फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
29 Jul 2010 - 4:36 pm

फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!
आपण सगळेच आपल्या "तिरंगी" ध्वजाचे अभिमानी आहोत. जेंव्हां मी आपला ध्वज उलटा लावलेला पहातो तेंव्हां माझं तर रक्तच उसळतं!
एक अनुभव माझा स्वतःचा!
साधारणतः सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांत परिषद संपल्यावर एक 'ओली' मेजवानी देण्यात येते व त्यात परिषदेत ज्या ज्या सभासदांनी भाग घेतलेला असतो त्या त्या देशांचे ध्वज एका विशाल फलकावर लावले जातात. एकदा जर्मनीतील अशाच एका परिषदेत माझ्यासारखे इतरही भारतीय प्रतिनिधी असल्याने आपला तिरंगी ध्वज लावला होता, पण (बहुदा) अज्ञानामुळे उलटा लावलेला होता (हिरवी पट्टी वर ठेऊन). माझ्या शेजारी एक ओळखीचा जर्मन प्रतिनिधी उभा होता. ही चूक मी त्याच्या निदर्शनास आणून दिली. त्याने ज्या चापल्याने तिथल्या स्टाफला बोलावून तो सरळ करवला त्यावरून तोही या घटनेला किती महत्व देत होता हे सहज लक्षात येत होते.
तो ठीक केल्यावर त्याने व नंतर त्या परिषदेच्या व्यवस्थापक वर्गातील एका वरिष्ठानेही येऊन माझ्याकडे चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफीही मागितली!
ती चूक नक्कीच अनवधानाने झाली होती.
पण माझे परमप्रिय (!) पाकिस्तानी नेते मुशर्रफ आग्र्याच्या शिखर परिषदेला PIAच्या खास विमानाने आले त्यावेळीही आपला ध्वज उलटा लागलेला बर्‍याच जणांनी पाहिला असेल! ते विमान भारतीय भूमीवर उतरल्यावर (मला वाटते अमृतसर येथे) ती चूक लक्षात आली व ती त्यांच्या शिष्टमंडळाच्या लक्षात आणून दिल्यावर आपला तिरंगा सुलटा करण्यात आला, मगच ते विमान पुढे गेले.
ही चूक अनवधानाने झाली नसणार! सरकारी पातळीवर अशा चुका होत नाहींत. कारण 'प्रोटोकॉल' विभागाचे लोक असल्या गोष्टी दहा वेळा तपासतात. आपल्या सरकारबरोबर वाटाघाटी करण्यासाठी येणारा सरकारी पाहुणा अशी चूक करणे शक्य नाहीं. पण 'झाली असेल एक वेळ' असे जरी मानले तर आपले परराष्ट्रमंत्री नुकतेच इस्लामाबादला गेले असता त्यांच्या उपस्थितीतही हीच मग्रूरी पुन्हा दिसली. मला तर वाटते कीं ही मुजोरी पाकिस्तानी सरकार मुद्दाम करते.
हे दुवे पहा:
http://www.youtube.com/watch?v=MDn9KJP0fsI (यात ध्वजाची चूक चिदंबरमसाहेबांच्या लक्षात आलेली दिसत नाहीं!)
http://www.youtube.com/watch?v=BKwxX7dwO9Y&feature=related
http://www.youtube.com/watch?v=yCTMmhXLGe4&feature=related

मग माझ्या मनात आलं कीं आपण आपल्या तिरंगी ध्वजाला नवे रूप कां देऊ नये जेणेकरून आपला ध्वज आडव्या आसावरही सारखा (symmetrical) असेल! तसे केल्यास आपण पाकिस्तानला नाकावर अंगठा ठेवून "टुक टुक माकडा" (Thumb your nose) करू शकू! अशाने आपल्याला सहजासहजी त्रस्त करण्यातला एक भाग काढून टाकला जाईल!
म्हणून पायाभूत रंगसंगतीत कांहींही बदल न करता व अशोक चक्रासारखे चिन्हही मध्यावरच ठेऊन मी एक नव्या रूपात आपला तिरंगी ध्वज योजला.
यात सध्याच्या निरंगी ध्वजाचा अवमान करण्याचा अर्थातच हेतू नाहींय्. उलट त्याला एक नवे आणि सरस रूप द्यायचा प्रयत्न मी केला आहे.
खालचा दुवा उघडल्यास आपल्याला हे नवे रूप पहाता येईल. ते पाहून आपले मत मला कळवावे ही विनंती.
http://lh6.ggpht.com/_O27mefLixak/TE4-qkaVLMI/AAAAAAAACCA/mB5MNELOlqM/Mo...
धन्यवाद व प्रणाम.
सुधीर काळे

राजकारणविचारशिफारस

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2010 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण ध्वजाला दिलेले रुप आणि त्यामागील हेतू चांगला आहे. उलटे-सुलटे होण्याची भीती राहणार नाही.

-दिलीप बिरुटे

भारतीय's picture

29 Jul 2010 - 4:53 pm | भारतीय

ध्वज बघितला.. संकल्पना छान आहे.. नवीन रुपही छान दिसते.. पण काय आहे ना, कोण्या माकडाने आपला ध्वज उलटा लावला म्हणजे आपल्या ध्वजाचे पावित्र्य कमी होते अथवा त्याचा अपमान होतो असे मला वाटत नाही.. सध्या आपला जो ध्वज आहे त्याच्यामागे एका क्रांतीचा ईतिहास आहे आणि जेंव्हा जेंव्हा हा ध्वज एखादा भारतीय बघतो, आपोआपच रक्त सळसळतं.. ध्वजाची रचना बदलण्यापेक्षा बाकी माकडांवर अशी जरब बसवायला हवी कि कुणी स्वप्नातही त्याचा अपमान करण्याची हिम्मत करणार नाही..

