होत,ह्याला कारण आहे,तसे सर्वच गोष्टींना आहे.

बाकी 'पिंग' हे 'पिन्ग' अस वाचतात मग 'सिंह' हे 'सिन्ह' असे न वाचता 'सिम्ह' का वाचतात?

सुनील's picture

26 Sep 2010 - 9:14 pm | सुनील

आवो, बोलून चालून भाषा आहे ती! गणितासारखी २+२=४, अशी थोडीच चालणार आहे?

कुठल्या हिंदी चित्रपटात आहे ते - To टू, Do डू पण Go ......?

असो, GHOTI ह्या शब्दाचा उच्चार काय होतो?

शानबा५१२'s picture

26 Sep 2010 - 9:27 pm | शानबा५१२

ह्या शब्दांना अपवाद वगैरे म्हणत असावेत व ह्यांना काही कारण नसावे पण मी विचारलेल्या प्रश्नांना कारण आहे.'सिम्ह'च का ह्याचे उत्तर मी विसरलो आहे,पाचवीत असताना माहीती झाले होते.

कृपया 'माहीत्या' मिळवुन उत्तर द्यावे.

- आर.आर. आबा

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Sep 2010 - 2:41 am | विश्वनाथ मेहेंदळे

हे वाचा http://misalpav.com/node/13608
त्यात अजून एक दुवा आहे, तो पण वाचा.

विजुभाऊ's picture

26 Sep 2010 - 9:38 pm | विजुभाऊ

GHOTI ह्या शब्दाचा उच्चार काय होतो?

GHOTI चा उच्चार फिश असा करता येतो

श्रावण मोडक's picture

27 Sep 2010 - 8:10 pm | श्रावण मोडक

अट्टल मासेखाऊ पहा तुम्ही. इथेही मासाच दिसावा!

मराठी वाचताना एखा शब्दाच्या अगोदरच्या शब्दावर अनुस्वार असेल तर नियमाप्रमाणे नन्तरच्या शब्दाच्या गटात असलेले सानुनासीक अक्षर उच्चारात येते
उदा : ट ठ ड ढ ण
या मुळे खन्ड असे न उच्चारता खण्ड असे उच्चारले जाते. तसेच पिंग या शब्दाचा उच्चर पिङ्ग असा होतो
क ख ग घ ङ या ह टा मुळे गंगा हा शब्द गन्गा असा न उच्चारता गङ्गा असा उच्चारतात
त थ द ध न य गटा मुळे दंत हा शब्द दन्त असा उच्चारतात
य र ल व स श या गटात अनुनासीक नाही त्यामुळे सिंह या शब्दाचा उच्चार सिम्व्ह असा होतो. त्या अपभ्रंश सिंघ असा देखील होतो.
इंग्रजी भाषेत एम आणि एन हे दोनच अक्षरे अनुनासीक म्हणून येतात त्यामुळे मराठीतले अनेक उच्चार इंग्रजीत होत नाहीत.
अर्थात हे प्रत्येक भाषे बाबत होतच असते.
मराठीतला ज्ञ या अक्षराचा गुजराती उच्चार ग्न असा होतो. तर हिंदी उच्चार ग्य असा होतो.

शानबा५१२'s picture

27 Sep 2010 - 8:30 am | शानबा५१२

खुप खुप धन्यवाद,
ही मीहीती पहील्यांदाच समजली.

सानुनासीक अक्षर हे अस काही ईंग्लिशमधे असेल असे वाटत नाही.

म्हणुन माझा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

डावखुरा's picture

27 Sep 2010 - 12:44 am | डावखुरा

सिम्व्ह असा उच्चार करताना खुपदा ऐकलंय...
आणि ज्ञ चा उच्चार गुजरातीत ग्न होतो त्यासाठी उदा.. जिग्नेश..हाच शब्द मराठीत जिज्ञेश असा उच्चारला जातो...
बाकी Explanation की Explaination हा घोटाळा अमेरिकन आणि ब्रिटीश्,फ्रेन्च अशा प्रचलित असणार्‍या अ‍ॅक्सेंट पध्दतीमुळे होत असावा...

शानबा५१२'s picture

27 Sep 2010 - 8:37 am | शानबा५१२

अ‍ॅक्सेंट चा व ह्याचा काही संबंध नाही.

