रुपांगी ज्योतिष -केशसंभार

प्रा.विद्याधर घैसास's picture
प्रा.विद्याधर घैसास in जनातलं, मनातलं
15 Sep 2010 - 8:23 pm

लांब ,तजेलदार ,काळेभोर केस हे स्त्री सौंदर्याचे आणखी एक लक्षण आहे. लक्ष वेधणारे असे हे लक्षण. क्षणोक्षणी लक्ष देऊन जपावे लागते , जोपासावे लागते.केसांच्या मुळांनी शोषलेली पोषक द्रव्ये व डोक्याच्या कातडीचे आरोग्य यावर केसांचे सौंदर्य अवलंबून असते.
केसाची मुळे शनी दर्शवतो ,तर दर्शनी केस शुक्राच्या अंमलाखाली येतात.
मेष ही डोक्याची राशी (स्काल्प स्किन दर्शक) तर चंद्र व वृश्चिक रास हे पोषणदर्शक घटक आहेत.
या घटकापैकी कोणता घटक बिघडला आहे हे शोधणे पत्रिकेत फारसे कठीण नसते व एकदा समस्येचे कारण समजले की प्रभावी उपाययोजना करता येते
उदा: राहूमुळे केसात कोंडा होतो. व केस निस्तेज होऊ लागतात ,तर शनी-रवी यांच्या युतीमुळे केसांच्या मुळाशी उष्णता अधिक होऊन केस गळण्याची तक्रार उदभवते.
हर्षलाचे शुक्राशी कुयोग केसांची टोके दुभंगीत करतात, तर नेपच्यूनच्या कुयोगांमुळे केसांमध्ये अधिक घाम साठून राहतो व डोक्याच्या कातडीचे आरोग्य व पर्यायने केसांचे सौंदर्य कालांतराने धोक्यात आणतो.
केसांचा रंग हा गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली येतो व म्हणूनच गुरुच्या अन्य गुणधर्मांचा (स्मरणशक्ती ,तर्कज्ञान )अतिरीक्त वापर प्रदीर्घ काळ चालू राहील्यास केस पांढरे पडू लागतात.
गुरु ग्रह मुळातच दुर्बळ असणे हे ही केस लवकर पांढरे होण्याचे कारण ठरते.
केसांचे सौंदर्य हे सुयोग्य आहार ,निद्रा व निगा यावर संपूर्ण अवलंबून आहे.
शारीरीक तापमानाचे संतुलन .रक्ताभिसरण ,स्वच्छता व मानसिक स्वास्थ्य या सर्वांचा केसांच्या सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने विशिष्ट व्यक्तीचा प्रकृतीधर्म ओळखून उपाय केल्यास विकृती दूर होते.
केस दाट ,काळेभोर व तजेलदार रहावेत ,रसरशीत व जीवनशक्तीने परिपूर्ण व्हावेत यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.
केसांमध्ये कोंडा होणार नाही ,घाम साचून रहाणार नाही यासाठी स्वच्छतेचे उपाय करायला हवेत.
डोक्याच्या भागात रक्ताभिसरण उत्तम तर्‍हेने होण्यासाठी मानेला व डोक्यावरील काही भागांना प्रेरक मसाज करावा.
डोक्याच्या भागाचे तापमान नियंत्रीत ठेवणे ही आवश्यक आहे .
पावलांना व पाठीच्या कण्याला मसाज करून हे तापमान नियंत्रीत करता येते.
मासिक पाळीच्या आधी तापमान एक ते दोन अंशाने वाढते हे लक्षात घेऊन उपाय करावेत.दिनचर्या आखावी.
प्रोटीन्स हा अन्न घटक केसांच्या आरोग्याला पोषक आहे ,परंतू पत्रिकेत रविच्या (प्रोटीन्सचा कारक )स्थान व राशीवरून कोणत्या स्वरुपात प्रोटीन्स घ्यावीत हे ठरवता येते.