अप्पा जोगळेकर's picture

30 Jul 2010 - 9:42 am | अप्पा जोगळेकर

भारतीय++

नावातकायआहे's picture

29 Jul 2010 - 4:59 pm | नावातकायआहे

त्या XXXXना झेंडा निट लावता येत नाय (किवा मुद्दामुन उल्टा लावला) म्हनुन आपन आपला तिरंगा बदलाय्चा हे अजिबात मान्य नाय आणि डोक्याला पटत नाय.

हा तिरंगा काय एका रातित जन्माला नाय आला..

त्याउलट 'त्यांचा' कोन हित आल का आपल कोनि 'तिकड' गेल का आपन पन त्यो मुद्दामुन उलटा टांगुन 'टुकटुक' करायचि धमक दाखवलि पाय्जे.

खरं आहे तुमचं म्हणणं. पण आपण निवडून दिलेले आपले राज्यकर्ते कसे आहेत ते पहा ना! मुशर्रफना परत कां नाहीं पाठविले आपण? चिदंबरम् उठून का नाहीं आले? कृष्णांचीही तीच गत. वर "आम्हाला कांहीं वाटलंच नाहीं!" असे बोलणारे आपले राज्यकर्ते!
म्हणून मी ही कल्पना मांडली! त्यात सगळे जुनेच ठेवले फक्त symmetrical केला ध्वज इतकेच. यात आणखी जास्त चांगल्या सुधारणा ही करता येतील!
अशा कल्पनांचं स्वागत आहे.

कार्लोस's picture

30 Jul 2010 - 3:54 pm | कार्लोस

झेन्दा लाव्ला हेच खुप आहे.

काका हिरवा रंग कमी झाला आणि भगवा वाढवला तर दाढ्या कुरवाळणार्‍या पक्षांच कस होणार हो?
एक गठ्ठा मत हरवतील ना त्यांची.
तस्मात....
ध्वज उलटा लावायचं सोडा, भले उद्या कुणी तिरंग्याच्या लंगोट्या करुन वापरल्या तरी चालतील पण हा असला भगवा ध्वज कदापी खपवुन घेतला जाणार नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2010 - 5:55 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत रे गणपा. या भगव्या लोकांचं क्रूर कारस्थान आहे ते. त्यांनीच पाकड्याना सुपारी दिली असेल ध्वज उलटा फडकवायची. म्हणजे ध्वज बदलता येईल. :) त्यामुळे आधी हिरवा रंग वाढवा. नाहीतर त्या भगव्यांचा डाव यशस्वी होईल.

छोटा डॉन's picture

29 Jul 2010 - 6:06 pm | छोटा डॉन

सहमत आहे.
आम्हाला हे प्रकरण वाटते तेवढे सरळ वाटत नाही ;)

- छोटा डॉन
इथे प्रतिसादांचे पंख छाटुन मिळतील

दिपाली पाटिल's picture

29 Jul 2010 - 11:18 pm | दिपाली पाटिल

लेख छान आहे. आपला ध्वज उलटा लावला गेलाच नाही पाहीजे...तशी तुमची नव्या ध्वजाची आयडीया पण चांगली आहे पण आता ६० वर्षे वयाचा तिरंगा बदलणं कितपत शक्य आणि योग्य आहे??

जसं नावातकायआहे म्हणाल्याप्रमाणे "त्यांना झेंडा नीट लावता येत नाय (किवा मुद्दामुन उल्टा लावला) म्हनुन आपन आपला तिरंगा बदलाय्चा हे अजिबात मान्य नाय आणि डोक्याला पटत नाय."

हेही पटण्यायोग्य आहे...

दिपाली :)

नुसता अभिमान असून काय फायदा? अंगात धमक पण पाहिजे ना जशास तसे उत्तर द्यायला. भारताने पाकिस्तानचा ध्वज उलटा लावावा. भारत सरकारकडे ही हिंमत नाही, हे सगळ्या जगाला माहीत आहे, मग ऊर बडवण्यात आणि पाकिस्तानच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ आहे?

बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे. हिंमत असेल तर कोणी मुद्दामहून अमेरिकेचा ध्वज उलटा लावून दाखवावा. मग लगेच चोख उत्तर मिळेल. भारताने अशी स्थिती आणली, की मग पुढच्या वेळेस कोणी अशी चूक करणार नाही. तोपर्यंत, पाकिस्तानच नाकावर अंगठा ठेवून भारताला "टुक टुक माकडा" (Thumb your nose) करणार.

स्वाती फडणीस's picture

29 Jul 2010 - 11:32 pm | स्वाती फडणीस

आपल्या ध्वजातला भगवा रंग = त्याग
पांढरा आणि अशोक चक्र = शांती
आणि हिरवा रंग = स्मृद्धी चे प्रतिक म्हणून वापरला गेला आहे..

त्या प्रमाणे आपल्या या नव्या ध्वजाचा काय अर्थ निघतो त्याचा विचार करा.. राष्ट्र ध्वज म्हणजे फक्त काही रंगांचे पट्टे नव्हेत
आणि तसेही नुसत्या रंगांच्या पट्ट्यांना देखिल त्या त्या संदर्भात अर्थ असतात.

(तेव्हा कोणी गाय मारली म्हणून आपलंच वासरू मारू नका.)

नाहीतर खरंच हा ध्वज अंगिकारायची वेळ येईल.

एक तर आपल्या राज्यकर्त्यांकडे अजिबात हिम्मत नाही....त्या पाकड्याना खडसावता येत नाही का? पण जिथे तिथे शेपूट घालूनच फिरणारे लोक निवडून दिल्याने काय बोलनार...
आणि कोणी ध्वज उलटा लावला म्हणून ध्वजच बदलायचा ? हि कोणती पद्धत?

जिथे अशी चूक दिसेल तिथेच ती निदर्शनास आणून देऊन त्यांची कानउघाडणी करायची...घाबरायचं काय कारण?