अमेरीकेत प्रचलित असणारे पण मुळ वेगळे असणारे शब्द.

aluminium - aluminum

metre - meter

centre - center

असे खुप आहेत.

माझा प्रश्नाबाबत एखादा नियम लागु होतो जो मी शोधत आहे.

इंटरनेटस्नेही's picture

26 Sep 2010 - 10:17 pm | इंटरनेटस्नेही

आमला विंग्रजी मधलं काय बी कलना बघा.. पुढील चर्चेस शुभकामना.

(घाटी)

पैसा's picture

26 Sep 2010 - 11:58 pm | पैसा

"सायबाची भाषा सगळ्यात मूर्ख" असं कोण त्यो जार्ज बर्नाड शा काय कोण त्यो सायब म्हणत व्हता म्हनं!

explanation मध्ये आय घालू नये असे दादा कोडके सांगून्शान गेले आहेत

धनंजय's picture

27 Sep 2010 - 2:13 am | धनंजय

आणखी काही उदाहरणे :

exclaim -> exclamation
pronounce -> pronunciation

वेगळ्या प्रत्ययाची आणखी उदाहरणे :
prevail -> prevalence
abound -> abundance
explain -> explanatory

(पुढील उदाहरणात दुहेरी स्वर स्पेलिंगमध्ये नाणवत नाही, पण उच्चारात दुहेरीचा एकेरी झालेला स्पष्ट कळतो -)
incline (इन्क्लाइन) -> inclination (इन्क्लिनेशन)

अशा परिस्थितीत दुहेरी स्वराच्या जागेवर एकेरी स्वर येतो, हा बदल हे इंग्रजीमध्ये नियमितच आहे.

शानबा५१२'s picture

27 Sep 2010 - 8:42 am | शानबा५१२

incline (इन्क्लाइन) -> inclination (इन्क्लिनेशन)

spelling बदलल्याने उच्चार बदललेत.ह्या बदलात e काढुन ation लावावे हा नियम आहे.अधिक माहीती मिळवत आहे.

ह्यासारखाच नियम explain ह्या शब्दाला लागु होत असावा.

धन्यवाद,उत्तराच्या जवळ आलो आहोत.आपणही प्रयत्न(विचारपुस) करा.

उच्चार वेगळा असल्यामुळे स्पेलिंग वेगळे आहे.
भाषेत ध्वनी=उच्चार हा आधी असतो. स्पेलिंग हे नंतर असते.

आणि तुम्ही म्हणता तो नियम : "पुढल्या 'e'मुळे आदल्या स्वराचा उच्चार 'मोठा' होतो" यापेक्षा व्यापक आहे.
"पुढल्या निराघात स्वरामुळे आदल्या स्वराचा उच्चार 'मोठा' होतो" असा आहे.
बघा : incline (इन्क्लाइन) -> inclining (इन्क्लाइनिंग) येथे पुढे 'e' नसून निराघात 'i' आहे. म्हणून आदल्या 'i'चा उच्चार 'मोठा' आहे.

तसेच climax (क्लायमॅक्स) येथे पुढील निराघात 'a' आहे. म्हणून आदल्या 'i'चा उच्चार 'मोठा' आहे.

इंटरनेटस्नेही's picture

27 Sep 2010 - 3:37 am | इंटरनेटस्नेही

मिसळपाव वर व्याकरण हा शब्दच मुळात अस्थानी आहे!

(सडेतोड)

इन्द्र्राज पवार's picture

27 Sep 2010 - 11:06 am | इन्द्र्राज पवार

(श्री.धनंजय यांचाच प्रतिसाद पुढे नेत आहे....)

इंग्लिश व्याकरणाच्या नियमांची जंत्री देताना एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे सोमवारचा रूल सोमवारला लावला म्हणजे तो मंगळवारलादेखील चालेल असे होत नाही. याला कारण म्हणजे या भाषेच्या वापरातील लवचिकता (Flexibility) जी जवळपास जगात सर्वत्र वापरात आहे. त्यामुळे प्रारंभ-प्रत्ययाचा रूल उत्तरगामी प्रत्ययाला का लागू होत नाही ही शंका निघत नाही. असो.

'explain' ह्या क्रीयापदाला '-tion' हा प्रत्यय(suffix) लावताना 'explaination' असे न होता 'explanation' का होते?