पुढील भागात सुडौल बांध्याचा वविचार करू.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

15 Sep 2010 - 8:35 pm | मेघवेडा

पुढील भागाच्या प्रतीक्षेत. इसमे मजा नै आया. :(

सुडौल भाग असणार आहे नं तो! ;)

(बेडौल)चतुरंग

अवांतर - बाकी केशसंभार वगैरे वरुन आमचे एक विडंबन आठवले

मीनल's picture

15 Sep 2010 - 8:45 pm | मीनल

ग्रहमानाचा आरोग्यावर परिणाम होतो हे ऐकून आहे. पण इतका बारकावा कधीच कळला नाही.
वैद्यकिय उपचार आणि ग्रहमान ठिक झाले तर आरोग्य निट होते.
तसेच ग्रहमान ठिक झाले की पांढ-याचे काळे केस नैसर्गिक रित्या होतात का?? नसतील होत बहुधा.

अमेरिकेत तर केस खूप गळतात. येथिल पाण्याचा परिणाम आहे. वैयक्तिक ग्रहमानाच कुठचं काय माहित????

छोटा डॉन's picture

15 Sep 2010 - 8:45 pm | छोटा डॉन

पत्रिकेतल्या ग्रहांचा आपल्या केसांच्या आरोग्यावर फरक पडतो आणि त्यापुढे इतर उपाय 'झक मारतात' ही माहिती मनोरंजक वाटली.
बाकी टेक्निकल डिटेल्स कळाले नाहीत / कळवुन घेण्याची इच्छा नाही.

एक शंका :
ग्रहांच्या बदलत्या स्थानांनुसार केसातली बदल होत जातो का ?
म्हणजे समजा एखाद्या अलाण्या फलाण्या ग्रहच्या जागाबदलामुळे केस डायरेक्ट निस्तेज होऊन गळु लागले व अलमोस्ट टक्कल पडले आणि नंतर काही काळानंतर तो ग्रह आपल्या फेव्हरमध्ये आल्यावर हे केस पुन्हा तजेलदार बनतात व टक्कल पडलेल्या जागी पुन्हा केस उगवतात असे आहे का ?
तसे नसल्यास मग दुसर्‍या कुठल्या ग्रहाला बाबापुता करुन त्याच्याकडुन हे काम करवुन घेता यईल का ?

अर्थात ह्या उगाच जनरल शंका आहेत, माझ्यासाठी नव्हेतच, माझ्या केसांच्या आरोग्यासाठी मजा कुठल्या ग्रहाच्या फेव्हरची गरज नाही.

- छोटा डॉन

शेम २ शेम हीच शंका आली माझ्या डोक्यात.
टंकायचे कष्ट वाचवल्या बद्दल चोताचे धन्यवाद.

डान्याचे केशसंभार विषयक प्रश्न पाहुन, "ज्याचे (केस) गळतात, त्यालाच (ग्रह) कळतात" ह्या म्हणीचा उगम कळला.

मस्त कलंदर's picture

16 Sep 2010 - 9:13 am | मस्त कलंदर

चोता दोनचे तर ठीक आहे.. पण मग बिचार्‍या नंदनचे काय? ती तर अगदीच गॉन केस आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 9:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मकी आणि डॉन्याच्या केसमधे ग्रह सारखे आहेत का हे पहायला हवं!

मस्त कलंदर's picture

16 Sep 2010 - 10:03 am | मस्त कलंदर

हा हा.. माझा केशसंभार डॉन्याच्या केसांपेक्षा (निदान अजूनतरी)केसभर जास्तच आहे!!! त्यामुळे माझे ग्रह अधिक चांगले असायला काही हरकत नसावी ब्वॉ!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 10:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्छा म्हणजे तुझे ग्रहतरी किमान जास्त उंचीचे आहेत तर!

पैसा's picture

16 Sep 2010 - 10:02 pm | पैसा

ते फक्त स्त्रियांच्या केसांबद्दल बोलतायत!
+१, आजकाल काही नट्या टक्कलवाल्या दिसतात त्याचं कारण काय असावं बॉ?

