हिशेबाची माय मेली?
कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?
पुजारी पुसे एकमेकांस आता
नटी कोणती आज नावाजलेली?
तिला घाबरावे असे काय आहे
अशी काय ती तोफ़ लागून गेली?
किती नाडती आडदांडे तराजू
कशी रे हिशेबा, तुझी माय मेली?
कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी
कशी दरवळावीत चंपा चमेली?
म्हणालेत आम्ही तुरुंगात डांबू
जरी तू कधी अभय फ़िर्याद केली..!
गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
(वृत्त - भुजंगप्रयात)
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 4:01 pm | श्रावण मोडक
वा. आवडली रचना.
22 Sep 2010 - 4:03 pm | यशोधरा
आवडली.
आडदांडे तराजू- हे बरोबर आहे का? की थोडीफार सूट घेतली आहे?
23 Sep 2010 - 8:21 am | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल आभार. :)
यशोधराजी,
योग्य तोलमापण करू नये म्हणुन जाणिवपुर्वक छेडछाड केलेले तराजू अशा अर्थाने "आडदांडे तराजू" अशा अर्थाने योजिला आहे.
किंवा आडदांडे म्हणजे आडदांड असाही अर्थ घेतला तरी चालेल.
तराजूला विदर्भात दांडी पारडे असे म्हणतात. :)