शुचि's picture

30 Jul 2010 - 1:29 am | शुचि

नाही मी काय म्हणते - जर पाकीस्तान झेंडा उलटा लावत असेल तर आपण बदलू या ना आपला झेंडा. हाय काय अन नाय काय? उद्या ते नकाशात काश्मीर स्वतःचा भाग म्हणून दाखऊ लागले तर आपण सोडून देऊ काश्मीरवरचा हक्क नाहीतरी त्यांना तंबी देण्यापेक्षा शांतीचा मार्ग केव्हाही श्रेष्ठ्च. आज झेंडा उलटा लावतायत उद्या नकाशा बदलतील. पण आपण एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करत जाऊ दर वेळी. शांती महत्त्वाची.

नाही मी काय म्हणते - जर पाकीस्तान झेंडा उलटा लावत असेल तर आपण बदलू या ना आपला झेंडा. हाय काय अन नाय काय?

पण मी काय म्हणतो, मुळात तो झेंडा लावण्याची कामगिरी येऊन पडलेला पाकिस्तानी कर्मचारी जो कोणी असेल, त्याचा तसा हेतू असेल, त्याने मुद्दाम तसे केले असेल कशावरून? आता असेल त्याची खोपडी उलटी, नाहीतर कोणीतरी त्याला उलटे टांगलेले असेल. (किंवा त्याने स्वतःलाच उलटे टांगून घेतलेले असेल, कोणी सांगावे?) आता अशा माणसाने झेंडा सुलटा लावला तरी त्याला उलटा लावल्यासारखाच दिसणार, मग आपली 'चूक सुधारण्याचा' त्याने प्रयत्न केला, तर त्याचे नेमके काय चुकले? (लक्षात घ्या. प्रश्न 'पर्स्पेक्टिव'चा आहे.)

अशा वेळी त्याच्या वरिष्ठांकडे तक्रार करावी, की कसली माणसे तुम्ही झेंडा लटकवण्यासाठी नेमता म्हणून. निषेधही व्यक्त्त करावा. पण दुसर्‍याची खोपडी उलटी आहे म्हणून आपण आपलाच ध्वज बदलायचा? दुसर्‍याला 'पर्स्पेक्टिव' बदलू द्या हवे तर!

आणि बदला म्हणून आपणही पाकिस्तानचा ध्वज उलटा लटकवून नेमके काय साधते? आपले 'पर्स्पेक्टिव' तर सरळ आहे ना? की आपलीही खोपडी फिरली आहे?

(उलट मी तर म्हणतो की सुलटाच लावावा. म्हणजे त्यांना तो उलटा दिसेल. तसेही आजवर आपण तो सुलटाच लावत आलेलो आहोत. पण त्यांनी आजवर कधी तक्रार केलेली आहे का? नाही! मग आपणही थोडा समंजसपणा का दाखवू नये?)

उद्या ते नकाशात काश्मीर स्वतःचा भाग म्हणून दाखऊ लागले तर आपण सोडून देऊ काश्मीरवरचा हक्क

उद्या ते नकाशात काश्मीर स्वतःचा भाग म्हणून दाखवू लागले, तर आपणही काश्मीरच काय (तसे आजही भारत सरकार जम्मू आणि कश्मीर हा पूर्णपणे भारताचा भाग म्हणून अधिकृत नकाशांत दाखवतेच म्हणा! आणि त्यात काहीही चूक नाही. राजनैतिकदृष्ट्या ते योग्यच आहे.), आख्खा पाकिस्तानसुद्धा आपलाच भाग म्हणून दाखवू या की! आहे काय आणि नाही काय?

नकाशात कोणीही काहीही दाखवले, तरी प्रत्यक्ष जमिनीवरच्या स्थितीत नेमका काय फरक पडतो? (पाकिस्तानला उद्देशूनः) दाखवा लेको जे काही दाखवायचे ते!
===================================================================

"आस्क अ स्टुपिड क्वेश्चन, गेट अ स्टुपिड आन्सर" तत्त्वावर वरील टोलवाटोलवी केल्यावर, आता या बाबतीतली गंभीर उत्तरे:

(१) पाकिस्तान सरकारने, किंवा भाग घेणार्‍या देशांचे झेंडे लावण्याची कामगिरी सोपवलेल्या किंवा त्याकरिता जबाबदार असलेल्या पाकिस्तान सरकारच्या अखत्यारीतील कोणतीही व्यक्तीने, अधिकृत प्रसंगी भारताचा झेंडा उलटा लावल्यास, राजनैतिक पातळीवर त्याची दखल घेऊन त्याबद्दल योग्य त्या ठिकाणी निषेध नोंदवण्यासारखा हा प्रसंग निश्चितच आहे. आणि सरकारी पातळीवर हे होतही असावे. मात्र याउपर त्याचा बाऊ करण्यासारखे यात काहीही नाही. त्यापुढे जाऊन, त्याकरिता भारताने आपलाच झेंडा बदलणे हे अनावश्यक, निरर्थक आणि वेळेचा अपव्यय आहे. आणि त्याहीपुढे, बदला म्हणून भारतानेही अधिकृत प्रसंगी पाकिस्तानचा झेंडा उलटा लावणे हा निव्वळ पोरकटपणा आणि विनाकारण आपलीच पातळी खाली आणणे आहे. (पाकिस्तान सरकार जाणूनबुजून भारताचा झेंडा उलटा लावते, की खरोखरच चुका होतात, हा केवळ गौण प्रश्नच नव्हे, तर मुळात हा प्रश्नही नाही. भारतावर पाकिस्तानी नागरिक व्यक्तींकडून अतिरेकी हल्ला झाला तर अशा हल्ल्यामागील पाकिस्तान सरकारचा सहभाग हा महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो, आणि त्याबद्दल करण्याच्या उपायांचा उहापोहही होऊ शकतो. 'पाकिस्तान सरकारने भारताचा झेंडा उलटा लावला' हा मुळात प्रश्न होऊ शकत नाही, त्यामुळे त्यावर उपायांची चर्चा करणे हे निरर्थक ठरते. घटना घडली, निषेध नोंदवला - मामला खतम.)

(२) प्रत्येक देशाचे सरकार हे आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे आणि हितसंबंधांप्रमाणे नकाशे छापते. याचा प्रत्यक्ष जमिनीवरील स्थितीशी किंवा दाव्यांच्या न्याय्य-अन्याय्यतेशी काहीही संबंध नसतो. (किंबहुना न्याय्य-अन्याय्यताही दृष्टिकोनाप्रमाणे बदलू शकत असावी.)