भरघोस अक्षरक्षः विपुल विपुल आणि पायापर्यंत लांबसडक केस माझ्या पहाण्यातील एका बाईंचे आहेत = उत्तम स्थितीचा शुक्र (असं मी मानते)
पण
शुक्र हा वैवाहीक सौख्याचा देखील निदर्शक आहे.
या बाईंची २ लग्न होऊन त्या दोनदा विधवा झाल्या आहेत. = शुक्र तितकासा चांगला नसावा.
मग हा विरोधाभास कसा?
____

अर्थात मंगळी पत्रिका आहे, कन्या कग्न आणि कन्या रास आहे - हे सर्व एकाकी आयुष्य दर्शवत असेल कदाचित.

पण तुम्हाला काय वाटतं?

केसांमध्ये कोंडा होणार नाही ,घाम साचून रहाणार नाही यासाठी स्वच्छतेचे उपाय करायला हवेत.

स्वच्छतेचे उपाय का करायचे म्हणे? हे सगळं जर ग्रहांमुळे होत असेल तर त्यांचीच शांती केली तर नाही चालणार का?

अवांतरः मला या ग्रहांचा खूप खूप राग यायला लागलाय. रिकामटेकडे आहेत नुसते! उगा अंतराळात फिरत राहण्याशिवाय काही काम नसल्याने भूतलावरील लोकांच्या जीवावर उठतात! यांचा एकवेळ बंदोबस्तं केलाच पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2010 - 11:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भिक्कारडे ग्रह कुठचे!

(गुर्जींकडून उधारीवर वाक्य घेऊन) ही ग्रहमाला माजली आहे फार साला!

अनामिक's picture

15 Sep 2010 - 11:39 pm | अनामिक

निदान भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांनी ग्रहांना शिव्या घालू नये म्हणतात... शनी-मंगळ युतीचा कोप होतो.
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2010 - 11:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मंगळ आमच्या टेलिस्कोपला दिसत नाही, त्यामुळे शनी-मंगळ युतीला मी नाही घाबरत! गुरू शनी म्हणाल तर मज्जा येईल!

त्यावरून आठवलं, शनिवारी, गणेशचतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्र-शुक्र युती होती. पाहिली का कोणी? काय झक्कास दिसत होती ही जोडगोळी आकाशात!

गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि चंद्रदर्शन?... या अल्ला! आता हिच्यावर बाप्पापण नाराज झाले म्हणायचे तर!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 9:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे मागच्या वर्षी कोणीतरी गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन केल्यास काय टाईपचा धागा काढला होता ना! माझं अजूनपर्यंत काहीही वाईट झालं नाहीये (अजून काय वाईट होणार म्हणा! ;-) )

विजुभाऊ's picture

16 Sep 2010 - 1:17 pm | विजुभाऊ

ती गणेश चतुर्थी नाय रे.... गणेश चतुर्दशी

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2010 - 10:44 am | राजेश घासकडवी

(गुर्जींकडून उधारीवर वाक्य घेऊन) ही ग्रहमाला माजली आहे फार साला!

वाक्य उधार घेऊन त्याची मोडतोड केलीत तर पूर्ण पैसे भरावे लागतील. मूळ वाक्य 'ही **** फार माजली आहे साली' असं होतं. **** च्या जागी ग्रहमाला, लग्नसंस्था, परवानापद्धत, गाडीसंस्था वगैरे शब्द बसतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 10:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही पुणेरी का?

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2010 - 10:51 am | राजेश घासकडवी

मुळात तुम्ही न सांगता उधार घेतलंत. वर ते तोडून टाकलं... तुम्हालाच पुणेरी भामटी (गावकुसाबाहेर राहाणारी) का म्हणू नये?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

न सांगता: वरचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा गुर्जी! व्यवस्थित सांगून सवरून, जाहीर करून वाक्य आणलं आहे. त्यातून मूळ वाक्य आशयानुसार थोडं बदलून, अर्थपूर्ण ठेवलं तरीही ती शिवीगाळ होते असं मानायची नवीन (अर्थातच पुणेरी) पद्धत तुम्हाला माहित नाही? कसं काय हो मराठी बोलणारे म्हणवता तुम्ही स्वतःला??

