अनंत.....

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
23 Sep 2010 - 11:25 am

सोहोळ्यातुन सोहळ्याकडे
चालले आयुष्य सारे,
सोहळा हरेक घडी
क्षणी बदलताच वारे ॥

चाहुल लागता जन्माची
प्रथम सोहळा घडे,
मातृपद देउन तिजला
हळुवार पाउल पुढे ॥

नामकरण अन उष्टावण
भरभरुन जमती जन,
वाढदिसांची त्यातच गणती
वर्षांचे उठवुन व्रण ॥

सोहळे शिक्षणा आधी
सोहळे शिक्षणा नंतर,
कळे न जीवनी कशास
सोहोळ्यांचा हवा मंतर ॥

सोहळा प्रत्येक पायरी
विवाह; नोकरी; यश
भर त्यातच सणासुदिंची
उस्तव, आठवुन तो ईश ॥

आला संपत जन्म
पण सोहळे पुरुन उरले,
रौप्य, सुवर्ण, हिरक
जरतारी वस्त्र लाभले ॥

उपस्थिती चे संपले सोहळे
अन, अनुपस्थिती आता,
श्राद्ध, वर्षस्मरण, पुण्यतीथीच्या
घडती जनात बाता ॥

अपर्णा.

शांतरसकवितासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

अवलिया's picture

23 Sep 2010 - 1:15 pm | अवलिया

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2010 - 1:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान...!

-दिलीप बिरुटे

फ्रॅक्चर बंड्या's picture

23 Sep 2010 - 4:18 pm | फ्रॅक्चर बंड्या

छान ...

शुचि's picture

23 Sep 2010 - 7:23 pm | शुचि

सोहोळा :) सुंदर!!!