कधी येणार ही बस?
शेअर टॅक्सी केली तर बरे झाले असते.
की चालत जाऊ?
नको. केळकर चे थालीपीठ खुणावणार.
अॅम आय गेटींग हायपर?
एवढी बचत कशाला?
गेले दोन महीने हीची तर उधळपट्टी चालु आहे.
शक्य असेल तर सर्व कॉलनी ला जेवण घालायची तयारी.
ही सगळी ९०% ची गोची.
किती बदलली आहे.
सतत कसला ना कसला तरी उपास.
दोन वर्षापुर्वी अगदी दोन शेपट्या घातल्या तर दहावीच्या वर्गात शोभणारी आता अगदी पोक्त दिसायला लागली आहे.
आयला रे त्या दहावीच्या.
जवळचे सगळे हेवा करायचे.
अगदी मुक्त आणि अनिर्बंध.
हे परिवर्तन होणे गरजेचे होते का?
का तो अविभाज्य भाग असतो?
गेले दोन आठवडे हवेत आहे.
आता पर्यंत दहा किलो पेढे झाले.
सर्व कॉलनी जेवण घालायची पण तयारी.
दोन रुपयाचे चणे खाउ.
म्हणजे घरी जाईपर्यंत भुक लागणार नाही.
पाणी आहेच बाटली मधे.
ऑफिसमधे फिल्टर लावल्यामुळे तो एक खर्च वाचला.
स्टेशनला पोचल्यावर कुणी शेअर रिक्षा वाला मिळाला तर बरे होईल.
१६ च्या ऐवजी २४ होतात आजकाल.
महीन्याला ४०० ची फोडणी.
मोबाईल घ्यायचा म्हणतेय ही.
तो सुद्धा नउ हजाराचा.
सर्व फंक्शन्स असलेला.
ही फंक्शनच पुढे मुलांना डीस्फंक्शनल करतात.
उपयोग नाही सांगुन.
ऐकायची नाही ती.
९०% ची गोची आहे ही.
च्यायला खिरापत वाटलेली दिसतेय,
नववी ७५ च्या आसपास.
अचानक ९३%?
कमाल आहे.
आणि लगेच आय आय टी?
कोण सांगणार?
आयला स्टेट च्या दहावीच्या मुलाला जवळ जवळ पंधरावी चा अभ्यास परवडणार आहे का?
अजुनही ३० चे पाढे येत नाहीत धड.
इंग्लीश तर दिव्य.
इंग्लीश चा खणखणीत असल्याशिवाय आय आय टी शक्यच नाही ह्या वर कुणाचा विश्वास बसत नाही.
कसल्या तरी सेमीनार ला गेली होती दोघेही.
क्रमशः
प्रतिक्रिया
9 Aug 2010 - 7:56 am | सहज
मला तो सिनेमातला एक संवाद आठवला. ये बंबई (मुंबई हो) है| यहा पूरे देशसे रोज हजारों नौजवान फिल्मोंमे हिरो या हिरॉइन बनने चले आते है|
स्लो एन्ड स्टेडी विन्स द रेस की राईट नाउ राईट हियर?