बाकी तुम्ही व्यक्तीगत टीका टिप्पणी करत आहात याचा अर्थ समजला!

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2010 - 11:16 am | राजेश घासकडवी

चोरी करायची आणि वर म्हणायचं 'सर्वांच्या समक्ष नेलं, म्हणून ती चोरी नाही'. अजब तर्कशास्त्र आहे. जाऊदेत, नेलं आणि मोडलं. मी माझ्या सध्याच्या रेटप्रमाणे तुम्हाला व्यनिने बिल पाठवेन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 11:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही चोरी नव्हे, कृपया हा प्रतिसाद नीट वाचा! तुमच्याकडून वाक्य उधार घेऊन मी ते माझ्या पद्धतीने मांडलं आहे.

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2010 - 11:46 am | राजेश घासकडवी

तुम्ही उधार घेतल्याचं जाहीर केलंत. मला अर्थातच आधी विचारलं नव्हतंत. मालकाला न विचारता उधार म्हणजे चोरीच. खुलासा संपला. आता मुकाट्याने व्यनित कळवल्याप्रमाणे पैशे भरा नाहीतर पुढची बोलणी माझ्या वकिलांशी करा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढची बोलणी माझ्या वकिलांशी करा.

शी! कोणाशीही काय बोलायचं? तुमचा रेट काय ते इथे सांगा नाहीतरी आमचे(ची) केस स्ट्राँग असल्यामुळे आम्ही कोणत्याही साल्या माजलेल्या ग्रहमालेला घाबरत नाही.

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2010 - 12:09 pm | राजेश घासकडवी

समजून घ्या थोडं. हा नाजूक मामला आहे. रेट काय आहे हे केस बाय केस ठरतं. नक्की काय इन्व्हॉल्व्ह्ड आहे यावरूनही ठरतं. असा जर जाहीर रेट सांगितला तर सगळे तोच मागतील की. तुम्हाला म्हणून थोडं कन्सेशन दिलं आहे. व्यनितच बोलू. काय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं मग केस बाय केस रंग आणि रेट कसा बदलतो ते सांगा! (हे म्हणजे कसं एकदम चोख झालं ना, केसांच्या लांबीवरून रंगाचा रेट बदलतो तसं!)

आत्ता समजलं मला, हा जेंडर बायस आहे म्हणून तुम्हाला केस करायची आहे. सालीच्या ऐवजी साला म्हटलं म्हणून या केसमधे एवढा रस?

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2010 - 1:21 pm | राजेश घासकडवी

चला आता कशी गाडी मूळ विषयावर, म्हणजे केसावर आली. उगाच कोणाला अवांतराचा आरोप करण्याची संधी नको.

(जज्ज : वकीलसाहेब, तुमच्या या प्रश्नांचा मूळ गुन्ह्याशी काय संबंध आहे?
वकील : जज्जसाहेब, मला थोडी अजून मोकळीक दिली, तर लवकरच हा संबंध मी प्रस्थापित करेन.
जज्ज : ठीक आहे. पण लवकर आटपा माझा लंचटाईम व्हायची वेळ आलेली आहे)

केस म्हणजे धागा. तो कसा वाढतो? भांग सरळ पडतो, की वाह्यात प्रतिसादांप्रमाणे तिरका तिरका जातो? (ये नोट किया जाय की तिरके प्रतिसादोंका उदाहरण उपरीच दिया गया है) कुठचे ग्रह हे धागे वाढवतात, व कुठचे वक्री होऊन अचानकपणे ते नष्ट करतात? केव्हा हेअर स्प्लिटिंग जाणूनबुजून होतं व केव्हा पुरेसं खाद्य न मिळाल्यामुळे स्प्लिट हेअर होतात? शिवाय लांबलचक धागे करायचे असतील - (३३६ मिमी) तर कोणाला किती सुपारी काय रेटने द्यावी लागते? हे सगळे गहन प्रश्न आहेत. माननीय प्राध्यापक घैसास सरांनी हा केसांवरचा धागा काढला आहे. हे सर्व ग्रहांच्याच हाती असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला आता केसरा सरा (व्हॉटेव्हर विल बी विल बी...) म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. का असं आहे की प्रोफेसरांचे ग्रहांच्या शांती करण्याचे रेट ठरलेले आहेत? तसं असेल तर ते या धाग्यावर इथे जाहीर करतील का? (अदितीचा प्रश्न...)