~~ असे न होण्यामागे भाषेत असा नियम (वा धारणा म्हणू या हवे तर...) की ज्यावेळी 'Consonant' ने क्रियापद संपते आणि त्या Consonant च्या अगोदर स्पेलिंगमध्ये लागोपाठ दोन 'Vowels' येत असतील तर '-tion' हा उत्तरगामी प्रत्यय लावताना त्याचे रुपांतर “-ation” मध्ये करावे आणि मूळ क्रियापदातील 'Consonant' च्या अगोदरचे एक 'Vowel' कमी करावे (इथे 'i' चा लोप झाला.)

~~ 'Maintain' या क्रियापदाचे 'Maintenance ' असे नामात रूपांतर होताना हाच नियम लागू होतो.

इन्द्रा

(जाता जाता या संदर्भातच, पण थोडेसे अवांतर ~~ खुद्द बीबीसीवर ग्रामरच्या किचकट स्वरूपाविषयी एकदा सखोल चर्चा झाली होती. त्याचा विषय होता "Schools to rethink 'i before e" (चर्चेतील तज्ज्ञांनी जी उदाहरणे दिली तीत आपल्या रोजच्या वाचनातील "Receive, Seize, Caffeine, Ceiling, Science, View, Piece, Species, Eight, Thief, Beige, Field" या सम शब्दांचा वापर करताना 'ई' ला किती व का महत्व द्यावे हाच कळीचा मुद्दा झाला होता. ~~ यावर पुढे केव्हातरी इथे चर्चा व्हावी असे वाटते.)

धनंजय's picture

27 Sep 2010 - 7:34 pm | धनंजय

वरती दिलेला नियम जवळजवळ बरोबर असावा.

बहुधा नियमाची व्याप्ती फार मर्यादित होते आहे. "-tion" वेगळ्या अन्य प्रत्ययांनासुद्धा हा नियम लागू आहे. बघावे : explain -> explanatory येथे वेगळ्या प्रत्ययाच्या ठिकाणी हाच बदल होतो आहे.

आणि उच्चाराऐवजी स्पेलिंगकडे लक्ष दिल्यामुळे व्याप्ती थोडीशी अयोग्यही होत आहे.
detain -> detention
retain -> retention
(येथे आघात त्याच ठिकाणी राहिल्यामुळे एकेरी स्वर वेगळा आहे. व्युत्पत्तीच्या दृष्टीने detention मधील स्वर अधिक प्राचीन आहे. परंतु इंग्रजीपुरते बोलायचे झाले तर 'detain' हे मूळ रूप आणि त्याला जोडलेला '-tion' हा प्रत्यय मानायला काहीच हरकत नाही.)
शिवाय :
contain -> continence
abound -> abundance

(येथे पाणिनीचे संस्कृतबाबत निरीक्षण सामांतर्यामुळे उपयोगी ठरावे : "एच इग्घ्रस्वादेशे" -> 'ए'/'ऐ'चे ह्रस्वरूप 'इ' आहे, आणि 'ओ'/'औ'चे ह्रस्वरूप 'उ' आहे. इंग्रजीमध्ये साघात ह्रस्वरूपे जशीच्यातशी असतात. पण निराघात ह्रस्वरूपे पाणिनीच्या या जोडणीने दिली जातात.)

शानबा५१२'s picture

27 Sep 2010 - 7:40 pm | शानबा५१२

खुप खुप आभार पवारसर,

आता एक विनंती ह्या माहीतीचा स्त्रोत कळेल का?
एखादे पुस्तक असल्यास सांगावे.

मिपावर पहील्यांदा अपेक्षित मदत मिळाली.

विजुभाउ,धनंजय आपले व ईतर सर्वांचे आभार!

धनंजय's picture

27 Sep 2010 - 9:30 pm | धनंजय

"फोनोटॅक्टिक्स" बघा.

इंग्लंडातील बोलीतील उच्चारांशी/स्पेलिंगांशी संबंधित विकीलेखसुद्धा चांगलाच आहे. त्यातील बहुतेक मुद्दे अमेरिकन बोलीतल्या उच्चारांना/स्पेलिंगांना लागू पडतात.

नगरीनिरंजन's picture

27 Sep 2010 - 12:18 pm | नगरीनिरंजन

शिवाय unexplanable बरोबर की inexplicable?