"नैनिताल" भटकंती भाग १

jaypal's picture
jaypal in कलादालन
26 Sep 2010 - 10:39 am

१० ते २० फेब्रुवारी २०१० दर्म्यानच्या नैनिताल, अल्मोरा, कौसानी, जागेश्वर आणि हरीद्वार या भटकंतीचे काही फोटो आपल्या बरोबर शेअर करतोय. प्रयत्न गोडमानुन घ्यालच :D . दिल्ली वरुन नैनिताल्ला गेल्यावर ढगाळ वातावरणानी आणि गारा युक्त पावसाने हिरमोड केला होता पण तरीही त्यातल्यात्यात चान्स मारलाच. खुप फोटो असल्याने काही भागां मधे ही मालिका सादर करतोय.
हवेतील धुकं आणि लेन्सवर जमणार बाष्प या मुळे फोतो थोडे धुसर आले आहेत ;-(
१. मी एक भटक्या
1

२. या तळ्या काठच्या नैनादेवी मंदिरावरुन या ठिकाणाला नैनिताल हे नाव प्राप्त झालं. ताल = तलाव. मंदीर तस लाहानच आहे पण ही मशिद मात्र खुप आवाढव्य आहे.
2

३. नैनितालच्या परीसरातील भटकंती
3

४. डोंगर उतारावरील (भात?) शेती
4

५.
5

६.
6

७.
7

८.
8

९.
9

१०.
10

११.
11

१२.
12

१३.
13

१४.
14

१५.
15
हा वरचा तलाव आहे तो काठावर दिसणा-या हॉटेलच्या मालकीचा आहे. एवढा मोठा तलाव बघुन मला फार पुर्वी वाचलेली गोष्ट आठवली.
एक अतीश्रीमंत माणुस असतो. मोठा बंगला, दारात कुत्रा, मस्त ऐसपैस स्विमींगपुल असा त्याचा दिमाख. कुबेर मुक्त हस्ते प्रसन्न झाला होता. आपल्या मुलाला गरीबी काय असते? हे समजाव म्हणुन एक गरीब शेतक-याच्या घरी काही दिवस राहण्यासाठी पाठवतो. तीथे तो मुलगा रोज नदीवर पोहायला जात असे. शेतातलीच ताजी भाजी , फळ खात असे. भरपुर खेळुन दमल्यावर आणि भुक लागल्यावर सकस धारोष्ण दुधचा पेला झटक्यात रिकामा करुन पुन्हा बागडायला मोकळा. काही दिवसांनी त्याचे वडिल त्याला परत आपल्या घरी घेउन जातात आणि विचारतात काय? कळली का गरीबी?

मुलगा उत्तरतो, हो बाबा ! मला तिकडे रहायला गेल्या मुळे कळल की आपण किती गरीब आहोत? ते.
आपल्या कडे स्विमींगपुल आहे त्यांच्या कडे मोठी नदीच आहे.
आपल्या कडे एक मोत्या आहे त्यांच्या कडे ५/६ कुत्रे आहेत.
आपल्या कडे काही फुटांची बाग आहे त्यांच्या कडे तर एकरांमधे बाग (शेती) आहे.
आपल्या कडे पिशवीचे दुध आहे तर त्यांच्या कडे सकस-धारोष्ण दुध आहे.
आपण फ्रिज मधली फळ, भाज्या खातो तर त्यांच्या कडे डायरेक्ट झाडावरुन ताजी ताजी.

बाबा आपण खरच खुप गरीब आहोत.

कॅमेरा निकॉन डी-९०
लेन्स निकॉन १८/५५ व ७०/३००

मांडणी

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

26 Sep 2010 - 11:02 am | शिल्पा ब

फोटो छान...गोष्ट तर त्याहुन छान.

मस्त कलंदर's picture

26 Sep 2010 - 11:30 am | मस्त कलंदर

फोटो आणि गोष्ट, जरी आधी ऐकली असेल तरी या रेफरन्समध्ये अधिकच छान वाटली...

पुढील भागाची वाट पाहात आहे...

मदनबाण's picture

26 Sep 2010 - 11:25 am | मदनबाण

सर्वच फ़ोटो मस्त...
पण...
१४वा फ़ोटु लयं आवडला... :)

श्रावण मोडक's picture

26 Sep 2010 - 11:44 am | श्रावण मोडक

मस्त!

विलासराव's picture

26 Sep 2010 - 12:00 pm | विलासराव

गोष्ट आवडली.

मितान's picture

26 Sep 2010 - 12:01 pm | मितान

सुंदर ! सर्वच फोटो सुंदर !:)

नगरीनिरंजन's picture

26 Sep 2010 - 1:18 pm | नगरीनिरंजन

फार सुंदर! आठ वर्षांपुर्वी पाहिलेल्या स्थळांची आठवण ताजी झाली.

अब् क's picture

27 Sep 2010 - 12:00 pm | अब् क

फोटो आणि गोष्ट छानच!!!!!!!!!!!!!!!!!!
पुढील भागाची वाट पाहात आहे...

मस्तच रच.. फोटो आणि गोष्ट दोन्ही.

मेघवेडा's picture

27 Sep 2010 - 1:22 pm | मेघवेडा

क आणि ड आणि क!

sneharani's picture

27 Sep 2010 - 3:30 pm | sneharani

फोटो अन् गोष्ट देखील मस्त!
:)

प्रभो's picture

27 Sep 2010 - 7:20 pm | प्रभो

लई भारी!!!

श्रीराजे's picture

27 Sep 2010 - 7:35 pm | श्रीराजे

जबरी फोटो आहेत.

हेम's picture

27 Sep 2010 - 11:08 pm | हेम

सुरेख !
फोटो न् ..गोष्ट

आंसमा शख्स's picture

29 Sep 2010 - 11:14 am | आंसमा शख्स

फार सुंदर...
ही तर भारताची जन्नत आहे जन्नत. त्यावर पाकी डोळा आहे हेच वाईट!

jaypal's picture

29 Sep 2010 - 4:52 pm | jaypal

रसीक प्रतीसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभर :-)

रिमा केसरकर's picture

5 Oct 2010 - 4:16 pm | रिमा केसरकर

शेवटच्या फोटोतिल हॉटेल अतिशय बकवास आहे. पण त्या तळ्याचा परिसर तितकाच सुंदर आहे.

लै भारी फोटो आहेत..

- सूर्य.