तुम्हाला काय वाटतं?

बटांविषयी आम्ही इथे आधी लिहिलेलं असल्यामुळे पुनरुक्ती करत नाही.

पुष्करिणी's picture

16 Sep 2010 - 1:03 pm | पुष्करिणी

बघ, आला ना आळ चोरीचा...सांगितलं होत नको बघूस म्हणून

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 1:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते तू उघडपणे सांगितलंस म्हणून! आणि तसंही हा आळ नेहेमीप्रमाणे खोटाच आहे. तू या पुर्षी काव्याला बळी पडू नकोस!

प्राध्यापक घैसासांचे हे तद्दन तकलादु (श्रेयअव्हेर) लेखन दुर्बिटणे बाईंना पुरुषी काव्या*प्रमाणे भासले याला घैसासांचे यश समजावे की अपयश या द्विधेत मी अडकलो आहे.

प्राध्यापकांना एक प्रश्नः द्विधा ही कुठल्या ग्रहाच्या अधीन असते? द्विधेत पडल्यावर डोके खाजवुन गळणारे केस नक्की केशग्रहांच्या अधिपत्याखाली येतात की द्विधाग्रहांच्या? आधीच सांगुन ठेवा ब्वॉ. नाहीतर च्यायला एका ग्रहाची शांती करायचो आणि नंतर तो इंडियन पोलिसांप्रमाणे 'आमाला पावर नाय' म्हनुन पचकायचा.

हे काव्य* काय आहे रवी न देखणार्‍या विभागात जाउन उचकावे.

१) मेष ही डोक्याची राशी (स्काल्प स्किन दर्शक) तर चंद्र व वृश्चिक रास हे पोषणदर्शक घटक आहेत.
वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ मेषेत व्ययात असेल तर त्यांच्या केसांवर काय परिणाम होतो ?
२)राहूमुळे केसात कोंडा होतो. व केस निस्तेज होऊ लागतात.
राहू गुरुसोबत भाग्यात असेल तर गुरुमुळे हे दुष्परिणाम कमी होऊ शकतात का ? गुरु राहूसोबत एकाच स्थानी असल्याने दुष्परिणाम वाढतात.
३) दर्शनी केस शुक्राच्या अंमलाखाली येतात
शुक्र त्रिक स्थानी (६, ८, १२)असल्यास अशा लोकांचे दर्शनी केस लवकर गळतात का ??

गुरु राहू एका स्थानात असतील तर माहीत नाही पण जर एका स्थानी आणि युतीत असतील तर त्याला चांडाळ योग म्हणतात. गुरु देवांचा गुरु आणि राहू दानव मंत्री. हे एकमेकांना भेटले तर ...

ते माहित आहे, पण केसांवर त्याचा काय परिणाम होतो ??

स्वत:हाचे केस स्वहस्ते उपटले जातात :D

सूड's picture

16 Sep 2010 - 7:42 am | सूड

हा हा मस्त !!

रुपी's picture

15 Sep 2010 - 10:30 pm | रुपी

आरं माज्या द्येवा .. माजे सगळे ग्रह खराब हायेत म्हंजे :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2010 - 11:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>पुढील भागात सुडौल बांध्याचा वविचार करू.
कृपया लवकर टाका पुढचा भाग आणि तेवढे फोटूचे विसरु नका. :)

>>>>केसांचे सौंदर्य हे सुयोग्य आहार ,निद्रा व निगा यावर संपूर्ण अवलंबून आहे.
असे असेल तर ग्रहब्रिहाचा आणि केशसंभाराचा काही संबध नाही असे म्हणावे काय ?