- भारत सरकार भारताचा अधिकृत नकाशा छापताना संपूर्ण जम्मू आणि कश्मीर, तसेच संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे दाखवते. (अनेकदा अशा नकाशांत ताबारेषेचा / प्रत्यक्ष ताबारेषेचा उल्लेखही नसतो.) प्रत्यक्षात जम्मू आणि कश्मीरचा खूप मोठा भाग आणि अरुणाचल प्रदेशाचा काही भाग भारताच्या ताब्यात नाही. मात्र, तरीही भारताने असे अधिकृत नकाशे छापणे हे योग्यच आहे, कारण अधिकृत नकाशांतून भारत सरकारची या बाबतीतील अधिकृत भूमिका ('जम्मू आणि कश्मीर राज्य हा भारताचा अविभाज्य घटक आहे' आणि 'अरुणाचल प्रदेश हा नि:संदिग्धपणे भारताचा प्रदेश आहे') व्यक्त होते. किंबहुना याहून वेगळे काही छापणे हे (प्रत्यक्ष स्थितीबद्दलच्या सत्याच्या कितीही जवळ गेले, तरी) भारत सरकारने स्वतःच्याच अधिकृत भूमिकेचे स्वतःच जाहीर आणि अधिकृत खंडन केल्यासारखे व्हावे.

(अवांतर: यावरून आठवले. मी कॉलेजात असतानाची, १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धातील गोष्ट. पाकव्याप्त कश्मीरमध्ये एक बस दरीत कोसळून पंचवीसएक माणसे मेली. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरील राष्ट्रीय बातम्यांत ही घटना, 'पाकिस्तानात बस कोसळून' वगैरे वगैरे अशी, बाकी जागेबिगेबद्दलच्या तपशिलात न शिरता, वर्तवली गेली. खुद्द रेडियो पाकिस्तानवरील अधिकृत बातमीपत्रात ही बातमी 'आजा़द कश्मीरमध्ये घडली' अशी दिली गेली. या तपशिलावरून थेट आकाशवाणीच्या वृत्तविभागाच्या डायरेक्टरशी 'भारताने पाकव्याप्त कश्मीरवरील आपला दावा अधिकृतरीत्या सोडला काय?' अशा छापाचे पत्र लिहून पंगा घेतल्याचे - आणि त्या पत्राला खुद्द संबंधित डायरेक्टरच्या अशिष्टंटाकडून खुलासेवजा उत्तरही आल्याचे - आजही चांगलेच आठवते. खुलासा काहीसा 'नंतरच्या बातमीपत्रात आम्ही ही चूक दुरुस्त केली होती. आकाशवाणीच्या बातमीपत्रांत रस दाखवल्याबद्दल आभार.' अशा स्वरूपाचा होता. असो.)

- चीन जेव्हा अधिकृत नकाशे छापते, तेव्हा (बहुधा) अख्खा अरुणाचल प्रदेश हा चीनचा प्रदेश असल्याचे दाखवत असावे, असे वाटते. (चीनशी संबंध येणारे मिसळपाव-सदस्य कदाचित याबद्दल खात्रीलायक माहिती देऊ शकतील.) तसेच जम्मू आणि कश्मीरचे चीनव्याप्त भाग हे चीनच्या त्या भागातील प्रदेशांचे भाग असल्याचे दाखवत असावे, असे वाटते. हे चीनच्या अधिकृत भूमिकेशी मिळतेजुळते आहे. मात्र अरुणाचल प्रदेशाचा भारताच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेला भाग जोवर भारताच्या ताब्यात आहे, तोवर चीनने काहीही छापले तरी भारताला फरक पडू नये, आणि अरुणाचल प्रदेश आणि जम्मू आणि कश्मीरचा चीनव्याप्त भाग जोपर्यंत चीनच्या ताब्यात आहे, तोपर्यंत भारताने काहीही छापले, तरी चीनला फरक पडू नये. वाटाघाटी चालू राहतील, त्यातून पुढेमागे काही ठोस निष्पन्न झालेच, तर कदाचित प्रदेशांची थोडीफार देवाणघेवाण होईल किंवा होणारही नाही, आणि कदाचित दोन्ही देशांचे अधिकृत नकाशे हे त्या वेळी, कोणी सांगावे, या नवीन प्रत्यक्ष परिस्थितीच्या अधिक जवळ येतीलही. किंवा येणारही नाहीत. पण ती वेळ येईपर्यंत दोन्ही देशांत छापले जाणारे नकाशे हे असेच छापले जात राहणार. आणि त्याने दोन्ही बाजूंना काहीही फरक पडणार नाही.

- पाकिस्तान अधिकृत नकाशे नेमके कसे छापते, याच्या तपशिलांबद्दल मला खात्री नाही. मात्र संपूर्ण जम्मू आणि कश्मीर राज्य हे पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवत नाही, एवढे निश्चित. पाकव्याप्त कश्मीरचे दोन भाग - तथाकथित 'आजा़द जम्मू और कश्मीर' आणि 'नॉर्दर्न टेरिटरीज़' (याचे मराठी भाषांतर 'उत्तर प्रदेश' असे करणे जिवावर येते.). हे भागसुद्धा पाकिस्तानने छापलेल्या अधिकृत नकाशांत 'पाकिस्तानचे भाग' म्हणून दाखवले जातात का, याबद्दल साशंक आहे. कारण या दोन भागांवरच काय, पण आख्ख्या जम्मू आणि कश्मीर राज्यावर पाकिस्तानचा दावा असला, तरी पाकिस्तानच्या (माझ्या माहितीप्रमाणे) अधिकृत धोरणानुसार, आख्खे जम्मू आणि कश्मीर राज्य हा 'वादग्रस्त प्रदेश' आहे. हा 'वाद' जोपर्यंत अधिकृतरीत्या सोडवला जाऊन संपुष्टात येत नाही, तोपर्यंत (पाकिस्तानचा आख्ख्या राज्यावर दावा असला तरी) तो 'पाकिस्तानचा प्रदेश' होऊ शकत नाही, 'वादग्रस्त प्रदेश'च राहतो. (हे भारतीय धोरणाच्या एकदम विरुद्ध आहे. भारताच्या मते हा वादग्रस्त प्रदेश नाहीच, भारताचाच नि:संदिग्ध प्रदेश आहे, आणि यात 'वाद' जर काही असलाच, तर तो पाकिस्तानने बळकावलेला भाग पाकिस्तान भारताच्या ताब्यात नेमका कधी आणि कसा देणार, एवढाच आहे.) आणि एकदा 'वादग्रस्त प्रदेश' आहे असा दावा केला, की 'वाद सुटेपर्यंत' त्यापैकी पाकिस्तानच्या प्रत्यक्ष ताब्यातला भागही 'पाकिस्तानचा अधिकृत भाग' म्हणून दाखवता येत नाही. कारण (अ) असा भाग हा 'नि:संदिग्धपणे अधिकृत पाकिस्तानी प्रदेश' म्हणून दाखवला तर, तो जम्मू आणि कश्मीर राज्याच्या प्रदेशाचा भाग असल्याने, संपूर्ण जम्मू आणि कश्मीर राज्य हा 'वादग्रस्त प्रदेश' असल्याबद्दलच्या धोरणाला आणि दाव्याला तडा जातो, आणि (ब) एकदा का पाकिस्तानच्या ताब्यातील प्रदेश हा 'नि:संदिग्धपणे अधिकृत पाकिस्तानी प्रदेश' म्हणून दाखवला, की मग असा प्रदेश हा व्यापक 'वादग्रस्त प्रदेशा'चा भाग असल्याचा दावा सोडावा लागतो, आणि पर्यायाने उर्वरित जम्मू आणि कश्मीर राज्यावरील दाव्यावर पाणी सोडावे लागते.

याचा अर्थ, सद्यपरिस्थितीत संपूर्ण जम्मू आणि कश्मीर राज्यावर दावा कायम ठेवायचा झाल्यास, पाकिस्तानसमोर पर्याय दोनचः (अ) संपूर्ण जम्मू आणि कश्मीर राज्यावर केवळ दावा न ठेवता, (भारतीय धोरणासारखेच) संपूर्ण जम्मू आणि कश्मीर राज्य हे पाकिस्तानचा नि:संदिग्धपणे अधिकृत भाग आहे, केवळ त्यातील काही भाग हा अनधिकृतपणे भारताच्या ताब्यात आहे, असे धोरण ठेवणे, किंवा (ब) संपूर्ण जम्मू आणि कश्मीर हा वादग्रस्त प्रदेश आहे (पक्षी: या प्रदेशावर कोणाचेच नि:संदिग्ध आणि अधिकृत अधिपत्य नाही, भारताचे नाही तसे पाकिस्तानचेही नाही), मात्र या संपूर्ण प्रदेशावर पाकिस्तानचा दावा आहे, असे धोरण ठेवणे.

पैकी, पाकिस्तानने दुसरे धोरण स्वीकारलेले असल्याने, पाकिस्तानला जम्मू आणि कश्मीर हा पाकिस्तानचा भाग म्हणून अधिकृत नकाशांतून दाखवणे हे (स्वतःचेच अधिकृत धोरण आणि दावे धोक्यात आणल्याशिवाय) शक्य नाही.

(या 'वादग्रस्त प्रदेशा'च्या धोरणामुळे इतरही अनेक गमतीजमती होतात. पण सध्याचा तो विषय नाही.)

- नकाशांबद्दलच बोलायचे झाले, तर भारताबाहेर छापलेली आंतरराष्ट्रीय प्रकाशने भारतात अधिकृतरीत्या वितरित होतात. ('टाइम', न्यूज़वीक'सारखी मासिके वगैरे.) कधीकधी अशा प्रकाशनांत एखाद्या बातमीच्या अनुषंगाने संपूर्ण भारताचा आणि किंवा क्वचित जम्मू आणि कश्मीर किंवा अरुणाचल प्रदेशाजवळच्या भागांचा एखादा तपशीलवार नकाशा येतो. किंवा क्वचित भारतात अस्तित्व असलेल्या परंतु भारताबाहेरील मूळ असलेल्या 'रीडर्स डायजेस्ट'सारख्या एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनसंस्थेकडून जगाच्या तपशीलवार नकाशांचे एखादे पुस्तक (अ‍ॅटलस) प्रसिद्ध होते. किंवा एखाद्या ग्रंथात विषयाच्या अनुषंगाने एखादा नकाशा प्रसिद्ध होतो. अशी पुस्तके किंवा प्रकाशने ही खास करून भारतात वितरणासाठी सहसा प्रकाशित झालेली नसतात. केवळ उर्वरित जगाप्रमाणेच ती भारतातही वितरित होतात. अशा पुस्तकांत भारताच्या संबंधित भागांचे नकाशे हे प्रकाशनाच्या देशात प्रचलित असलेल्या दृष्टिकोनानुसार असणार, आणि असा दृष्टिकोन हा भारत सरकारच्या अधिकृत धोरणांशी मिळताजुळता असेलच, असे नाही, किंबहुना बहुधा नसतोच, हे ओघाने आले. (बहुतकरून जम्मू आणि कश्मीरचा प्रदेश हा एकतर पूर्णपणे वादग्रस्त असा दाखवून विविध देशांच्या प्रत्यक्ष ताब्यातील प्रदेश हे तुटक रेषांनी दाखवतात, किंवा सरळसरळ त्यात्या देशाचा भाग म्हणून दाखवतात.) अशी प्रकाशने ही जाणूनबुजून भारत सरकारच्या विरोधात प्रकाशित केली जात नसल्याने भारत सरकार त्यांवर बंदी आणत नाही; मात्र वितरणापूर्वी संबंधित नकाशांवर 'या नकाशात दाखवलेल्या भारताच्या सीमारेषा या भारताच्या अधिकृत किंवा वास्तव सीमा दर्शवत नाहीत' अशा स्वरूपाचा 'अधिकृत शिक्का' आवर्जून मारते.

