नकोना नकोना आता नकोना

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
10 Aug 2010 - 6:48 am

नकोन नकोना आता नकोना

तो: ऐ ये ना
ती: अंहं नकोना, नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना ||धृ||

ती: अवेळी या वेळी तू सतावी मला
इथे नाही कुणी आवर स्व:ताला

तो: नको करू बहाणे का छळशी मला
छळण्याचा खेळ बरा जमतो तूला
तू जवळ ये अथवा मला जवळ घे ना ||१||

ती: अंहं नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना

ती: इतर वेळी तू रे भोळा सांब माझा
अशा वेळी काय होई न राहतो तूझा

तो: उगा का प्रश्नोत्तरे तूच विचार मनाशी
अशा वेळी काय मागणे हे तू जाणशी
अंतर मिटवाया दुर राहू नको ना ||२||

ती: अंहं नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना

ती: चल जा हट सोड तू वाट माझी
ओरडून सांगेन मी तक्रार तुझी

तो: माहीत नाही का काय लागे मला
काय जे हवे तूला तेच हवे मला
मग का ओरडूनी तू सांगे सकळांना ||३||

ती: दया मला येई तूझी तू रे माझा
तू माझा असूनी दया येते मला
कशाला मग मी त्रास देईन तूला

बहाणे नव्हे हा तर रूकार माझा
वेड्या, चल जवळ येना तू जवळ येना ||४||

दोघे: हं हं हं हं हं ला ला ला ला ला

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०८/२०१०

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

10 Aug 2010 - 6:56 am | पाषाणभेद

वरील काव्याचे शिर्षकात व धृवपदात 'नकन' झालेले आहे. ते 'नकोना' असे हवे.

म्हणजेच काव्याचे शिर्षक: 'नकोना नकोना आता नकोना' हे आहे. कृपया बदल करून वाचावे.

अवांतर: साहित्य स्वसंपादन करणे ही सुवीधा किती महत्वाची आहे पहा. संपादक महाराज आपण माझ्या काव्याचे शिर्षक कृपया "युगूलगीतः नकोना नकोना आता नकोना"असे दुरूस्त करावे.

धन्यवाद.

+१००००००००००००००००००००००

कानडाऊ योगेशु's picture

10 Aug 2010 - 4:54 pm | कानडाऊ योगेशु

ती: अवेळी या वेळी तू सातावी मला

सतावी हवे आहे का?

ती पण नकोना म्हणतीय तो पण नकोना म्हणतोय हे जरा गमतीशीर वाटते आहे.

पाषाणभेद's picture

10 Aug 2010 - 7:32 pm | पाषाणभेद

धन्यवाद योगेश.

ती म्हणतेय "अंहं नकोना, नकोना"
तो म्हणतोय "नकोना नकोना, आता नकोना" म्हणजे नकोना आता म्हणू नकोना!
संपादनाची सोय नसल्याने मी संपादीत करू शकत नाही.

तसेच सतावी हे योग्य आहे.

क्रेमर's picture

10 Aug 2010 - 7:47 pm | क्रेमर

हा पाषाणभेदांचा धागा सोळातल्या एकालाही दिसला नसावा. स्वयंसंपादनाची सुविधा काढून घेतांना संपादकांची कार्यक्षमताही ध्यानात घ्यायला हवी होती, असे वाटते.

अत्यंत खेदाने सहमत म्हणाव लागतय.
संपादकांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास नाही, पण ही सुविधा खरच गरजेची आहे.
तसच २४ x ७ कुणीना कुणी संपादक हजर असेलच याची शाश्वती नाही.

@ पाषाणा संपादकांना व्यनी खरड केली आहेस का रे?
संपादक सगळेच धागे उघडत बसणार नाहीत.

संपादक मंडळ's picture

10 Aug 2010 - 8:23 pm | संपादक मंडळ

संपादक मंडळ ह्या आयडीवर खरड/व्यनि करुन तुम्ही संपादन करुन घेऊ शकता. संपादकांच्या ताबडतोब हजर असण्या नसण्यावर संपादनाचा वेळ अवलंबून राहू शकतो, परंतु संपादन होईल हे नक्की! धन्यवाद.

पाषाणभेद's picture

11 Aug 2010 - 4:11 am | पाषाणभेद

मुळ कवितेत चुकीची दुरूस्ती केल्यामुळे संपादक मंडळाचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.

शानबा५१२'s picture

11 Aug 2010 - 12:32 am | शानबा५१२

इतर वेळी तू रे भोळा सांब माझा
अशा वेळी काय होई न राहतो तूझा

म्हण्जी काय राव?