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

16 Sep 2010 - 8:49 am | पाषाणभेद

प्रा. साहेब, लेख तद्दन तकलादू वाटला. आपल्यासारख्या प्राध्यापक असणार्‍याचा अशा प्रकारे ग्रहतार्‍यांवर विश्वास वैयक्तिक रित्या असणे समजू शकतो पण त्याचे जाहीर प्रदर्शन म्हणजे आपल्या ज्ञानावर आपला विश्वास आहे की नाही हे दाखवते.
अहो जग चालले कुठे अन तुम्ही अजूनही डोक्यातील कोंड्यासाठी ग्रहगोलांवर अवलंबून राहतात?

>>>> प्रोटीन्स हा अन्न घटक केसांच्या आरोग्याला पोषक आहे ,परंतू पत्रिकेत रविच्या (प्रोटीन्सचा कारक )स्थान व राशीवरून कोणत्या स्वरुपात प्रोटीन्स घ्यावीत हे ठरवता येते.

अहो प्रोटीन्स का घेतात मग? केसांत अंगठ्या का नाही घालू देत तुम्ही? केसांची शांती केली तर?

प्रोटीन्स हा घटक मग वैज्ञानीक नाही का? की तुम्ही म्हणाल की ते पृथ्विवर आधीच होते वैगेरे. चालूद्या.

एखाद्या समाजात जर वैज्ञानीक दॄष्टीकोनाच्या व्यक्तींची संख्या जास्त वाढली की तो समाज प्रगतीशील होतो. याच्या विपरीत झाले की अधोगती होते. आपले (भारताचे) आता तसे होत तर नाही ना? कारण आजकाल देव देव, ज्योतिषीपण, बुवा महाराजपणा, वास्तूशास्त्रवाले, फेंगशुयीवाले, धर्मभोळेपणा, धार्मीकता खुपच वाढलेली आहे.

एक परखड सुचना: पुढील सुडौल बांध्याच्या लेखात असला काही उल्लेख नसेल तरच पुढचा लेख टाका. नाहीतर नाडीग्रंथासारखा विनोदाने वाचू की नाही ही शंका आहे.

नितिन थत्ते's picture

16 Sep 2010 - 10:41 am | नितिन थत्ते

आमची एक बेशिक शंका आहे.

माणसाच्या किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीराचे आणि अवयवांचे काही प्रमाण असते. त्याप्रमाणाच्या थोडेफार पुढेमागे अवयवाचे माप असणे ठीक असते. त्यापेक्षा अधिक उणे माप झाल्यास त्याला विकृती समजली जाते.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे डोके खूप मोठे असणे किंवा पायांची लांबी धडाच्या मानाने खूप कमी असणे अशा गोष्टी विकृती समजल्या जातात.

माणसाच्या केसांबाबत पाहिले तर पाठीच्या मध्यापासून कमरेपर्यंत लांब केस हे केसांच्या लांबीचे सामान्य प्रमाण असते. यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे केस लांब असतील तर ती विकृती का समजू नये?

त्यावर उपाय करून (वेगवेगळी तेले, लोशने लावून किंवा ग्रहांची शांत करून) ते अ‍ॅव्हरेज लांबीचे होतील असे उपाय करायला हवेत. ;)

[ज्यांचे केस असे लांब असतील त्यांनी हा प्रतिसाद हलके घ्यावा]

पाषाणभेद's picture

16 Sep 2010 - 11:09 am | पाषाणभेद
चिगो's picture

16 Sep 2010 - 11:41 am | चिगो

हाणा त्या Head&shoulder, Sunsilk, Pantene, Garnier वाल्यांच्या **वर लाथा.. ती शिल्पा शेट्टी, आसीन, करीना, जॉन अब्राहम, शारुख ह्यांच्या झिंज्या उपटा.. शँपुच्या अ‍ॅड्स करताहेत हरामखोर. प्रां. ना भेटलात तर सुटतील कि केसांच्या सगळ्या केसेस..!