- भारतात (किंवा कदाचित चीन आणि तैवान वगळता बहुतांश उर्वरित जगात) प्रकाशित आणि वितरित होणार्‍या जगाच्या बहुतांश नकाशांत, चीन आणि तैवान हे दोन वेगवेगळे देश असल्याचे दाखवले जाते. हे चीन आणि तैवान या दोन्ही देशांच्या अधिकृत धोरणांविरुद्ध तर आहेच; किंबहुना बहुधा प्रकाशनाच्या देशाच्या चीन किंवा तैवानसंबंधीच्या अधिकृत धोरणाशीही विसंगत असावे. पण लक्षात कोण घेतो? आणि फरकही (चीन किंवा तैवानसकट) कोणाला पडतो?

- फार कशाला, जॉर्डन आणि इजिप्त वगळता अरब जगतातील एकाही देशाचे इस्राएलशी राजनैतिक संबंध नाहीत. एवढेच नव्हे, तर इस्राएलचे अस्तित्वही मानले जात नाही. म्हणजे अधिकृत दृष्टिकोनातून पाहिल्यास इस्राएलशी वैर तर सोडाच, पण जणूकाही या नावाचे काही पृथ्वीतलावर अस्तित्वातच नाही. आणि या धोरणाचा पाठपुरावाही चमत्कारिकरीत्या होऊ शकतो, असे ऐकले आहे. म्हणजे त्या प्रदेशाचा उल्लेख बहुधा 'पॅलेस्टाइन' किंवा तत्सम होत असावा, असे वाटते. किंवा कदाचित इस्राएलचे नाव घेणे हा गुन्हा किंवा पापही असू शकेल, पण खात्री नाही. इस्राएलच्या नागरिकांस यापैकी बहुतांश देशांत प्रवेश निषिद्ध आहे. एवढेच नव्हे, तर त्रयस्थ देशाच्या नागरिकाच्या पासपोर्टात इस्राएलचा व्हिसा, शिक्का, उल्लेख किंवा इस्राएलमधील प्रवासाचा किंवा इस्राएलशी कोणत्याही प्रकारच्या संबंधाचा अप्रत्यक्ष पुरावा जरी सापडला, तरी तेवढ्या कारणावरून यांपैकी अनेक देशांत संबंधित देशाचा योग्य व्हिसा असूनही प्रवेश नाकारला जाऊ शकतो. (प्रत्यक्ष इस्राएली शिक्के नसले, तरी इजिप्त किंवा जॉर्डनच्या इस्राएलबरोबरच्या भूसीमेवरील इजिप्त किंवा जॉर्डनच्या सीमाअधिकार्‍यांचा शिक्का जरी सापडला, तरी 'म्हणजे नक्की हा/ही पुढे इस्राएलला गेला/ली असणार; कारण तेथून इतर कोठे जाणे शक्य नाही' हा तर्क 'अप्रत्यक्ष पुरावा' म्हणून पुरतो.)

अशा परिस्थितीत, या देशांमध्ये वितरित होणारे जगाचे किंवा इस्राएलच्या आजूबाजूच्या प्रदेशाचे नकाशे नेमके कशा पद्धतीने छापले जातात, आणि काय दाखवतात, याची मला कल्पना नाही. पण जोपर्यंत इस्राएल अस्तित्वात आहे आणि स्वतःच्या भूप्रदेशावर जोपर्यंत त्याचा ताबा आहे, तोपर्यंत, कोणीही काहीही छापले तरी, त्याने (किमानपक्षी इस्राएलला) नेमका काय फरक पडतो?

सारांशः असल्या फालतू गोष्टींमध्ये अस्मितेचा बाऊ करणे हे आत्मविश्वासाच्या अभावाचे आणि स्वतःबद्दलच्या 'दुर्बल' अशा प्रतिमेचे, दुर्बलतेच्या मानसिकतेचे द्योतक आहे. विचारमंथनात वेळ घालवण्याच्या लायकीच्या अनेक बाबी आहेत. ही विशिष्ट बाब त्यांपैकी नाही.

निश्चित आकडा सांगू शकत नाही, पण 'पाकिस्तानने - किंवा अन्य कोणत्याही देशाने - एखाद्या प्रसंगी - किंवा अनेक प्रसंगी - भारताचा झेंडा उलटा लावला' ही बाब साधारणतः पाच सेकंदांपेक्षा (किंवा अशा एखाद्या बातमीचा मथळा वाचायला जेवढा वेळ लागू शकतो, त्यापेक्षा) अधिक वेळ विचार करण्याच्या लायकीची आहे, असे वाटत नाही.

याचा अर्थ अशी बाब घडल्यास अशा प्रसंगी भारत सरकारने कोणत्या ना कोणत्या अधिकृत सरकारी पातळीवर त्याबद्दल संबंधित देशाकडे निषेध नोंदवू नये असा मुळीच नाही. जरूर नोंदवावा. आणि तपशील जाहीर झाले नाहीत किंवा अगदी उच्चपातळीवर हे घडले नाही, तरी बहुधा पडद्यामागे आणि योग्य पातळीवर राजप्रथेनुसार हे होतच असावे. मात्र असा निषेध नोंदवल्यानंतर त्यापुढे त्या घटनेबद्दल किंवा अशी घटना पुन्हा घडण्याच्या शक्यतेबद्दल आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल विचार करण्यात हशील नाही. आणि याकरिता आपलाच ध्वज बदलण्याचा विचार, अगदी विरंगुळा म्हणूनसुद्धा, करण्यात तर मुळीच नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jul 2010 - 9:53 am | llपुण्याचे पेशवेll

जेव्हा भारताचा झेंडा वारंवार उलटा लावला जातो तेव्हा तो मुद्दाम केलेला प्रमादच असतो त्याबद्द्ल पाकिस्तानला सणसणीत सुनावणे एवढा एकच पर्याय योग्य आहे. त्यापुढे जाऊन केलेले २००० शब्दांचे किंवा २००० पानांचे युक्तिवाद फोल आहेत.
सुनावल्या नंतरही जर सुधारणा झाली नाही तर जशास तसे धोरण जरूर अवलंबावे.

