(हळूहळू हा तापच झाला स्वैपाक अन्)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
9 Jul 2010 - 2:43 pm

मिपावरील थोर विडंबनकार, संपादक व आता बल्लवाचार्य केशवसुमार यांना समर्पित. त्यांच्याच दोन विडंबकविता व एक पाककृती यांच्या मिश्रणातून खालील रचनेला प्रेरणा मिळालेली आहे.

हळूहळू हा तापच झाला स्वैपाक अन्
भोजनमात्र रहावे आता कन्क्लूजन

येती अश्रु - न दु:खाचे ना आनंदाचे
वेगाने कांद्यांचे त्या होते कर्तन.

जीव घेऊ मी का त्या दुर्बळ प्राण्यांचा
मसुरी देऊन तडका करतो ते उलथन

हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे-
फोडणी-चुरचुरी कडे करतो दुर्लक्षन.

उगाच पडले काळे कणकेचे गोळे
पोळपाटि जणू झाले त्यांचे मउ तिंबन

पाट्या वरवंट्यावर चटणी उडली कशी
आणि कुणाच्या हाती लागे ही झणझण

फुड प्रोसेसर काय मला हे अधी सांगा
नंतर सांगा कसले हे चाले मंथन...

कधीच ना हा सुधारेल "केश्या" मेला
सुरूच राहिल जाली हे ना ते लेखन

हास्यकवितापाकक्रियाविडंबन

प्रतिक्रिया

सहज's picture

9 Jul 2010 - 2:45 pm | सहज

हा हा मस्त!

बहुदा केसुंची पुढची डिश व्हेज भुना, खिमा अशी काहीतरी येणार बॉ!

अवलिया's picture

9 Jul 2010 - 2:47 pm | अवलिया

का का का राजेशकाका‍?

केसुकाका बरे रमले आहेत पाककृती तर का त्यांना उचकवता‍ ?
येतील परत कातर घेवुन तर माझे लेख, प्रतिसाद कचाकच कापतील.... :(

पहाटवारा's picture

9 Jul 2010 - 2:59 pm | पहाटवारा

खरा ताप हा नसे मुळी स्वैपाक,
प्रश्न असा कि, "कोन घिसे बरतन??"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 3:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा ... स्वयंपाकाचं विडंबन का विडंबनांवर अमावस्या?

अदिती

गणपा's picture

9 Jul 2010 - 3:19 pm | गणपा

=)) अफलातुन

श्रावण मोडक's picture

9 Jul 2010 - 3:50 pm | श्रावण मोडक

:)

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 6:10 pm | शानबा५१२

काय कविता आहे!!
चांगली आहे का??

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे