अजब रसायन

नि३'s picture
नि३ in जनातलं, मनातलं
18 Sep 2010 - 6:00 am

३० तारीख.पहीला पगार (आहाहा... स्वताच्या पायावर ऊभे झालो.. याच फिलींग वेगळच असते नाही ?) अकाऊंट मधे जमा झाला.

घरापासुन मैलो दुर होतो कंपणीच्या ट्रेनींग ऑफीसात ...केरळ मधे...

सगळे पहीले जण वालेच होतो ,सेलीब्रेट करायला बि-६ नावाच्या हॉटेल मधे जमा झालो . मि ही आपल्या नुकत्याच मित्र झालेल्या एका पंजाबी मित्राबरोबर आत गेलो. एक ढींच्याक तामीळ गाण्यावर सर्व जण नाचत होते.मि कोपर्यातला एक सोफा पकडला आणी त्यांचा नाच बघत होतो. माझा पंजाबी मित्र आल्या आल्या कुठे गेला ते कळ्ले नाही पण पाचच मिनिटात हातात दोन बियरच्या बाट्ल्या घेऊन आला. त्यातली एक त्याने माझ्या हातात दीली . मै शराब नही पीता..मि एकदम सिनेमा ष्टाईल मधे हे वाक्य बोललो ; -). आणण्या अगोदर मला विचारायचे तर होते यार. तर तो म्हणाला" ठीक है अभी तक नही लेता था लेकीन अब तो चालु कर साले पहीली पगार आई है it's celebration time साले अब नही तो कब लेगा" आजुबाजुला पाहीले तर सगळेच नशे मधे हातात बाटल्या घेऊन नाचत होते. म्हट्ल चला कधी ना कधी तर हे होणारच होत ,मग आताच का नाही तसही कुणीतरी म्हटलच आहे ना "कल करे सो आज कर आज करे सो अब"...चियर्स... आणी बाट्ली तोंडाला लावली ...ऊऊऊ.. एकदम कडवट.. कसातरी घोट घश्याखाली घातला .. अबे साले बहोत कडवी है बे
अबे पहली बार पि रहा ना थोडी कडवी लगेगी - मित्र
झालं पहीला पगार ..पहीला घोट्..पहीला नशा..सुरवात झाली होती.
अख्खी बाट्ली संपवीली...

दारु ,मद्य,शराब,देशी,रम,वोडका,बियर्,व्हीस्की,स्कॉच,ब्रांडी ..काय म्हणु याला ..अह.. याला एकच नावाने जास्त समर्पक पणे बोलावता येईल ते म्हणजे अजब रसायन...

तर या अजब रसायना विषयी तशी कुतुहलता तर नेहमीच होती माझ्या मनात ...अगदी पहीलेपासुन ....

शाळेत शिकवल जायच दारु वाईट. गावात चिचपुरा म्हणुन एक भाग ओळखला जायचा तिथे पहील्या धारेची मोहाची दारु मिळते अशे मित्र सांगायाचे. लहाणपणी प्रश्न खुप पडायचे हे पहील्या धारेची म्हण्जे काय?? कधी कळले नाही ..मग मिच माझ समजत असे की जसे सकाळी सकाळी हॉटेलात गरमागरम समोसे काढतात तसेच जी काही पहीले दारु बनवीली जात असल त्याला पहील्या धारेची म्हणत असावे किंवा अशेच काहीतरी प्रकरण असावे..तर अशी ही माझ्या गावात पाच रुपयात एक ग्लास मिळ्णारी देशी दारु..गावाकडे कधी त्या एरीयात फिरकलोच नाही..मला माहीत होत जर तिकडे जवळ्पास जरी फिरकलो असतो तर घरी आपली काही खैर नाही..

गावात रोज बघायचो काही लोक दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा करायचे ,जोर्याने ओरडायचे,भांडण करायचे ,काही जण आपल्या बायका मुलांना मारझोड करायचे पण हीच माणसे जेव्हा दारु पिलेली नसायची तेव्हा एकदम नॉर्मल वागायचे ..मग मला कळ्त नसे की दारु पिल्यानंतर यांना काय व्हायचे ते ..

घरी किराणा दुकान होते..बाबाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही.. स्वता तर खायचे नाही पण दुकानात पण गुटखा,बिडी,सिगरेट,तंबाखु काहीही विकायला ठेवायचे नाही..(यांची सर्वात जास्त विक्री होते हे माहीत असुनही)
मि कधीतरी दुकानात जात असे. ही दारु पिणारी मंड्ळी मग कधीतरी आपल्या मुलांबरोबर किराणा घ्यायला यायची..सर्व किराणा सामान घेतल्यानंतर पाच रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे आणी मुलाला बाकी सामान देऊन घरी पाठ्वायचे...मग माझे बाबा बरोबर ओळ्खायचे ..कारे सुभाष आज चिचपुर्यावर का?? आणी तो सुभाष पण गालातल्या गालात हसायचा आणी दुकानातले नोकर चाकर पण ...
मला एक कळ्त नसायचे बाबा त्या शेंगदाण्या वरुन कसे ओळ्खायचे आज सुभाष दारु पिणार म्हणुन ...

दारुचा आणी शेंगदाण्याचा काय संबध हे एकदा मला त्या साल्या सुभाष ला विचारायचे होते ( बाबाला विचारायचा तर विचार पण करु शकत नव्हतो)..