भारतीय's picture

30 Jul 2010 - 2:37 pm | भारतीय

फार अभ्यासू लेख लिहिलात्..त्याबद्दल तुमचे अभिनंदन.. पण जरा जास्तच अभ्यासु लेख झालाय असे नाही वाटत? तुम्हि जसे लिहिलेय त्यावरुन तुमचा या विषयाशी संबंधित नक्किच खुप अभ्यास असणार, पण तुम्हिच सांगताय तितकेच या विषयाचे गांभीर्य असल्यास या फारश्या गंभीर नसलेल्या विषयास तुम्हीच खुप गंभीर केलेत असे वाटते.. जसे तुमच्याच शब्दात.."भारताचा झेंडा उलटा लावला' ही बाब साधारणतः पाच सेकंदांपेक्षा (किंवा अशा एखाद्या बातमीचा मथळा वाचायला जेवढा वेळ लागू शकतो, त्यापेक्षा) अधिक वेळ विचार करण्याच्या लायकीची आहे, असे वाटत नाही."
पण तुम्ही यावर फारच विचार करुन खुप वेळही दिलाय...त्याबद्दल अभिनंदन..!!

माझ्या लेखाच्या सुरुवातीलाच मी जर्मनीतील एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. तिथे केवळ अनवधानाने आपला ध्वज उलटा लावला होता.
पाकिस्ताने राज्यकर्ते तो मुद्दाम लावत असतीलच कारण प्रोटोकॉल विभागाचे लोक एरवी अशी चूक होऊ देत नाहींत!
"केवळ अशी चूक होऊच देता कामा नये म्हणून आपला ध्वज दोन्ही अक्षांवर सारखा (symmetrical) असावा काय" एवढाच माझ्या लेखाचा उद्देश होता, पण प्रतिसादांचा रोख वेगळाच दिसतोय.
तरी सर्वांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा ही विनंती.
यात दिलेल्या व्हीडियोच्या लिंक शोधताना अमेरिकेत कांहीं अमेरिकन नागरिकांनी ते आणीबाणीच्या परिस्थितीत असताना लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ध्वज उलटा लावल्याचे, कुणी कुठल्याशा निषेधाचे प्रतीक म्हणून ध्वज उलटा लावल्याचे उल्लेख आहेत. पण ती कारणे वेगळीच आहेत.
वर दिलेल्या माझ्या एका वाक्याचा पुनरुल्लेख करतो. "आपला ध्वज दोन्ही अक्षांवर सारखा (symmetrical) असावा काय" एवढ्यापुरताच माझ्या लेखाचा उद्देश आहे.
धन्यवाद
सुधीर काळे

'पंगां'चा प्रतिसाद त्यातल्या 'पर्स्पेक्टिव्ह' या मुद्द्यावरून आवडला!

पंगा's picture

30 Jul 2010 - 9:29 am | पंगा

अंमळ 'पुटिंग इट इन पर्स्पेक्टिव'चा माफक प्रयत्न करून पाहिला झाले!

ज्ञानेश...'s picture

30 Jul 2010 - 8:46 am | ज्ञानेश...

पंगा साहेबाचा प्रतिसाद मनापासून आवडला.
असे प्रतिसाद जालीय चर्चांना एक दर्जेदार उंची प्राप्त करून देतात !

राजेश घासकडवी's picture

30 Jul 2010 - 8:53 am | राजेश घासकडवी

काळ्या पांढऱ्यातल्या राखाडी छटा दाखवणं यासाठी एक उन्नत दृष्टीकोन लागतो. पंगांनी तो दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

मात्र असाच विवेकी विचार सगळ्यांनी केला तर ट्यार्पीचं काय होणार असा प्रश्न पडून राहिला आहे, त्याचं काय करायचं?

कशाला भांडताय.. पुढच्यावेळी चांदतारा उलटा फडकवू ठिक आहे? ;)

नगरीनिरंजन's picture

30 Jul 2010 - 12:59 pm | नगरीनिरंजन

पाकिस्तान आपला झेंडा मुद्दाम उलटा लावत असेल तर तो त्यांचा बालिशपणा आहे. त्या साठी आपण त्यांचा झेंडा उलटा लावण्याची किंवा आपला झेंडा बदलण्याची गरज नाही.
ते बालिशपणा करतात आणि आपल्यालाही त्या पातळीवर ओढायला बघतात. आपण त्या खालच्या पातळीवर जाऊन भांडण्यात अर्थ नाही कारण त्या पातळीवरचा त्यांचा अनुभव दांडगा आहे.
शिवाय झेंडा बदलला आणि नवा झेंडा उलटा लावता येत नसला तरी इतर प्रकारे त्याचा अपमान होऊ शकतोच ना?
झेंडा हे आपल्या सार्वभौमतेचं केवळ प्रतीक आहे आणि प्रतीकाशी थोडाफार खेळ झाला तरी मूळ गोष्टीला धक्का पोचत नाही. लहान मुलाना जसं दरडावून चुका दुरुस्त करुन घेतात तसं फक्त करायचं आणि तेच आपण करतो.

पंडित गागाभट्ट - पंगा यांचे अभिनंदन
पंगा,
मला जे वाटत होत तेच तुम्ही छान अन सुरेख शब्दात मांडले
धन्यू !! धन्यू !! धन्यू !!

