बंद!

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
5 Jul 2010 - 7:50 pm

बंद जाहीर झाला होता. पण नेहेमीसारखा तुमच्या आमच्या आयुष्यातला नव्हे. तर राडेसेनेच्या एका पदाधिकाराच्या घरांत जाहीर झाला होता. आपण त्याला शाप्र म्हणुया. बायकोने, मुलांनी एकमुखाने मिळून हा बंद जाहीर केला होता. कारण होते, त्याची वागणुक! म्हणजे घरातली आणि थोडीफार बाहेरची. ऐकल्यावर पहिल्यांदा तर त्याने सातमजली हंसून घेतले. पण मुले व बायको अजिबात हसत नाहीयेत हे लक्षांत येताच तो गुर्मीने ओरडला,' अरे जारे, काय करता बघतोच मी पण!
शाप्र मोठ्या मेहनतीने या स्थानावर पोचला होता. अनेक लोकांचे पत्ते काटून त्याने 'वरची' मर्जी संपादन केली होती. मध्यंतरीच्या सत्तेच्या काळात तर त्याने आपले आधीच भरलेले घर आणखी भरुन घेतले होते. पूर्वी माळ्यावर 'डिप्लोमॅट' चा खच असायचा. आता तो अस्सल स्कॉचचा असायचा. बायकोला तर सोन्याने मढवून काढले होते.
हाताच्या पांची बोटांत अंगठ्या, पांढरा झब्बालेंगा, कपाळावर शेंदराचा टिळा असे हे व्यक्तिमत्व पोस्टरवरही ठसठशीत दिसायचे. मुलांना ती जे मागतील ते त्याने हजर केले होते.असे असताना यांच्या मागण्या काय याचा त्याला प्रश्न पडला होता.
बायकोला त्याचे रात्री बाहेर जाणे अजिबात पसंत नव्हते. मुले वयांत आली होती. बाईकवरुन बागडत होती. त्यांना बापाने आपल्या वैयक्तिक बाबतीत विचारपूस केलेली चालत नव्हती. लहानपणी त्यांनी मारही खाल्ला होता, पण आता नुसते चढ्या आवाजात बोललेले त्यांना खुपत होते. त्याला फार वाटे की मुलांनी खूप शिकावे आणि मग गुंडगिरी करावी. पण मुलांचे शिक्षणात लक्षही नव्हते आणि गतीही नव्हती. ती आत्ताच बापाच्या जिवावर रोज नवीन लफडी करत होती. ती निस्तरायला पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. त्याचेही त्याला विशेष काही वाटत नव्हते. पण अलिकडे ,अरे ला कारे ची भाषा सुरु झाली होती आणि ती त्याच्या सहनशक्तिपलीकडील होती. मग तोही डाफरे ,पण आता जिममध्ये जाणार्‍या मुलांवर हात उचलण्याची हिंमत राहिली नव्हती.बायको पूर्वी त्याला फार घाबरायची. पण आता मुलांमुळे तिच्यातही हिंमत वाढली होती.
बंदचा दिवस उजाडला. सकाळी आठ वाजता तांबारलेल्या डोळ्यांनी तो उठला. नेहेमीप्रमाणे चहा काही आला नाही. वैतागून तो उठला, चहा-साखरेचे डबे शोधू लागला. बायकोने सर्व कपाटांना कुलपे लावून टाकली होती आणि स्वस्थपणे खुर्चीवर बसली होती. तो ओरडला, "आता च्या देतेस का हानू एक ?" त्याला दरवाजात चाहुल लागली. त्याचा थोरला दारात बोटाने किल्ल्या फिरवत उभा होता. तो बाहेरच्या खोलीत गेला. भला मोठ्ठा प्लाज्मा टी.व्ही. लागत नव्हता. "हा काय चावटपना लावलाय ?" दुसर्‍याच क्षणी खळ् कन कांचेचा आवाज आला. धाकट्याने बॅटने टीव्ही फोडला होता. तो प्रचंड दचकला. खरे म्हनजे कांच फुटण्याचा आवाज त्याच्या परिचयाचा. उमेदवारीच्या काळात नुसती कांच बघितली तरी त्याचे हात शिवशिवायचे. पण स्वतःच्याच घरात ? पाठोपाठ कांचा फुटण्याचे प्रचंड न थांबणारे आवाज येऊ लागले. तो भांबावून गेला.
शेवटी धीर करुन ओरडला, " अरे का नासधूस करता ?" पोरं ओरडली, अवो, तुमाला काय, असे धा टीव्ही आनाल तुमी. आमचं म्हननं कबुल करनार की नाई त्येवडं बोला!!
दोन्ही हात तोंडावर धरुन तो म्हणाला, कबुल, कबुल बाबांनो, पण ह्ये थांबवा.
मुले बोटांचा 'व्ही' दाखवत आईच्या समोर गेली अन् म्हणाली, आये, आपला बंद संबर टक्के येशस्वी जाला!!!!

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2010 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त ! हा 'बंद' आवडला....!

-दिलीप बिरुटे

अरुंधती's picture

5 Jul 2010 - 8:12 pm | अरुंधती

जे दिल्लीत ते गल्लीत की कॉय? आणि जे गल्लीत ते घरीपण! घरी देखील अशीच राडा संस्कृती जोपासावी राडा पुरस्कर्त्यांनी! ;-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चिरोटा's picture

5 Jul 2010 - 8:25 pm | चिरोटा

बंद आवडला. You must be the change you want to see in the world. गांधी उगाच म्हणत नसत.!
P = NP

दशानन's picture

5 Jul 2010 - 9:33 pm | दशानन

=))

हा हा हा मस्तच !

दशानन's picture

5 Jul 2010 - 10:51 pm | दशानन

स्वःसंपादित.

शिल्पा ब's picture

5 Jul 2010 - 10:22 pm | शिल्पा ब

लै भारी... =D> =D> =D> =D>
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मेघवेडा's picture

5 Jul 2010 - 11:12 pm | मेघवेडा

"च्यायला आणखी 'बंद'चा धागा" म्हणत उघडला पण हा बंद आवडला ब्वॉ. :) मस्त! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Jul 2010 - 12:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी! पण धागाप्रवर्तकाचे नाव वाचून काहीतरी चांगलं वाचायला मिळेल याची खात्री होती.

तुमचा "बंद"चा ताळेबंद आवडला!!

अदिती

पुष्करिणी's picture

6 Jul 2010 - 12:44 am | पुष्करिणी

मस्त!
पुष्करिणी

स्पंदना's picture

6 Jul 2010 - 12:12 pm | स्पंदना

चांगली आयडीया आहे...घरी पण बंद्..जरा घोषणा वगैरे टाकायच्या ना!! छान लिहिलय..मस्त.