असाच आम्हाला हिंदी शिकवीणारा आमचा मास्तर ऑलमोस्ट रोजच दारु ढोसायचा..कधी कधी शाळेत पण दारु पिऊण यायचा...
त्याचा शाळेतला एक प्रसंग तर खुपच फेमस आहे .एकदा तो शाळेत पिऊन आला आणी आमचा वर्ग घेत होता मधेच म्हणाला " तुम स्टुडंट लोक स्कुल मे क्यो आते हो ??"
आम्ही सर्व अचंबीत .. हा काय प्रश्न झाला ..मग तोच ऊत्तर देत म्हणाला " लड्कीयो पे लाईन मारने के लीए "
आम्ही सगळे आश्चर्यचकीत हा काय बरळ्तोय ..मग तो पुढे म्हणतो " हम मास्तर लोग स्कुल मे क्यो आते है ?"
(आमची तर आता ऊत्तर द्यायची उरली सुरली हवा पण त्याने काढुण टाकली) " मास्तरीनो पे लाईन मारने के लीए "
असे त्याने म्हणताच वर्गात हास्याचा जो कल्लोळ ऊळाला की त्या दिवशी बाकी पिरीयेड आम्ही कसे पुर्ण केले ते आम्हालाच माहीत...
आमचा शाळेतला चपराशी पुंडलीक ..तो पण शाळेत नेहमी सुजलेल्या लाल चेहर्याने यायचा . याचा पण एक किस्सा फेमस ..आम्हाला पहील्या दोन पिरीयड नंतर लघवीची सुटी व्हायची ( बेलचे दोन ठोके ) तर हे आमचे पुंड्लीक राव एकदा टुण्ण होउन शाळेत हजर आणी बेलचे दोन ठोके देण्याएवजी फुल्ल बेल दिली ठोकुन दीली ..(जाय तुच्या आयला) झाल त्या दीवशी फुकट्च सुट्टी मिळाली..हा जो आम्हाला काय दुसर्याचा दारु पिण्याचा एकमेव फायदा...

तर सांगायचे तात्पर्य अशे की , हे अस आमच दारुड गाव..लहानपणापासुन असले काही प्रसंग मनावर बिंबवले गेले होते...
म्हणुन दारुबद्द्ल भयानक कुतुहल...अस ह्या दारु मधे काय आहे की नॉर्मल माणुस एकदम विचीत्र वागतो..

दहावीनंतर गावात शाळा नाही म्हणुन गाव सोड्ल जिल्ह्याचा गावी आणखी शिकण्यासाठी ..आता तर दर महीना ठरावीक पैसा हातात मिळायचा बाबांकडुन आणि घरापासुण दुर पण तरीही कधीही हे अजब रसायण घेतले नाही..पण मनात आत कुठेतरी कुतुहल होतच...

कट टु प्रेझेंट

क्रमश....

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

18 Sep 2010 - 6:12 am | शिल्पा ब

हम्म..छान लिहिलंय..
कोणतीही गोष्ट प्रमाणात ठीक असते...नाहीतर त्याचं व्यसन होतं जे वाईटच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Sep 2010 - 7:41 am | विश्वनाथ मेहेंदळे

हे बाकी बरोबर बोललात :-)

नगरीनिरंजन's picture

18 Sep 2010 - 8:39 am | नगरीनिरंजन

असेच म्हणतो. दारूच्या आहारी जाणं फार वाईट. योग्य नियम पाळून आस्वाद घेतला तर मात्र मजा.
चांगलं लिहीलंय. पुढचं लिहा पटापट.

क्रेमर's picture

18 Sep 2010 - 6:52 am | क्रेमर

अनुभवकथनातील प्रवाहीपण, ताजेपण भावले.

पैसा's picture

18 Sep 2010 - 8:45 am | पैसा

"या" रसायनशास्त्रात मला गति नाही. पण शाळेतले किस्से मात्र ब्येष्ट!!!

दारु पासुन दुर राहिले. फार छान....
पर्न्तु सयम... सोडला .....
याचे दुख....

चिगो's picture

18 Sep 2010 - 10:43 am | चिगो

छान लिहीताय.. अन मस्त किस्से.. पु.भा.प्र.त

शुचि's picture

18 Sep 2010 - 5:16 pm | शुचि

लेख आवडला.

पिवळा डांबिस's picture

18 Sep 2010 - 6:17 pm | पिवळा डांबिस

आणी बेलचे दोन ठोके देण्याएवजी फुल्ल बेल दिली ठोकुन दीली ..(जाय तुच्या आयला)
इथे फिस्सकन् हसू फुटलं!!!
:)

मी-सौरभ's picture

18 Sep 2010 - 10:16 pm | मी-सौरभ

अजब रसायनाची गजब दुनिया! :)
आम्ही ही या दुनियेतले एक पात्र (मंजे गिलास नव बर का ;) )

इंटरनेटस्नेही's picture

18 Sep 2010 - 7:03 pm | इंटरनेटस्नेही

सुंदर, प्रभावी लेखन.

अध्यक्ष,
अखिल भारतीय मद्यपान प्रचार महामंडळ.

अनिल हटेला's picture

18 Sep 2010 - 11:28 pm | अनिल हटेला

अजब रसायन आवडले !!

पू भा प्र..................

:-)

दारू + सोडा म्हणनारा , ;-)