अगदी अप्रतिम योग्य प्रतिसाद ! Very Well Balanced "Point -of- view"

सारे जहाँ से अच्छा हिन्दोसितां हमारा । हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा ॥धृ॥

घुर्बत मे हो अगर हम रहता है दिल वतन मे । समझो वही हमे भी दिल है जहाँ हमारा ॥१॥

परबत वो सब से ऊंचा हमसाय आसमाँ का । वो संतरी हमारा वो पासबा हमारा ॥२॥

गोदी मे खेलती है इसकी हजारो नदिया । गुलशन है जिनके दम से रश्क-ए-जना हमारा ॥३॥

ए- अब-रौद गंगा वो दिन है याद तुझको । उतर तेरे किनारे जब कारवाँ हमारा ॥४॥

मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना । हिन्दवी है हम वतन है हिन्दोसितां हमारा ॥५॥

युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिट गए जहाँ से । अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा ॥६॥

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी । सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥

इक़्बाल कोइ मेहरम अपना नही जहाँ मे । मालूम क्या किसी को दर्द-ए-निहा हमारा ॥८॥

--कविवर्य आलम-ए-इकबाल

INDIA FLAG - SHORT HISTORY & MEANING OF TRICOLOUR IN INDIAN FLAG

The National Flag of India was adopted in its present form during an ad hoc meeting of the Constituent Assembly held on the 22 July 1947, a few days before India's independence from the British on 15 August, 1947.

The flag is a horizontal tricolour of "deep saffron" at the top, white in the middle, and green at the bottom. In the centre, there is a navy blue wheel with twenty-four spokes, known as the Ashoka Chakra, taken from the Ashoka pillar at Sarnath. The diameter of this Chakra is three-fourths of the height of the white strip. The ratio of the width of the flag to its length is 2:3 Each colour in the flag represents something different. the saffron stands for purity and spirituality, white for peace and truth, green for fertility and prosperity and the wheel for justice.

"Bhagwa or the saffron colour denotes renunciation of disinterestedness. Our leaders must be indifferent to material gains and dedicate themselves to their work. The white in the centre is light, the path of truth to guide our conduct. The green shows our relation to (the) soil, our relation to the plant life here, on which all other life depends. The "Ashoka Chakra" in the centre of the white is the wheel of the law of dharma. Truth or satya, dharma or virtue ought to be the controlling principle of those who work under this flag. Again, the wheel denotes motion. There is death in stagnation. There is life in movement. India should no more resist change, it must move and go forward. The wheel represents the dynamism of a peaceful change."

प्रदीप's picture

31 Jul 2010 - 11:07 am | प्रदीप

चुकिचे आहे कारण त्याचा अ‍ॅस्पेक्ट रेशो (मराठी प्रतिशब्द ?) बदलला आहे. त्यामुळे मधील वर्तुळ, वर्तुळ राहिलेले नाही. ते कृपया दुरूस्त करावे.

मग तुम्हीच टाका ना फोटो अ‍ॅस्पेक्ट रेशो व्यवस्थीत न बदलता . मला ते वर्तुळच दिसत आहे तुम्हाला आणखिनही काही चुकीचे दिसेल . 'जशी दृष्टी, तशी च सृष्टी' दिसते काय करणार ??

खुदके संग बाता : "बाल की खाल, कैसे निकाली जाती है" यह 'प्रदीप' से सिखना

अप्पा जोगळेकर's picture

31 Jul 2010 - 12:55 pm | अप्पा जोगळेकर

आस्पेक्ट रेशो मधे घोटाळा झालाय खरा. असाच फोटो कोणत्यातरी शासनाच्या वेबसाईट्वर पाहिला होता. तिथून तर घेतला नाही ना? चालायचच.

मृत्युन्जय's picture

30 Jul 2010 - 3:25 pm | मृत्युन्जय

पण समजा पाकड्यांनी आपल्या तिरंग्यातील अशोकचक्रात मुद्दाम कमी आर्‍या दाखवल्या तर काय करायचे? असे करा ना सरळ मध्ये फक्त गोल दाखवुयात. २४ रेघा नकोतच मधल्या. आणि कदाचित ते भगवा रंग मुद्दाम लाल रंगासारखा दाखवतील (चीनच्या सुचनेने). तर ते टाळण्यासाठी आपण की नाही तो भगवा रंग तेवढा काढुन टाकु. त्याच्याऐवजी फक्त हिरवा रंग ठेवु. तो त्यांच्याकडे भरपुर आहे. आणि त्यांच्या झेंड्यामध्ये पण आहे. त्यामुळे त्यात ते चुक करणार नाहीत. म्हणजे आता आपल्या झेंड्यामध्ये उरतो फक्त हिरव्या पार्श्वभुमी वरचा निळा गोल. आता आपण पाकिस्तानला नाकावर अंगठा ठेवून "टुक टुक माकडा" करू शकू. प्रश्नच मिटेल.

पंगाचा विस्तृत प्रतिसाद आवडला.. पर्स्पेक्टीव्ह छानच..
सुधीर काका, तुमच्या मुद्द्या मागची भावना कळली पण उपाय अप्रस्तुत वाटतो.. दुसर्‍याच्या मूर्ख वागण्यामुळे आपल्यात बदल करणे म्हणजे मिळमिळीतच.. म्हणजे उद्या त्यांनी झेंडा आडव्या ऐवजी उभा लावला तर आणि सगळी कडून सिमेट्रीकल केलात तर तिरका लावला तर? आणि वर म्हटल्याप्रमाणे अशोकचक्रातल्या आर्‍या कमी केल्या तर? आपण दरवेळा नवीन झेंडा काढत बसणार का? तुमचा (इथे तुमच्या झेंडयाचा) दुसर्‍याने आदर दाखवावा असे वाटत असेल तर तशी जरब ठेवता आली पाहिजे आणि ते जमत नसेल तर निषेधच पुरे! आपण झेंडे बदलत राहिलो तर माकड पुन्हा टेर्‍या बडवणारच, बघा मी झेंडा बदलायला लावला म्हणून. .
जय हिंद!

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2010 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

जाउदे हो ! आपण हिरव्या झेंड्याच्या चड्ड्या घालुन हिंडु त्यांच्यासमोर !

हाय काय आन न्हाय काय.

सुधीर काळे's picture

31 Jul 2010 - 2:51 pm | सुधीर काळे

वाहीदा,
तुझा प्रतिसाद आवडला.
काका