सध्या पाण्यावरून धुमशान सुरू आहे. नळाचे पाणी (टॅप वाटर) विरुद्ध बाटलीबंद पाणी . आमच्या इकडे (आखाती वाळवंटात) बाटलीबंद पाण्याचा जास्त वापर आहे. त्यातही काही जणांनी घरी पाणी शुद्ध करण्याचे महागडे (किंमत सुमारे ३५,००० रुपये) यंत्र (वाटर प्युरिफायर)लावले आहे. त्यांचे म्हणणे हे की बाटलीबंद पाण्यापेक्षा असे शुद्ध केलेले पाणी आरोग्यास जास्त चांगले. कारण त्यातील विरघळलेले क्षार ( टी. डी. एस. – Total Dissolved Solids) चे प्रमाण बाटलीबंद पाण्यापेक्षा कमी आहे.
प्रत्यक्षात WHO च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे टी. डी. एस. चे प्रमाण ५०० मिलि प्रती १००० लिटर (500 ppm) असायला हरकत नाही. हे प्रमाण बाटलीबंद पाण्यात १५०मिलि प्रती १००० लिटर ( approx 150 ppm) असते तर प्युरिफायर ने शुद्ध केलेल्या पाण्यात ५० मिलि प्रती १००० लिटर (approx 50 ppm) किंवा त्यापेक्षा कमी असु शकते. टी. डी. एस. चे प्रमाण आणि आरोग्य या विषयावर WHO मात्र जास्त प्रकाश टाकत नाही त्यामुळे स्वच्छ पाण्याचे निकष काय असावे हा प्रष्न अनुत्तरितच राहतो.
भारतात असलो की पाण्यामध्ये सरळ क्लोरिन चे चार थेंब टाकून पाणी गटागटा प्यायला मोकळे. टी. डी. एस. चे टेन्शन नाही की बॅक्टीरिया वा व्हायरस चा उपद्रव नाही. परंतु पाणी खळखळ उकळुन वा गाळुन पिणे किंवा तुरटि टाकून त्यातला गाळ वेगळ करण्याच्या आपल्या सनातन पद्धतीला अजूनही तोड नाही हे मात्र खरे.
आमचा सध्या मुक्काम पोस्ट कुवेत; त्यामुळे सध्या बाटलीवरच (पाण्याच्या !) अवलंबुन आहे, (गंमत म्हणजे इथे पाणी १५ रुपये लिटर आणि तेल म्हणजे पेट्रोल ९ रुपये लिटर भावाने मिळते )
असो.
मला अजूनही पाण्याचा हा मूलभूत प्रष्न सोडविता आला नाही, तुम्हाला कोणाला याचे खात्रिलायक निदान मिळले काय?
तुम्ही हा प्रश्न कसा सोडवला? मला जाणुन घ्यायला आवडेल.
प्रतिक्रिया
29 Jul 2010 - 2:38 pm | इंटरनेटस्नेही
गंमत म्हणजे इथे पाणी १५ रुपये लिटर आणि तेल म्हणजे पेट्रोल ९ रुपये लिटर भावाने मिळते
एकमेकांना कुरिअर करुया का? इथुन आपल्याला पाणी पाठवेन, त्याच बोटल मध्ये भरुन तुम्ही पेट्रोल पाठ्वा!
ह.घ्या.!
(वाहनचालक)
29 Jul 2010 - 3:10 pm | शुचि
हा हा. मस्त!
30 Jul 2010 - 6:02 pm | इंटरनेटस्नेही
धन्यवाद!
(विचित्र सेन्स ओफ हुमर असलेला)
29 Jul 2010 - 2:45 pm | अवलिया
परंतु पाणी खळखळ उकळुन वा गाळुन पिणे किंवा तुरटि टाकून त्यातला गाळ वेगळ करण्याच्या आपल्या सनातन पद्धतीला अजूनही तोड नाही हे मात्र खरे.
काय सांगता ! मला वाटले होते आधुनिक युगात इतर सनातन गोष्टिंसारखेच हे पण मातीमोल झाले असेल.. असो.
बरेच लोक शुद्ध पाणी दगडावर, मुर्तींवर धार धरुन अभिषेक करतात ते पाहुन मला फार यातना होतात हो.. किती सांगायचे त्यांना.. ऐकतच नाहीत नुसती नासाडी करत असतात.
देवबाप्पा त्यांना शिक्षा करो.
29 Jul 2010 - 2:51 pm | महेश हतोळकर
नक्की करेल. तेवढा अभिषेकाचा नवस बोलून ठेवा म्हणजे झालं
29 Jul 2010 - 5:10 pm | भारतीय
गम्मत म्हणजे भारतातही पाणी (बाटलीबंद) १५ रु. लि. मिळते.. पेट्रोल मात्र ५४-५५ रु. लि. आहे.. आईशपथ कुवेत परवडला..