जिंन्हें हरएक धागेपे नाज हैं, वो कहां हैं!
धागारक्षक हाजिर होssssssssssss!!!

अवलिया's picture

16 Sep 2010 - 12:12 pm | अवलिया

सदस्य क्रमांक ८७३

म्हणजे बर्‍याच जुन्या आणि जाणत्या ( जुण्या आनि जानत्या) सदस्या असुनही तुम्ही भलती अपेक्षा का ठेवता? असो.

यशोधरा's picture

16 Sep 2010 - 12:21 pm | यशोधरा

हॅ हॅ हॅ, हल्लीच काही धागारक्षकांनी आमच्यावर हल्ले केले त्यावरुन परिस्थितीत फरक पडका की काय असे वाटले होते, पण नेहमीप्रमाणेच "all are equal, but some are more equal" ह्या धोरणाची अंमलबजावणीच सुधारीत आवृत्तीत सुरु आहे हे बघून जीव अंबळ भांड्यात पडला!

अवलिया's picture

16 Sep 2010 - 12:28 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

काय आहे एकाच्याच मागे लागले तर ते डोळ्यात येते म्हणुन ऋतु बदलला की टार्गेट बदलले जाते.

आम्हाला अकारण फटके मारुन त्यांचा आत्मा शांत झाला नसावा म्हणुन आता तुमचा नंबर ;)

घ्या गेंड्याची कातडी पांघरुन.

लहानपणी सर्दी झाली की खिडकीतुन पावसाची मजा पाहत बसायचो, इतर मुले हुंदडतांना पहायचो तेव्हा वाईट वाटायचे त्याची आठवण झाली. फक्त तेव्हा सर्दी खरोखर झालेली असायची. इथे सक्तीने बाजुला केले जाते येवढाच काय तो मोठा आणि मुलभूत फरक. उडेल हा प्रतिसाद नक्कीच म्हणुन खवत सुद्धा पेस्ट करुन ठेवतो. :)

यशोधरा's picture

16 Sep 2010 - 12:30 pm | यशोधरा

:)

विनायक प्रभू's picture

16 Sep 2010 - 12:11 pm | विनायक प्रभू

ग्रहांचा फक्त डोक्याच्या केसावंरच परिणाम होतो का?

ग्रहांचा फक्त डोक्याच्या केसावंरच परिणाम होतो का? >>>

=))=))

मार डाला !!

धागा वाचुन केसांत कोंडा झाला !!

त्याचा गुरु किती प्रबळ आहे नाही का.

विजुभाऊ's picture

16 Sep 2010 - 1:20 pm | विजुभाऊ

माझी रवी रास वृषभ्...चंद्र राशी सुद्धा वृषभच आहे.
एस ए पी च्या व्यवसायात येई पर्यन्त डोक्यावर बर्‍यापैकी केस होते.
आता मात्र परिस्थिती बदलली बरीच आहे.
हे कोणत्या ग्रहांच्या प्रभावामुळे ?

सूड's picture

16 Sep 2010 - 1:41 pm | सूड

विजुभाऊ, SAP मध्ये असाल तर ते मॉड्युलनुसार ठरत असावं बहुधा !!

सुहास..'s picture

16 Sep 2010 - 1:21 pm | सुहास..

हे कोणत्या ग्रहांच्या प्रभावामुळे ? >>

छे छे विजुभाऊ !! ऊलट आपल्या केसांमुळे ग्रहांवर काही परिणाम झाला का असे विचारायला हवे ..

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2010 - 2:28 pm | प्रकाश घाटपांडे

स्त्रीचा केशसंहाराला तोडगा ग्रहशांती नसुन गंगावन हा आहे. येथे प्रकाशचे माक्याचे तेल लावुन देखील काही उपयोग होत नाही.

सुनील's picture

17 Sep 2010 - 7:07 am | सुनील

लेख छान. चालू द्या...

(सुडौल बांध्याच्या प्रतीक्षेत) सुनील